7/28/2010

कविता/गीतांचे स्वैर (!) अनुवाद - एक ब्लॉगर्स खो-खो

आज मी जो प्रकार करतोय, तो मी ह्यापूर्वी कधीच केलेला नाही. कविता किंवा गीतांचा अनुवाद. पण साक्षात यॉनिंग डॉगनं खो दिल्यावर माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. तरीसुद्धा, हपिसातल्या कार्यबाहुल्यामुळे माझं बाहुलं झालं होतं, ज्या कारणे मी तीन दिवस उशीर करण्याची गुस्ताख़ी केलीच. असो. तर ब्लॉगर्स खो-खो च्या नियमाप्रमाणे मी दोन (हा अत्याचार आहे हे आधीच मान्य करून) मराठीशिवाय दुसर्‍या भाषांतल्या गाण्यांचे स्वैर(!) अनुवाद केलेत. ते जर गोड मानून घेण्याइतपतही नसतील, तर भाषांतरित विडंबनं म्हणून मानून घ्या आणि जर तितपतही नसतील, तर मी विटंबना केलीय असं समजून चार शिव्या (मनातल्या मनात) हासडून सोडून द्या!

आणि हो आपापल्या जबाबदारीवर वाचा.

१. मूळ गाणं - आजा तू बैठ जा सायकल पे

मूळ गायक/लेखक - अल्ताफ राजा (होय मी ह्याचा फॅन आहे)

सिनेमा (होय हे गाण सिनेमात होतं) - परदेसी (जास्त खोलात शिरू नये)

अथ -


आजा तू बैठ जा सायकल पे,

आजा तू बैठ जा सायकल पे ।।ध्रु॥

अंजानी है ये डगर, अंजाने रास्ते,

लाया हूं मैं दिलकी सायकल तेरे वास्ते,

जरा आंख मिला, नजरोंसे पिला,

मेरे प्यार का दे तू कुछ तो सिला,

आजा तू बैठ जा सायकल पे ।।ध्रु॥


लाख बचना चाहा फिरभी दिलबर जानी,

मेरी जवानी से टकरा गयी तेरी शोख़ जवानी,

इस सायकल में ब्रेक नहीं हैं, ओ पगली दीवानी,

यूंही करती रहना तू नादानी पे नादानी,

रोजाना आते जाते, तू दोस्ती के नाते,

आजा तू बैठ जा सायकल पे ॥ध्रु॥


देख के तुझको ना जाने क्यूं सायकल के पहिये फडके,

अरमानों के छर्रे इसकी चेन में आके धडके,

तुझको आवाज़ें देती हैं प्रेम नगर की सडकें,

ये टेढे मेढे रास्ते, चलूं मैं हसतें हसतें,

आजा तू बैठ जा सायकल पे ॥ध्रु॥


अपने आगे चलने वाले पीछे मैने छोडे,

तेरी खातिर मैने जाने कितने सिग्नल तोडे,

चौराहे के बीच सिपाहॉ खडा रहा मुंह मोडे,

काश तू मेरे इस दिल की सायकल से रिश्ता जोडे,

तू परियों की रानी, तू मेरी जिंदगानी,

आजा तू बैठ जा सायकल पे ॥ध्रु॥

टीप : कृपया अल्ताफ राजाच्या गाण्याला चाल लावण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका, यमक वगैरे शोधू नका. त्याच्या गाण्यांना गेय अशी चाल फक्त तोच लावू जाणे.

स्वैर (!) अनुवाद -

ये ना बसायला सायकलवर

ये ना बसायला सायकलवर॥ध्रु॥

अनोळखी वळणं, अनोळखी रस्त्यांसाठी

आणलीय हृदयाची सायकल, तुझ्याचसाठी

जराशी नेत्रपल्लवी, नजरेची ती एक खुमारी;

एव्हढंच माझ्या प्रेमाच्या परताव्याखातर।

ये ना बसायला सायकलवर ॥ध्रु॥


कितीही करशील प्रयत्न तू टाळायचे,

होणारच आपले मिलन जे आहे व्हायचे,

ह्या सायकलीला ब्रेकच नाहीत गं वेडाबाई,

अशीच करत राहा तू गं आपली मनमानी,

नेहमीच्याच ठरलेल्या त्या रस्त्यावर

ये ना बसायला सायकलवर ॥ध्रु॥


बघून तुला का सायकलची चाकं फडफडू लागतात,

इच्छांचे धागे हिच्या साखळीत गुरफटू लागतात,

प्रेमनगराचे मार्ग तुजला हाकारू लागतात,

मी चाललोय ह्या अवघड वाटेवर, तुझ्याचखातर

ये ना बसायला सायकलवर॥ध्रु॥


पुढच्यांना गं मी केव्हाच माझ्या मागे टाकलंय,

ह्या सगळ्यांत न जाणे किती सिग्नल तोडलेत,

चौकात तोंड फिरवून उभारलाय पहा हवालदार,

तू माझ्या सायकलीशी नातं कधी जोडणार,

तू अप्सराच जणू, आयुष्य ओवाळलं तुझ्यावर,

ये ना बसायला सायकलवर॥ध्रु॥

इति.


२. मूळ गाणं - Careless Whisper

मूळ गायक/लेखक - George Michael

अथ -


I Feel So Unsure
As i take your hand
And lead you to the dance floor
As the music dies
Something in your eyes
Calls to mind a silver screen
And all its sad goodbyes

I'm never gonna dance again
Guilty feet have got no rhythm
Though it's easy to pretend
I know you're not a fool
I should have known better than to cheat a friend
And waste a chance that i've been given
So i'm never gonna dance again
The way i danced with you

Time can never mend
The careless whisper of a good friend
To the heart and mind
Ignorance is kind
There's no comfort in the truth
Pain is all you'll find

Tonight the music seems so loud
I wish that we could lose this crowd
Maybe it's better this way
We'd hurt each other with the things we want to say
We could have been so good together
We could have lived this dance forever
But now who's gonna dance with me
Please stay

Now that you've gone
Now that you've gone
Now that you've gone
Was what i did so wrong
So wrong that you had to leave me alone


स्वैर (!) अनुवाद -

मला इतकं विचित्र वाटतंय,

तुझा हात हातात घेऊन नृत्यमंचाकडे जाताना,

जसजसं संगीत शांत होतंय,

तुझ्या डोळ्यातले काही भाव,

मला चंदेरी दुनिया आणि तिथल्या ताटातूटींची आठवण करून देतात


मी पुन्हा कधीच नाचणार नाही,

कारण अपराधी पायांना ताल सापडत नाही,

तसं भासवणं सोपं आहे,

पण तू दूधखुळी नाहीस हे ही मी जाणून आहे,

मैत्रीत फसवाफसवी चालत नाही हे मला आधीच कळायला हवं होतं,

ही मिळालेली संधी घालवण्याआधीच,

त्यामुळेच मी कधीच नाचणार नाही,

जसा मी तुझ्याबरोबर नाचलो


काळाच्या मलमाने,

चांगल्या मित्रांच्या बेफिकिर वक्तव्यांनी झालेल्या जखमा भरून येत नाहीत,

अश्या वेळी अज्ञानात सुख असतं,

कारण सत्यामध्ये फक्त वेदनाच


आज हे संगीत कानांना खटकतंय,

तुला ह्या गर्दीपासून दूर घेऊन जावंसं वाटतंय,

पण कदाचित

आपण इथेच एकमेकांना दुखवून आपली मनं मोकळी करून घेऊ,

तेच बरं होईल,


आपण एकत्र असतो तर किती छान झालं असतं..

आपण हे नृत्यच कायम जगलो असतो,

पण आता माझ्याबरोबर कोण नाचणार, थांब ना!


आता तू गेलीच आहेस,

तर मला विचारायचंय, की मी जे केलं ते इतकं वाईट होतं का,

की ज्यामुळे तू मला असा एकटा टाकून गेलीस!

इति.

तळटीप - कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व. माझा पहिलाच गुन्हा असल्याने माफ करा.

माझा खो भाग्यश्रीताई आणि मीनलला. (हे करायचा मला अधिकार आहे की नाही हे ठाऊक नसूनही आपला एक {नेहमीप्रमाणे} आगाऊपणा.)

32 comments:

  1. भारी..
    विल्ताफची सर कोणालाही नाही.. ;)

    ReplyDelete
  2. फास्टेस्ट कॉमेंट्सचे सगळे रेकॉर्ड मोडतायत हल्ली!
    धन्यवाद हेरंबभाऊ!

    ReplyDelete
  3. ha ha ha ha, arre kay te saykaliche gane ahe :D

    "ह्या सायकलीला ब्रेकच नाहीत गं वेडाबाई"
    LOL

    He gane ashok saraf, kishori shahane, lakshya anee ashwini bhave yanchyavar chitrit zale ahe ase imagine karun vachale kee ajun maja yete

    *vinantila maan dilyabaddal dhanyavad :D

    ReplyDelete
  4. विद्या, अरे सायकलचे गाणे कसले भारी झालेय. जाम हसले मी. बाकी गाणे पण तू जबरीच निवडलेस. :D

    आता हा अशक्य प्रकार तू माझ्यावर खो म्हणून दिला आहेस तेव्हां आता कुठले तारे ( अकलेचे का शब्दांचे... कठिणच आहे बुवा ) तुटतील कोण जाणे.

    खो बद्दल धन्स रे. :)

    ReplyDelete
  5. Mast. Afalatoon. Jhakaas.

    Careless whispers..wah. I couldn't imagine it could be translated so well.

    Mala Sonal kadun kho milala aani me hee G.Michael chech gaane ghetale ha yogayog.

    http://gnachiket.wordpress.com

    ReplyDelete
  6. बापरे अरे हे काय रे....सायकलीचे गाणे..
    बघून तुला का सायकलची चाकं फडफडू लागतात,हेहेहे...सही हां....पोट धरुन हसलेय मी...

    ReplyDelete
  7. >>पण तू दूधखुळी नाहीस हे ही मी जाणून आहे,

    जबर्या....लोळा लोळी....

    विल्ताफ़ बाजा....नादभरी...

    ReplyDelete
  8. कैच्याकै...पण अशक्य भारी....
    ही गाणी मराठी एफ.एम. वर लावायलाच हवी... ;)

    ReplyDelete
  9. अशक्य अल्ताफ राजा दा जवाब नही ;)

    ReplyDelete
  10. विल्ताफ ...सायकल .....अबे सुटला ना बे तू पुन्हा..... भन्न्न्न्न्न्न्न्नाआआआआट!!!!!!

    (BTW ’उभारलीस” हे सोलापुरी की कोल्हापुरी हिथे जरा गोंधळ झाला बघ माझा!!!)

    Careless Whisper अरे त्या George Michael ला पाठव रे वाचायला... :)

    आता वाट पहातेय श्रीताई आणि मिनलच्या पोस्टस ची.....

    ReplyDelete
  11. सायकलचा अनुवाद वाचून मला मराठी सिनेमातलं गाणं आठवलं

    पोलीसवाल्या, सायकल वाल्या बिरेक मारून थांब
    टोपी तुझी रं हातात माझ्या होईल कसं रं काम
    जाऊया डबलशीट रं लांब लांब लांब
    चल डबलशीट रं लांब लांब लांब

    चित्रपटाचं नाव आठवत नाही. बहुतेक तो सिनेमा ज्यात लक्ष्याला एका स्फोटातून शक्ती मिळते अन् लाल रंग पाहिला की निघून जाते.

    ReplyDelete
  12. विल्ताफ बाबा की जय हो.........

    Careless Whisper चा अनुवाद जाम आवडला आपल्याला. निव्वळ अप्रतिम, जबरी.......

    ReplyDelete
  13. सायकल आणि Careless Whisper एकदम सही..
    मूळ गीत वाचताना I know you're not a fool चा काय अनुवाद केला असशील म्हणून पट्कन अनुवाद पाहिला. दूधखूळी पेक्षा दुसरा चांगला शब्द असूच शकत नाही.

    बापरे, तू मला खो घातलास.. हा काही आगाऊपणा नाही, पण वेडेपणा नक्कीच आहे..

    ReplyDelete
  14. चौकात तोंड फिरवून उभारलाय पहा हवालदार,
    तू माझ्या सायकलीशी नातं कधी जोडणार,
    ........हा हा हा!!, यमक छान जुळवलय, हवलदार नतंर लगेच नातं कधी जोडणार

    ReplyDelete
  15. ViBhi,

    Cycle majesheer pan rao careless whispers cha evdha jamla nahi re.. mhanje sorry pan mala vaatala ki tu yaahunahi chaangala karu shakala asataas, mhanje tyaach kalkaline comment keli, dukhaavala jaau nakis..

    Onkar

    ReplyDelete
  16. यॉडॉ,
    भाई, तुझी विनंती, आमच्यासाठी आज्ञा..;)
    बाकी, तुझी आयडिया भारीच आहे...तो प्रसंग इमॅजिन केला तर भारी वाटेल असलं काहीतरी..:)

    ReplyDelete
  17. श्रीताई,
    अगं माझ्यासाठी सुद्धा अशक्यच होता...पुन्हा आम्ही गद्य माणसं...निभावलं कसंबसं...
    पण तू नक्कीच छान करशील, हा माझा विश्वास आहे..म्हणूनच तर खो दिला..:)
    आणि हो तू खोबद्दल धन्यवाद म्हणालीस..;)

    ReplyDelete
  18. नचिकेत,
    ब्लॉगवर स्वागत.
    तुझा अनुवादही वाचला मी. छोटाच पण सुंदर केलायस..नाहीतर आम्ही उगाच भाराभर दिवे लावलेत..चालायचंच...
    तरीही तुझ्या मनापासून कॉमेंटसाठी खूप खूप धन्यवाद.
    अशीच भेट देत राहा!

    ReplyDelete
  19. माऊताई,
    लिहिताना मात्र माझ्यावर काय वेळ आली होती...बिलकुल शब्द सुचत नव्हते..
    अनुवाद अवघड काम आहे...खरंच!
    :)

    ReplyDelete
  20. योगेश,
    :))
    खूप खूप धन्यवाद! (पदवीसाठी नव्हे)

    ReplyDelete
  21. आनंदा,
    मराठी एफ.एम. विसरा...
    आता सगळ्या एफ.एम. वर मराठी गाणी लावायचीच आहेत...
    बाकी, ही सकाळच्या काकडआरतीच्या वेळी लावायला चांगली आहेत..लोकांची झोप पार उडून जाईल!:))

    ReplyDelete
  22. सुहासा,
    खरंच..अल्ताफ राजा एकमेवाद्वितीय आहे!
    :)))

    ReplyDelete
  23. तन्वीताई,
    अगं, सुटलो म्हणजे, सोडलं मला यॉडॉनं त्या बिचार्‍या गाण्यांवर...
    चालायचंच...:))))
    अगं ते उभारलाय, हे कुठे म्हणतात लक्षात नाही माझ्या, मी आपलं अक्षरं बॅलन्स करण्यासाठी वापरलं..;)
    बाकी मी पण त्यांच्या पोस्टस ची वाट बघतोय..मी जे गीतविश्वाला दुखावलंय, त्यावर मलमपट्टी होईल म्हणून! :))

    ReplyDelete
  24. नॅकोबा,
    भारीच गाणं आठवलं..बहुधा थरथराट नाव होतं सिनेमाचं...
    डेडलीच!

    ReplyDelete
  25. सचिन,
    अल्ताफच्या गाण्याची आयडिया तुझीच होती..तुला आवडला अनुवाद म्हणजे मी ऑलमोस्ट सक्सेसफुल!
    बाकी केअरलेस व्हिस्पर डेडलीच आहे रे...मी पामर कुठे तिथवर जाणार!

    ReplyDelete
  26. तन्वीताई,
    तुझ्या उत्तरात हे राहिलंच...
    केअरलेस व्हिस्पर..अगं ते मला जेन्युईनली कळतं आणि आवडतं असं एकमेव इंग्रजी गाणं आहे...मी फार फार कमी इंग्रजी गाणी ऐकतो(कळतच नाहीत)
    त्यामुळे तू कौतुक केलंस तेव्हा बरं वाटलं!

    ReplyDelete
  27. मीनल,
    मला बराच वेळ शब्द सुचत नव्हता..खरं म्हणजे जिभेवर आहे असं वाटत होतं..पण पकडीत येत नव्हता...
    शेवटी एकदाचा सुचला आणि जीव भांड्यात पडला..
    दुसर्‍या कुठल्याही शब्दानं कदाचित अर्थ बदलला असता! सही पकडलंस तू!
    धन्यवाद!

    ReplyDelete
  28. प्रसिक,
    ब्लॉगवर स्वागत!
    हाहा...ती मजेदार ओळ होती... बिलकुल संबंध नाही एकमेकांशी..बादरायण संबंध जोडलाय...
    मी तुझी कॉमेंट कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो...
    धन्यवाद!
    अशीच भेट देत राहा!

    ReplyDelete
  29. ओंकार,
    अल्ताफ आणि जॉर्ज मायकल दोन्ही अवघड कामं आहेत आपापल्या परीनं..
    त्यातलं अल्ताफचं गाणं लाईट, त्यामुळे मला टेन्शन नव्हतं...
    पण जॉर्ज मायकलचं केअरलेस व्हिस्पर इज समथिंग इन अ डिफरन्ट लीग...
    त्यानं खूप लहान वयात लिहिलेलं अफाट अर्थ असलेलं गाणं वाटतं मला..
    मी कुठून न्याय देणार होतो...
    बाकी तुझ्या माझ्याकडून एव्हढ्या उच्च अपेक्षा आहेत हे पाहूनच बरं वाटलं...दुखावला कसला जातो?

    ReplyDelete
  30. हाय हाय...आधी LOL (लोळालोळ) आणि मग एकदम "काळाच्या मलमाने,

    चांगल्या मित्रांच्या बेफिकिर वक्तव्यांनी झालेल्या जखमा भरून येत नाहीत,".....सॉलिड मित्रा.....

    ReplyDelete
  31. अपर्णा,
    लय लय धन्यवाद...!!
    :)

    ReplyDelete
  32. Mi suddha Altaf Rajacha Fan aahe aan aata tujhya ganyancha ;)

    ReplyDelete