"मदर डाईड टूडे ऑर मे बी यस्टरडे!"
हे "द स्ट्रेंजर" किंवा "द आऊटसायडर" ह्या नावानं प्रसिद्ध असलेलं, मूळ फ्रेंच "L’Étranger " आल्बेर काम्यू(Albert Camus) ह्या लेखकाच्या पुस्तकाचं पहिलंच वाक्य आहे. मी ह्या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा पेपरात वाचलं आणि प्रेमात पडलो होतो. पुस्तक मिळवलं, पण ५-१० पानांपुढे कधी जाऊ शकलो नाही. उत्कंठावर्धक पुस्तक आहे तसं, पण मलाच भीती वाटते. कसली ते सांगतो पुढे.
मला सहसा कुठलेही 'इझम्स' फार आवडतात. कारण माझ्या मते जगात काहीच नियमित नाहीये. जगातली कुठलीही गोष्ट प्रमाणबद्ध नसते, माणसाला प्रत्येक गोष्टीला प्रमाणात अडकवायची हौस आहे. तुम्ही मला सांगा, किती जणांना 'अमुक एका' नंबराचे बूट किंवा चप्पल व्यवस्थित बसतात. किती जणांचा कमरेचा पट्टा एकाच भोकात व्यवस्थित बसतो. किती जणांच्या मनात एका वेळी प्युअरली एकच भावना असते(रादर कुणी हे डिफाईन करू शकतं का?). मला तरी ह्यातलं काहीच नाही जमत बुवा. माणसं उगाच प्रत्येक गोष्टीला प्रमाणात बांधतात. ऍक्चुअली गणिताला सुद्धा हे कळतं, 'पाय' चं पूर्ण उत्तर नाही, किरणोत्सर्गी पदार्थाला हाफ लाईफ असतं, ते तुम्ही मोजून बघा, कधीच उत्तर मिळणार नाही. अनादि, अनंत. तसेच हे सगळे इझम्स आहेत. विचारांना, भावनांना विविध स्थितींमध्ये पकडायचे प्रयत्न. ही स्थिर छायाचित्रं आहेत. चलत चित्र नाहीत. एका मोठ्या फिल्मचे तुकडे पाडले, आणि प्रत्येकाने एक एक पकडला. कुणी म्हणालं हा निहिलिझम, कुणी म्हणालं, हा एग्झिस्टंशियलिझम, कुणी म्हणालं डिटर्मिनिझम. हत्ती आणि पाच आंधळ्यांच्या गोष्टीसारखं, प्रत्येकाला हत्ती वेगळाच भासतो.
असाच एक इझम ह्या पुस्तकात वर्णन केलाय, "ऍब्झर्डिझम". एक कमालीचा विचित्र, सांगायला अतिशय साधासरळ पण कळायला तितकाच गुंतागुंतीचा प्रकार. "कुठल्याही गोष्टीविषयी पराकोटीचा त्रयस्थ भाव, म्हणजे ऍब्झर्डिझम." ही मला समजलेली व्याख्या आहे. सुरुवातीचं वाक्य परत वाचा. आता थोडा बोध व्हायला लागेल.
"Mother died today. Or maybe yesterday, I don't know. I had a telegram from the home: 'Mother passed away. Funeral tomorrow. Yours sincerely.' That doesn't mean anything. It may have been yesterday"
मध्यवर्ती पात्राची आई वारलीय. त्याला एक तार आलीय त्यावरून त्याला कळलंय. त्याला आठवत नाहीये असं नाही, पण तो नक्की नाहीय. पण वाक्यातला कोरडेपणा जाणवल्यावाचून राहत नाही. एक वेगळाच त्रयस्थपणा त्याच्या पुढच्या कृत्यांवरूनपण जाणवायला लागतो. तो तिच्या वृद्धाश्रमात जातो. तिथे तिच्या कॉफिनशेजारी त्याला रात्रभर बसावं लागतं. तिथले लोक त्याचं सांत्वन करताना अपेक्षा करत असतात की तोही रडेल, पण त्याला हेच कळत नाही की त्याला रडू का येत नाही. त्याला कॉफी घेणार का विचारतात तेव्हाही त्याला आपली आवडती कॉफी आठवते. एकंदर, कुठेही त्याला आई जाण्याचा धक्का बसल्याचं जाणवत नाही. तो अगदी नॉर्मल असतो. तिथल्या एकंदर स्थितीचंही वर्णन तो इतका त्रयस्थपणे करतो की बस. तिथल्या गार्डशी तो हवापाण्याच्या गप्पाही करतो. वाचताना एका वेगळ्याच विश्वात पोचल्यासारखं वाटायला लागलं.
मी ऍब्झर्ड आहे का? हा प्रश्न छळायला लागला. आणि मी पुस्तक खाली ठेवलं. असं दोन-तीनदा झालं.
मला माझ्या सगळ्या जवळच्यांबद्दल खूप ओढ वाटते. कायम सगळ्यांशी संपर्कात राहावंसं वाटतं. पण, कधी काही विपरित घडलं तर मी कसा रिऍक्ट करेन? छ्या काहीतरी विचित्र प्रश्न. पण असं घडलं होतं. माझा एक जवळचा मित्र वारला. मी क्षणभर सुन्न झालो होतो. मला कळतच नव्हतं. मग मी भानावर आलो. मी ऑफिसात होतो. थोडा वेळ बातमी देणार्या मित्राशी बोललो. मला दुःख झालं होतं. पण मी दिवसभर कामात बुडालो. मग संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा त्या विचारांनी ताबा घेतला. असा ऊनपाऊस खूप चालला मनाचा. त्याच्या आईवडिलांना भेटायला गेलो होतो, तेव्हा गळा दाटून आला होता. पण पुन्हा नॉर्मल झालो. माझे आजोबा वारले तेव्हा इम्पॅक्ट मोठा होता, पण मी फार लवकर सावरलो होतो. अजूनी कधी कधी खूप आठवण येते. अगदी हुंदकाही दाटून येतो, पण मी मेजरली नॉर्मल असतो. की तसं वाटतं फक्त, आतल्याआत तुटत तर नसतो मी? ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो?
मी जमेल तेव्हा, जमेल तेव्हढे इझम्स वाचतो, मी कुठल्या कॅटेगरीत येतो ह्याचा विचार करत करत. मग अचानक अपूर्णांकांचा विचार आला. माझ्यात कदाचित ऍब्झर्डिझम जास्त असेल, पण बरेच इतरही इझम्स असतीलच. मी थोडासा एस्थेटिसिस्ट असेन पण थोडासा युटिलिटेरियन पण असेन. थोडासा निहिलिस्ट असेन पण थोडा एग्झिस्टेन्शियलिस्टही असेन. थोडक्यात मी अपूर्णांकच आहे. जगातले सगळेच जण कदाचित अपूर्णांक असतील. सहसा अपूर्णांकांनाच पूर्णांक बनवायची हौस असते. कारण पूर्णांक बनले, तरच अपूर्णांकांना त्यांची ओळख मिळेल. म्हणून कुणीतरी आल्बेर काम्यू उठून "ऍब्झर्डिस्ट' नॉव्हेल लिहितो(तो स्वतःला ऍब्झर्डिस्ट समजायचा नाही) आणि कुणीतरी 'विद्याधर भिसे' उठून ब्लॉग लिहितो.
टीप - वरती जे सगळे इझम्स मी लिहिलेत, ते सगळे मला कळलेत अशातला भाग नाही, पण मी वाचलंय थोडं थोडं. उगाच स्वतःची थोडी लाल करावी म्हणून इथे खरडले.
ता.क. - पण काहीही म्हणा, मला ऍब्झर्डिझमबद्दल फार उत्सुकता वाटते. बाकी आता टेन्शन गेलंय. फार जास्त फलसफे दिले की देणार्याचं टेन्शन जातं. द स्ट्रेंजर आता मात्र वाचणारच. फार झालं!
kaahi hi kalat nasat tenvha barach kaahi kalatay ase vatat. jenvha ase vatayala lagat tenvha lakshat yeta ki aapalyala kahisuddha samajala naahi. ekun kaay tar sagalaa savala gondhal .baaki kaahi naahi.
ReplyDeleteNy-USA
22-7-10
http://savadhan.wordpress.com
अपूर्णांका eivaji tula weighted avg. mhaNaayche aahe ka?
ReplyDelete(a x Existentialism + b x Absurdism)/(a+b)
:-P
Buzz varchya first para mule sagle article vaachle :-)
विभी,तू उल्लेख केलेले पुस्तक वाचायला हवेच आता. उहापोह, विचार, परामर्ष छानच घेतलास.
ReplyDeleteकधी कधी आपण स्वत:च आपल्या वागण्यावर थक्क-अचंबित व्हावे असे वागतो. जेव्हां आत्यंतिक दु:ख होते तेव्हां आपण अतिशय स्थिर-संयमीत असतो तर कधी अत्यंत साध्याश्या गोष्टीवर कोसळून जातो.
कधीही न सुटणारे एक अनाकलनीय कोडे. काही गोष्टी कोणाच्याच हातात नसतात हे कळत असूनही आपण त्यावर सतत विचार करतो. क्लेश करून घेतो. त्रयस्थपणा स्वत:करता जमला तर कदाचित बरेच प्रश्न लोंबकळत राहणार नाहीत. त्याचे अचूक किंवा आपल्याला हवे असलेले उत्तर मिळणार नाही पण निदान उत्तर गवसेल.
bestt !
ReplyDeleteWisdom is not to stick to any "ism" but to adapt to any "ism" as the situation demands.
btw, have you heard of Godel's incompleteness theorem? It states that any axiomatic system has to be incomplete.
(Brief and watered down statement)
- Onkar
भन्नाट !!वाचायला पाहिजे हे पुस्तक...
ReplyDeleteयाच विषयाशी निगडीत आपलं बोलणं झालं होतं काही दिवसांपुर्वीच... मित्राच्या बायकोच्या अचानक दगावण्यामुळे.... अजुनही सगळ अनुत्तरीत आहे...
ReplyDeleteहे असंच होतं.. जाणारे निघून जातात. बर्याचदा अचानक.. त्यावेळी आपण शांत, संयत, संयमी असल्याचा आव आणतो.. पण नंतर आठवणींचा पाउस, स्वप्नातली दर्शनं... आपले बांध फुटतात, फुटत राहतात.. !! :(
ReplyDeleteमी गेलोय या सार्यातून अलिकडेच... !!!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteतू इथे समजावलेला इझम समजला पण बाकीचे इझम समजून घेण्याचा त्रास मी घेतला नाही त्यामुळेच कि काय हि पोस्ट जरा जड झाली मला.
ReplyDeleteनावं वाचताना घाम फुटला!
ReplyDeleteतुझ्याशी आणि भाग्यश्रीताई म्हणते त्याच्याशी १०१% सहमत
>>कधी कधी आपण स्वत:च आपल्या वागण्यावर अचंबित व्हावे असे वागतो.
आपली स्वतःची स्वतःशीच एक प्रतिमा तयार झालेली असते. आजूबाजूला घडणार्या गोष्टींमधे भले आपला प्रत्यक्ष सहभाग असो, नसो, आपण स्वतःला प्रमाणबद्धरित्या रिलेट करु पाहतो. आणि प्रत्यक्ष प्रसंग घडताना काही वेळा ती प्रतिमा दगा देते आणि आपल्याला अचंबित करते. आपण सगळेच अपूर्णांक आहोत.
’पराकोटीचा त्रयस्थ भाव’ जैन धर्मामधे संतांच्या बाबतीत वर्णन केला आहे. दुष्टता तर नकोच, पण पुण्यही नको. काहीच चिकटलेले नको. फक्त एक त्रयस्तपणा प्रत्येक गोष्टीविषयी.. कुठेतरी थोडे साम्य वाटून ही आठवण झाली.
पोस्ट विषयी काय लिहू?
एकदम भारी.. खूप छान.
पुरुषोत्तमजी,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत. तुम्ही वर्णन केलेल्या स्थितीतून मी अनेकदा गेलोय!
प्रतिक्रियेसाठी खूप आभार! असेच भेट देत राहा!
सागर,
ReplyDeleteआवरा! :P
>>Buzz varchya first para mule sagle article vaachle :-)
हे मी कॉम्प्लिमेन्ट म्हणून घेतो...;)
धन्यवाद!
भाग्यश्रीताई,
ReplyDelete>>कधी कधी आपण स्वत:च आपल्या वागण्यावर थक्क-अचंबित व्हावे असे वागतो. जेव्हां आत्यंतिक दु:ख होते तेव्हां आपण अतिशय स्थिर-संयमीत असतो तर कधी अत्यंत साध्याश्या गोष्टीवर कोसळून जातो.
अगदी हेच कोडं पडतं नेहमी, कदाचित त्यावरचीच उत्तरं शोधण्याचा खटाटोप म्हणजे हे सगळे इझम्स आहेत.
ओंकार,
ReplyDelete>>Wisdom is not to stick to any "ism" but to adapt to any "ism" as the situation demands.
एकदम पर्फेक्ट!
मी गोडेल च्या थियरमबद्दल ऐकलं नाहीय, पण आता वाचतो..
धन्यवाद ह्या माहितीबद्दल!
माऊताई,
ReplyDeleteनक्की वाच अगं..तुला पाठवलंय इबुक मी! :)
आनंदा,
ReplyDeleteअरे खरोखर हे विचित्र प्रश्न आहेत आणि ह्यांना निश्चित उत्तरं नाहीत...
आयुष्यभर शोधत बसायची उत्तरं आणि आपल्यानंतर इतर लोक शोधत बसतील!
सचिन,
ReplyDeleteभा.पो.
हेरंबा,
ReplyDeleteफार अवघड स्थिती असते, आपण स्वतःलाच ओळखू शकत नसतो.
प्रवीण,
ReplyDeleteअरे म्हटलं ना, मी ही थोडंफारच वाचलंय. तुला एकात तरी इंटरेस्ट वाटला, आता पुढे आपोआपच तू बाकीही कधीतरी पाहशील..
धन्यवाद भौ!
मीनल,
ReplyDelete>>आपण स्वतःला प्रमाणबद्धरित्या रिलेट करु पाहतो
अगदी, आपण ह्या सगळ्या इझम्सच्या फुटपट्ट्या वापरून पाहतो. पण हेच विसरतो, की आपण अपूर्णांक आहोत. आणि तसं असण्यातच आपलं पूर्णत्व दडलेलं आहे. "पूर्णमदः पूर्णमिदं.." तो श्लोक हेच सांगतो.
आणि 'पराकोटीचा त्रयस्थ भाव' जो आपल्या जैन धर्मात आहे, तो आपल्यातही संन्यास ह्या प्रकारात आहे..आणि हो ऍब्झर्डिझम थोडाफार तसाच आहे, पण ती एक वृत्ती आहे, सहज येणारी! पाषाणागत!
खूप धन्यवाद!
मी तुला खो दिलाय. संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी please visit
ReplyDeletehttp://samvedg.blogspot.com/2010/07/blog-post.html
लेख आवडला, विद्याधर. स्ट्रेंजर अशा पुस्तकांपैकी एक आहे की ते वाचून झाल्यावर - खरं तर वाचतानाच - असले प्रश्न पडतात आणि आपल्या प्रतिक्रिया आपल्यालाच तपासून पहाव्याशा वाटतात.
ReplyDeleteयॉडॉ,
ReplyDeleteखो दिल्याबद्दल आभारी...आता लागतोच धावायला!..;)
नंदन,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत!
होय. स्ट्रेंजर अगदीच स्ट्रेंज पुस्तक आहे. आता चालूच आहे वाचन. ह्या वेळेस मात्र संपवूनच खाली ठेवणार.
प्रतिक्रियेबद्दल आभार!
असेच भेट देत राहा!
'The Fall' madhe ha absurdism jara vegala ahe. Camus asa mhanayacha ki 'It is challenge to live this absurdism.'
ReplyDeleteकिरण,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत!
'The Fall' माहित नाही मला...शोधावं लागेल!
पण ऍब्झर्डिझम चॅलेंजिंग आहे हे मात्र खरं!
प्रतिक्रियेसाठी खूप आभार!
अशीच भेट देत राहा!
लेख आवडला. ब्लॉगही छान.
ReplyDeleteतसा कमू एक्झिस्टेंशिलिस्टही आहे मात्र त्याला स्वतःला त्याची ही ओळख आवडायची नाही. ऍब्झर्डिझमचा मास्टर म्हणजे काफ्का. वाचल्यावर सुन्न होतो आपण.
राज,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत.
काम्यू विचित्रच रसायन होतं. पण काफ्काबद्दल जास्त वाचलं नाहीय. त्याचं लिखाणही नाही अजून. बघू, येईल कधीतरी योग.
प्रोत्साहनपूर्ण प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
असाच भेट देत राहा.