"तुला माहितीय डी. एका लेखकासाठी सर्वांत वाईट काळ कुठला असतो?" दृष्टद्युम्नानं तोंडातल्या सबवे सॅंडविचच्या महत्प्रयासाने तोडलेल्या तुकड्याचे चावे घेणं चालूच ठेवत उत्सुकतेचे खोटे भाव चेहर्यावर आणत बभ्रुवाहनाकडे पाहिलं.
"स्वतःच्याच साहित्याची कीव येणं" बभ्रुवाहन कुठेतरी दूर नजर लावत म्हणाला.
डी अजूनही चावेच घेत होता. लेट्युस, काकडी, टोमॅटो, भोपळी मिरची, कांदा, ऑलिव्ह आणि नावं माहित नसलेले कित्येक सॉसेस मिश्रित तो एकच घास बब्याच्या सहनशीलतेचा घास घेण्यास समर्थ होता.
"डी!" काहीच उत्तर न आल्याने अभिमानाची तंद्री मोडल्यानं बब्या वैतागून ओरडला. "मी काहीतरी वक्तव्य केलं"
डी अजूनही चावत होता.
बब्या असहायपणे त्याचा घास संपण्याची वाट पाहत होता. डी पुढचा घास घेण्यासाठी हातातल्या सॉसेसनी लडबडलेल्या आणि चहूबाजूनी भाज्या बाहेर ओघळत असलेल्या अर्धवट उघडलेल्या पुडक्यामध्ये जागा शोधत होता.
"डी, पुढचा घास घेण्यापूर्वी जरा थांब."
"अरे किती चावशील!" डी घास चावून संपल्यावर म्हणाला.
"इतक्या फालतू कोट्या करतोस म्हणून तुला मित्र नाहीत."
"I don't have friends, Watson. I have 'a' friend." डीनं डायलॉग मारला.
"आवरा!"
"लवकर काय बोलायचं ते बोल. मला ह्या सबवेसोबतच्या युद्धाचा पुढचा राऊंड सुरू करायचाय."
"अरे हो. मी म्हणत होतो. एखाद्या लेखकासाठी सर्वांत वाईट काळ म्हणजे.."
"...स्वतःच्याच साहित्याची कीव येणं"
"तू ऐकलं होतंस तर."
"त्यानं काय फरक पडतो."
"म्हणजे, ऐकलंस तर ऐकल्याचं किमान दर्शवायला नको?"
"त्यानं नाही रे, स्वतःच्याच साहित्याची कीव आल्यानं काय फरक पडतो?"
"अरे असं कसं. नवीन काही लिहायची इच्छा मरून जाते."
"तू 'रायटर्स ब्लॉक' हा शब्द ऐकला आहेस का?"
"हा 'रायटर्स ब्लॉक' नाहीये!" बब्यानं झटकन उत्तर दिलं.
"Interesting." डीनं पहिल्यांदाच संभाषणात लक्ष घातलं. "हा नाहीये म्हणजे.. तू स्वतःबद्दल बोलतोयस का?"
"अलबत्!"
"तू सध्या लिहित नाहीयेस, बरोबर?"
"बरोबर!"
"मग जरा प्रमाण मराठी बाजूला ठेव."
"विषयांतर होतंय."
"पुन्हा तेच!"
"आता तुला प्रमाण विरूद्ध बोली असा वाद घालायचाय का?"
"मला वाद नकोय, संवाद हवाय"
"काहीही बोलतोयस का आता?"
"कसं वाटतं ऐकायला? म्हणूनच म्हणतोय जरा साधं बोलत जा."
"जरा विषयाला धरून बोलशील का?"
"बरं तू धर बघू विषयाला."
"'विषया' नावावरची कोटी.."
"करत नाहीये मी, मुद्द्यावर ये."
"छान, आता तू मला सांग हे."
"समस्या काय आहे तुझी?"
बब्यानं कपाळावर आठ्या आणत सुरूवात केली. "म्हणजे बघ. स्वतःच्याच पूर्वीच्या लिखाणात कमतरता दिसू लागतात. वाचकानुनय, लोकानुनय, कोट्या, शब्दच्छल वगैरे सगळं पाणचट वाटू लागतं. स्वतःचंच कल्पनादारिद्र्य प्रकर्षानं जाणवू लागतं. बरंचसं लिखाण एकांगी आणि बाळबोध वाटू लागतं."
"एक मिनिट."
"काय?"
"मला अजून एक घास घेउ दे, मग तुझं टीकास्त्र चालू दे, म्हणजे माझा घास संपेपर्यंत तुझं बोलून होईल आणि मग मी पुढच्या ब्रेकमध्ये काही उत्तराचा प्रयत्न करू शकेन."
बब्यानं हतबुद्धतेनं पुन्हा एकदा तंद्री लावली.
"म्हणजे बघ."
"काय?" बब्याची तंद्री मोडली. वेताळ बोलू लागल्यावर विक्रम जसा दचकत असेल आणि सावध होत असेल तसा बब्या दचकला आणि सावधपणे ऐकू लागला.
"जेव्हा तू हे सर्व निकृष्ट लिहिलं होतंस."
"निकृष्ट?"
"आत्ता तूच तर म्हणालास, कीव येते वगैरे."
"हो पण.." डीनं नेहमीप्रमाणे यॉर्कर टाकला होता. "बरं, पुढे बोल."
"तेव्हा तुझी मनःस्थिती काय होती?"
"म्हणजे?"
"ते लिहिताना, तुझ्या मनात काहीतरी सुरू असेल, एखादी विचारशृंखला, ज्यामुळे तू ते लिहायला उद्युक्त झाला असशील."
"ह्म्म.. कुणास ठाऊक?"
"कुणास नाही, तुला ठाऊक आहे, पण अंतर्मनामध्ये. आत्ता ते तुला आठवणार नाही. पण काहीतरी विचाराने प्रेरित होऊनच ते योग्य-अयोग्याचा अदमास घेत केलेलं लिखाण असणार."
"तू असं का बोलतोयस?"
"असं कसं?"
"म्हणजे.." बब्याची जीभ रेटेना, "प्रमाण मराठी."
"तुला दर्शवायला की संवादांमध्ये प्रमाण वापरणं रूपककथांसाठी ठीक असतं पण वास्तववादी किंवा ललितलिखाणात बोली जास्त शोभून दिसते."
"पुन्हा विषयांतर."
"फारसं नाही. तरीही, पुढे म्हणजे, जरी ते वाचकानुनयी, एकांगी, कोटीपूर्ण, शब्दच्छलयुक्त वाटलं, तरी ती मनोवस्था होती आणि तुझं लेखन हे त्या मनोवस्थेचं प्रतिबिंब होतं. जसा एखादा चित्रकार मनोवस्थेचं एक विस्कळित चित्र जसंच्या तसं उतरवतो, पण दर्दी रसिकांना त्या विस्कळितपणामध्येच एक नादपूर्ण लय सापडते. स्वतः चित्रकारासाठी ते चित्र एक कमअस्सल कलाकृती असते कारण त्याचं प्रतिबिंब त्याला कधीच परिपूर्ण वाटत नाही. किंबहुना अस्सल कलाकाराची ती एक खूणच असते."
"थँक्स!"
"आता कसं!"
"काय?"
"काही नाही."
"म्हणजे मी जे लिहिलंय ते चांगलं असू शकतं तर."
"योग्य शब्दप्रयोग केलास. असू शकतं! कारण सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी. 'डोरियन ग्रे' प्रत्येकासाठी वेगळा असतो."
"तू एकदम 'एलिट' मंडळींचे डायलॉग मारतोयस डी!"
"जर तुझ्या लक्षात आलं असेल की तू आता सामान्य बोलू लागला आहेस, तर माझ्या कष्टांचं चीज़ झालं असं म्हणेन मी!"
"चीज़ माहित नाही, पण मेयोनीज निश्चितच झालं आहे आणि ते तुझ्या सँडविचच्या कागदावरून ओघळून तुझ्या हातावरून टेबलाकडे झेपावण्याच्या तयारीत आहे."
डीनं त्याच्या स्वभावाला अनुसरून सरळ तो कागद काढून टाकला. बाहेर झेपावणार्या भाज्या एका टिश्यूमध्ये गोळा केल्या आणि छिन्नविच्छिन्न सँडविचचे तुकडे ट्रे मध्ये एका टिश्यूपेपरवर गोळा केले.
"पण मी काहीही नवीन लिहू लागलो की मला पूर्वी लिहिलेल्यासारखंच वाटतं आणि सांगितलं तसं सगळंच कृत्रिम वाटू लागल्याने लिहिण्याची क्रियाच निरर्थक वाटू लागते. त्यामुळे लिहायचं सुचत असूनही ते पटत नसल्याने लिहिणं होत नाही. ह्याला 'रायटर्स ब्लॉक' कसं म्हणणार?"
"'रायटर्स शो-ऑफ' म्हणायचं काय?"
"असं काय म्हणतोस रे?"
"हे बघ बब्या. सोप्या गोष्टी अवघड करू नयेत. नाव काय करायचंय तुला? प्रॉब्लेम आहे, तर आहे. उत्तर शोध ना. वपु सांगतात, कुठल्याही समस्येवर तीन गोष्टींशिवाय काहीही उपाय नसतो वेगळा - 'वेळ, पैसा आणि माणसं'. ह्याच्यापलिकडची समस्या जगात अस्तित्वात नाही. आणि मला ते पटतं."
"आहे ना. इच्छाशक्ती. ती कुठून आणणार?"
"बरोबर. सापडलं की नाही उत्तर? डॉ. हाऊसप्रमाणे 'एलिमिनेशन' मेथडनं मिळालं आपल्याला उत्तर. आता करा उपाय!"
"उत्तर माहित असून देता येत नाही अशी समस्या आहे ही."
"बब्या. जेव्हा तू 'मी लेखक आहे' ह्या भूमिकेतून बाहेर पडशील, तेव्हाच त्या 'रायटर्स ब्लॉक' मधून बाहेर येशील."
".."
"प्रत्येक कलाकृती ही तिच्या व्यक्त होण्याच्या क्षणानंतर कलाकाराच्या नजरेतून उतरतच जाते. त्यामध्ये नवीन काही नाही. पण प्रत्येक व्यक्त होण्याच्या क्रियेतून कलाकार आपल्या परिपूर्ण कलाकृतीच्या दिशेनं पावलं टाकत असतो."
"काहीही. हे म्हणजे थॉमस अल्वा एडिसनच्या It just turned out to be a thousand step process सारखं झालं."
"मी निकोला टेसलावादी आहे हे माहित असतानाही, मी एडिसनचं वाक्य चोरेन असं कसं वाटलं तुला?"
बब्या थोडा ओशाळला.
"हाहा!" डी पहिल्यांदाच हसला. "एडिसन टेसलाचं श्रेय चोरू शकतो तर मी एडिसनचं वाक्य नाही चोरू शकत?"
"....."
"बरं ते सोड. मी बोललो ते सिरियसली बोललो. कलाकाराच्या कलाकृतीचे टप्पे असतात - पहिल्या टप्प्यात कलाकृती म्हणजे निव्वळ नक्कल असते, दुसर्या टप्प्यात ती प्रेरित असते, तिसर्या टप्प्यात ती प्रतिबिंब असते आणि चौथ्या टप्प्यात एकरूपता येते."
"हे कुणाचं चोरलंस?"
"आठवत नाहीये."
"डझन्ट मॅटर. चांगलं आहे."
"चांगलं वाईट शी मतलब नाही रे. फेसबुकवर थोडीच टाकायचंय. तुला मी काय म्हणतोय ते कळलं का?"
"हेच ना की, कलेपेक्षा मोठा होऊ नकोस."
"बरोब्बर. स्वतःची कलाकृती कमअस्सल वाटणं ठीक आहे पण सरसकट कीव वाटणं, व्यक्त होणं निरर्थक वाटणं वगैरे थांबवलं पाहिजे. परिपूर्णतेची आस असणं वेगळं आणि परिपूर्णतेचा ध्यास असणं वेगळं."
"तीदेखील मनोवस्थाच आहे नाही का?"
"नक्कीच!"
"मग त्यावरच एखादा लेख लिहू का?"
ह्या वाक्यानंतर वेताळ परत झाडाच्या फांदीवर जाऊन लटकू लागला, अर्थात डीनं उर्वरित सँडविचकडे मोर्चा वळवला.

No comments:
Post a Comment