मग थोड्या दिवसांनी सहजच एक गाणं ऐकण्यात आलं. चावटपणाच्या उंबरठ्यावर आहे की काय असं वाटावं असं हे गाणं. पण थोडंसं लक्ष देऊन ऐकलं, तर त्यात आक्षेपार्ह मला काहीच वाटलं नाही. आणि मग कलेबद्दलचा उपयुक्ततावाद, ह्याबद्दल माझ्या वाचनात आलं. म्हणजे कला ही सुंदरच असावी असं नाही, पण त्यात नैतिकता, संदेश किंवा उपयुक्तता हवी. आणि ह्या क्रायटेरियात हे गाणं चपखल बसतं. मग लगेच मटाच्या उपरोल्लेखित अग्रलेखाला स्मरून मी ह्या गाण्याचं रसग्रहण करायला घेतलं.
वैधानिक इशारा : ह्या गाण्यातले शब्द थोडे सभ्य माणसांना खटकण्यासारखे असू शकतील, पण अगदीच काही 'हे' नाहीयेत. तरीही, आपल्याच जवाबदारीवर हे रसग्रहण वाचा आणि गाणंही ऐका. गाण्याची लिंक मुद्दामहूनच लेखाच्या शेवटी दिलेली आहे, म्हणजे तिथवर पोहोचलातच नाहीत तरी हरकत नाही.
अजून एक महत्वाची माथाटीप : हे रसग्रहण गंमतीने केलेलं आहे आणि ह्याला गंभीरतेने घेऊ नये. मी ह्या लेखाच्या माध्यमातून पहिल्यांदाच 'लवचिक वैचारिक लेखणी'चा प्रयोग करतोय. आणि हो, कुणाच्याही भावना दुखावल्या जात असल्यास पुन्हा सांगतो, हे केवळ एक गंमत म्हणून केलेलं लेखन आहे; तरीही आधीच क्षमा मागतो.
अथ।
सांप्रतच्या काळात, "जनरेशन वाय", "जनरेशन एक्स", "जेननेक्स्ट", "यंगिस्तान" ह्या आणि असल्या इंग्रजाळलेल्या फुटकळ आणि बाष्कळ शब्दांनी हल्लीच्या पिढीचं वर्णन करण्याची लाट आलीय. आणि वर कहर म्हणजे काहीतरी हाय-फाय म्हणजे "ऍक्सेसरीज", "स्टाईल स्टेटमेंट", "आयडेंटिटि क्रायसिस" असले परकीय शब्द वापरून उगाच गोंधळलेल्या आजच्या पिढीला अजून कन्फ्युज्ड करून टाकतात. ह्या असल्या गदारोळात आमच्यासारख्या मराठमोळ्या आणि ह्या भारताच्या मातीशी नाळ जुळलेल्या "हल्लीच्या पोरां"च्या एका महत्वाच्या समस्येला अगदी मातीशी इमान राखणार्या भाषेत भाष्य करणारं एक गाणं मध्यंतरी ऐकिवात आलं आणि ह्या देशात आमच्यासारख्यांचीही किंमत आहे ह्याची साक्ष पटून डोळ्यांत पाणी उभं राहिलं.
ह्या गाण्याच्या ध्रुवपदाची सुरूवातच मुळी "हल्लीच्या पोरांना.." अशी आहे. इतक्या आपुलकीनं उल्लेख झाल्याने माझ्या मनावर जी अनेकानेक इंग्रजी शब्दांची पुटं चढली होती, ती जळमटं झटकावीत तशी झटकली गेली. ह्या हाय-फाय जमान्यात राहून आमच्यासारख्या भूमीपुत्र मुलांची जी 'घर के ना घाट के' अशी अवस्था झालीय, त्याचं अगदी यथार्थ वर्णन ह्या गाण्यात आलं आहे. इथे मी ह्या गाण्याचं प्रत्येक ओळीप्रमाणे रसग्रहण करायचा एक क्षीण प्रयत्न करतो आहे.
ना साडी, ना झंपर, ना मॅक्सी पाहिजे। हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(ध्रु.)(२)
स्पष्टीकरण - गीतकार ध्रुवपदालाच सिक्स मारतो. मला वाटतं साडी, झंपर आणि मॅक्सी ही तीन वेगवेगळ्या सामाजिक स्तरांच्या स्त्रियांची(त्या वापरत असलेल्या वस्त्रांप्रमाणे) प्रतीकं म्हणून वापरली आहेत. ह्यातूनच गीतकाराची निरिक्षणशक्ती आणि अगदी सहज रुपकं वापरण्याची हातोटी समोर येते. आणि पुन्हा 'सेक्सी' हा जो शब्द आहे, तो हाय-फाय जमान्याच्या चकचकाटाला भुलून गेलेल्या तरूणाची मनःस्थिती अगदी अचूक दर्शवतो.
मल्लिका बिपाशा, नटी जणू रंभा। नको देसी गावठी हवा इन्गलिस खंबा॥(कोरस)
ना सोडा, ना लेमन ना पेप्सी पाहिजे।
हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(२, कोरस)
स्पष्टीकरण - हे पहिलं कडवं गाण्याचा टोन व्यवस्थित राखतं. सिनेनट्यांचं वर्णन स्वर्गातल्या अप्सरांशी करून गीतकार आपल्याला संस्कार आणि सामाजिक परिस्थिती ह्यांच्यातलं मानसिक द्वंद्व दाखवतो. पुन्हा आपलं ते सर्व वाईट आणि परकीय ते सर्व चांगलं असं समाजमनावर जे आज विविध माध्यमांतून बिंबवलं जातंय, त्यावर गीतकार "नको देसी गावठी.." ह्या वाक्यातून प्रहार करतो, पुन्हा स्वदेशीच्या उत्त्थानाचा एक छुपा संदेशही तो ह्याच वाक्यातून विरोधाभासाचा वापर करून देतो. आणि "आपलं ते वाईट..." हाच मुद्दा तो "ना सोडा, ना लेमन..." मधूनही देतो, पण ह्यावेळेस विरोधाभासाचा वापर करून तो "पेप्सी"सारख्या आरोग्यास घातक शीतपेयांपेक्षा सोडा, लेमन हे कसे चांगले पर्याय आहेत, असा छुपा संदेश देतो.
नको लठ्ठ जाडी हवी नाजूक बॉडी। मग फिरायाला हवी एक स्कॉर्पियो गाडी॥
ना टांगा, ना रिक्शा, ना टॅक्सी पाहिजे।
हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(२, कोरस)
स्पष्टीकरण - ह्या कडव्यात तो तोंडदेखल्या सौंदर्यावर प्रहार करतो. थोडक्यात म्हणजे तो सुंदर पेक्षा टिकाऊ कसं महत्वाचं आहे, हे पहिल्या वाक्यातून विरोधाभासाच्या माध्यमातून दाखवतो. इथपर्यंत वाचताना आपल्याला गीतकाराची शैली स्पष्ट होते. मग पुढ्च्या वाक्यात काही परिणाम मिळत नाही, कारण पुढचं आणि तिसरं अशी दोन्ही वाक्य एकत्रित वाचल्यास परिणाम साधतात. स्कॉर्पियो गाडी आणि टांगा, रिक्शा आणि टॅक्सी ह्यातून तो आजच्या पिढीच्या चंगळवादाकडे झुकणार्या मानसिकतेवर प्रहार करतो. आणि पुन्हा अगदी सहजपणे एका सामान्य वाक्यातून टांगा, रिक्शा आणि टॅक्सी अश्या रूपकांमधून तो तीन सामाजिक स्तरांना एकत्रित गुंफतो. गीतकाराचा सामाजिक उतरंडीचा अभ्यास दांडगा असल्याची प्रचिती वारंवार अश्याप्रकारे येत राहते.
सिनेमात पाहूनी त्या अर्धनग्न बाया। एकनाथा गेली बघ ही तरूण पिढी वाया॥
ना पतली, ना जाडी, ना फोक्सी पाहिजे।
हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(२, कोरस)
ना साडी, ना झंपर, ना मॅक्सी पाहिजे। हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(२)
ना साडी, ना झंपर, ना मॅक्सी पाहिजे। हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(२, कोरस)
स्पष्टीकरण - हे माझ्या मते पूर्ण गाण्यातलं सर्वाधिक बोल्ड आणि म्हणूनच अगदी थेट परिणाम साधणारं कडवं आहे. ह्यामध्ये तो कुठेही छुपे प्रहार करत नाही, इथे सर्व मामला थेट. सिनेमातल्या अंगप्रदर्शनाला पहिल्याच वाक्यात फटकारून तो थेट संत एकनाथांना आपलं दुःख सांगतो. त्यांच्यासमोर आपलं गार्हाणं मांडतो. आणि ह्याप्रकारे संत एकनाथांच्या उल्लेखातून तो आपल्या संतकाव्याशी जोडलेल्या नाळेचंही दर्शन घडवतो. पुन्हा तो बाह्य सौंदर्यावर भाळणार्या आजच्या भरकटलेल्या पिढीला शेवटच्या वाक्यानी लाथाडतो आणि चौखूर उधळलेल्या प्रतिभेला लगाम घालतो.
हे एव्हढं लिहितानाच माझे कर गीतकाराच्या प्रतिभेपुढे आपोआप जुळलेत. पण ह्या गाण्याचं यश गीतकाराचं फारतर ७५% असेल, पण संगीत दिग्दर्शक आणि गायकानेही आपल्या प्रतिभेने आणि बारकाव्यांवर घेतलेल्या मेहनतीने ह्या गाण्याला एका परमोच्च पातळीवर नेऊन बसवलंय.
संगीत दिग्दर्शकाने ह्या गाण्यासाठी एक अतिशय सरळ आणि साधी चाल निवडलीय. वाद्यही सगळी कानाला सुखावतील अशी. ह्यामुळे कसं, गीतकाराने जे आसूड ओढलेत ते थेट काळजाला भिडतात, अजून परिणामकारक ठरतात. विचार करा, जर ह्या गाण्याला रॉक संगीतासारखी चाल घेतली असती, तर हा परिणाम मिळणं केवळ अशक्य होतं. पुन्हा कोरससाठी स्त्रियांचा परिणामकारक वापर हाही एक महत्वाचा बारकावा. कारण, गाण्यात 'सेक्सी' हा आक्षेपार्ह मानला जाणारा शब्द आहे. समाजाचा एक मोठा वर्ग नाहक ह्या शब्दाला अश्लील समजतो. ह्या शब्दाचा नुसत्या उल्लेखालाही लोक कानावर हात ठेवतात, अश्या काळामध्ये स्त्रियांना 'सेक्सी' हा शब्द असलेलं ध्रुवपद कोरसमध्ये गायला लावून संगीत दिग्दर्शकाने हा टॅबू(निषिद्ध गोष्ट) मोडायचा स्तुत्य प्रयत्न केलाय.
आणि गायक, ह्या गायकाच्या आवाजाचा पोत हा लोकसंगीताचा आहे, त्यामुळे हे समाजजागृतीपर गाण्यासाठी त्याचा आवाज अगदी चपखल बसतो. सुरूवातीपासून शेवटापर्यंत मला वाटतं तो 'हल्लीच्या पोरांना..' ही टॅगलाईन नऊ वेगवेगळ्या प्रकारे म्हणतो, कदाचित कमी जास्तही असेल, पण ते केवळ संगीतातल्या जाणकारांच्याच तयार कानांना जास्त योग्य समजू शकतं. पण शेवटच्या वेळेस जेव्हा तो म्हणतो, तेव्हा गाण्याला तो एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो आणि आपल्या तोंडून आपोआपच दाद निघते, "वाह!". मग रेग्युलर कोरस चालत राहतो आणि हळूहळू ती लागलेली किक उतरते.
पण गायकाचा खरा मास्टरस्ट्रोक आहे तो 'पाहिजे' ह्या शब्दाचा उच्चार. गायक आपल्या लोकसंगीताच्या पार्श्वभूमीचा इथे पूर्ण उपयोग करतो आणि 'हल्लीच्या पोरांना..' अशी सुरूवात असलेल्या वाक्याच्या शेवटी 'पाहिजे' चा वेगळा उच्चार करतो जेणेकरून ते वाक्य अधोरेखित होतं. कारण ही पंचलाईन आहे आणि त्याचा परिणाम ह्या विशिष्ट उच्चारामुळे अधिक गडद होतो.
ह्याहून अजून काही जास्त असल्यास, राहून गेलं असल्यास कृपया तो माझ्या अल्पमतीचा दोष मानून क्षमा करावी.
इति॥
इथपर्यंत वाचूनही मला मारण्यासाठी शोधत नसाल, तर गाणं इथून डाऊनलोड करता येईल(सौजन्यः अभिजित वैद्य).
मस्तच. एकदम भारी. कुठं सापडलं हे गाणं?
ReplyDeleteगीतांच्या शब्दांचे तुझं विश्लेषण एकदम व्यवस्थित आणि योग्य. मी गीत ऐकलं नाहीये म्हणून संगीतावर काहीच भाष्य करत नाही. :-)
ReplyDeleteजब्बरदस्त !!! हे जाम भारी आहे.. भन्नाटच.. गाण्यापेक्षाही तुझं रसग्रहण.. !! :)
ReplyDelete>> पण 'महाराष्ट्र टाईम्स'मधला त्या पत्रकारपरिषदेबद्दलचा हा अग्रलेख वाचनात आला आणि मी लेखकाच्या ह्या क्षमतेमुळे चाटच पडलो. मी लेखक बनायचा प्रयत्न करतोय, पण कुठल्याही गोष्टीला कश्याही प्रकारे पेश करण्याचं हे कसब माझ्याकडे आहे का? हा संशय माझ्या मनाला चाटून गेला.<<
हे तर बेष्टच.. याचा आणि तुझ्या पूर्ण रसग्रहणाचा परस्पर संबंध सॉलिड आहे !!!
या गाण्याचे गीतकार, संगीतकार, 'ज'वाले गायक आणि तुला त्रिवार सलाम...
ReplyDeleteवाचताना पॉज करुन गाण्याचा आस्वाद घेतलाच पाहीजे, तरच रसग्रहणाचा पुर्ण आनंद घेता येईल...
जबरी, भन्नाट, खल्लास.... ;-))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))
gaana ekdam bhari ahe....ani tyachbarobar tumche analysis hi(sorry vishleshan mhanayacha hota mala) uttam ahe...
ReplyDeleteफारच सुंदर रसग्रहण ! लेख जमलाय एकदम !!
ReplyDelete:) :) :)
ReplyDeleteलई भारी राव....
ReplyDeleteमुद्दाम मी गाण आधी ऐकला मग रसग्रहण एकदम रसपूर्ण झाला :):)
विभि लालभडक रसग्रहण आहे.. :)
ReplyDeleteधन्यवाद देविदास,
ReplyDeleteहे गाणं अभिजितनं मला दिलं. गाण्याचा उगम त्यालाही आठवत नाहीये. नदीचं मूळ, ऋषीचं कूळ...तसंच. ;)
अलताई,
ReplyDeleteहे पोस्ट फारच बिचकत बिचकत टाकलं होतं. तुझी प्रतिक्रिया वाचली आणि जीवात जीव आला. तायांकडून कान पिळले जाणार असं वाटत होतं.;)
हेरंब,
ReplyDeleteएकदम अचूक पकडलंस...तोच परस्परसंबंध आहे.
धन्यवाद...(टोपी काढून दाखवायचा स्मायली)
हाहाहा आनंद,
ReplyDelete>>'*ज*'वाले गायक..
हे आवडलं, चांगलं नामकरण आहे!
बाकी >>वाचताना पॉज करुन गाण्याचा आस्वाद घेतलाच पाहीजे
हे मात्र खरं...;)
नंदकिशोर,
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...मी माझ्या विश्लेषणातून गाण्याच्या उच्च(!) दर्जाला मान देऊ शकलो हे जाणवून बरं वाटलं..
अभिजीत,
ReplyDeleteहे रसग्रहण, तू दिलेल्या गाण्यामुळेच शक्य झालंय. :P
तेव्हा खरे धन्यवाद, आभार तुझेच! :D
मैथिली,
ReplyDeleteधन्यवाद...;))))))))))))
हाहा सुझे,
ReplyDeleteहे बाकी ब्येस..आधीच गाणं.....:D
धन्यवाद!
मुंबई/भ्रमर,
ReplyDeleteलालभडक...रस्साग्रहण?? ;))
धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत!
भारीच....
ReplyDeleteएकदम सहीच कि राव............काय गाणे आहे आणि काय विश्लेषण आहे..........
ReplyDeleteधन्यवाद सागर!! ;)
ReplyDeleteधन्यवाद अनामिक!!! :)
ReplyDeleteगाण एकल नाही पण गाण्यापेक्षाही हे रसग्रहण नक्कीच भारी आहे अस वाटते...
ReplyDeleteदेवेन,
ReplyDeleteधन्यवाद रे. गाण पण जरूर ऐक. ;)
एकदम भन्नाट रसग्रहण झालंय!
ReplyDeleteधन्यवाद निरंजन!
ReplyDeleteगाणंच एव्हढं भन्नाट आहे की माझ्या हातून हे कार्य घडलं..;)