5/09/2011

चारोळ्या - पुन्हा एकदा

चालत्या बोलत्या दुःखांना
मधेच वाचा फुटते
एकमेकांचं ऐकून
ओठांवर हास्याची लकेर उमटते

----

उडत्या पक्ष्याला कधीकधी
जमिनीचा विसर पडतो
जागा कळून पुन्हा ओळख पटताना
चार-दोन पंखांचा बळी जातो

----

वेड्या वार्‍याला आपल्या शक्तीचा
पुरेसा अंदाज नसतो
समुद्राबरोबरच्या निरागस खेळात
कुणाचा उभा संसार कोलमडतो

----

एकदा गिरक्या घेता घेता
उकाड्यानं पृथ्वीला चक्कर आली
लाख-दोन लाख माणसं मेली अन
शे-दोनशे खडबडून जागी झाली

----

खोटं बोललं म्हणून शिक्षा भोगायला
मी काय आता लहान आहे?
खरं बोललो तर शिक्षा होईल भाऊ
माझा भारत महान आहे

----

19 comments:

 1. कवितांपेक्षा मला चारोळ्या परवडतात बाबा (बाबावर श्लेष...:)) असो...
  मस्त रे..शेवटची चारोळी तर एकदम मार डाला....

  ReplyDelete
 2. अजून जपान जात नाहीये न नजरेसमोरून ? :(
  उत्तम झाल्या आहेत चारोळ्या.

  ReplyDelete
 3. लई भारी !!
  शेवटची चारोळी जाम आवड्या...:)

  ReplyDelete
 4. Anonymous11:39 PM

  >>>अजून जपान जात नाहीये न नजरेसमोरून ?
  उत्तम झाल्या आहेत चारोळ्या.

  +१००
  >>>लाख-दोन लाख माणसं मेली अन
  शे-दोनशे खडबडून जागी झाली ...

  त्या शे- दोनशे मधे आपण आहोत का पडताळून पहातेय रे....

  ReplyDelete
 5. जबरी.. प्रचंड आवडल्या.. आणि अपर्णाशी सहमत.. पद्यापेक्षा चारोळ्या परवडल्या..

  ReplyDelete
 6. शेवटच्या दोन खुप आवडल्या....मस्त

  ReplyDelete
 7. मस्तच बाबा.. प्रत्येक चारोळीतून डोकावणारी नैसर्गिक आपत्तीबद्दलची सूचक मांडणी खूप आवडली !!

  ReplyDelete
 8. सुंदर,छान,मस्त लईभारी,

  ReplyDelete
 9. मॉंकस्सम बाबा... शेवटल्या दोन कातिल आहेत... एकदम लौली रे...

  ReplyDelete
 10. मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत रे ह्या! :(

  ReplyDelete
 11. ajit_dafle@rediffmail.com7:00 AM

  Tumache Koutuk Keval 4 Olitun Karata Yene Keval Ashakya Aahe. Apratim.

  ReplyDelete
 12. Anonymous10:01 PM

  बाबा ,सगळ्याच चारोळ्या मस्त झाल्या आहेत..... शेवटीच तर खूप खूप भावली...

  ReplyDelete
 13. आज भरपूर दिवसांनी उत्तर लिहितोय.. आधी माफी मागतोय.. ब्लॉगला घरघर लागल्याचा परिणाम जुन्या पोस्ट्सवरही झाला.. असो..
  सर्वांचे खूप खूप आभार! :)

  ReplyDelete