२००२
"छ्या राव जर्मनी जिंकायला हवं होतं. " - मी.
"धत्, रोनाल्डो वेड्या रोनाल्डो. कसला खेळतो तो बघितलंस? ब्राझील इस पर्फेक्ट ऍज अ विनर." - मित्र.
२००६
"यार ह्या झिदानला काय गरज होती हेडबट मारायची? तो मातेराझ्झी बोलला असेल काहीपण; ह्याला अक्कल नव्हती का?" - मित्र.
"अरे झिदान फुटबॉलचा देव आहे, कळलं? त्याला कळत नसेल का तो काय करतोय ते? मातेराझ्झीनं खोडीच तशी काढली असेल." - मी.
२०१०
"यार अर्जेंटिना आणि ब्राझील पाहिजे होते रे." - मित्र.
"'तो' गोल डिस्क्वालिफाय झाला नसता ना, तर इंग्लंडने इक्वलाईझ केलं असतं आणि मग जर्मनी कदाचित बाहेर गेलं असतं." - दुसरा मित्र.
"'हट्. जर्मनी...जर्मनी...जर्मनी..." - मी.
हे असले संवाद दर चार वर्षांनी होतात. पण ही मी माझीच गोष्ट करत नाहीये. ही प्रातिनिधिक गोष्ट आहे. आपल्या देशात असे अनेक 'नियतकालिक फुटबॉल वेडे' आहेत. ह्यांच्या फुटबॉल वेडाला वर्ल्ड कप, ऑलिम्पिक किंवा चॅम्पियन्स लीगच्या फायन स्टेजेसच्या वेळी बहर येतो. अश्या वेळी ही जनता आपल्या गल्लीतलीच फुटबॉल टीम खेळायला गेल्यागत तावातावाने चर्चा करते. अगदी आपल्या घरचा कोणी खेळाडू असल्यागत मॅचचं टेन्शन घेते.
"अरे त्याचा टॅकल केव्हढा व्हायोलंट होता आणि नुसती फ्री किक?"
"धत्, अरे बॉल फर्स्ट होता, फ्री किक पण मिळायला नको होती."
"अरे(फुल व्हॉल्युम)..पेनल्टी, पेनल्टी!! काय हे पेनल्टी नाही दिली?"
"अबे पेनल्टी कसली, डाईव्ह केलं साल्यानं. मी तर म्हणतो कार्ड द्यायला हवं होतं डायव्हिंगसाठी."
सहसा दोन 'नियतकालिक वेडे' एकत्र मॅच पाहतात, तेव्हा त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध टीमला सपोर्ट करणं मॅन्डेटरी असतं. नाहीतर मजा येत नाही. तश्याही ह्यांच्या निष्ठा लवचिक असतात. कारण उगाच कम्प्लीट निष्ठा ठेवली आणि टीम पहिल्याच फेरीत गारद झाली तर उरलेल्या स्पर्धाभर काय करायचं ही पंचाईत. मग अश्या वेळी "माझा पहिला प्रेफरन्स तसा फ्रान्सला आहे, पण काय आहे, मी अंडरडॉग्जना नेहमी सपोर्ट करतो, त्यामुळे घाना पुढे गेली तरी मला आनंडच होईल." असा बॅकप प्लॅन तयार असतो. पण स्पेशालिटी ही की कुणालाही सपोर्ट असला तरी तो दिल से असतो एकदम. म्हणजे पूर्ण भावनिक होऊन.
उदा. "अबे काय गरज होती साल्याला, असा फिअर्स टॅकल करायची. आता कार्ड मिळालं ना. पूर्ण सेकंड हाफ सब्ड्यू होऊन खेळावं लागेल. आणि हा असा घाबरून खेळेल तर गोल कोण करणार. त्यापेक्षा आता कोचनं ह्याला सब्स्टिट्यूट केलं पाहिजे. म्हणजे निदान रेडचं तरी टेन्शन जाईल."
"छ्या, साल्याला स्ट्रेट शूट नाही करता आला. गोलीनं उडीपण चुकीच्या डायरेक्शन मध्ये मारली होती, आणि ह्या मूर्खाने बॉल क्रॉसबारवर मारला."
आता ह्या वाक्यांमधला भावनिक कोशन्ट वाचून लक्षात येणार नाही. त्यामुळे ही वाक्य कश्याच्या तालावर वाचावी ह्यासाठी पुढची उदाहरणं
(२००७ ची २०-२० वर्ल्डकप फायनल)"अरे यार, ह्या हरभजनला बॉलिंग का देतोय धोनी, मिसबाह तुडवतोय. अजून एक ओव्हर दिली तर रिक्वायर्ड रनरेट ६ च्यापण खाली येईल."
"आईला. पहिल्याच बॉलला सिक्स. ह्या जोगिंदर शर्माला सरळ बॉल टाकता येत नाही का? संपलं आता."
तर इतक्या इमोशनली पाहणारे हे फुटबॉल वेडे जरी कुठल्याही टीमला प्रेफरन्स देत असले, तरी प्रत्येक मॅचमध्ये एका टीमला ह्यांचा अगदी भावनिक सपोर्ट असतो.
"अरे, आज काही झालं तरी उरुग्वे हरलं पाहिजे रे. होंडुरास तर आरामात हरेल. उरुग्वे डेंजर आहे पॅराग्वेसाठी."
आता मागच्या वाक्यातल्या तीनपैकी दोन जरी देश प्रत्यक्षात जगाच्या पाठीवर कुठे आहेत, हे ह्या वाक्य सांगणार्याला ठाऊक असेल, तर मी काहीही हरायला तयार आहे. पण वर्ल्ड कपच्या वेळी हे विश्वची माझे घर हा प्रत्यय सगळ्यांनाच येत असेल. कित्येकांना तर नावं पण उच्चारता येत नाहीत, पण आम्ही फुटबॉल वेडे. उरुग्वे ला उराग्वे, पॅराग्वे ला पेरुग्वे, स्लोव्हाकिया आणि स्लोव्हेनिया मधला गोंधळ. पण ह्या सगळ्याचा काय फरक पडतो. एकाने तर मला उरुग्वे हा युरोपियन देश आहे का म्हणून विचारलं होतं. पण उरुग्वे हा दोनवेळा वर्ल्डकप जिंकलेला देश आहे हे मात्र ह्या लोकांना ठाऊक असतं.
बाकी स्टॅटिस्टिक्सची चटक आपल्या देशातल्या लोकांना जन्मजातच. कदाचित म्हणूनच आपल्याला क्रिकेट खूप आवडतं. त्यात स्टॅटिस्टिक्सची रेलचेल असते. फुटबॉल हा असा खेळ आहे ज्यात स्टॅटिस्टिक्स फक्त ऍनॅलिसिस साठी उपयोगी पडतात, त्यावरून रिझल्ट्स प्रेडिक्ट करता येत नाहीत. पण ह्या सगळ्याने आपल्या लोकांचा जोश कुठे कमी होतो.
"तुला माहितीय, १९७६ साली इंग्लंड-जर्मनी मॅचमध्ये असाच सिमिलर गोल नाकारला गेला होता जर्मनीला. बदला घेतला त्यांनी यावेळी. स्वीट रिव्हेंज."
"तुला सांगतो. अर्जेंटिना गेल्या वीस वर्षांत क्वार्टरफायनलच्या पुढे नाही जाऊ शकली."
ही आणि असली निरुपद्रवी माहिती आपल्या लोकांकडे खूप असते. मला वाटतं, लोक ह्याचा अभ्यास करतात. कदाचित ब्राझीलच्या पोरांबरोबर आपल्या पोरांची फुटबॉल क्विझ ठेवली, तर आपली पोरं ब्राझीलच्या पोरांना चारीमुंड्या चीत करतील. बाकी मैदानावर काय गत आहे ती कुणाला सांगायची गरज नाही. (हाच प्रकार मी कुठल्याही मोठ्या क्रीडास्पर्धेवेळी पाहिलाय. ऑलिम्पिक्सच्या वेळी मी लोकांना फेन्सिंग आणि वॉटर राफ्टिंग बद्दलही चर्चा करताना ऐकलंय.)
वर्ल्ड कप संपला, की रुटिन सुरू होतं. अधून मधून फ्रेंडली असतात, त्याबद्दल कुणाला सोयरसुतक नसतं. वर्ल्ड कपला जर्मनीचा हार्ड कोअर फॅन असणारा 'जर्मनीचा ग्रीसकडून फ्रेंडलीमध्ये मोठा पराभव' ही बातमी 'सानिया विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत गारद' वाचवी तेव्हढ्याच उत्सुकतेने वाचतो. आता चर्चा कशावर करणार? त्याचं उत्तर मिळतं. चॅम्पियन्स लीग जवळ येत असते. युरोपातल्या बेस्ट क्लबांची सर्वोच्च स्पर्धा.
जी गत देशांची, तीच गत क्लब्सच्या बाबतीत. "मी हार्डकोअर मॅन्चेस्टर युनायटेड फॅन आहे." हे वाक्य एखादा पोरगा असा फेकतो, जणू तो ओल्ड ट्रॅफर्डवरच लहानाचा मोठा झालाय. "अरे तुला ठाऊके, ह्या वर्षी, मायकल एसियनला कुणीच जास्त ऑफर नाही केलं. एड्रियन मुटू ह्या वर्षी ड्रग्समध्ये अडकलाय वाटतं. कोलो आणि याया टूरे ला जबरा मिळतंय ट्रान्स्फर अमाऊंट. काका रेआलला चालला मिलानला डिच करून." मी कधी कधी कौतुकाने अश्या पब्लिककडे बघतो. कारण हा बहर तात्पुरता असतो. ही हार्डकोअर फॅनशिप कुठल्या मोठ्या स्पर्धेच्या(सहसा चॅम्पियन्स लीग) बाद फेरीपासून सुरू होते(कोण कोण क्वालिफाय झालंय त्यावरून) आणि फायनल(ही रात्री जागून बघणं हा प्रेस्टिज इश्यू असतो) संपल्यावर दुसर्या दिवशीच्या गरमागरम चर्चेनंतर संपते.
मग ही स्पर्धा संपते आणि वर्ल्ड कपनंतर दोन वर्षांनी येणार्या 'युरो' स्पर्धेचे वारे वाहू लागतात. मग ग्रीस, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड, पोर्तुगाल, स्पेन पुन्हा चर्चेत येतात.
एखादी स्पर्धा संपली, की हे लोक थोड्या वेळासाठी उदास होतात. आता कुणाला सपोर्ट करणार? कुणाला चीअर करणार? कशावर चर्चा करणार? कुणाची फॅनशिप घेणार.
मग मी विचार करतो. कदाचित हे सगळं एव्हढ्यासाठी, की आपली टीम नाही इथे. जगातला सर्वांत लोकप्रिय खेळ आणि त्याच्या उत्सवात आपली टीम नाही? हाच सल असावा ज्यामुळे ह्या उत्सवाचा भाग बनण्यासाठी मग टीम्स दत्तक घेतल्या जातात. मनाला दिलासा मिळत असावा. मीही त्यातलाच. मग कधी कधी मी उगाच 'क्रिकेटची सर नाही फुटबॉलला' म्हणून शहाणपणा करतो. आणि मग धोनी, युवराजच्या मग्रुरीचे आणि पार्टीबाजीचे किस्से ऐकून सगळ्याचीच किळस यायला लागते. पुन्हा मी टीव्ही लावतो आणि 'जर्मनी..जर्मनी...जर्मनी... म्हणून ओरडायला लागतो, झिदान हा कसा फुटबॉलचा देव आहे ह्यावर वाद घालायला लागतो. ह्यावेळच्या युरोमध्ये स्पेनचं पानिपत होणार आणि चॅम्पियन्स लीगमध्ये आर्सेनल जिंकणार अश्या वल्गना करू लागतो. तरी कोपर्यात एक जाणीव कायम असते, आपली एकपण टीम नाही यार. आपला एकपण प्लेअर नाही यार.
मग कदाचित माझ्यासारख्याच लोकांमुळे हे शक्य झालं असावं. दुर्दम्य आशावादाचं मूर्त स्वरूप.
अर्थात, मी वर्णन केलेल्या 'नियतकालिक वेड्यां'व्यातिरिक्त खरे फुटबॉलप्रेमीही असतीलच. त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. फुटबॉलच का, मला कुठल्याही खेळावर मनापासून प्रेम करणार्या प्रत्येकाबद्दल आदर आहे.
ही नोंद लिहिण्याची कल्पना ओंकारनं परवा बोलताना दिली. त्यामुळे त्याचे धन्यवाद, कारण मला काहीच सुचत नव्हतं.
हाहा .. येकदम खरं.
ReplyDeleteपावसाळी रानगवतासारखं फुटबॉलप्रेम वाढतं वर्ल्ड कपच्या वेळी... मी ही त्यातलाच..
तश्याही ह्यांच्या निष्ठा लवचिक असतात ... जबराट ... मी सद्ध्या जर्मनीला सपोर्ट करत आहे... अर्थातच जर ते फायनल मध्ये नाही गेले तर दुसरी टीम... हरभरजन क्रिकेटपेक्षा फुटबॉल चांगला खेळू शकतो... ;)
>>वर्ल्ड कपच्या वेळी हे विश्वची माझे घर हा प्रत्यय सगळ्यांनाच येत असेल.
ReplyDeleteखरच खुप फ़ील येतो हा..कोण कुठला देश ठाउक नाही पण आपण एकदम ’दिलसे ’ त्याला सपोर्ट करत असतो... बाकी आपला संघ हया रणधुमाळीत नसल्याची सलही आहेच...
अगदी मनातलं बोललास! मी पण ह्यातलाच एक!
ReplyDeleteफूटबॉल क्रिकेटपेक्षा चांगला खेळ का?
ReplyDeleteउत्तर सापडेल या जालनिशीवर -
http://xero0ne.blogspot.com/2010/06/why-football-is-better-than-cricket.html
इंग्लिश आहे लिखाण पण एकदम धमाल !
- ओंकार
"फुटबॉलच का, मला कुठल्याही खेळावर मनापासून प्रेम करणार्या प्रत्येकाबद्दल आदर आहे"......हे अगदी पटल...मस्त झाली आहे पोस्ट...
ReplyDeleteआपलं football वर प्रेम आहेच ! मायबाप सरकार ने आपला सगळ्यांचा football केल्या मुळे आपल्याला world cup ची गरज नाही .. म्हणून आपली team पण नाही !! मायबाप सरकार visionary असल्यने उगीच आपली team हरली तर केवढे वाईट वाटेल देशभर सगळ्यांना असा विचार करतं! so उगीच सल वगेरे काही ठेवू नका आणि enjoy करा !
ReplyDeleteअल्टिमेट लिहिलं आहेस.. सहीच..
ReplyDeleteमी तर येगळ्याच जमातीतला आहे. कोण कुठे खेळतंय, कोण कुठल्या फेरीत पोचलं, कोणी कोणाला हरवलं, कसं हरवलं याच्याशी काहीही घेणंदेणं नसतं. आमची जमात म्हणजे वर्षानुवर्षं फुटबॉल वर्ल्ड कपची फायनल भक्तीभावाने बघणारी जमात. दर चार वर्षांनी मी हे काम मन लावून करतो :)..
:D sagale agdi 100% patale...!!! Bhannat...!!!
ReplyDeleteमंडळी...अतिउशीरा उत्तरांसाठी क्षमस्व..ब्लॉगरबुवांमध्ये काही समस्या होती...
ReplyDeleteआनंदा,
ReplyDeleteअसाच लवचिक निष्ठावंत राहा!
देवेन,
ReplyDeleteआपला सल कधी दूर होणार कुणास ठाऊक...बघू..होईल कधीतरी..
धन्यवाद!
कपिल,
ReplyDeleteधन्यवाद भाऊ...
ओंकार,
ReplyDeleteजोरदार आहे तो दुवा...सॉलीड एकदम..
धन्यवाद रे!
योगेश,
ReplyDeleteधन्यवाद रे...फुटबॉल फिव्हरमध्येच खरडली अघ पोस्ट..;)
विक्रम,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत.
तुमचं एका अर्थी बरोबर आहे. पण ह्यात नुसताच सरकारी उदासीनपणा कारणीभूत नाही.
एकेकाळी क्रिकेटही एव्हढं वेड लावणारं नव्हतं. पहिला वर्ल्ड कप मिळाल्यावर क्रिकेटवेडानं बाळसं धरलं. असो. जे होणार ते बघत राहावं.
हाहा..हेरंबा..
ReplyDeleteम्हणजे तुझी चतुर्वार्षिक योजना असते तर...उत्तम..
माझंही पूर्वी तसंच होतं...कालमानाप्रमाणे मी हळूहळू सामन्यांची संख्या वाढवत गेलो..;)
मैथिली,
ReplyDeleteस्वानुभवाच भाग बराच आहे त्यात...:D
धन्यवाद!
Sahi ahe...
ReplyDeleteMe paN kityekda eikto asha comments tevha majaa yete. Achuk varNan kele ahes. Complex yeto lokanna aajkaal samja samor champions league che discussion chalu asle ani aapan ek pan vegle vaaky feku shaklo nahi tar.
सागर,
ReplyDeleteबरोबर एकदम..हा कॉम्प्लेक्स जनरल केस आहे..:P