मी लहान होतो तेव्हा (हे मी कितव्यांदा लिहितोय ते आठवत नाहीये) मी एक छानशी गोष्ट ऐकली होती.
एकदा एका गावामध्ये सभा सुरू असते. सभा गावाच्या शाळेशेजारच्या मैदानावर सुरू असते. सभेचा विषय हा गावाच्या विकासाशी आणि भविष्याशी निगडीत असा महत्वाचा असतो. नुसतेच समाजधुरिण नाही, तर गावातल्या प्रत्येकानेच आवर्जून ऐकले पाहिजेत असे तज्ज्ञ, मान्यवर वक्ते सभेला आलेले असतात. सभा शांततेत आणि चांगल्या प्रकारे सुरू असते. एक महत्वाचा वक्ता उठून भाषणाला उभा राहतो. त्याचं भाषण सुरू असतानाच शाळेची मधली सुट्टी होते. मुलं बाहेर येऊन शाळेच्या अंगणात खेळ खेळायला लागतात. थोडासा गोंधळ घालायला लागतात. त्यामुळे सभेतल्या श्रोत्यांचं लक्ष तिकडे जातं आणि बरेचसे श्रोते मुलांच्या लीला पाहण्यात मग्न होतात. थोड्याच वेळात वक्त्याच्या हे लक्षात येतं. त्याचं भाषण अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आलेलं असतं, पण हळूहळू जवळपास ८०% श्रोत्यांचं लक्ष विचलित झालेलं असतं. सभेचा नूर बघून एकदम वक्ता म्हणतो.
"आता मी एक गोष्ट सांगतो. तुमच्यापैकी कुणीच ही गोष्ट कधीच ऐकली नसेल."
गोष्ट शब्द ऐकताच अनेक श्रोत्यांचं लक्ष पुन्हा वक्त्याकडे जातं. वक्ता पुढे सुरू करतो.
"एकदा काय होतं. देवांचे गुरू बृहस्पती, एक चिमणी आणि एक मासा असे तिघेजण अरण्यामार्गे इंद्राकडे निघालेले असतात. रस्ता काट्याकुट्यांचा असतो. मजल दरमजल करत ते तिघे पुढे पुढे जात असतात."
आता हळूहळू सगळ्या श्रोत्यांचं लक्ष पुन्हा वक्त्याकडे वळतं.
"अचानक त्यांना रस्त्यात खूप मोठी नदी लागते. आता आली का पंचाईत. नदी पार कशी करायची? चिमणी उडते आणि थेट नदीच्या पलिकडे जाऊन पोचते. मासा पाण्यात झेपावतो आणि पोहत पोहत पलिकडे जाऊन पोचतो. आता ते दोघेजण बृहस्पतीकडे बघू लागतात."
श्रोते गोष्टीत पूर्णपणे शिरलेले असतात आणि ह्याच क्षणी वक्ता आपल्या भाषणातला महत्वाचा मुद्दा मांडून पुढच्या भाषणाला सुरूवात करतो.
लोक एकदम भांबावतात. ते एकदम गोंधळ सुरू करतात. वक्त्याला ही कल्पना असतेच, त्यामुळे तो लगेच थांबून काय झालं म्हणून विचारतो. लोक म्हणतात, "बृहस्पतीचं पुढे काय झालं सांगा?"
वक्ता म्हणतो, "जेव्हा माणसं महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फुटकळ गोष्टींकडेच लक्ष देण्यात किंवा फुटकळ गोष्टी करण्यात वेळ घालवणं बंद करतील, तेव्हा बृहस्पती आपोआप नदीपार पोहोचेल."
आता हेच बघा ना, आजच बातमी वाचली, गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा उभारणार आहेत. मोदीभाईंना मी मानतो, एक अतिशय उत्तम प्रशासक आहेत ते. पण हा निर्णय वाचून मला धक्काच बसला. इकडे आपल्याकडे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचाय. सगळे पुतळा पुतळा खेळणार आहेत. करोडो रुपयांचा चुराडा करायचा, तितकेच सगळ्यांनी घशात घालायचे आणि बांधायचे काय, तर पुतळे? आणि जास्त पुतळे पुतळे करू नका राव, तिकडे मायावती उत्तर प्रदेशात स्वतःचा एखादा भव्य पुतळा बांधेल. पूल, महामार्ग, धरणं वगैरे महत्वाच्या गोष्टी बांधता येतात, पण आपण फुटकळ गोष्टी बांधायच्या - पुतळे!
भारतीय वंशाच्या लोकांना जागतिक स्तरावर सन्मान मिळतात, आपलं पब्लिक त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जाणून बिणून घेत नाही, ते लोक भारतीय वंशाचे आहेत असं सांगत चार दिवस मिशीला कोकम लावून तूप तूप म्हणून सांगत फिरतात. (आणि माझ्यासारखे ते भारतीय नाहीतच हे सगळ्या आजूबाजूच्यांना ओरडून समजावून सांगण्यात मग्न असतात.)
गेल्या निवडणुकीवेळी वाचलेला माझ्या लक्षात राहिलेला प्रसंग. प्रियांका गांधी-वड्रा आपल्या मुलांना घेऊन कुठल्यातरी गावात प्रचाराला गेली होती. मुलांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं होतं. मुलं पांढरे कपडे घालून सगळ्यांना नमस्कार वगैरे करत होते. गावाच्या मुखियानं मुलांकडे बघून म्हटलं, "ये इंदिराजी की चौथी पिढी है। गुण तो दिखायी दे रहें हैं।"
आवरा. अरे चौथी पिढी म्हणून काय काहीही! आणि हे छापायचं? च्यायला इथे सिग्नलवरचं पोरही नमस्कार करून भीक मागतं, तिथे गुण नाही दिसत का?
संजय दत्त कोर्टाच्या फेर्या मारत होता, तेव्हा न्यूज चॅनेलवर त्याने आज त्याचा लकी निळा शर्ट घातलाय, आज त्याने काळा शर्ट घातलाय, आज त्याच्या हातात अंगठी होती हे सगळं दाखवत होते. च्यायला, मला तर डाऊट आहे बर्याच जणांना त्याच्यावर कसली केस चाललीय ते माहित नसेल. माझंच बघा, मला तो निळा शर्ट घालून हवालदाराला सलाम करत आत जाणारा संजय दत्त आठवतोय, पण त्याचं एग्झॅक्ट निकालपत्र आठवत नाहीये.
अबू सालेम क्लिन शेव्ह करून कोर्टात कसा चिकना दिसत होता, राहुल गांधीनं दाढी बाळगली, मग काढली मग पुन्हा बाळगली. आयला राहुल गांधीनं भाषणात काहीही चुका केल्या त्या दिसत नाहीत. आपलं पब्लिक म्हणजे काय विचारू नका!
आपल्याला २ ऑक्टोबरला गांधी आठवतात लालबहादूर शास्त्री आठवत नाहीत, लोकसभेत सोनिया चालते सावरकरांचं तैलचित्र चालत नाही, लालू लक्षात राहतो लोहिया लक्षात राहत नाहीत, निवडणुकांच्या दिवशी सुट्टी दिसते मतदान दिसत नाही, गुजरात दंगली लक्षात राहतात गोध्रा आणि दंगलीनंतरचा गुजरात लक्षात राहत नाही, रामदासांची जात दिसते (च्यायला इथेपण आणलं का मी) रामदास दिसत नाहीत, (रामदासांवरून आठवले) रामदास आठवले दिसतो बाबासाहेब आठवत नाहीत, आमच्या भागात संजय निरुपम दिसतो पण बिनखड्ड्याचा रस्ता दिसत नाही, अस्लम शेख आणि निरूपमचे बॅनर दिसतात झाडं दिसत नाहीत, टीव्हीवर जाहिराती दिसतात सिरियल्स दिसत नाहीत, सिरियल्समध्ये चकचकीत कपड्यातले स्त्रीपुरूष दिसतात स्टोरी दिसत नाही, आयपीएल घोटाळ्यात ललित मोदी लक्षात राहतो शरद पवार लक्षात राहत नाहीत ('आयपीएल घोटाळ्यात' असं मुद्दाम लिहिलं नाहीतर शरद पवार कसे लक्षात राहणार नाहीत, एकवेळ सावरकरांना विसरतील लोक पण शरद पवारांना शक्यच नाही), आयपीएल दिसते चीअरलीडर्स दिसत नाहीत, दबंगमध्ये पडदाभर सलमान दिसतो सोनाक्षी दिसत नाही, गोलमाल-३ च्या प्रोमोमध्ये जास्तवेळ प्रभुजी दिसत नाहीत, कपुच्चिनो दिसतं सकस गरम दूध दिसत नाही, जेवताना पिझ्झा दिसतो सलाड दिसत नाही.
छ्या! बघा ह्या पोस्टमध्येसुद्धा बृहस्पती पार होता होता राहिले!
Showing posts with label देश. Show all posts
Showing posts with label देश. Show all posts
10/07/2010
2/13/2010
इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ !
'नटरंग' सिनेमामध्ये एक छान कटाव आहे. तशी 'नटरंग'ची सगळीच गाणी मला आवडतात, पण सध्याची परिस्थिती पाहून ह्या ओळी फारच समर्पक वाटतात.
"मिरगाचा (मॄग नक्षत्राचा) हंगाम दाटला, फाटलं आभाळ। इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ॥"
२६/११/२००८ ला रात्री ११ वाजता मी विमानाने मुंबईला उतरलो होतो. विमानातच सूचना मिळाली होती की शहरात काहीतरी घडलंय म्हणून. पण किती भयंकर आहे ह्याचा अंदाज आधी आप्रवसन (इमिग्रेशन) ला आणि मग विमानतळाबाहेरची सुरक्षाव्यवस्था बघून आणि शेवटी विमानतळावरून घरी जातानाचे रिकामे रस्ते पाहून आला. आणि घरी पोहोचल्यावर टीव्ही पाहून अंदाजाचं रुपांतर अविश्वासात झालं. मग ते हल्ले संपल्यावर तिथे मेणबत्त्या लावायचे प्रकार झाले. नेत्यांनी एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढल्या. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दोन चार मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. मुंबईच्या 'स्पिरिट'ला सलाम झाला. शहीदांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबांना मदतीच्या नावाखाली त्यांचे अपमानही झाले. मीडियावाल्यांनी चार-पाच वर्षांची कमाई ४-५ महिन्यांमध्येच करून घेतली. सरकारतर्फे पाकिस्तानला ललकारण्यात आलं संबंध तोडण्याची भाषा झाली. "पुरावे" सुपूर्द करण्यात आले. जिवंत दहशतवाद्याच्या खटल्यातून सर्व मृतांना न्याय मिळवून देण्याच्या गोष्टी झाल्या.
७-८ महिनेच झाले असतील. पुन्हा तेच सरकार निवडून आलं. ज्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते, बहुतेकांना पुन्हा तीच खाती मिळाली. बाकीच्यांची राजकीय पुनर्वसनं झाली. पाकिस्तानने 'पुरावे' अपुरे असल्याचे सांगत सर्व प्रमुख आरोपींना सोडून दिलं. हाफिज सईद गच्च गर्दीच्या रॅल्या घेतोय. 'जिहाद' चे नारे देतोय. कसाब, एकमेव जिवंत अतिरेकी आता प्रसारमाध्यमांचा अन्नदाता आहे. कसाब कोर्टात हसला, त्याने डोळ्याच्या एका कोपर्यातून पाहिलं, तो मराठीत बोलला, आज कसाब कोर्टात असताना मजा झाली वगैरे वगैरे. कोणाच्या हे लक्षात आहे का की ह्याच माणसामुळे १८४ जिवंत माणसं मेली. मुंबई पोलिसांचे ३ खंदे अधिकारी गेले. पण आपण मात्र पाकिस्तानी कलावंत आणि त्यांचे क्रिकेटपटू भारतात यावेत ह्याच काळजीत. त्यांच्या रोजीरोटीची जवाबदारी आपली असल्यागत. फक्त दीड वर्ष झालं असेल, आता आपण "पाक खेळाडू आपले पाहुणे आहेत. आपण त्यांचा अपमान नाही केला पाहिजे. ते सर्वोत्तम आहेत." असं म्हणणार्या एका कणाहीन माणसाच्या एका सिनेमासाठी पाठिंबा देतो. इथे खेळाडूंना कुणाचाही विरोध नाही. विरोध देशाला आहे. त्यांना सर्व बाबतीत एकटं पाडल्याखेरिज शांततेचं महत्व कळणार नाही. पण आपण सहिष्णू आहोत. इथे हाच पैशांसाठी लग्नांमध्ये नाचणारा नट गुलशन कुमार खटल्यात व्यस्त असल्यामुळे साक्ष देऊ शकला नाही आणि भरत शाह खटल्यात उलटला होता ह्याचा सर्वांना सोयिस्कर विसर पडतो. इथे पुन्हा विरोध सिनेमाला नाही तर व्यक्ति आणि वृत्तीला आहे. आपलं सरकार सगळा पोलिसी फौजफाटा त्याच्या सिनेमाच्या दिमतीला लावतं, हेच सरकार मराठी सिनेमावर अशीच वेळ आलेली असताना तमाशा पाहतं कारण तेव्हा सरकारातलेच मंत्री आपली अब्रू वाचवण्यासाठी सिनेमा रोखत असतात. सगळा फौजफाटा सिनेमाच्या मागे असल्यामुळे पुण्यात अतिरेकी अगदी सहज बॉम्ब फोडतात. १० लोक मरतात. तरी ४-५ महिन्यांपूर्वी निवडणुकांपर्यंत गर्जना करणारं सरकार पाकिस्तानबरोबर बोलणी करायला तयार होतं. आणि पुन्हा पाकिस्तानी म्हणतात, आम्ही नाही झुकलो, तेच झुकले शेवटी. आणि तरीही आपण पुनःपुन्हा तेच सरकार निवडून द्यायचं.
महागाई वाढलीये. ८०च्या दशकात, बायकांनी लाटणे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. आता लोकांना विचारा. लोक म्हणणार, काय करणार आपण? अरे? महागाई निवडणुकांच्या आधीपासून आहे, काय केलंत तुम्ही निवडणुकांच्यावेळी? घरी बसून लोळलात. पुन्हा तेच सरकार आलं आणि हेच चालणार. महागाई वाढणार, दहशतवाद वाढणार, पाकिस्तान असंच आपल्या तोंडावर थुंकणार. आपण मात्र सिनेमांना पाठिंबा द्यावा, तो कुणी काढलाय त्याच्याशी आपल्याला काय? उद्या अफझल गुरु किंवा कसाबल घेऊन सिनेमा आला तरी आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करण्यासाठी तो सिनेमा बघायचा. महागाई, शेतकर्यांच्या आत्महत्या, दहशतवाद ह्या विषयी आपण काय करणार? खरंच, आपण काय करणार?
असं म्हणतात, की प्रत्येक मनुष्यसमूहाला त्याच्या लायकीनुसार नेता मिळतो. खरंय, अगदी शंभर टक्के खरं आहे.
षंढ झालो आहोत आपण! काही करायचंच नाही आहे कुणाला! सगळ्यांना फक्त स्वतःची काळजी आहे. पण सगळे हे विसरतात, की ज्या आगीकडे ते "आपल्याला काय त्याचं" म्हणून पाहतायत, ती आज नाहीतर उद्या त्यांच्याच घरात येणार आहे. पण पर्वा कुणाला आहे. लाचारीची सवय झालीये. मुघल आणि इंग्रजांनी आपल्या लाचार प्रवृत्तीचा फायदा घेऊनच राज्य केलं. आता घरभरू नेते करताहेत. एके काळचे आपण शूर म्हणवणारे, इतिहासातच शूर राहिलो आहोत. आता तर स्थिती सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे आहे.
"इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ ।"

Subscribe to:
Posts (Atom)