2/17/2011

अनुवाद -२

'मॅन'स सर्च फॉर मीनिंग' चाच अजून एक उतारा अनुवादित करायचा प्रयत्न आहे. ह्यापुढे दुसर्‍या कुठल्या पुस्तकातील करण्याचा प्रयत्न करेन.

मूळ उतारा -

The medical men among us learned first of all: "Textbooks tell lies!" Somewhere it is said that man cannot exist without sleep for more than a stated number of hours. Quite wrong! I had been convinced that there were certain things I just could not do: I could not sleep without this or I could not live with that or the other. The first night in Auschwitz we slept in beds which were constructed in tiers. On each tier(measuring about six-and-a-half to eight feet) slept nine men, directly on the boards. Two blankets were shared by each nine men. We could, of course, lie only on our sides, crowded and huddled against each other which had some advantages because of the bitter cold. Though it was forbidden to take shoes up the bunks, some people did use them secretly as pillows in spite of the fact that they were caked with mud. Otherwise one's head had to rest on the crook of an almost dislocated arm. And yet sleep came and brought oblivion and relief from pain for a few hours.
I would like to mention a few similar surprises on how much we could endure: we were unable to clean our teeth, and yet, in spite of that and a severe vitamin deficiency, we had healthier gums than ever before. We had to wear same shirts for half a year, until they had lost all appearance of being shirts. For days, we were unable to wash, even partially, because of frozen water-pipes, and yet the sores and abrasions on hands which were dirty from work in the soil did not suppurate (that is, unless there was frostbite). Or for instance, a light sleeper, who used to be disturbed by the slightest noise in the next room, now found himself lying pressed against a comrade who snored loudly a few inches from his ear and yet slept quite soundly through the noise.
If someone now asked of us the truth of Dostoevski's statement that flatly defines man as a being who can get used to anything, we would reply, "Yes, a man can get used to anything, but do not ask us how." But our psychological investigations have not taken us that far yet; neither had we prisoners reached that point. We were still in the first phase of our psychological reactions.

अनुवाद -

आमच्यातले वैद्यकीय व्यावसायिक सर्वप्रथम एक गोष्ट शिकले, "पाठ्यपुस्तकं खोटं सांगतात!" कुठेतरी असं म्हटलं गेलंय की माणूस ठराविक तास झोपल्याखेरीज जिवंत राहू शकत नाही. अगदीच चूक! मी काही ठराविक गोष्टी करू शकत नाही अशी माझी पक्की खात्री होती : मी अमुक गोष्टीशिवाय झोपू शकत नाही किंवा मी तमुक गोष्टीशिवाय राहू शकत नाही. ऑशविट्झमधल्या पहिल्या रात्री आम्ही एकाहून अधिक स्तर असलेल्या पलंगांवर झोपलो. प्रत्येक स्तरावर (साडेसहा बाय आठ फूट आकाराचा) नऊ माणस, थेट लाकडावरच. दोन शाली नऊ माणसांसाठी मिळून. साहजिकच आम्ही सर्व एका अंगावर होऊन, एकमेकांना बिलगून गर्दी करूनच झोपू शकत होतो, ज्याचा कडाक्याची थंडी असल्याने थोडा फायदाही होत होता. जरी बूट आपल्या पलंगावर नेणं निषिद्ध होतं, तरीही काहीजण त्या चिखलानं भरलेल्या असूनही चोरून त्यांचा वापर उशीसारखा करायचे. नाहीतर त्याला आपलं डोकं जवळपास निखळलेल्या हाताच्या घडीवर ठेवणं भाग होतं. आणि तरीही झोप यायची अन काही तासांसाठी अलिप्तता अन वेदनांपासून मुक्ती द्यायची.
मी इथे आमच्या सहनशीलतेबद्दलच्या ह्यासारख्याच आश्चर्यकारक अनुभवांचा उल्लेख करेन : आम्हाला दात साफ करणंही जमत नसे आणि त्यातच जीवनसत्वांची भयानक कमतरत असं असतानाही आमच्या हिरड्या आधीपेक्षा जास्त मजबूत होत्या. आम्ही एकच सदरा जवळपास सहा महिने घालत असू, अगदी तो सदरा आहे असं वाटेनासं होईस्तोवर. कित्येक दिवस आम्हाला आंघोळही करता येत नसे, अगदी हातपायही धुता येत नसत, कारण पाण्याचे पाईप थंडीनं गारठून जात आणि तरीही हातावरचं खरचटलेलं किंवा छोट्या जखमा ज्या दिवसभर मातीत काम केल्याने अस्वच्छ असत कधीच चिघळल्या नाहीत (अर्थातच, तो हिमदंश नसेल तर). किंवा उदाहरणार्थ, एखाद्याची झोप हलकी असेल, ज्याला पलिकडच्या खोलीत आलेल्या थोडक्याशाही आवाजानं जाग येत असेल, तो आता त्याच्या कानात मोठ्यानं घोरणार्‍या साथीदाराला बिलगून अगदी शांत अन प्रगाढ झोपलेला सहज दिसेल.
जर तेव्हा आम्हाला कुणी डोटोव्हस्कीच्या त्या विधानातलं सत्य विचारलं असतं, ज्यामध्ये तो सरधोपटपणे माणसाची व्याख्या, 'एक असा जीवजंतू जो कशाशीही जुळवून घेऊ शकतो' अशी करतो, तर आम्ही उत्तर दिलं असतं की, "हो, मनुष्यप्राणी कशाशीही जुळवून घेऊ शकतो, पण कसा ते आम्हाला विचारू नका." पण आपले मानसशास्त्रीय शोध आपल्याला अजून तिथवर घेऊन गेलेले नाहीत, आणि आम्ही कैद्यांनीही अजून ती पातळी गाठली नव्हती. आम्ही अजूनही आमच्या मानसशास्त्रीय प्रतिक्रियांच्या पहिल्याच पातळीवर होतो.

12 comments:

 1. मस्त जमला आहे... :)

  ReplyDelete
 2. छान अनुवाद केला आहेस.. आगे बढ़ो !!!

  ReplyDelete
 3. योगेश,
  धन्यवाद भाऊ!!!!

  ReplyDelete
 4. संकेतानंद,
  धन्यवाद भावा!!!

  ReplyDelete
 5. बाबा, मस्तच जमलाय अनुवाद. ते तुरुंगातले अनुभव वाचून एकदम काटा आला अंगावर. शॉशांक आठवला !

  ReplyDelete
 6. अनुवाद छानच जमलाय...आणि तू असं काही लिहिल्याने आमच्याही नजरेखालून जातं. :)

  ReplyDelete
 7. हेरंब,
  अरे त्या पुस्तकात ह्याहून भयानक भयानक प्रसंग आहेत.. आणि बरेचदा लेखक इतक्या त्रयस्थ पद्धतीनं ते लिहितो की ह्या मनुष्यानं प्रत्यक्षात हे सर्व भोगलंय, हे जाणवून अंगावर काटा येतो! :-|

  ReplyDelete
 8. अनघाताई,
  एकेकाळी कुठलंतरी पुस्तक अनुवादित करण्याची इच्छा होती... ती हौस अशी भागवून घेतोय! :)

  ReplyDelete
 9. विद्या, अनुवाद छानच! वाचताना काटा आला अंगावर. खरेच, जीवेच्छा माणसाला कश्याही प्रसंगांतून तारून नेते. :)

  ReplyDelete
 10. श्रीताई,
  हो गं! ते पुस्तक वाचताना बर्‍याचदा हादरायला होतं. खरंच माणूस फार चिकट प्राणी असतो जीवनाच्या बाबतीत! :)

  ReplyDelete
 11. Anonymous11:26 PM

  चांगलाच जमला आहे अनुवाद...!!!

  ReplyDelete
 12. देवेन,
  धन्यवाद रे भाऊ! :)

  ReplyDelete