काल मित्रांसोबत कॉफी घेताना नेहमीप्रमाणेच 'चिंता करितो विश्वाची' चाललं होतं. विषय होता 'इजिप्त'. मी म्हटलं, 'वेस्टर्न मीडिया सध्या लोकशाहीवादी अन मुस्लिम ब्रदरहूड ह्या दोन विरोधी पक्षांमध्ये कसे मतभेद आहेत हे दाखवण्यात गुंग आहे. अन खरंच गंमत होणार आहे सगळी. कारण मुस्लिम ब्रदरहूड हा कट्टरवादी पक्ष आहे अन बाकी लोकशाहीवादी आहेत. पण दोघेही होस्नी मुबारकच्या मात्र विरूद्ध आहेत.'
तेव्हा एका मित्रानं एका सामाजिक प्रयोगाबद्दल सांगितलं, ज्यामध्ये दोन युवकांचे गट बनवण्यात आले अन त्यांना एका कॅम्पवर ठेवण्यात आलं. अन काही कारणांचं निमित्त करून त्यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण करण्यात आलं. मग त्यांचं आपापसातलं वैमनस्य मिटवायचे प्रयत्न सुरू केले गेले. पण वैमनस्य मिटेना. मग त्यांच्या धर्मांचे धर्मगुरूही बोलावले गेले. धर्मगुरूंचं सांगणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं अन त्यानंतर त्यांनी आदरपूर्वक वैमनस्य संपवायला नकार दिला. निर्वाणीचा उपाय म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणार्या ह्या गटांच्या कॅम्पचं पाणीच तोडून टाकण्यात आलं. दोनेक दिवस उलटल्यानंतर पाण्याची समस्या गंभीर बनली. अन मग थोडा शोध घेता दोन्ही गटांच्या लक्षात आलं की पाण्याचा मुख्य पाईपच कापण्या आलाय अन आता तो पाईप दुरूस्त करण्यासाठी सगळ्यांना एकत्र काम करावं लागेल. मग त्या दोन्ही गटांनी मिळून एकत्र तो पाईप दुरूस्त केला अन कॅम्पवरचं संकट टळलं. पण इतक्या उपायांनीही शक्य न झालेलं काम म्हणजे दोन्ही गटांचं मनोमिलन पाणीटंचाईनं घडवलं. अर्थात नंतर त्यांच्यात पुन्हा भांडणं झाली का वगैरे तपशील मला ठाऊक नाहीत. पण तात्पर्य हे की, समान शत्रू नेहमीच दोन किंवा अधिक गटांना एकत्र आणतो.
मी कॉलेजात असताना डब्ल्यू डब्ल्यू एफच्या कुस्त्या पाहायचो (अजूनही वेळ मिळेल तेव्हा पाहतो). त्यात जेव्हा ट्रिपल थ्रेट किंवा फोर-वे अर्थात निघांचा किंवा चौघांचा सामना असायचा, तेव्हा सर्वांत ताकदवान एकासमोर बाकीचे सगळे एक व्हायचे अन सर्वप्रथम सगळ्यांत ताकदवान प्रतिस्पर्ध्याला बाहेर काढण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग ते आपापसात लढून पुढचा निर्णय घ्यायचे. तसंच काहीसं इजिप्तमध्ये चालू आहे. होस्नी मुबारकच्या ३० वर्षांच्या एकछत्री सत्तेला विरोध करण्यासाठी सगळेच अतृप्त गट उभे राहिलेत. मग समान शत्रू मुबारकला प्रथम हटवण्यासाठी ते सगळे आपापसांतले मतभेद भांडणंदेखील बाजूला ठेवून एकत्र लढत आहेत.
त्यावरनं पुढे थोडी विवादास्पद चर्चा झाली. ती म्हणजे भारतासारखा प्रचंड विरोधाभासी देश फक्त दहशतवाद, पाकिस्तान ह्यांसारख्या समान शत्रूंमुळे अजूनही एकत्र उभा आहे. ज्या दिवशी ही कारणं संपतील, त्यादिवशी आपले तुकडे पडणं निश्चित आहे. मला स्वतःला हे विधान फारसं पटलं नाही, पण एक क्षण अंगावर काटा आला. म्हणजे, ज्या गोष्टीसाठी पाकिस्तानातल्या अनेक शक्ति अक्षरशः आकाशपाताळ एक करताहेत, ते फक्त त्यांना स्वतःला संपवून मिळू शकतं? पण मग आपले लोक निरक्षरता, गरीबी, बेरोजगारी, अंधश्रद्धा असल्या समान शत्रूंविरूद्ध का एक होऊन लढू इच्छित नाहीत? असा एक काव्यात्म विचारही माझ्या मनात आला. पण पुढच्या क्षणी ते कोडंसुद्धा सुटलं, कारण जर ह्या समान शत्रूंविरूद्ध आपण लढलो, तर आपण एक होऊ अन आपल्यातल्या दुहीचा फायदा घेणारी माणसं आयुष्यातून उठतील. त्यामुळे सध्या ते सगळे (वाचा राजकारणी) आपापसातले मतभेद विसरून फक्त त्यांचा समान शत्रू म्हणजे सामान्यांमधली जागृती, एकी ह्याविरूद्ध लढताहेत अन लोकांसमोर अस्तित्वात नसलेला शत्रू उभा करून आपला कार्यभाग साधताहेत. सध्यातरी ते त्यात यशस्वी होतानाच दिसताहेत. महाराष्ट्रात ह्याचं जिवंत उदाहरण पुतळे, समाध्या अन चित्रांवरून निर्माण होणार्या दंगलसदृश स्थितीच्या रूपात समोरच आहे.
2/04/2011
1/30/2011
३० जानेवारी
३० जानेवारी हा दिवस भारतामध्ये मो.क. गांधींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो. ह्याच दिवशी नथुराम गोडसेंनी गांधींचा गोळ्या घालून वध/खून केला (ज्याला जे हवे ते घ्यावे, मूळ मुद्दा हा नाही). आणि भारताच्या इतिहासातला एक अध्याय संपला. पण एका अपमानित व्यक्तिनं जागृत होऊन अन्याय्य शक्तिंविरूद्ध एक अख्खं राष्ट्र जागं करण्याची जगातल्या इतिहासातली पहिलीच वेळ असावी. राष्ट्रीय चळवळ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचं श्रेय अवश्य गांधींना जातं. पण जसजसे दिवस उलटत गेले तसतसे गांधी दुराग्रही अन हट्टी होत गेले. आणि मग हळूहळू व्यक्ति राष्ट्रापेक्षा मोठी होत गेली. जेव्हा असं घडतं तेव्हा राष्ट्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसानच होतं आणि तसंच ते होऊही लागलं होतं. आणि पुढे अजूनही मोठ्या प्रमाणावर होण्याच्या शक्यता होत्या.
अशा वेळी नथुरामनी घाई केली की उतावीळपणा केला की शांतपणे निर्णय घेतला हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या मते देशाचं नुकसान थांबवण्याचा एकच मार्ग होता आणि त्यांनी तो अनुसरला. त्यासाठी होणार असलेलं यथोचित शासनही स्वीकारण्याची पूर्ण तयारी करूनच त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. तो निर्णय चुकीचा की बरोबर किंवा नथुराम माथेफिरू की हुशार हे महत्वाचं नाही. पण नथुरामच्या कृतीचे किती विचित्र परिणाम घडले ते महत्वाचं.
नथुरामच्या कृतीनं गांधींना हौतात्म्य मिळालं. ज्याचा पुरेपूर वापर नेहरू सरकारनं करून घेतला. गांधी म्हातारपणानं गेले असते तर गांधींना जे अतिमानवीय रूप देण्यात आलंय बहुदा तसं झालं नसतं. गांधींच्या चुका आणि अतिरेक कदाचित आपोआपच देशासमोर आला असता. शेवटी गांधीदेखील माणूस होते, पण त्यांना देव बनवण्याचं काम नथुरामच्या कृतीमुळे सोपं झालं. गेली ६० वर्षं काँग्रेससकट देशातले अनेक पक्ष त्यांच्या जीवावर भाकरीचे तुकडे मोडतायत (किंवा नोटा मोजतायत असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल).
गांधींचे विचार कितीही आदर्श असले तरी त्यांनी त्या विचारांना योग्य ठिकाणी मर्यादा घातल्या नाहीत. गांधींचा प्रत्येकच बाबतीत अतिरेक होता. मग ती अहिंसा असू दे, असहकार असू दे किंवा ब्रह्मचर्य असू दे. असे प्रकार संतांसाठी ठीक असतात, पण देश चालवणार्यांसाठी नव्हे. त्यातही त्यांनी ब्रह्मचर्याबाबत केलेले प्रयोग हे कधीकधी विकृती ह्या सदरात मोडणारे होते. मग भले ते त्यांनी कितीही निरागसपणे केल्याचं सांगण्यात आलं तरीही.
कुठलीही मागणी मान्य करून घेण्यासाठी उपोषणाला बसून अख्ख्या देशाला वेठीला धरणं हे त्यांचं अमोघ अस्त्र होतं. आधी हे त्यांनी ब्रिटीशांवर आजमावलं. पण ब्रिटीशांच्या वेळी केस वेगळी होती. गांधी मेले असते तर अख्खा देश पेटेल ही भीती ब्रिटीशांना होती. थोडक्यात ते अन्यायी ब्रिटीशांना केलेलं हुशार ब्लॅकमेलिंग होतं. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याच लोकांकडून स्वतःची तत्त्व राखण्यासाठी (किंवा हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी) आपल्याच लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करणं हे कितपत योग्य होतं. एका माणसाच्या तत्वांसाठी अख्खा देश आणि हजारो लोकांचे प्राण पणाला लावले जात होते. आपली तत्व लोकांवर जबरदस्तीनं लादणं ही एकप्रकारची वैचारिक हिंसा ठरत नाही का? पण गांधींनी काही काही गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं.
गांधींनी एकट्यानीच देशाचं नुकसान केलं असं म्हणणं कदाचित अतिशयोक्ति ठरेल. पण अशा न तशा पद्धतीनं गांधींचं पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान होतं. नेहरू आणि कंपनीने गांधींच्या नावाखाली अनेक चुका केल्या. पण गांधींनीदेखील आपल्या हट्टीपणाने अनेक गोष्टी घडवून आणल्या. गांधींची सगळ्यात मोठी चूक कदाचित ही होती की त्यांनी स्वतःची तत्व कधीच काळाच्या कसोटीवर तपासून पाहिली नाहीत. त्यांच्या ज्या समजूती होत्या त्यांचा टिकाऊपणा तपासून पाहण्याची त्यांना कधीच गरज वाटली नाही. उलट अख्ख्या जगानं आपल्याच समजुतींनुसार स्वतःची मतं बदलून चालावं ह्या हट्टाने ते मार्गक्रमणा करत राहिले. त्यांचं अहिंसेचं अन असहकाराचं अमोघ अस्त्र देखील बदलत्या काळानुसार बदल मागत आहे. आजही ज्या ज्या देशांमध्ये उठाव झालेत, तिथे सगळीकडे सुरक्षा दलं निर्दयीपणे आंदोलकांवर हल्ले करताहेत. पण आंदोलक ठिय्या मांडून उपोषणाला बसले तर एकतरी आंदोलन यशस्वी होऊ शकतं का? हा प्रश्न मला पडतो. जोवर आंदोलक आपली एकगठ्ठा शक्ति दाखवून सुरक्षा दलांनाही आपल्या बाजूनं येण्यास मजबूर करत नाहीत तोवर हे अशक्यच ठरतं. काही काही देशांमध्ये रक्तविरहित क्रांतीही झालीय. पण सर्व ठिकाणची परिस्थिती एकसारखी नसते. जेव्हा जखम जुनी होते तेव्हा जवळचा भाग कापूनच काढावा लागतो आणि त्यात थोडं रक्तही वाहून जावं लागतं.
जर नथुरामनं गांधींना गोळ्या घातल्या नसत्या. तर कदाचित काही वर्षांमध्ये स्वतंत्र भारतामध्ये गांधींभोवतीचा बुडबुडा फुटलाही असता किंवा भारत अजून मोठ्या प्रमाणावर गांधींच्या आहारी गेला असता. कदाचित अजून एक दोन संस्थांनांची घोंगडी हिंसक कारवाईअभावी भिजत पडून राहिली असती. पण ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत.
देशातल्या जनतेला ब्रिटीश अन्याय्य राजवटीविरूद्ध जागृत करण्यामधलं गांधींचं योगदान वादातीत आहेच आणि त्याबद्दल मी त्यांचा आदर करतो. पण आज स्वतःच्या तत्वांपायी अख्ख्या देशाचं आणि पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान केल्यामुळे त्यांना महात्मा म्हणताना मात्र माझी जीभ कचरते.

आज माझ्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी ३० जानेवारीलाच मी पहिली पोस्ट टाकली होती. सर्व वाचकांच्या प्रेमामुळे आणि सर्व मित्र आणि शुभचिंतकांच्या प्रोत्साहनामुळेच हा प्रवास पूर्ण झाला. सुरू केला तेव्हा स्वतःपासून काहीच अपेक्षा नव्हत्या. पण सर्वांच्या प्रेमानं आणि प्रोत्साहनामुळे आणि वेळोवेळी मिळणार्या चांगल्या वाईट अभिप्रायांमुळे लिहिता राहिलो. रस्त्यावर काही कौतुकंही झाली पण सगळ्याचं श्रेय वाचकांनाच जातं.
डिसेंबरमध्ये विचार केलेला की पहिल्या वाढदिवशी ब्लॉगला १०० व्या पोस्टची भेट द्यावी. पण डिसेंबरमध्ये सुट्टीवर असताना लेखनात जवळपास महिन्याभराचा खंड पडला. पण मग तरीसुद्धा पहिलीच भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याखातर गेला आठवडाभर रोज एक अन कालपासून तर दिवसाला दोन पोस्ट केल्या आहेत. ह्या अतिरेकाचा गुणवत्तेवर निश्चितच परिणाम झाला असेल. पण मला हे चॅलेंज पूर्ण करायचं होतं आणि महत्प्रयासाने ते मी पूर्ण करू शकलोय ह्याचा मला आनंद आहे. ही माझ्या ब्लॉगवरची १०० वी पोस्ट आहे.
ह्यापुढे पोस्ट्सची फ्रिक्वेन्सी पूर्ववत होईल. आणि गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, ह्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न करूर करेन.
सर्वांचे मनापासून आभार! आपला लोभ असाच कायम राहिल आणि मी कायम लिहिता राहिन हीच सदिच्छा! :)
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये
लहानपणी हे कुठल्याशा गाण्यात ऐकलं होतं. पण त्याचा अर्थ तेव्हा फारसा समजला नव्हता. पण मग एक एक उदाहरणं पाहत पाहत हळू हळू अर्थ थोडाफार समजला. पण आज तर असलं भारी उदाहरण पाहायला मिळालं की हे वाक्य केवळ ह्याच घटनेसाठी लिहिलं गेलं असावं असं वाटलं. आत्ताच 'बीबीसी' वर एक बातमी पाहिली. त्याचं झालं असं -
साल २००९ इराकच्या बगदादमध्ये साखळी स्फोट घडतात आणि शेकडो माणसं मरतात. चर्चा अशी सुरू होते, की इतकी सारी स्फोटकं राजरोसपणे बगदादसारख्या प्रचंड सुरक्षाव्यवस्था असलेल्या भागामध्ये आलीच कुठून? मग पोलिसांच्या आणि सुरक्षादलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागू लागतात. चौकशी आणि तपास सुरू होतो आणि सगळ्यांचं लक्ष एका छोट्याशा गोष्टीकडे जातं. आणि अनेक मोठी माणसं कपाळाला हात मारतात.
९०चं दशक. अमेरिकन नेव्हीकडे काही उद्योजक जातात आणि म्हणतात, 'आमच्याजवळ सर्व प्रकारची स्फोटकं शोधून काढणारं एक यंत्र आहे.' एक छोटंसं खेळण्यातल्या बंदुकीसारखं दिसणारं यंत्र, ज्याच्यापुढे एक छोटीशी एरियल लावलेली आहे. ती बंदूक धरायची आणि एरियल पूर्ण उघडून चालायचं. एरियल स्फोटकं जिथे असतील त्या दिशेने फिरते. इतकं सोपं आणि सुटसुटीत यंत्र. ते ही प्लॅस्टिकचं. अमेरिकन नेव्ही त्याची परीक्षा घेते आणि ते यंत्र परीक्षेमध्ये फेल होतं. एफबीआय हे यंत्र अमेरिकेत मार्केट होऊ नये असं फर्मान काढतं.
२००० साली इंग्लंडमध्ये असेच काही उद्योजक ब्रिटीश आर्मीकडे जातात आणि चक्क एका मेंबर ऑफ पार्लमेंटच्या शिफारसीवर ह्या यंत्राची चाचणी ठरते. प्राथमिक चाचणी फेल होते. पण तरीसुद्धा चाचणी घेणारे प्रशिक्षित नाहीत असं कारण सांगून पुढची चाचणी पुढे ढकलली जाते.
पण ९० च्या दशकापेक्षा आता जागतिक परिस्थिती बदललेली असते. जग फारच मोठ्या प्रमाणावर साशंक आणि अस्थिर झालंय. नेमक्या ह्याच गोष्टीचा फायदा हे उद्योजक उचलतात. आणि माल्टामध्ये एअरपोर्ट सिक्युरिटी आणि पोलिसांकडे ह्या यंत्राचा प्रस्ताव जातो. शिफारस करणारे काहीजण ब्रिटीश आर्मी आणि पार्लमेंटशी निगडीत असतात. काही चाचण्या फसतात पण तरीही थोड्याप्रमाणात संशयास्पद विक्री होतेच.
नंतर ह्या यंत्राचे प्रस्ताव जगभरच्या अनेक अस्थिर देशांकडे जातात आणि शिफारसी पाहता आणि देशोदेशीच्या सरकारांमध्ये असलेले भ्रष्टाचार पाहता ह्या यंत्रांची प्रचंड प्रमाणावर विक्री होते. त्या देशांच्या यादीत पाकिस्तान, इराक, अफगाणिस्तान वगैरे देशांचीही नावं आहेत. नशीबानं त्यात भारताचं नाव दिसलं नाही.
पण २००९ मध्ये इराकमध्ये हेच यंत्र सापडल्यावर लोकांच्या भुवया उंचावल्या. इराक सरकारनं काही मिलियन खर्च करून ही यंत्र सुरक्षाव्यवस्थेसाठी विकत घेतली होती आणि त्याचाच परिणाम म्हणजे स्फोटकं बिनासमस्या शहरामध्ये प्रवेश करती झाली. शेकडो लोकांचे जीव गेले. चौकशी समिती बसली. बीबीसीनं सुद्धा स्फोटकांच्या तज्ज्ञांबरोबर तपास केला आणि लक्षात आलं की ही यंत्र केवळ खेळणी आहेत. त्यामध्ये स्फोटकं शोधू शकेल असं काहीच नाही. आणि जगभर ही एकसारखीच यंत्र वेगवेगळ्या नावांनी कधी स्फोटकं शोधणारी, कधी ड्रग्ज शोधणारी तर कधी हस्तिदंत शोधणारी म्हणून विकली गेली. आणि सगळ्यांत गंमतीची गोष्ट ही, की असलं एक यंत्र बनवायला जास्तीत जास्त १० ब्रिटीश पौंड एव्हढा खर्च येतो, पण एक एक यंत्र १५००० पौंडांपर्यंत विकलं जातं. माल्टा एअरपोर्टचा सिक्युरिटी हेड आजही टेलिव्हिजनवर सांगतो की हे यंत्र 'फ्रॉड' आहे आणि ते काहीही शोधू शकत नाही. तो त्या यंत्राची खोटी हालचाल कशी होते ह्याचं प्रात्यक्षिकही करून दाखवतो.
असं म्हणतात की ह्या यंत्राची शिफारस करणार्या ब्रिटीश मेंबर ऑफ पार्लमेंटला एका यंत्रामागे ३००० पौंड मिळणार होते. त्यानं एका काऊंटर टेरर एक्स्पो मध्ये तर खुलेआम त्या यंत्राची वकिली केली होती. तो अजूनही इंटरव्ह्यू मध्ये गोल गोल बोलतो. पण अजूनही तो हे मान्य करत नाही की तो कित्येक जीवांशी खेळलाय.
सगळ्यांत गंमतीशीर गोष्ट ही की ब्रिटीश सरकारनं ह्या यंत्राच्या 'अफगाणिस्तान आणि इराकच्या निर्यातीवर बंदी' घातलीय. कारण, ब्रिटीश आणि मित्र राष्ट्रांच्या सैनिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. बाकी जगभर माणसं मेली तरी चालतील!
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये! हेच खरं.
टीप - ह्या यंत्रांबद्दलची अधिक माहिती इथे पहा.

1/29/2011
झापडं
जन्माला मीही तिथेच आलो
पण बाकीच्यांइतका नशीबवान नव्हतो
माझ्या बापाकडे पैसा नव्हता
रूढार्थाने मी श्रीमंत नव्हतो
मोठं होता होता कळलं
श्रीमंती पैशांची नसते
श्रीमंती असते संस्कारांची
तिथे मी कमनशीबी नव्हतो
नोकरीला लागेस्तोवर जगच बदललेलं
एकदम अंगावर येणारं
प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मागणारं
अन देणारा मी एकटाच नव्हतो
नव्या जगाच्या नियमांना
सरावणं फारच अवघड होतं
संस्कारांवर दरोडा पडला
पण पुरेसा श्रीमंत मी होत नव्हतो
सरकारी चाकांना वंगण लागतं
हे निर्लज्जपणे सांगत होतो
पण कुटुंबाची जवाबदारी उचलणारा
मी काही जगात एकटाच नव्हतो
डोळ्यांवर झापडं घालून चालताना
सगळीकडचा हाहाकार अनुभवत होतो
मी अन माझं घर ह्यापलिकडे
कुणाचं देणं लागत नव्हतो
कॅन्सरसारखी खोल विवेकबुद्धि
हाडांमध्ये रुतून बसलेली
तिची हाक टाळून चालत राहायला
मी कुणी राजकारणी नव्हतो
एक दिवस दुखणं असह्य झालं
अन साकळलेलं रक्त बाहेर आलं
इतक्या वर्षांचा साचलेला आवाज
थांबवायचा प्रयत्न मी करीत नव्हतो
तोंडावर कुलूप लावून जगणार्यानं
जगाचा नियम मोडला होता
राखणदारांच्या झोपा उडल्या
पण मी आता थांबणार नव्हतो
तेव्हा जगानं झापडं बंद केली
जेव्हा काडी माझ्या दिशेनं झेपावली
आग मलाच लागली होती
पण मी एकटाच जळत नव्हतो
पण बाकीच्यांइतका नशीबवान नव्हतो
माझ्या बापाकडे पैसा नव्हता
रूढार्थाने मी श्रीमंत नव्हतो
मोठं होता होता कळलं
श्रीमंती पैशांची नसते
श्रीमंती असते संस्कारांची
तिथे मी कमनशीबी नव्हतो
नोकरीला लागेस्तोवर जगच बदललेलं
एकदम अंगावर येणारं
प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मागणारं
अन देणारा मी एकटाच नव्हतो
नव्या जगाच्या नियमांना
सरावणं फारच अवघड होतं
संस्कारांवर दरोडा पडला
पण पुरेसा श्रीमंत मी होत नव्हतो
सरकारी चाकांना वंगण लागतं
हे निर्लज्जपणे सांगत होतो
पण कुटुंबाची जवाबदारी उचलणारा
मी काही जगात एकटाच नव्हतो
डोळ्यांवर झापडं घालून चालताना
सगळीकडचा हाहाकार अनुभवत होतो
मी अन माझं घर ह्यापलिकडे
कुणाचं देणं लागत नव्हतो
कॅन्सरसारखी खोल विवेकबुद्धि
हाडांमध्ये रुतून बसलेली
तिची हाक टाळून चालत राहायला
मी कुणी राजकारणी नव्हतो
एक दिवस दुखणं असह्य झालं
अन साकळलेलं रक्त बाहेर आलं
इतक्या वर्षांचा साचलेला आवाज
थांबवायचा प्रयत्न मी करीत नव्हतो
तोंडावर कुलूप लावून जगणार्यानं
जगाचा नियम मोडला होता
राखणदारांच्या झोपा उडल्या
पण मी आता थांबणार नव्हतो
तेव्हा जगानं झापडं बंद केली
जेव्हा काडी माझ्या दिशेनं झेपावली
आग मलाच लागली होती
पण मी एकटाच जळत नव्हतो
छंद
लहान असताना मला कुणी विचारलं की तुझा छंद काय? की मी बेधडक कुठलाही विचार न करता सांगायचो, "वाचन!" अगदी लहान असताना पुढचा प्रश्न येत नसे. मी लॉजिकली विचार केला होता. मला वाचायला कंटाळा येत नाही, उलट मजा येते, ह्याचा अर्थ वाचन हा छंद असायला हवा. पण वाचनाचं वेड वगैरे कधी नव्हतं, ही प्रांजळ कबुली दिलीच पाहिजे. अन छंद नसला तरी आवड निश्चितच होती. कारण माझा कुठलाही सो कॉल्ड छंद उदा. स्टँप गोळा करणे, नाणी गोळा करणे, हा एका विशिष्ट टाईम पिरियडच्या पुढे टिकलाच नाही. वर्ष, दोन वर्षं बस. कारण पुढे काय? हा प्रश्न मला अनादि अनंत काळापासून पडत आलेला आहे. म्हणजे आता बघा. मी स्टँप गोळा करतो. बरं मग मी दोनशे स्टँप जमवले. अन एके दिवशी कळतं की कुणा मित्राकडे पाचशे आहेत. मग मी थोडा हिरमुसतो आणि विचार करतो की मी जर पाचशेपर्यंत जरी पोचलो, तरी पुढे अजून कुणीतरी असणारच आणि स्टँप गोळा करून मुळात आपल्याला आनंद मिळतो का? की आपण फक्त स्पर्धा म्हणून हा प्रकार करतो? अर्थात एव्हढे सखोल विचार मी तेव्हा केले होते की नाही माहित नाही, पण थोडक्यात असं की आपण अशी स्पर्धा खेळतोय ज्याला अंत नाही अन (बहुतेक त्यामुळेच) त्यात मजा नाही अशा निष्कर्षाप्रत मी पोचलो अन ते स्टँप किंवा नाण्यांचं कलेक्शन वगैरे प्रकार मी बंद केले.
छंद म्हणजे काय? हा मूलभूत प्रश्न मला तेव्हा पडला. ओके, ऍक्च्युअली इतका मूलभूत नव्हता, 'माझा छंद नक्की कोणता?' इतपत मूलभूत तरी होता. मी बराच विचार केला. नाणी जमवून पाहिली, स्टँप जमवून पाहिले, डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या पैलवानांची कार्डं जमवून अन त्याचा खेळ खेळून झाला, क्रिकेटरांची मिळणारी कार्डं जमवून झाली. पण कशालाच मला छंद म्हणता येईना. कारण त्या सगळ्यांचाच मला एका काळानंतर कंटाळा आला होता. मग असं काय होतं ज्याचा मला कधीच कंटाळा आला नाही. वाचन? खरंतर वाचन हा खूप ढोबळ शब्द आहे. जेव्हा कुणी वाचनाचा छंद आहे म्हणतं तेव्हा ते फार ढोबळ वक्तव्य होतं. कारण वर्तमानपत्र, हँडबिलं, पॅम्प्लेट्स, पुराणं, पौराणिक कथा, साहित्य.. पुन्हा साहित्यामध्ये प्रचंड विविध प्रकार. नक्की काय वाचायला आवडतं?
थोडा मोठा झाल्यावर माझ्या छंद कोणता? ला दिलेल्या 'वाचन' ह्या उत्तरावर सहसा "नक्की काय वाचायला आवडतं?" हा पुढचा प्रश्न असायचा. मग मी निरूत्तर व्हायचो. मग थोड्या शांततेनंतर, "असंच काहीही, चांगली पुस्तकं, तशी वर्तमानपत्रंही, पौराणिक कथासुद्धा.." झाला गेम? तसं सगळंच आहे, पण सगळ्यातलं सगळं नाही. पण माझा एक मित्र आहे, तो खरा क्वालिफाय करतो 'वाचन' छंद म्हणून सांगायला. कारण तो काहीही वाचतो. अगदी तल्लीन होऊन. अक्षरशः काहीही. पण मी नाही वाचू शकत काहीही. म्हणजे जेव्हा एखादं पुस्तक झपाटून टाकतं, तेव्हा मी वेड्यासारखा तहानभूक-झोप विसरून पुस्तक वाचत बसतो, नाही असं नाही. अगदी पु.ल. देशपांड्यांची असू देत, किंवा 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' असू दे किंवा जेम्स हॅडली चेज च्या 'द वेअरी ट्रान्सग्रेसर'च्या शेवटाकडे अंगावर सरसरून काटा येऊन डोळ्यांत पाणी उभं राहू दे किंवा ग्रिशम च्या 'द रेनमेकर' मधल्या नायकाच्या शेवटाकडच्या निवडीवर चेहर्यावर स्मित उमटू दे ते अगदी प्रेमचंद ची 'कर्मभूमी' मिलानमध्ये वाचताना दोन तीन दिवस धड जेवणालाही बुट्टी मारण्यापर्यंत मी वाचनाच्या आहारी जातो. पण वाचनाशिवाय राहू शकत नाही असं म्हणणं अति होईल. काही काही लोकांना खरंच वाचनाशिवाय राहता येत नाही, अन मला अशा लोकांचा हेवा वाटतो. पण मला जमतं बुवा! म्हणजे 'वाचन'ही बाद. पण छंद म्हणून सांगायचं काय, म्हणून मी 'Anything except career books' अशी एक पळवाट काढली. कारण मी बाकी काहीही सहन करू शकतो, पण करियर टाईपची बुक्स मला झेपत नाहीत. 'तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार' टाईप संदेश असला की मी सहसा दूर असतो.
लहानपणापासून दुसरी एक हौस आहे. लेखनाची! 'कविता' वगैरे, ह्याबद्दल पूर्वीही लिहिलेलं थोडं. अन ते करताना मजाही यायची. अगदी घुसून जायला व्हायचं. अजूनही होतं. पण लिखाणाचं मोटिव्हेशन काय? प्रोत्साहन कुठून मिळतं? तर लिहिलेलं चार लोकांनी वाचलं तर. प्रचंड दुःखी असताना किंवा घुसमट होत असताना लिहिलेलं काही फार वैयक्तिक स्वरूपाचं लिखाण (स्ट्रेस मॅनेजमेंट) सोडता बाकी मी जे काही लिहितो, ते कुणीतरी वाचेल ह्या अंदाजानंच. त्यामुळे ते लोकांसमोर यावं ही सुप्त इच्छा कायमच प्रत्येक क्षणी डोक्यात असते. माझ्यासाठी लिखाण जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक आहे कुणीतरी ते वाचणं. अभिप्राय देणं न देणं हे सर्वस्वी वाचकावर. पण ते लोकांपर्यंत पोचणं मला फार महत्वाचं वाटतं. का ते मला माहित नाही, पण हे अगदी लहानपणापासून आहे. मी लिहिलेल्या कविता किंवा कथा फारशा कधी लोक काय म्हणतील म्हणून दडवून ठेवल्यात असं झालं नाही. आई-बाबांना वाचून दाखवायचो. शाळेच्या मासिकाला द्यायच्या. मग कॉलेजच्या असं करत करत आता ब्लॉगपर्यंतचा प्रवास. जेव्हा मनुष्य कुठलीही गोष्ट ब्लॉगवर पब्लिकली पब्लिश करतो तेव्हा ती पर्सनल कधीच असू शकत नाही. कुणीतरी वाचावं म्हणूनच असते. ह्याचा अर्थ मीही हा ब्लॉग रेकग्निशनसाठीच लिहितो. उगाच ताकाला जाऊन भांडं कशाला लपवा. मी स्वतःसाठी लिहितो हे जरी सत्य असलं, तरी ते पूर्णसत्य नाही. पण लेखनामध्ये मात्र मी वाचनासारखा नाही, मी लिहायला काहीही लिहू शकतो. अर्थात ते चांगलं असेलच असं नाही. पण त्याचा कंटाळा नाही. कितीही अन काहीही!
माझी तिसरी अन लेटेस्ट म्हणजे गेल्या पाचेक वर्षांतली आवड म्हणजे सिनेमे. अन ही आवड ऑलमोस्ट वेडाच्या उंबरठ्यावर आहे. सिनेमे लहानपणापासून पाहिले, पण एका अंतरावरून. पण 'ओल्डबॉय' ने प्रत्यक्ष सिनेमाशी गळाभेट घडवली. सिनेमा अंगावर येतो किंवा विचारप्रवृत्त करतो किंवा अंतःकरण हेलावून सोडतो म्हणजे काय, हे 'ओल्डबॉय' ने दाखवलेल्या वाटेवर चालल्यानंतर कळू लागलं. मग पेपरात समीक्षकांनी किंवा सिनेजाणकारांनी लिहिलेल्या गोष्टींचे अर्थ उमजू लागले, समजत आधीही होते. आणि सिनेमाचं वेड इतकं भारी पडू लागलं, की पूर्वी मोकळ्या वेळात हातात येत असलेलं पुस्तक तसंच न वाचता पडून राहू लागलं. सुरूवात झाली वाचायला तरच झपाटायला होणार, पण इथे पुस्तकाला सुरूवातही होत नाही आताशा!
तर थोडक्यात अजूनही माझा छंद नक्की कोणता? हा प्रश्न बर्यापैकी अनुत्तरित आहे. पण बहुतेक निवडक वाचन, लेखन अन सिनेमा असे तीन छंद आहेत असं ढोबळमानाने म्हणता येईल. हुश्श! चला एक प्रश्न निकाली निघाला. आता आपण अजून मूलभूत प्रश्नाकडे वळू. छंद म्हणजे नक्की काय?
मला ठाऊक आहे. प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा क्रम चुकलाय. पण आधी लौकिकदृष्ट्या महत्वाचा प्रश्न सोडवणं महत्वाचं होतं. आत्मिक अन आध्यात्मिक प्रश्न नेहमी शेवटी सोडवावेत. तस्मात आता मूलभूत प्रश्न.
छंदाची एक जबरदस्त व्याख्या आहे. जे करताना माणसाला आनंद मिळतो, तो त्याचा छंद! अन ही एकदम बँग-ऑन वगैरे म्हणतात ना तशा टाईपची व्याख्या आहे. पण लोक इथे एक पायरी ओलांडून पुढे जातात अन म्हणतात जेव्हा माणसाचा छंद आणि उत्पन्नाचं साधन एक असतं, तेव्हा तो माणूस सर्वांत सुखी असतो. पण इथे एक गोम आहे. जेव्हा छंद उत्पन्नाचं साधन बनतो, तेव्हा त्यामध्ये व्यावसायिकता येण्याची दाट शक्यता निर्माण होते. माणसाला ती सीमारेषा न ओलांडण्याची तारेवरची कसरत करावी लागते. तरच तो खर्या अर्थाने अर्थार्जन अन छंदजोपासणी दोन्ही करू शकतो. पण बरेचदा परिस्थितीमुळे म्हणा किंवा वाईट संगतीमुळे ही सीमारेषा पार होते आणि छंदाचं रूपांतर व्यवसायात होतं. आणि एकदा तो व्यवसाय झाला की त्यातनं आनंद मिळणं बंद होतं.
हल्लीच्या मुलांकडून पालक ज्या मणामणांच्या अपेक्षा ठेवून छंद 'जोपासायला' लावताना दिसतात ते पाहून कधी कधी बरं वाटतं की आपल्याला लहानपणी 'वाचन' हा एकदम हार्मलेस छंद होता! अन कुठल्याच छंदाचा तेव्हा व्यवसाय झालेला नव्हता.

1/28/2011
जाळ
गेल्या दोन आठवड्यांपासून जगामध्ये एक फार मोठा बदल व्हायला सुरूवात झालीय. बर्याच जणांना त्या बदलाचं महत्व कळत नसलं तरी त्याचे सुरू झालेले अन पुढे होतच राहणारे परिणाम प्रचंड दूरगामी असतील. हा बदल म्हणजे मध्यपूर्वेमध्ये (अर्थात पश्चिम आशिया अन उत्तर आफ्रिकेचा काही भाग) सुरू झालेली सरकारविरोधी आंदोलनं.
मध्यपूर्व हा जगाची तेलाची गरज पुरवण्यामध्ये फार महत्वाचा वाटा उचलणारा भाग आहे. आणि योगायोगाने हा भाग बहुतांशी अरब अन त्यातही मुस्लिमबहुल असा आहे. इस्लामची पताका इथूनच जगभर गेल्यामुळे अरबी मुस्लिम हे जरा जास्तच कट्टर आहेत. पण त्याच कारणामुळे इथल्या बहुतांश देशांमध्ये उत्तम शिक्षणाचं फारसं महत्व नाही. त्यातच ह्या भागामध्ये तेलाचे प्रचंड साठे असल्यानं औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा सर्व देशांचे इथे हितसंबंध असणं नेहमीच जरूरी होतं. ह्या धंद्यामध्ये अमेरिका नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे, कारण वर्षांनुवर्षांपासून अमेरिकेची तेलाची भूक महाप्रचंड आहे. आणि त्याचबरोबर इस्रायल हे अमेरिकेच्या मांडीवरचं बाळही तिथेच शत्रूंच्या मधोमध राहत असल्यानं तिथे आपली माणसं असणं अमेरिकेसाठी अत्यावश्यक ठरतं. त्यामुळे अमेरिकेने ह्या देशांमध्ये अनेक हुकूमशहा पोसलेले आहेत. जे गेली कित्येक दशकं अशिक्षित अन गरीब जनतेला नाडत सिंहासनांवर बसून आहेत. कधी थेट हुकूमशहा म्हणून तर कधी खोट्या लोकशाहीचा मुखवटा घालून. एकंदर ह्या भागामध्ये गरिबी अन शिक्षणाचा अभाव फार असल्याकारणाने सत्तेवरची मांड लष्कराच्या मदतीनं टिकवणं सोपं जातं.
पण गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटच्या प्रचंड वेगाने होत असलेल्या प्रसाराने लोकांच्या, विशेषतः तरूणांच्या आतल्या खदखदणार्या विचारांना वाट मिळाली. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून त्यांना व्यक्त होण्याची अन जगाच्या पाठीवरच्या समविचारी लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. इथल्या सरकारांनी कधी माहिती तंत्रज्ञानच काय कसलीच व्यवस्था नीट न ठेवल्यामुळे इंटरनेटचा विस्तारही अव्यवस्थितपणेच होत होता. पण हेच बंडखोर तरूणांच्या पथ्यावरही पडलं कारण त्यांना रोखण्यासाठीही फारसं काही केलं जाऊ शकत नव्हतं. इराण किंवा सौदी अन इतर काही देशांमध्ये बंडखोर तरूणाईच्या इंटरनेट स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचाही प्रयत्न झाला, पण तरूणाई ह्या सगळ्याला पुरून उरली. जग छोटं झाल्यामुळे सगळ्या जगभरात चालणार्या गोष्टी, लोकशाही मूल्य अन पुरोगामी विचार ह्यांसारख्या गोष्टी ह्या भागातील लोकांनाही कळू लागल्या. आणि त्यातच गेल्या वर्षीपासून आलेल्या जागतिक मंदीमुळे मध्यपूर्वेतल्या छोट्या देशांची तर अवस्था बिकटच झाली. पण अर्थात जनतेची, शासकांची नाही. त्यामुळे लोकांमध्ये इतक्या काळापासून खदखदत असलेल्या असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्ह होतीच. प्रथम इराणमध्ये झालेलं अयशस्वी अन निर्दयरित्या दडपलं गेलेलं सरकारविरोधी आंदोलन हे त्याचीच नांदी होतं.
आणि आता आठवड्याभरापूर्वी ट्युनिशियात घडलेली ते अभूतपूर्व आंदोलन. ट्युनिशिया, हा जागतिक नकाशावरचा एक ठिपका. पश्चिम आशियाला जवळ असणार्या उत्तर आफ्रिकेच्या किनार्याने वसलेला एक छोटासा देश. अक्षरशः इतका छोटा की आम्ही शाळेत नकाशा खेळताना (ह्या खेळात प्रतिस्पर्ध्याला नकाशावरचं एक ठिकाण शोधायला सांगायचं असतं) ट्युनिशिया हमखास सांगत असू. माझी अन ट्युनिशियाची पहिली ओळख ती अन दुसरी ही की त्यांची फुटबॉल टीम बरीच तगडी आहे. तर अशा ह्या नगण्या ट्युनिशियात गेली काही दशकं राज्यपदावर बसलेल्या राष्ट्रप्रमुखाविरूद्ध आंदोलन होतं आणि मोठ्या सातत्याने दडपशाहीविरूद्ध प्रक्षुब्ध जनता आणि तरूणाई आपल्या मागण्या लावून धरते आणि शेवटी त्या राष्ट्रप्रमुखाला देश सोडायला भाग पाडते, ही अभूतपूर्व घटना गेल्या आठवड्यात घडली.
अरब जगताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जनतेनं 'यशस्वी' उठाव घडवून आणला. आणि एकजात सारे अरब नेते हडबडून गेले. कारण त्यातले जवळपास सगळेच कमीअधिक फरकाने हुकूमशहा. आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व प्रगतीमुळे सार्या जगानं ही घटना पाहिली आणि ती सार्या जगापर्यंत व्यवस्थित पोचवायचं काम सोशल नेटवर्किंग साईट्सनीही केलं. ह्यामुळे आता मध्यपूर्वेच्या सगळ्या देशांमधल्या तरूणाईला एक आदर्श मिळालाय. एक असं उदाहरण जे आशादायी आहे. संपूर्ण व्यवस्थाच उलथून टाकणे हा मार्ग आचरण्यासाठी बरीच तरूणाई उत्सुक आहे. त्यामुळे लगेचच शेजारी अल्जेरियात उठाव सुरू झालेत. आणि आज इजिप्तमध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झालंय.
वर्षांनुवर्षं लोकांना गृहित धरून स्वतःची घरं भरणार्या राजकारण्यांना यःकश्चित प्रजाजन देशातून हुसकावून लावायच्या प्रयत्नात आहेत. एका ठिकाणी तर यशस्वीही झालेत आणि बाकी ठिकाणी लढाया सुरू झाल्यात. माझ्या मते तर ही खूप लांब चालणारी लढाई असेल. ह्या हुकूमशहांचे आलिशान प्रासाद जाळून आंदोलनकर्ते योग्य तो संदेश परिणामकारकपणे देताहेत. हा जाळ आता लवकरच पसरेल आणि जर हुकूमशहा जाऊन तिथे योग्य तशी लोकशाही येऊ शकली तरच खरा विजय ठरेल पण अमेरिकेसह तमाम स्वार्थी युरोपियन देशांचे वांधे होतील. अन्यथा अराजकच माजेल आणि त्यात जनतेची परवड अन अजून एखाद्या हुकूमशहाचा उदय एव्हढंच निष्पन्न होईल. पण दोन्हीही परिस्थितींमध्ये जगामध्ये अन जगाच्या राजकारणामध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत आहेत. ही उलथापालथ अगदी रातोरात नाही झाली तरी हळूहळू पण निश्चितपणे होईल आणि कायमस्वरूपी परिणाम करेल.
पण हा जाळ भारतात कधी येईलसं वाटत नाही. आपले लोक फारच निर्ढावलेत. इतके घोटाळे रोजच्या रोज बाहेर येऊनही फक्त घराणं, नातेवाईक हे बघूनच आपले लोक वर्षांनुवर्षं मतदान करताहेत. सरकारला जाब विचारणं दूरच साधा विरोध प्रदर्शित करणंही आपल्या लोकांच्यानं होत नाही. रोज एकेका जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत चाललेत पण आपल्याला पुतळे, इतिहास, जात ह्या गोष्टींमध्ये प्रचंड स्वारस्य आहे. आणि अन्यायविरोधी आंदोलनांसाठी नाही तर जातीपाती अन धर्मांवरून दंगलींसाठी जाळपोळ करायला अन रक्त सांडायला आपले लोक तयार आहेत.
आपल्या माणसांना कधीतरी हे समजेल का की मेणबत्त्या आणि संग्रहालयं पेटवून काही होत नाही. आयुष्याच्या मशाली पेटवायला लागतात आणि त्यांतूनच जो जाळ निर्माण होतो तो जगातल्या मोठ्यांतल्या मोठ्या पापाच्या पैशांच्या प्रासादांना स्वाहा करायची ताकद ठेवतो.

1/27/2011
अनुवाद -१
ब्लॉगवर सगळे प्रकार हाताळून बघायचे असं सध्या डोक्यात चालू आहे. त्यामुळे आज फारसं काही सुचत नसल्याचा मुहूर्त साधून 'अनुवाद' हा प्रकार धरावा असं ठरवलंय. अनुक्रमांक अशासाठी, की पुन्हा कधी अशीच 'शून्य वैचारिक अवस्था' आली की अनुवादाचं शस्त्र काढायला बरं!
डॉ. व्हिक्टर फ्रँकल हा एक मानसशास्त्रज्ञ नाझींच्या ज्यू छळाच्या पर्वामध्ये छळछावणीमध्ये होता. ऑशविट्झ च्या कुप्रसिद्ध छळछावणीत जाऊनही जिवंत परत आलेल्यांपैकी हा एक. व्हिक्टर फ्रँकलनं ह्या छळादरम्यानदेखील स्वतःच्या अभ्यासामध्ये बरीच भर घातली. त्यानं तर बाहेर पडल्यानंतर आपल्या अनुभवांवरून मानसशास्त्रातल्या नवीन उपचारपद्धतीही शोधल्या. आपले छळछावणीतले अनुभव अन त्यावरून त्यानं बनवलेली उपचारपद्धती असं एक पुस्तक त्यानं लिहिलेलं आहे. अन ते जगभरात बरंच नावाजलंही गेलंय. 'मॅन'स सर्च फॉर मीनिंग' असं पुस्तकाचं नाव. मी ह्या पुस्तकाची-खासकरून 'छळछावणीतले अनुभव' ह्या भागाची पारायणं केलेली आहेत. त्यामुळे 'अनुवाद' ह्या प्रयोगाची सुरूवात ह्या पुस्तकातल्याच एका उतार्यापासून करतोय.
मूळ उतारा -
The prisoner who had lost faith in the future-his future-was doomed. With his loss of belief in the future, he also lost his spiritual hold; he let himself decline and became subject to mental and physical decay. Usually this happened quite suddenly, in the form of a crisis, the symptoms of which were familiar to the experienced camp inmate. We all feared this moment-not for ourselves, which would have been pointless, but for our friends. Usually it began with the prisoner refusing one morning to get dressed and wash or to go out on the parade grounds. No entreaties, no blows, no threats had any effect. He just lay there, hardly moving. If this crisis was brought about by an illness, he refused to be taken to the sick-bay or to do anything to help himself. He simply gave up. There he remained, lying in his own excreta, and nothing bothered him any more.
I once had a dramatic demonstration of the close link between the loss of faith in the future and this dangerous giving up. F---, my senior block warden, a fairly well-known composer and librettist, confided in me one day: "I would like to tell you something, Doctor. I have had a strange dream. A voice told me that I could wish for something, that I should only say what I wanted to know, and all my questions would be answered. What do you think I asked? That I would like to know when the war would be over for me. You know what I mean, Doctor-for me! I wanted to know when we, when our camp, would be liberated and our sufferings come to an end."
"And when did you have this dream?" I asked.
"In February, 1945," he answered. It was then the beginning of March.
"What did your dream voice answer?"
Furtively he whispered to me, "March thirtieth."
When F-- told me about his dream, he was still full of hope and convinced that the voice of his dream would be right. But as the promised day drew nearer, the war news which reached our camp made it appear very unlikely that we would be free on the promised date. On march twenty-ninth, F-- suddenly became ill and ran a high temperature. On March thirtieth, the day his prophecy had told him that the war and suffering would be over for him, he became delirious and lost consciousness. On March thirty-first, he was dead. To all outward appearances, he had died of typhus.
Those who know how close the connection is between the state of mind of a man-his courage and hope, or lack of them-and the state of immunity of his body will understand that the sudden loss of hope and courage can have a deadly effect. The ultimate cause of my friend's death was that the expected liberation did not come and he was severely disappointed. This suddenly lowered his body's resistance against the latent typhus infection. His faith in the future and his will to live had become paralysed and his body fell victim to illness-and thus the voice of his dream was right after all.
अनुवाद -
ज्या कैद्याचा स्वतःच्या भविष्यावरून विश्वास उडायचा, तो संपलाच होता. त्याचं आत्मिक भानही सुटायचं. तो स्वतःला कोसळू द्यायचा आणि मानसिक अन शारिरीक स्तरावर त्याची अधोगती सुरू व्हायची. हे सहसा अगदी अचानक घडायचं, एखाद्या समस्येच्या रूपात अन अनुभवी कैद्यांना लगेच ह्या लक्षणांचा अर्थ लागायचा. ह्या क्षणाची आम्हा सर्वांनाच भीती वाटायची, पण स्वतःसाठी नाही कारण त्याला अर्थ नव्हता, तर आमच्या मित्रांसाठी. सहसा ह्याची सुरूवात एखाद्या कैद्यानं एका सकाळी उठायला, आंघोळ करायला, अन कपडे घालून परेड ग्राऊंडवर जायला नकार देऊन व्हायची. कुठल्याही प्रकारच्या विनवण्या, लाथा-बुक्के अन धमक्यांचा कसलाही परिणाम नाही. तो तसाच तिथे पडून राहायचा अगदी निश्चल. जर ही समस्या एखाद्या आजारपणामुळे निर्माण झालेली असेल तर तो स्वतःला आजारी कैद्यांच्या राखीव जागेत न्यायला नकार द्यायचा किंवा स्वतःसाठी काहीच न करता निश्चल पडून राहायचा. त्यानं आशा सोडून दिलेली असायची. तिथेच स्वतःच्याच मलमूत्रात पडलेल्या त्याला आता कशानंच काही फरक पडणार नसायचा.
एकदा मला भविष्यावरून उडालेला विश्वास अन ह्या भयंकर अशा परमोच्च नैराश्याच्या अवस्थेतील जवळच्या संबंधाचा मोठा नाट्यपूर्ण अनुभव आला. क्ष, माझा सिनियर ब्लॉक वॉर्डन, एक बर्यापैकी प्रसिद्ध संगीतकार जो ओपेराच्याही रचना लिहायचा, एक दिवस मला विश्वासात घेऊन सांगू लागला, "मला तुला काहीतरी सांगायचंय, डॉक्टर. मला एक विचित्र स्वप्न पडलं. एक आवाज मला म्हणाला की इच्छा असेल त्याप्रमाणे मी मला काही जाणून घ्यायचं असल्यास विचारू शकतो, आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुला काय वाटतं, मी काय विचारलं? की मला हे जाणून घ्यायचंय की माझ्यासाठी हे युद्ध केव्हा संपेल. तुला कळलं डॉक्टर, मला काय म्हणायचंय - माझ्यासाठी! मला जाणून घ्यायचं होतं की केव्हा आपण, आपला कॅम्प मुक्त होईल आणि आपल्या वाटचे भोग संपतील."
"आणि हे स्वप्न तुला केव्हा पडलं?" मी विचारलं.
"फेब्रुवारी १९४५ मध्ये." तो म्हणाला. तेव्हा मार्चची सुरूवात नुकतीच होत होती.
"अन तुझ्या स्वप्नातल्या आवाजानं काय उत्तर दिलं?"
तो हळूच माझ्या कानात म्हणाला, "तीस मार्च."
जेव्हा क्ष नं मला त्याच्या ह्या स्वनाबद्दल सांगितलं, तेव्हा तो प्रचंड आशावादी होता अन त्याला पूर्ण विश्वास होता की त्याच्या स्वप्नातला आवाज बरोबर बोलतोय. पण जसजसा सांगितलेला दिवस जवळ येत गेला, आमच्या कॅम्पवर येणार्या युद्धाच्या बातम्यांवरून हे स्पष्ट होत गेलं की सांगितलेल्या दिवशी आमचं मुक्त होणं अशक्यप्राय होतं. एकोणतीस मार्चला क्ष आजारी पडला अन तापाने फणफणला. अन त्याच्या भाकिताप्रमाणे युद्ध अन भोगांपासून त्याच्या मुक्तीसाठी ठरलेल्या दिवशी म्हणजे तीस मार्चला तो भ्रमिष्ट झाला अन त्याची शुद्ध हरपली. एकतीस मार्चला, तो गेला. तसं तिर्हाईतासाठी, लक्षणांवरून त्याचा मृत्यू टायफसमुळे झाला होता.
ज्यांना माणसाची मानसिक अवस्था (धैर्य अन आशा किंवा निराशा) अन शरीराची रोगप्रतिकारकशक्ती ह्यांच्यातल्या जवळच्या संबंधाची कल्पना आहे त्यांच्या लक्षात येईल की, अचानक गमावलेलं धैर्य किंवा नैराश्याचा झटका भयंकर परिणामांना कारणीभूत ठरू शकतो. माझ्या मित्राच्या मृत्यूचं अस्सल कारण हे होतं की अपेक्षित मुक्ती आलीच नाही अन त्याचा प्रचंड भ्रमनिरास झाला. ह्या घटनेमुळे त्याच्या शरीराचा सुप्त रूपातल्या टायफसच्या संसर्गाविरूद्धचा प्रतिकार एकदम कमी झाला. त्याचा स्वतःच्या भविष्यावरचा विश्वास उडाला अन त्याची जगण्याची इच्छाच लोप पावली आणि त्याचं शरीर आजारपणाला बळी पडलं - अन त्याअर्थी त्याच्या स्वप्नातला आवाज खरा झाला.
ह्या पुस्तकाची विकिपीडिया लिंक.
Subscribe to:
Posts (Atom)