(माथाटीप - सर्वांच्या वतीने 'आवरा' मी आधीच म्हणून घेतोय स्वतःला, पुनरुक्ति टाळावी :D )
कधीतरी शांतपणे चालताना विचित्र जाणीव होते
काहीतरी मागे सुटून गेलं अन नकळत वाट वळते
नव्या नवख्या वाटेवरती नवलाईच्या सोबतच
सुटून गेलेल्या कसलीतरी रूखरूख लागून राहते
----
ऋतू तो पानगळीचा जरी ओरबाडून गेला
दिसण्यास तो जरीही सर्वस्व घेऊनी गेला
तरी अंतरी अजूनी तो ध्येयाग्नी आहे
मी वृक्ष कालही होतो मी वृक्ष आजही आहे
----
लाटांच्या आधाराने समुद्र लाथाडीत होतो
क्षितिजाच्या नजरेने सूर्य बुडवीत होतो
बुडता बुडताही तो फिस्सकन हसला
अन कल्पनेचा प्रयत्न कल्पनेतही फसला
----
उदास संध्याकाळी एकट्या वाटसरूला
ना चालण्यात मर्जी ना थांबण्यात अर्थ
दूर थांबलेले पैलतीर ते खुणावे
जड संथ पावले पण सावलीत गर्क
----
वेडा म्हणून कोणी मला एकदा हाक मारली
मी नजर वर करून भुवई वर केली
दोन क्षण नजरानजर झाली अन
'हाक मी नाही मारली' म्हणत प्रतिबिंबानंच नजर खाली केली
----
दिसतोस उंच शांत ऐटीत डोलताना
स्वातंत्र्यदिन कधी अन गणतंत्रदिनही आहे
मज पामरास किंतु अप्रूप काय त्याचे
भाकरीच्या चंद्रकळांना मी ओळखून आहे!
----
1/26/2011
1/25/2011
झोल आहे
झोल आहे
कविता करायची आहे असं ठरवून
कागद पेन घेऊन बसणं फोल आहे
नेहमीच असं घडतं म्हणजे
आपल्याच अकलेत झोल आहे
फुका ट ला ट करण्यापेक्षा
अर्थवाही शब्दांना मोल आहे
पण तेदेखील जमण्याइतपत
आपली बुद्धि कुठे खोल आहे?
हल्ली जिकडे बघावं तिकडे
कसलं ना कसलं ओपिनियन पोल आहे
पण सत्तेच्या खुर्चीत सगळा प्रकार
होल ऍन्ड सोल आहे
आमची कविता म्हणजे
राष्ट्रकुलमधला ओव्हररेटेड टॉयलेट पेपर रोल आहे
अन कांदा महागल्यानं हुंगवण्यासाठी वापरल्या जाणार्या
फाटक्या बुटाचा सोल आहे
एका कडव्यात तरी राजकीय भाष्य
हा कवीनं ठरवलेला गोल आहे
बाकी कविता म्हणजे कापला गेलेला
पतंग भरदोल आहे
स्वतःच्याच स्वतःबद्दलच्या गैरसमजांची
केलेली पोलखोल आहे
स्वतःलाच समजावण्याचा एक प्रयत्न की
"मित्रा, दुनिया गोल आहे"
स्वतःला कवि न समजण्याइतपत
समज माझी समतोल आहे
प्रतिभावंत हिर्यांच्या गर्दीत
मी आपला एक कोल आहे..
(टीप - उगाच काहीही)

1/24/2011
सिनेदिग्दर्शक सचिन यांस अनावृत पत्र
प्रिय सचिनजी,
पत्र लिहिणेंस कारण की, नुकताच आपला नवा(?) सिनेमा 'आयडियाची कल्पना' पाहण्याचा (कालसर्प)योग आला अन आपणांस पत्र लिहिल्यावाचून राहावले नाही. 'मी लहानपणापासून आपला चाहता आहे' वगैरे असली पुस्तकी विधाने मी करणार नाही पण आपलं गोंडस रूप, मग ते 'उठा, राष्ट्रवीर हो' मधलं असो, किंवा 'सत्ते पे सत्ता' मधला शनि असो नेहमीच मला भावलं होतं हे मात्र तितकंच खरं. त्यानंतर थोडं कळू लागल्यानंतर स्वतःच्या बळावर 'लेखन-दिग्दर्शन-निर्मिती' करून पुन्हा अभिनय करून बर्यापैकी दर्जाचे मराठी सिनेमे काढणारा एक कलावंत म्हणून तुमचं कौतुक अन अभिमानही वाटायचा. तुमच्या 'तू-तू-मैं-मैं' चा मी कट्टर चाहता. पण तुम्ही हिंदीत कधी मोठे न होऊ शकल्याचं दुःखही नेहमी 'अखियों के झरोकों' से पाहिल्यावर होत असे. पण जसजसा मोठा होत गेलो अन समज येत गेली, तसतसा हिंदीतलं यश जरी सुखावणारं अन आर्थिकदृष्ट्या मोठं असलं, तरी ते न मिळणं म्हणजे आयुष्याचं नुकसान नव्हे असं अनेक प्रादेशिक (केवळ मराठीच नव्हे) कलावंतांकडे पाहून लक्षात येऊ लागलं. मात्र तुमच्या मनात तो सल कुठेतरी आजही कायम आहे ह्या गोष्टीची कल्पना तुमच्या सिनेमातल्या काही संवादांवरून आली अन विषाद वाटला.
सिनेमातल्या ह्या संवादांमध्ये हिंदीची श्रीमंती अन मराठी सिनेमाची गरीबी ह्या गोष्टीवर इतका भर देण्यात आलाय की गेल्या पाचेक वर्षांत नुसती बजेटपातळीवर नव्हे, तर बजेटच्या योग्य नियोजनाच्या पातळीपासून ते तांत्रिक अन मार्केटिंगपातळीवर क्रांती घडून आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतच बनलेला हा चित्रपट आहे ना अशी शंका यावी. उत्तमोत्तम कथावस्तू मराठी वाड्मयापासून ते मराठी नाटकांपर्यंत उपलब्ध असताना आपणांस एका पडलेल्या (किंवा फारशा न चाललेल्या म्हणा) हिंदी चित्रपटाची भ्रष्ट आवृत्ती का काढावीशी वाटली (ते ही 'आम्ही सातपुते' चं उदाहरण ताजं असताना) हे मला पडलेलं कोडं आहे. कथावस्तू सोडून पुढे गेलं, तर संवादांमध्ये जाणवणारं दारिद्र्य हे मन विषण्ण करणारं होतं. अनेकानेक उत्तमोत्तम विनोदी चित्रपट देणारे हेच आपण का? असं कोडं मला वारंवार विनोदी होण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे संवाद पाहून पडत होतं. (एकंदरच मी एकामागून एक पडणार्या कोड्यांमध्ये गुंतलो होतो.) तांत्रिक पातळीवर पाहण्यास जावे, तरी हल्लीच्या एकंदर सिनेमाकडे पाहता, आपल्यासारख्या जुन्याजाणत्या कलाकाराच्या चित्रपटात अजून सफाई अपेक्षित होती. अन कलादिग्दर्शनाबद्दल जितकं कमी बोलेन तितकं चांगलं. एकही सेट डोळ्यांत भरत नाही, अन लोकेशन्सही ऍडजस्ट केल्यागत वाटतात. अर्थात मी काही मोठा सिनेजाणकार नव्हे, पण एका सामान्य सिनेप्रेमीला जे खटकू शकतं तेच सांगतोय, ते ही केवळ तुमच्या अन मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रेमापोटी.
सेट अन तांत्रिक पातळीसाठी बजेटचा मुद्दा पुढे येईल हे मी जाणून आहे, पण शिवाजीराजे भोसलेसारख्या सिनेमाला अर्थसहाय्य देणारा मनुष्य तुमच्या सिनेमासाठी हात आखडता असा किती घेईल हा प्रश्न मनात येतोच. मग बजेटचं योग्य नियोजन झालं नसेल का? असाही एक प्रश्न पडतो. खरंच सांगतो, मला ह्या सगळ्यांतला 'ब' ही कळत नाही, पण सामान्य सिनेरसिकाला हे प्रश्न पडू शकतात. अन तुमच्यावर वर्षांनुवर्षं असलेल्या प्रेमामुळे अन लोभामुळे हे प्रश्न खुलेपणी विचारण्याचा हक्क आम्हाला मिळतो असं समजूनच चालतोय मी. हा आगाऊपणा वाटू शकेल, पण तुम्ही पोटात घालाल अशी आशा करतो.
पुढची गोष्ट म्हणजे आता तुम्ही 'हिरो' म्हणून पुढे येण्याचा अट्टाहास सोडावा अशी कळकळीची विनंती. कारण आपण बिलकुलच तरूण दिसत नाही. आपला चेहरा अन पोट झाकण्यासाठी ठेवलेला आऊट शर्ट आपलं वय सहजच सगळ्यांसमोर आणतो. अन जर आपल्याला खरंच हिरोची कामं करायचीच आहेत, तर रजनीकांतचा मेकअप आर्टिस्ट अन त्या दर्जाचे कॅमेरे आणण्यास सुरूवात करा, नाहीतर आपला प्रयत्न खरोखर उघडा पडत होता, अन मला खरंच अपार यातना होत होत्या. 'अखियों के झरोकों से', 'बालिका बधू', 'गंमत जंमत' वगैरेंमधले कुठे तुम्ही ते रूबाबदार सचिन, अगदी 'नवरा माझा नवसाचा' मध्येही आपलं वय दिसूनही व्यक्तिरेखेसोबत शोभत होतं, पण इथे मात्र तरूण दिसण्याच्या केविलवाण्या प्रयत्नाखेरीज मला काहीही दिसत नव्हतं, अन फार फार वाईट वाटत होतं.
अशोक सराफ, महेश कोठारे अन निर्मिती सावंतसारख्या चांगल्या कलावंतांना वाया घालवण्याचं अर्ध काम स्क्रिप्टनं केलं अन उर्वरित काम संवादांनी अन दिग्दर्शनानं मिळून केलं. निर्मिती सावंत ह्यांची व्यक्तिरेखा तर पहिल्यापासूनच शेंडा-बुडखा नसलेली आहे अन महेश कोठारेंना फक्त 'डॅम इट' म्हणायला सिनेमात घेतलंय की काय? असा प्रश्न पडावा इतपत त्यांच्या व्यक्तिरेखेची कधी कधी गळचेपी होते. अशोक सराफ ह्यांची भूमिका कथेच्या दृष्टीनं खरं म्हणजे मध्यवर्ती असायला हवी होती (जशी 'लाखों की बात' मध्ये संजीव कुमारची होती) पण तुमच्या स्वतःबद्दलच्या ऑब्सेशनमुळे तिथे थोडासा बट्ट्याबोळ झालाय.
स्वतःच स्वतःचं फॅन असणं काही चूक नाही. शाहरूख खान अन करिना कपूर ही त्याची ढळढळीत (यशस्वी) उदाहरणं. पण ते कुठे दाखवावं ह्यामुळे बराच फरक पडतो. प्रस्तुत चित्रपटात ह्या गोष्टीचा अतिरेक झाल्यागत वाटतो अन बरेचदा काही प्रसंग नको तेव्हा हास्यास्पद होतात. अन क्लायमॅक्सचा प्रसंग विचित्र पद्धतीने हास्यास्पद वाटण्याइतपत खेचला गेला आहे. त्याचबरोबर सिनेमाला अर्थसहाय्य मिळतं म्हणून 'सरोगेट ऍडव्हर्टायझिंग' चा वापर करणं ही युक्ति चांगली होती. पण ज्या पद्धतीनं त्या जाहिराती झाल्यात, त्यांच्यासमोर सुभाष घईंच्या 'यादें' मधल्या 'पासपास' च्या जाहिरातीसुद्धा जास्त कल्पक वाटतात. पण सगळ्यांत वाईट म्हणजे MRI चा फुलफॉर्म 'Magnetic Resonance Imaging' असा आहे, पण सिनेमातल्या हॉस्पिटलच्या सेटमध्ये चक्क 'Medical Resonance Imaging' असं लिहिलेलं दिसतं.
भार्गवी चिरमुलेचं काम जरी ठीक झालं असलं तरी एकंदरच आपली अन तिची जोडी कुठेही सूट होत नसल्यामुळे अन तिच्याही व्यक्तिरेखेला शेंडाबुडखा नसल्याने (एकंदरित थोड्याफार प्रमाणात अशोक सराफ ह्यांची व्यक्तिरेखा सोडल्यास सगळ्यांच व्यक्तिरेखा बिन शेंडा-बुडख्याच्या आहेत) बरेचदा कंटाळवाणंच वाटतं. त्यातून तिच्यासाठी जे पेहराव वापरले आहेत, ते अनेकदा इनऍप्रॉप्रियेट वाटतात.
संगीतामध्ये अवधूत गुप्तेंनी दिलेली लावणी चांगली आहे अन टायटल साँग (जे कुणी संगीतबद्ध केलंय ते मला ठाऊक नाही) हे दोन वगळता काहीही लक्षात राहिलं नाही.
आपल्या सिनेमाबाबत इतकं वाईट लिहिण्यामागे माझा कोणताही वैयक्तिक आकस नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक सिनेमाने लावलेल्या सवयी अन वाढवलेल्या अपेक्षा जेव्हा मराठी सिनेमा अन थोड्या प्रमाणात हिंदी सिनेमाही पूर्ण करू लागला, तेव्हा माझ्या अपेक्षा अजूनच वाढत गेल्या. त्यात आपण मराठी चॅनेल्सवरती, असेल नसेल त्या कार्यक्रमात येऊन अन स्वतःच्याच 'एकापेक्षा एक' मध्ये सिनेमाची तोंड फाटेल तेव्हढी स्तुती करू लागलात. ह्या सगळ्या परिस्थितीत मी सिनेमाला गेलो अन माझ्या सगळ्या अपेक्षांच्या फुग्याला पहिल्याच फ्रेममध्ये टाचणी लागली. अन मग त्या फुटलेल्या फुग्यावर पुढची प्रत्येक फ्रेम असंख्य टाचण्या बरसवतच राहिली. सिनेमा संपेस्तोवर मी फारच दुःखी झालो होतो. खरंच सांगतो, माझं मराठीवर, सिनेमावर अन पर्यायाने मराठी सिनेमावर प्रचंड प्रेम आहे. अन गेल्या काही वर्षांमध्ये तर मराठी सिनेमाने माझी मान अभिमानाने ताठ केलेली आहे. अशा वेळी आपल्यासारख्या एकेकाळी मराठी सिनेमाला गर्दी खेचून आणणार्या कलावंताने इतका वाईट (माझ्या मते) सिनेमा बनवावा हे फारच खटकलं. त्या सगळ्या वेदना कागदावर उतरल्या अन तुमच्यावर असलेल्या प्रेमाखातर थेट तुम्हाला लिहिण्याचं धाडसही करू शकलो. फार जास्त आगाऊपणा झाला असेल तर क्षमा करा. पण एका खर्या सिनेरसिकानं सच्च्या कळकळीनं लिहिलेलं हे पत्र आहे.
कळावे. लोभ असावा.
आपला,
(आपल्याकडून उत्तम सिनेमाची अपेक्षा करणारा चाहता) विद्याधर.

1/23/2011
कडू गुपित
एखादा चित्रपट महोत्सव झाला आणि त्याबद्दल पेपरात वाचलं की मग मी मनाशी एक कुठलीही भाषा धरतो आणि त्या भाषेतल्या सिनेमांबद्दल नेटवर माहिती शोधतो. मग त्यातून अनेकदा हाताला रत्नं लागतात. वेगवेगळ्या देशांतल्या वेगवेगळ्या संस्कृतींची निदान एक तोंडओळख होते. आणि माणूस ह्या प्राण्याची सुखदुःख वरकरणी कितीही वेगवेगळी वाटली तरी एका समान वैश्विक धाग्यानं एकमेकांत गुंफली गेल्याचं सत्य वारंवार मनात गडद होत जातं. सापडलेला/ले सिनेमे मिळवून बघणं म्हणजे खरी गंमत. तो मिळून पाहेस्तोवर त्याबद्दल जास्त वाचणं टाळायचं वगैरे, एकदम माहौल बनवायचा. पण सिनेमा सहज मिळणारा नसला तर मग अजून मजा. जंग जंग पछाडून, नेटाने नेटावर शोधून तो सिनेमा मिळवणं आणि मग तो बघणं, ह्यात मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान आणि चांगला सिनेमा अनुभवल्याचा आनंद असा दुहेरी फायदा होतो.
ह्या सगळ्या उपक्रमांतून आजवर खूप सिनेमे अनुभवलेत, ह्यापुढेही अनुभवेन. अगदी कोरियन, जपानीपासून ते पॅलेस्टिनियन, तुर्की आणि फिनलँड, स्वीडन पासून ते नॉर्वेजियन पर्यंत अनेकानेक सिनेमांचा आनंद केवळ इंटरनेटच्या कृपेमुळे घ्यायला मिळाला. २००२ सालच्या ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित, अल पचिनो अभिनित इन्सॉम्निया चा ओरिजिनल सिनेमा म्हणजे १९९७ सालचा नॉर्वेजियन इन्सॉम्निया मिळवण्यासाठी मी तब्बल दोन आठवडे तडफडलो होतो. पण मिळाल्यानंतर पाहताना जे समाधान लाभलं, त्याला तोड नाही. ह्या चित्रविचित्र भाषांचे सिनेमे सबटायटल्ससकट पाहिल्याचा एक दुष्परिणाम असा झाला आहे की मी अगदी मराठी सिनेमा पाहत असलो तरी खाली सबटायटल्स आली तर नजर तिथेच जाते.
आणि असाच एक दिवस मी मनाशी धरला सर्बिया आणि सिनेमा शोधता शोधता हाताशी लागला बोस्नियन सिनेमा - गर्बावित्सा (Grbavica). उच्चार नक्की असाच नसला तरी जवळपास जाणारा आहे. बोस्नियन राजधानी सारायेव्हो (Sarajevo) चं एक छोटं उपनगर 'गर्बावित्सा' मध्ये घडणारी एक छोटीशीच, पण उद्विग्न करणारी कहाणी म्हणजे हा सिनेमा.
पुढे सिनेमाच्या कथेतलं छोटंसं रहस्यदेखील सांगण्यात आलेलं आहे ह्याची मी आधीच कल्पना देऊन ठेवतो.
ही गोष्ट घडते ती युद्धोत्तर बोस्नियामध्ये. १९९२ सालच्या जवळपास बोस्नियाक आणि सर्ब लोकांमध्ये घडलेल्या युद्धाची सुन्न करणारी अदृश्य पार्श्वभूमी ह्या सिनेमात आहे. सिंगल मदर एस्मा जमेल ते आणि पडेल ते काम करून आपल्या १२ वर्षांच्या मुलीला साराला वाढवतेय. अधुनमधुन ती सपोर्ट ग्रुप्समध्येही जाते. परिस्थितीनं गांजलेली, थकलेली आणि हतबल अशी वाटणारी एस्मा सारासाठी मात्र आपली सगळी ताकद एकवटून उभी आहे. १२ वर्षांची सारा कुठल्याही नॉर्मल १२ वर्षीय मुलीसारखी उत्स्फूर्त, खेळकर आणि मोकळं आयुष्य जगतेय. एस्मा तिला गरजेचं असं काही कमी पडू देत नाही. आणि मग एक दिवस साराच्या शाळेची ट्रीप निघण्याची सूचना येते.
ट्रीपची फी भरा किंवा ज्या मुलांचे वडील बोस्नियाक-सर्ब युद्धात (सिनेमामध्ये जाणून बुजून 'सर्ब' शब्दाऐवजी 'चेटनिक' हा स्लँग शब्द वापरलाय) शहीद झालेत अशांना सर्टिफिकेट दाखवून फुकट ट्रीप, अशी सूचना शाळा काढते. साराला लहानपणापासून आईनं हेच सांगितलंय की तुझे वडील चेटनिक्स शी लढताना शहीद झालेत. त्यामुळे शाळेतही मिरवून आणि मित्र समीरला सांगून की तुझ्या वडलांप्रमाणेच माझे वडीलही शहीद झाले होते, सारा घरी येते आणि आईकडे वडलांच्या हौतात्म्याचं सर्टिफिकेट मागते. एस्माचं छोटंसं जग हादरतं. पूर्वीपासूनच वडलांच्या ओळखीबद्दल सारवासारव करणारी एस्मा आता मात्र भांबावून जाते आणि तिचं ते भांबावून जाणं साराच्याही नजरेतून सुटत नाही.
एस्माकडे सर्टिफिकेट तर नाहीये ती साराला सांगते की ती सर्टिफिकेट मिळवायचा प्रयत्न करेल आणि प्रत्यक्षात ती ट्रीपचा खर्च उचलण्याची तयारी सुरू करते. सगळ्या ओळखीच्यांकडून उधार मिळवण्याचेही प्रयत्न अपुरे ठरतात. ती एका नाईटक्लबमध्ये वेट्रेसचं कामही सुरू करते. इकडे सारा सर्टिफिकेटसाठी जसजशी मागे लागत राहते, माय-लेकींमधला तणाव वाढत जातो. आणि जेव्हा शाळेत हुतात्म्यांच्या मुलांची यादी लागते, तेव्हा त्यात स्वतःचं नाव न पाहून सारा हादरते. एका वर्गमित्राच्या खोचक टोमण्यावर कुणा दुसर्याच्या तोंडून ऐकलेली बापाच्या हौतात्म्याची कहाणी स्वतःच्या बापाची म्हणून सांगते. घरी येऊन ती आईला खूप टोचते तेव्हा शेवटी एस्मा पूर्ण कोलमडून जाते आणि साराच्या वडलांबाबतचं कडू गुपित ती सांगते.
बोस्नियाक-सर्ब युद्धांमध्ये चेटनिक्स अर्थात सर्ब सैनिकांनी बोस्नियन स्त्रियांचे 'मास रेप' केले होते. ही एका पद्धतीची अमानवी युद्धनीती आहे, ज्यात स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून पूर्ण समाजाचा पायाच हालवून टाकला जातो. नुकताच आफ्रिकेतील वांशिक युद्धांमध्येदेखील ह्या पाशवी नीतीचा वापर केल्याचं बातम्यांमध्ये ऐकलं होतं. तर एस्मा ह्याच पाशवी प्रकाराचा एक बळी असते. आणि ह्याचाच अर्थ सारा ही एका हुतात्म्याची नाही, तर एका चेटनिकची म्हणजे शत्रूची मुलगी असते.
हे कडू गुपित ऐकल्यावर साहजिकच सारा सुन्न होते आणि आपल्या खोलीत जाऊन बसते. दुसर्या दिवशी एस्मा साराला घेऊन ट्रीपच्या बसपर्यंत सोडायला जाते. सारा अजूनही बोलत नाहीये. पण बस जशी पुढे जायला लागते, तशी मागच्या खिडकीतून सारा आपल्या हतबल आईकडे पाहत राहते. आणि अगदी शेवटी ती तिला हात करते. आणि मग बसमध्ये गाणार्या इतर मुलांसमवेत आवाजात आवाज मिसळून गायला सुरुवात करते.
हा सिनेमा माय-लेकींचं तरल नातं तितक्याच हळुवारपणे रेखाटत जातो. एस्माची व्यक्तिरेखा कधी हतबल तर कधी निग्रही तर कधी कमालीची कोसळलेली इतक्या टोकांपर्यंत हेलकावे खाते आणि अभिनेत्री मिरयाना करानोविचनं ती तितक्याच तपशिलासकट उभी केलीय. सारा (लुना मिओविच) सकट सर्वच प्रमुख पात्रांचं काम पूरक आहे. मुलीसाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची आहुती देणारी आई वैश्विक आहे हेच हा सिनेमा पुन्हा अधोरेखित करतो.
सिनेमा बर्यापैकी संथ आहे. काही काही ठिकाणी, एस्पेशली सपोर्ट ग्रुप्सच्या सीन्समध्ये तर सिनेमा चक्क थांबल्यागत वाटतो. पण तीच ह्या सिनेमाची प्रकृती आहे. एखादं विकल करणारं संथसं शोकगीत असावं, तद्वत हा सिनेमा आपलं अंतःकरण विदीर्ण करत जातो. एस्माच्या गुपिताची आपल्याला तिनं सांगायच्या आधीच थोडी कल्पना येते. पण रहस्य हे सिनेमाचं सार नसल्याने, फारसा फरक पडत नाही. आपले वडील कोण, ह्याची जाणीव झाल्यानंतर सारा जेव्हा स्वतःच्या खोलीत जाते. आणि पूर्वी एकदा सारानं आईला विचारलेलं असतं की माझे केस तुझ्यासारखे नाहीत, म्हणजे माझ्या वडलांसारखे असणार, तो प्रसंग आठवून सारा स्वतःच्या केसांकडे पाहते आणि हेअर ट्रीमरनं आपले सगळे केस काढून टाकते. हा प्रसंग अक्षरशः अंगावर काटा आणतो.हा, तसेच साराचं आपल्या वर्गमित्रावर रागावणं किंवा एस्माचे काही प्रसंग सिनेमाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.
सिनेमाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेली आहेच. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलचा प्रतिष्ठेचा गोल्डन बेअर पासून अनेक सन्मान मिळालेत. पण दिग्दर्शिकेचा हा सिनेमा हृदयाची जी तार छेडून जातो, त्यावरचा कुठलाही पुरस्कार अस्तित्वातच नाही.
(पोस्टरचं छायाचित्र विकिपीडियावरून साभार. बोस्नियाक-सर्ब युद्धाबद्दल अधिक माहिती इथे.)

हा लेख शब्दगाSSरवा ह्या जालरंग प्रकाशनाच्या २०१० च्या हिवाळी अंकातील पूर्वप्रकाशित लेख आहे. मूळ लेख इथे वाचता येईल.
1/17/2011
आप्पाच्या लग्नाची गोष्ट - ३
भाग १ आणि
भाग २ पासून पुढे
चॅप्टर थ्री - द रिटर्न
संध्याकाळी सुहास, सचिन अन भारतची बस निघाल्यानंतर मी अन सागर 'नांदेड बाय द नाईट' बघायला निघालो. आधी प्लॅन होता काही पुस्तकं विकत घ्यायची. मग जेवून कुठलातरी सिनेमा पाहायला जायचं. पुस्तकं घेण्याचं कारण की दुसर्या दिवशी १२ तासांचा कंटाळवाणा होऊ शकणारा प्रवास वाट पाहत होता. पण दैवयोगानं दोनेक दुकानं पालथी घालूनही हवी ती पुस्तकं हाती लागली नाहीत. मग सागर अजूनही दुकानांच्या शोधात होता, पण मीच जाऊ दे म्हटलं. तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात सागरला राहचलते ४-५ ओळखीचे मुलं-'मुली' भेटले. पण सागरनं फार न ताणता काढता पाय घेतला. मग आम्ही ठरवलं की एखादे ठिकाणी सफरचंदं घेऊ प्रवासासाठी म्हणून अन मग 'काकां'च्या मेसमध्ये जेवायला जाऊ. सफरचंद घेऊन रिक्षा शोधताना मला एक बुक स्टॉल दिसला. मी म्हटलं एखादं मासिक विकत घेऊ, प्रवासात अगदीच काही नाही असं नको व्हायला.
मी पुढे झालो अन स्टॉलवाल्याला लोकप्रभा मागितला. त्यानं लोकप्रभा काढून समोर ठेवला मी दहाची नोट काढून त्याला दिली अन तो दोन रूपये काढून मला परत देत असतानाच मागून सागरनं वाचलं 'आध्यात्मिक विशेष'. मी लोकप्रभा उचलला अन नीट पाहिला. 'स्वामी समर्थ' वगैरेंचे फोटो होते अन तो चक्क 'आध्यात्मिक विशेष' अंक होता. मी सेकंदभर विचार करून तो खाली ठेवला अन दुकानदाराला म्हटलं, "हा राहू दे, चित्रलेखा द्या." दुकानदाराच्या चेहर्यावरची रेषही नाही हलली. त्यानं शांतपणे आतून चित्रलेखा काढून मला दिला अन दोन रूपये परत घेतले. मी चित्रलेखा डोळे फाडून चेक केला, तर तो 'सेलिब्रेटी हेल्थ गुरू' असं काहीसं मुखपृष्ठवाला होता. माझी नजर सहजच दुकानदाराकडे गेली. आता मात्र तो माझ्याकडे पाहून मिश्किल हसला अन म्हणाला, "दहापैकी नऊजणांनी ह्या आठवड्यात लोकप्रभा घेऊन परत ठेवलाय!" मी अन सागर मनापासून हसलो. अन रिक्षा केली.
पण संध्याकाळचे पावणेआठ-आठच होत होते. अन मी साडे-चार पाचच्या आसपास मोठा ग्लासभरून बोर्नव्हिटा घेतलेला होता. त्यामुळे मला फारशी भूक लागलेली नव्हती. सागरही जेवण नकोच म्हणाला (मी नको म्हणत असल्यानं की काय ठाऊक नाही). मग आम्ही सागरच्या मते हॅपनिंग स्पॉट असणार्या 'भाग्यनगर' भागात गेलो. तिथे एका ठिकाणी संध्याकाळभर उत्तम पाणी-पुरी अन संध्याकाळ उतरली की उत्तम पावभाजी मिळते असं सागरचं म्हणणं होतं. पण मला पावभाजीही खायची इच्छा नव्हती. मग आम्ही एका छोट्या हॉटेलात पाववडा अन वडापाव असं कॉम्बो खाल्लं.
ह्या भाग्यनगरमध्ये मी एक वेगळीच गोष्ट पाहिली. तिथे एका विशिष्ट ठिकाणी पाच-दहा मूकबधिरांचा एक गट एकत्र येऊन त्यांच्या खाणाखुणांच्या भाषेत गप्पा मारत होता. हे मी आदल्या रात्रीही पाहिलं होतं. सागरच्या म्हणण्यानुसार हा गेले कित्येक वर्षांचा शिरस्ता आहे. 'मूक-बधिरांचा कट्टा' ही संकल्पनाच किती मस्त आहे. 'काय काय गोष्टी शेअर करत असतील आपापसात?' हा प्रश्न मनाला चाटून गेला.
वडापाव अन पाववडा झाल्यावर निवांतपणे चालत चालत आम्ही निघालो. सागरचा सिनेमाचा मूड वाटत नव्हता. मी अंदाज घेऊन त्याला विचारलं, "तुला खरंच सिनेमा पाहायचाय?" तो चटकन म्हणाला, "खरं सांगू? नाही. सगळे बकवास सिनेमे लागलेत. आपण मस्तपैकी गप्पा मारूया ना." मीही लगेच दुजोरा दिला अन चालत हॉटेलवर पोचून गप्पाष्टक सुरू केलं. मधेच चक्क आनंदचा परत फोन. "सगळं व्यवस्थित झालं ना? हॉटेलच्या रिसेप्शनवर काय झालं? उद्या सकाळी मी फोनवर अव्हेलेबल असेन, किंवा स्वतःच येऊन जाईन." मी म्हटलं, "अरे वेडा आहेस का तू? लग्न झालंय ना आज तुझं? उद्या येऊन जाईन वगैरे काय? आम्ही पाहून घेऊ काय होतं ते." आनंदचा पाहुणचार काही संपायचं नाव घेत नव्हता.
मग ह्याच्या त्याच्या कागाळ्यांवरून सुरू झालेल्या गप्पा टीव्हीवरचा 'पीस टीव्ही ऊर्दू' पाहून धर्मापासून ते पार जागतिक राजकारणापर्यंत पोचल्या. रात्रीचे ११.३० होत आले होते. सागरच्या दिनक्रमाप्रमाणे सागरला भूक लागली. मग आम्ही रात्री ११.३० वाजता जवळच असलेलय एस.टी. स्टँडवरचे पोहे खायला बाहेर पडलो. नांदेडात कॉलेजच्या दिवसांत केलेले सगळे प्रकार सागर मला दाखवत होता. गरमगरम पोहे अन कटिंग चहा मारून रात्री बारा वाजता आम्ही हॉटेलसमोरच्या रस्त्यावर निरर्थक फेर्या मारत होतो. मग थोड्या वेळाने वर जाऊन पुन्हा थोडा वेळ टाईमपास करून आम्ही एकदाचे झोपलो.
सकाळी ७ ला मी उठून बसलो. काही झालं तरी नऊला हॉटेलातून बाहेर पडणं भाग होतं. कारण नाश्ता करून १०.३० ची ट्रेन गाठायची होती. पण सकाळी सकाळी गरम पाणीच येईना. मग मी शेवटी कंटाळून गार पाण्यानेच आंघोळ उरकली अन तयार होऊन रिसेप्शनवर आलो. आदल्या दिवशी मारे आनंदला आश्वासन दिलं होतं, पण रिसेप्शनवाला काही आमचं ऐकेना. मग पुन्हा आनंदला फोन लावला. तो ही फोनवर सापडला! :-o
पण तो काही बोलायच्या आतच रिसेप्शनवाल्याला त्याची चूक समजली अन त्यानं आमची माफी मागून आम्हाला सोडलं. मी आनंदला सगळं व्यवस्थित झाल्याचं सांगितलं अन पुन्हा डोसे खायला निघालो. डोसे खाऊन, चहा पिऊन स्टेशनला आलो अन ऑलरेडी प्लॅटफॉर्मला लागलेल्या ट्रेनमध्ये चढून खिडकीची जागा पकडून बसलो. सागर माझ्यासमोरच बसला. ट्रेन सुटायला अजून अर्धा तास होता. डबा तसा रिकामाच होता. एक सीट सोडून माझ्या तिरक्या रेषेत दोन ग्रामस्थ बसले होते. त्यातला एकजण माझ्याकडे थोडा वेळ निरखून पाहत होता. मग तो उठून माझ्याजवळ आला अन आपलं तिकिट मला दाखवून म्हणाला, "साहेब, हे 'सेलू'पर्यंत जायला चालेल ना?" काय होतंय हे माझ्या लगेच लक्षात आलं अन मी फक्त मिश्किल हसलो. पण मी काही बोलायच्या आधी सागरनं ते तिकिट ओढलं अन बघून म्हणाला, "सेलू पर्यंत ना. चालेल की!" तो ग्रामस्थ ओशाळवाणंसं हसला अन सागरला संकोचानंच ,"ते ठीक आहे" अन माझ्याकडे बोट दाखवून म्हणाला, "पण साहेब बसलेत, ते सांगतील ना!" मी सागरकडे विजयी मुद्रेनं पाहिलं अन मी काही वेळापूर्वीच सागरला सांगितलेला किस्सा सागरला स्ट्राईक झाला. सागर मी घातलेल्या काळ्या कोटाकडे पाहून हसला अन त्या ग्रामस्थाला म्हणाला, "अहो, तो टीसी नाहीये." त्या ग्रामस्थाला कितपत अर्थबोध झाला माहित नाही पण तो ओशाळवाणंसं हसून उठून गेला. मी रावणासारखा हसू लागलो.
तो काळा कोट माझ्या वडिलांनी १९९६ साली ते अमेरिकेला गेलेले तेव्हा शिवलेला होता. त्या दोन महिन्यांच्या अमेरिकावारीनंतर तो कोट त्यांनी कधी लग्नांनाही घातल्याचं मला स्मरत नाही. पण ते जेव्हा उत्तर प्रदेशात राहणार्या माझ्या काकांकडे रात्रीच्या ट्रेननं जायचे तेव्हा तो कोट घालून जायचे. तेव्हा एकदा एक मुलगा बाबांना सीट ऍडजस्ट करून देता का विचारायला आला होता अन बाबांनाही दोन मिनिटं आपण एव्हढे स्मार्ट दिसतो का? हा प्रश्न पडला होता. बाबांनी सांगितलेला हा किस्सा माझ्या चांगल्याच लक्षात होता. पुढे त्या कोटाला उर्जितावस्था थेट २००७ मध्ये म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा युरोपात आलो तेव्हा आली. तेव्हापासून आजतागायत मी प्रत्येक लांब प्रवासात आवर्जून तो कोट घालतो. कधीकधी ऑफिसातही. तर जेव्हा हा कोट घालून मी ह्या ट्रेनप्रवासाला निघालो, तेव्हाच मला असं काहीतरी होणार हे अपेक्षित होतं अन मी हे सागरला आधीच बोलून दाखवलं होतं. पण पुढे जी गंमत घडली त्यानं ह्या सगळ्यावर कडी केली.
तो ग्रामस्थ जाऊन दोनच मिनिटं उलटली असतील. खिडकीजवळ एक भिकारी आला अन माझ्याकडे पाहून म्हणू लागला, "वकिलसाब ओ वकिलसाब! औरंगाबाद जा रहे हो इतना बड़ा केस लड़ने. गरीब की मदद करो और दुआ लेके जाओ. केस जीत जाओगे!" मी सागरकडे पाहून खो खो हसत होतो. दोनच मिनिटांत मी अजून एक प्रोफेशन चेंज केलं होतं.
थोड्या वेळाने सागर उतरला. मी आनंदला मेसेज केला सगळं व्यवस्थित झाल्याचा, तशी त्याचा फोन आला. तो सांगत होता की हॉटेलवाल्यानं त्याला फोन करून झाल्या त्रासाबद्दल त्याची माफी मागितली. मग मी त्याला म्हटलं आता जरा फोनपासून दूर हो! :) आणि एकदाची ट्रेन निघाली. मी सागरला टाटा केला अन सागर नांदेडातल्याच त्याच्या मित्रांकडे गेला. तिथे एक दिवस राहून तो दुसर्या दिवशी सकाळी त्याच्या घरी जाणार होता.
थोड्याच वेळात ट्रेन भरू लागली. पूर्णा रोडला माझ्यासमोर एक जोडपं अन त्यांची तीन लहान मुलं असे सहप्रवासी आले. फक्त माझं अन त्यांचं रिझर्व्हेशन होतं. मग पुढे पुढे एकेका स्टेशनवर रिझर्व्हेशनवाले येऊन बाकीच्यांना उठवू लागले. आमचा रिझर्व्ह्ड डबा असूनही जनरल डब्यासारखी गर्दी होती. टीसी एकदोनदा येऊन डबा नियमित करायचा व्यर्थ प्रयत्न करून गेला. पण नंतर तो येऊही शकणार नाही इतपत गर्दी डब्यात झाली. मनमाड जंक्शनला तर डब्यात एव्हढी माणसं चढली की मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. लहान लहान बाळांना घेऊन आया सरळ मधल्या मोकळ्या रस्त्यात फतकल मारून बसत होत्या. महाराष्ट्र अन बिहारमध्ये फरक एव्हढाच असावा की इथे माझी रिझर्व्ह्ड जागा आहे सांगितल्यावर अनरिझर्व्ह्ड माणूस सहसा बिनतक्रार उठून उभा राहतो. पण आता उठून उभं राहणे वगैरेच्या पलिकडे गाडी गेलेली होती. मी मनमाडला दोन वडे खाल्ले, पण माझं पित्त प्रचंड चढू लागलं होतं. त्यात मला मायनर क्लॉस्ट्रोफोबिया असावा, त्यामुळे चारी बाजूंनी आपण बंदिस्त झाल्याच्या भावनेमुळे मला मळमळल्यासारखं होऊ लागलं. अजून पाच तास मला एकाच जागी बसून काढायचे होते.
नशीबानं खिडकीतलीच जागा होती. अन समोरच्या पोरांच्या बाळलीला चालू होत्या. त्यामुळे करमणूक सुरू होती. हळूहळू मी स्टेबल झालो. मग पायांपाशी जी मोकळी जागा शिल्लक होती, तीही कुणालातरी बघवली नाही. कुणाचं तरी लहान मूल कुठूनतरी आणून त्या मोकळ्या जागेत सोडण्यात आलं. मी आता राग, क्रोध, चीड वगैरे येण्याच्या पलिकडे पोचलो होतो. कारण त्या डब्यात असलेल्या ९०% लोकांपेक्षा माझी जागा असूया वाटण्याजोगी होती. एक मुलगा तर चक्क बॅगा ठेवण्याच्या रॅकवर झोपून प्रवास करत होता. आणि मग माणसं वाढल्यावर बॅगा ठेवायला जागा नसल्याने त्यानं अन त्याच्या आईनं इतरांच्या शिव्याही खाल्ल्या. पण तो काही शेवटपर्यंत तिथून उतरला नाही. अख्ख्या डब्यात काहीना काही करमणूक चालूच होती. तास हळूहळू पण निश्चित वेगानं उलटत होते. एकदाचं कल्याण आलं अन पावलं हलवण्याइतकी जागा झाली. मग ठाण्याला झोपण्याइतकी जागा झाली आणि शेवटी एकदाचं दादर आलं. मी ठाण्यालाच पोचल्याचा मेसेज बनवून ठेवला होता, तो दादरला उतरल्या उतरल्या सगळ्यांना पाठवून दिला अन गंमत म्हणजे प्रत्येकाचं क्षणार्धात उत्तर आलं. आनंदचं उत्तर, "प्रवास व्यवस्थित झाला न?"
सुरूवातीला जो संवाद मी टाकला होता त्याचं कारण हेच. की आनंदरावांना प्रत्येक क्षण दुसर्यांची किती काळजी लागून राहिलेली असते हे मला सोदाहरण स्पष्ट करायचं होतं. मी पार दादरला पोचलो तरी आनंदची काळजी संपली नव्हती. मग त्याला परतचा एक मेसेज टाकला आणि तासाभरात अजून कुठलीही घटना न घडता घरी पोचलो. :)
सुट्टीतला एक फार महत्वाचा कार्यक्रम पार पडला होता. आणि माझ्या ब्लॉगचा ब्रेकही सुरू झाला होता.
आता ब्रेक संपलेला आहे. अन आप्पाच्या लग्नाची गोष्टही आता खर्या अर्थाने संपलेली आहे!
समाप्त

1/16/2011
आप्पाच्या लग्नाची गोष्ट -२
भाग १ पासून पुढे
चॅप्टर टू - सम गाईज कॅन हँडल नांदेड
सकाळची वेळ होती. ७ च्या आसपास डोळे उघडले. अपेक्षेएव्हढी नसली तरी छान गुलाबी थंडी पडलेली होती. एखाद्या दुसर्या दिवशी, पहिल्या जागेला मी चादर पुन्हा डोक्यावर ओढून झोपलो असतो, पण त्यादिवशी निराळ्या गोष्टीचा उत्साह होता. खरं म्हणजे मी आदल्या दिवशी रात्रीची एक महत्वाची गोष्ट सांगायची विसरलो. आदल्या रात्री आम्हांला बॅचलर्स पार्टी करायची होती. आनंदला बोलावून :) ! एकदम 'द हँगओव्हर' स्टाईलमध्ये. पण आनंद त्या रात्री सापडणार नाही हे आधी लक्षात आलं अन 'हँगओव्हर' स्टाईलमध्ये केल्यास दुसर्या दिवशी पहाटे सापडणार नाही हे नंतर लक्षात आलं. मग आदल्या रात्रीच न सापडणं जास्त सेफ आहे, ह्यावर शिक्कामोर्तब करून आनंदऐवजी सचिनची (ज्याचे फेब्रुवारीत दोनाचे चार होणार आहेत) बॅचलर्स पार्टी करण्याचं ठरलं. पण सचिन जेवण उरकल्या उरकल्या मोबाईल बॅलन्स रिचार्ज मारून जो मोबाईलला चिकटला तो थेट रात्री झोपेस्तो (झोपेतही त्याचा हात मोबाईलवरून न हटल्याचं काही खात्रीलायक सूत्रांकडून समजलेलं आहे.). अशा पद्धतीनं आमच्या 'हँगओव्हर' च्या आशा धुळीत मिळाल्या :P. तर अशा एकंदर इव्हेंटफुल किंवा अनइव्हेंटफुल रात्रीनंतर आलेला दिवस खात्रीलायकरित्या इव्हेंटफुल करण्याची जवाबदारी आमच्या भक्कम खांद्यांवर येऊन पडलेली होती.
सचिननं जरी बॅचलर्स पार्टीला टांग दिलेली होती, तरी त्यानं सकाळी बाहेर पडून टूथपेस्ट, तेल आणि वर्तमानपत्र अशा आवश्यक गोष्टी (ज्या सगळेजण सोयीस्कररित्या विसरलेले होते) आणल्या अन थोडी कसर भरून काढली.
आनंदरावांनी मराठवाडी पाहुणचाराच्या सगळ्या सीमा गेल्या रात्री हे सांगून ओलांडल्या होत्या की सकाळी लग्नस्थळी घेऊन जायला एक गाडी येईल (शहरात थांबलेल्या सगळ्या पाहुण्यांना थोडं शहराबाहेर असलेल्या लग्नस्थळी घेऊन जायला ही सोय होती). आम्ही आपले तयार झालो अन सागर आमची वरात एका प्रसिद्ध डोसेवाल्याकडे घेऊन गेला. एकाच वेळी दहाच्या आसपास डोसे घालणारा मुख्य आचारी ही ह्यांची खासियत. बटर ओनियन, बटर मसाला वगैरे वगैरे नावं असलेले डोसे अन त्यांचा वातावरणात भरून राहिलेला सुगंध अन त्याला जोड लागलेल्या भुकेची. मग सगळे स्थानापन्न झालो अन सागरच्या रेकमेंडेशनवर ऑर्डरी सुटल्या. सुहासनं काही फोटोज काढले, पण भुकेपुढे फोटो फिके पडले. यथेच्छ पोटपूजा झाल्यावर आम्ही गाडीसाठी फोन केला अन परत हॉटेलवर आलो, अन चहाच्या ऑर्डरी देऊन लाऊंजमध्ये पेपर वाचत बसलो.
'पत्रे विवाह सोहळा' असं लिहिलेली गाडी आली, ज्यामध्ये आनंदचे बहुतेक हैदराबादेचे मित्रही होते. अन आनंदची वरात काढायला आमची वरात निघाली. थोड्याच वेळात विवाहस्थळी आम्ही पोचलो, तर नवरामुलगा हनुमानाच्या देवळात जाण्यासाठी म्हणून दरवाजाशीच येऊन उभा होता. चांगला सूट-बूट घालून अन दोन्ही हात भरून मेहंदी काढून! आम्ही जाऊन त्याला मिठ्या मारल्या अन त्याची खेचायला तिथेच सुरूवात केली :) बिचारा आधीच लग्नाच्या टेन्शननं गांगरलेला होता, त्यात आम्ही अन त्याचे इतरही मित्र त्याची यथेच्छ खेचत होते. मग तिथेच त्याच्या मेहंदीचं अन त्याचं आमच्यासोबत फोटोसेशन चटकन उरकलं अन त्याची वरात काढायची तयारी सुरू झाली. वरात म्हणजे अर्धा किलोमीटरवर असलेल्या हनुमानाच्या देवळापर्यंत अन परत. वरातीसाठी घोडं नव्हतं, तर गाडी होती. मी कारण विचारलं असता, बँडवाल्यांना "तेनु घोडी किन्ने चढाया, भूतनीके" हे गाणं वाजवावयास सांगता येऊ नये ह्यासाठीची ही तजवीज असल्याचं मला सांगण्यात आलं. मग बाकायदा बँडसकट वरात निघाली, अन वरातीमागून गाडी ज्यात नवरामुलगा होता.
मी आजवर कधी गणपती विसर्जनातही नाचलो नव्हतो, पण त्यादिवशी आनंदच्या विसर्जनासाठी नाचायचंच असं ठरवून स्वतःही नाचलो अन सचिन, सुहास, भारत आणि सागरलाही नाचवलं. अर्थात सचिनला नाचवणं थोडं अवघड गेलं, पण जमलं शेवटी :D देवळात काय काय विधी करायचे हे सचिननं नीट पाहून घेतलं अन ते नीट पाहताना आम्ही सचिनला पाहून घेतलं. मग वरात परतताना पुन्हा सगळ्यांच्या नृत्यकौशल्याला बहर आला. सरतेशेवटी तर गाडीतून उतरवून नवरदेवाला खांद्यावर घेऊन नाचवलं गेलं, अन मग खाली उतरवून पुन्हा नाचवलं गेलं. नवरदेवाचा उत्साह चांगलाच ओसंडून वाहू लागला होता.
मग आम्ही सर्व लग्नमंडपात पोचलो. आणि तो प्रचंड मोठा माणसांनी भरून वाहणारा हॉल पाहून आम्हा शहरी लोकांची छातीच दडपली. सागर म्हणाला गावाकडे लग्नात असंच असतं. सगळी सजावट अन स्टेजवर नवरानवरीनं जाण्यासाठी बनवलेला स्पेशल कमानी रस्ता वगैरे पाहून मस्त वाटत होतं. आनंद येऊन कमानी रस्त्याच्या सुरूवातीला उभा राहिला. ऑर्केस्ट्रावाले गाणी गात होते. त्यावेळेस चालू होतं, "रूपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना!" पण आनंदराव यायला आय मीन जायला तयारच नव्हते. पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली. मी आपला, 'वाळू अन बन नाहीये ना, म्हणून जात नसेल तो" असले माफक विनोद करून पाहिले. पण माणसांच्या अशक्य कोलाहलात अन ऑर्केस्ट्राच्या आवाजात माझे विनोद हवेतच विरून गेले. मग लक्षात आलं, की नवरा-नवरी दोघे एकत्रच स्टेजवर जाणार आहेत, म्हणून आज्ञाधारक वर वाळू अन बनाला भुलत नव्हता. एकदाची वधू आली, अन मग दोघे जोड्यानं स्टेजकडे गेले अन जोडे काढून बसले. मग विधी सुरू झाले. आनंदनं आधीच सांगितलं होतं, की मेजर विधी आदल्या दिवशीच झालेले आहेत अन आज जास्त नाही, तद्वत अर्ध्या तासातच विधी झाले अन मंगलाष्टकं सुरू झाली. आम्ही बरेच मागे होतो अन सचिन मात्र थोडा पुढे गेला होता. त्यामुळे आम्ही आनंदच्या अक्षता थोड्याफार सचिनवरही टाकून त्याच्या लग्नाला जाता न येण्याची कसर थोडी भरून काढली.
लग्न लागलं अन इथे आम्हाला भुका लागल्या. पण आधीच आनंदला भेटून घेण्यात शहाणपणा होता. त्यामुळे गर्दीतून वाट काढत आम्ही स्टेजजवळ पोचलो, पण सचिन गायब. मग त्याला फोन करून स्टेजजवळ बोलावलं तोवर जिन्यांवरती बायकांचा घोळका. मग सरळ समोरच्या बाजूनंच स्टेजवर चढलो अन वाट काढत आनंदच्या जवळ जाऊन पोचलो. स्टेजवर बरीच माणसं होती, त्यामुळे आनंद काय बोलतोय ते ऐकूच येत नव्हतं. वहिनींशी आनंदने ऐकू न येणारी ओळख करून दिली, नमस्कार केले आणि फोटो काढले. पण ह्या कोलाहलामुळे मला जो पीजे मारायचा होता तो मारता आला नाही. ती हौस इथे भागवून घेतो. आम्ही ठरवून गेलेलो की स्टेजवर त्याला आलं द्यायचं. पण आलं घ्यायला विसरलो, त्यामुळे मी तिथे त्याला म्हणणार होतो की "तेव्हढं आलं राहिलं बघ!". मग त्यानं विचारलं असतं "काय?" मग मी म्हटलं असतं, की "तू लग्नाच्या निमंत्रणात लिहिलं होतंस ना, की लग्नाला आलंच पाहिजे म्हणून!" :D
मग चटाचट जेवून अन लग्नाचा (खरा) लाडू खाऊन (व्हर्च्युअल लाडू आनंदनं खाल्ला होता) आम्ही निघालो. सागर आमची वरात नांदेडच्या प्रसिद्ध हुजूरसाहेब गुरूद्वाराला घेऊन गेला. अतिशय सुंदर संगमरवरी बांधकाम अन इतकी स्वच्छता अन शांतता पाहून शीण कमी झाला. शीख समाज गुरुद्वारेच्या अन एकंदरितच त्यांच्या धर्माच्या बाबतीत फार कट्टर आहे, त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पण धर्मासाठी अन धर्मबांधवांसाठी ते काय काय करतात (इतरधर्मीयांना त्रास न देता) ह्यांतलं बरंच काही शिकण्यासारखंदेखील आहे. सागर एखादा ऑफिशियल गाईड असावा तशागत त्या जागेचा इतिहास, भूगोल अथक सांगत होता. तिथून बाहेर पडल्यावर थोडी कडी अन हातरूमालांची खरेदी होईस्तो सचिनचं बालपण जागृत झालं अन तो कुल्फीवाल्याकडे पोचला. मग आमचंही सर्वांचं बालपण जागृत झालं. त्यानंतर तिथून रिक्षा करून सगळे गपगुमान हॉटेलावर पोचलो. रिक्षापण भारी होती. आम्ही सगळे (सागर सोडून) हट्टेकट्टे नौजवान, तरी आदल्या दिवशीपासून एकाच रिक्षात पाचजण फिरत होतो. आदल्या रात्री एकजण पुढे बसला त्यामुळे ठीक होतं, पण लग्नाच्या दिवशी शाळेच्या पोरांसारखे पाचजण मागच्या बाजूला बसलो होतो. सीटवर तिघे अन छोट्याशा लाकडी फळीवर मी अन सागर. पण त्यातही गंमतच होती.
सचिन, सुहास अन भारत संध्याकाळीच बसने निघणार होते, पण मी दुसर्या दिवशी सकाळच्या ट्रेनने एकटाच जाणार होतो. मग मला सोबत द्यायला म्हणून सागर थांबणार होता, नाहीतर तो घरी जाणार होता त्याच्या गावी. मराठवाडी पाहुणचाराचं हे अजून एक उदाहरण. मीही स्वार्थीपणा करून घेतला, कारण तेव्हढ्याच अजून गप्पा झाल्या असत्या आणि ह्यानंतर पुन्हा इतकं निवांत भेटणं सहा महिने तरी शक्य नव्हतंच.
दुपारी हॉटेलावर पोचल्यावर आम्ही सगळ्यांनी झोप काढायचं ठरवलं. झोपा झाल्यावर सागर त्याच्या मित्रांना भेटायला गेला अन तिघेजण तयार झाले. आम्ही दुपारसाठी गरमगरम बोर्नव्हिटा मागवले. आणि ते पिऊन ताजेतवाने होऊन सगळेजण बाहेर पडलो. आनंदचं लग्न नक्की झालंय ना अशी शंका यावी इतक्या वेळा तो बिचारा आमच्याशी फोनवर बोलत होता. आमचं सगळं व्यवस्थित होतंय ना ह्या काळजीनं तो अस्वस्थ होत होता. मंडळी निघाली तेव्हाही हॉटेलच्या रिसेप्शनवर थोडा गैरसमज झाल्यावर आम्ही त्यालाच फोन करून त्रास दिला. पण हा सदैव तत्परच होता. बसस्टॉपवर पोचलो तर बस निघायला थोडा वेळ शिल्लक होता. मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मंडळी स्लीपर बसमध्ये स्थानापन्न झाली. बस निघाली अन आम्ही आनंदला सगळं व्यवस्थित पार पडल्याचं कळवलं. व्हॉटेव्हर हॅपन्स इन नांदेड स्टेज इन नांदेड! इथे क्रेडिट्स रोल करता येतील. सिनेमा संपला.
पण क्रेडिट्सबरोबरसुद्धा बरेचदा काही स्टोरी पुढे गेलेली दाखवतात. तस्मात माझी स्टोरी अजून शिल्लक आहे. ती उद्याच्या भागात!
क्रमशः
भाग ३

1/15/2011
आप्पाच्या लग्नाची गोष्ट -१
नमस्कार सर्वांना अन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रण केलेला असूनही माझ्या लिखाणात सुट्टीच्या निमित्ताने खंड पडला अन त्यामुळे मलाच फार चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. तर अनेकजणांनी बर्याच दिवसांत पोस्ट नाही, नवी पोस्ट कधी असं आपुलकीनं विचारल्यामुळे अतिशय सुखावून गेलो. आता मी पुन्हा नव्या जोमाने पूर्वीप्रमाणे नियमित लिखाण करायचा प्रयत्न करेन. सर्व वाचकांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद!
चॅप्टर वन - ट्रेन टू नांदेड
"१९ तारखेला ठेवलंयस लग्न ते बरं केलंस. मला येता येईल." मी
"खरंच येणार आहेस?" आप्पा.
"असं का विचारतोस?" मी.
"नाही. तू मिलानहून येणार, अजूनही ठिकाणी जायचे प्लॅन्स असतील. नांदेडास येऊन-जाऊन दमायला नाही ना होणार?" आप्पा.
"तू म्हणत असशील तर नाही येत." मी
"मी असं बोललो का बे?" आप्पा.
बहुतेक नोव्हेंबरच्या शेवटाकडला एक दिवस होता आणि मी आनंद पत्रे ऊर्फ आप्पाशी उपरोक्त चॅट करत होतो. ह्या चॅटचा उल्लेख करून गोष्टीची सुरूवात करण्याचं कारण गोष्टीच्या शेवटी कळेल.
तर आप्पाचं लग्न १९ डिसेंबरला होतं. लग्नाला कोण कोण येणार ह्याची हवा तब्बल महिनाभर आधीपासून होती अन रोज एक जण कन्फर्म करत होता अन लगेच दोनेक दिवसांत रद्द करत होता. मी जायचं ठरवलंच होतं, फक्त जाण्यायेण्याची सोय काय, ह्या विवंचनेत होतो. मला इतक्या दूर बसनं जायचं-यायचं नव्हतं. पण अर्धवट रिझर्व्हेशनं करण्यात अर्थ नव्हता. कधी बस, कधी प्रायव्हेट गाडी तर कधी ट्रेन असे रोज नवनवे प्लॅन्स बनत होते, अन उधळले जात होते. मला पूर्ण विश्वास होता की शेवटच्या दिवशीपर्यंत कसं जायचं हे ठरणार नाहीये. पण सचिननं (सपा) मी इथून निघण्याच्या दोनेक दिवस आधी जाण्याचं ट्रेनचं सहा जणांचं (मी, सचिन (पाटील), सुहास (झेले), सागर (बाहेगव्हाणकर), योगेश (मुंढे), दीपक (परूळेकर)) रिझर्व्हेशन केलं. पण परतीचा लोचा होता. कारण, सगळ्या बाकी मंडळींना (मी आणि सागर सोडून) दुसर्या दिवशीच कामावर हजर राहायचं होतं. त्यामुळे त्यांना रात्रीची गाडी हवी होती, तिचं रिझर्व्हेशन मिळालं नाही. त्यामुळे ते तत्कालमध्ये बघण्याचा निर्णय घेण्यात आला.
यथावकाश मी मुंबईला आलो. थोडी हपिसाची कामे वगैरे उरकण्यात पहिला आठवडा संपत आला. अन तत्कालमध्येही रिझर्व्हेशन न मिळाल्याचा सचिनचा फोन आला. त्यामुळे बाकी सर्वांनी येण्यासाठी बसचं रिझर्व्हेशन करण्याचं ठरवलं होतं. सागर तिथून थेट त्याच्या जवळच असलेल्या घरी जाणार होता, त्यामुळे तो बाद होता. मग राहिलो मी एकटाच. अन मला काय बुद्धी सुचली, मी परतीचा १२ तासांचा ट्रेनचा प्रवास लग्नाच्या दुसर्या दिवशी एकट्याने करण्याचा निर्णय घेतला. सागरनं फक्त मला सोबत म्हणून एक रात्र जास्त नांदेडात राहायची तयारी दर्शवली. प्रत्यक्ष जाण्याच्या आदल्या दिवशी भारतही (मुंबईकर) येत असल्याचं मला कळलं.
सागर अन योगेश पुण्याहून रात्री निघून पहाटे मुंबईला पोचणार होते. अन मग सचिन अन ते दोघे सीएसटीहून ट्रेन पकडणार होते. मी, सुहास, भारत अन दीपक दादरहून चढणार होतो. पण ऐन आदल्याच दिवशी काही वैयक्तिक कारणांमुळे योगेशचं येणं रद्द झालं. त्यामुळे सागर एकटा पडला. मग सचिननं पहाटे लवकर सीएसटीला जाऊन सागरला सोबत करण्याचं ठरलं. त्यानुसार सागर रात्री अकराला पुण्याहून निघाला. मग प्रत्यक्ष जाण्याची पहाट उजाडली. मी ट्रेन यायच्या अर्धा तास आधी दादरच्या प्लॅटफॉर्मवर पोचलो. तिथे भारत आणि सुहास भेटले. अन तिथेच दीपकचंही येणं काही कारणाने रद्द झाल्याचं कळलं. मग ट्रेनमध्ये विवक्षित डब्यात चढल्यावर झोपलेला सागर अन सचिनचं दर्शन घडलं. मी सचिन, सुहास अन भारतला पूर्वी भेटलो होतो. पण सागर अन माझी प्रत्यक्ष भेट अशी नव्हतीच. ती होण्यास अजून थोडा अवकाश होता. तूर्तास मुटकुळ करून झोपलेला सागर अन दोन रिझर्व्ह केलेल्या रिकाम्या सीट्स राखत आम्ही गप्पा टाकत बसलो.
थोड्या वेळाने गाडी हळूहळू भरू लागली. आणि सागर उठून बसला. एकदाची भरतभेट झाली! :) मग चौघांमध्ये पाचव्याची भर पडल्यामुळे गप्पांना चांगलाच रंग चढू लागला. गाडीत गर्दी वाढू लागल्यावर आमच्या दोन रिकाम्या सीट्स राखणं अवघड होऊ लागलं. मग एका लहानग्याला घेऊन प्रवास करणार्या ताईंना सीट देऊन आम्ही मोकळे झालो. अजून किमान दहा तासाचा प्रवास शिल्लक होता. पण फिकर कुणाला होती. आनंदनं तिकडे राहण्याची सोयही केल्याचं कळवलं होतं. आणि गप्पा टाकायला सोबत मित्र होते. आणि महत्वाचं म्हणजे गप्पांसाठी विषयांची कमतरताच नव्हती. तासांमागून तास उलटू लागले तसतसा हळूहळू सकाळचा उत्साह ओसरू लागला. पण जशी ट्रेन मराठवाड्यात शिरली, तसा सागर थोडा फुलला. हा फिनॉमेनन मी बरेचदा पाहिलाय. सातार्याजवळ पोचल्याबरोबर माझ्या बाबांच्या बॉडी लँग्वेजमध्ये पॉझिटिव्ह बदल होतो. तसाच काहीसा बदल गाव जवळ येऊ लागल्यावर सागरमध्ये आला. सागर मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक मतदारसंघातील आजी अन माजी (अन क्वचितप्रसंगी पाजी) आमदारांचे विविध किस्से सांगू लागला. मग त्यातच पोलिस, मुख्यमंत्री वगैरे शब्द ओघानं येतच होते. त्याचं बोलणं ऐकून महाराष्ट्राचे बहुतांश मुख्यमंत्री का ह्या मला अनेक वर्षांपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. त्यातच सचिननं विचारलं, "इथे मराठवाड्यात काय पिकतं रे?" सागर बोलायच्या आत मीच म्हणालो, "राजकारण!"
प्रवासाचे उणेपुरे दोनेक तास उरलेले असताना हळूहळू अवसानं आणि गात्रं दोन्ही गळू लागली होती. आनंदचा मधेच फोन येऊन गेला होता, अन त्यानं सांगितलेल्या हॉटेलच्या नावावरून 'निर्मल पॅलेस' सागरनं ते एक उत्तम हॉटेल असल्याचं ताडलं होतं. आणि त्यातच आनंदनं स्टेशनपासून हॉटेलवर घेऊन जायला गाडीचीही सोय असल्याचं सांगून आमचे आ वासले होते. मग कंटाळ्याचा प्रभाव वाढू लागल्यावर मी आपला, "अरे पॅलेसला उतरायचंय, थोडी कळ काढा!" असं म्हणून चीअर-अप करायचा प्रयत्न करत होतो. आमच्या अपेक्षा पाहून सागर आपला, "अरे नावाचं पॅलेस आहे रे. एव्हढंही काही चांगलं नाहीये." असं सांगायचा आपला एक क्षीण प्रयत्न करत होता. गप्पांमध्ये रंग अधूनमधून यायचा, पण एकंदरित कंटाळ्याचे सूर वाढू लागले होते. सचिनच्या स्पेशल 'एग्झॉटिक' बिस्किटांमुळे जी काय ती एनर्जी शिल्लक होती. शेवटी एकदाचं नांदेड आलं. अन सगळ्यांनीच सुटकेचे निःश्वास टाकले.
हुजूर साहेब नांदेड स्टेशनच्या उत्तम बांधलेल्या इमारतीची तारीफ करत आम्ही सगळे निघालो. हॉटेल स्टेशनच्या जवळच असल्याने आम्ही आनंदला फोन करून चालतच जात असल्याचं अन सुखरूप पोचल्याचं कळवलं. अन एकदाचे 'पॅलेस' वर पोचलो. हॉटेल खरोखरच उत्तम होतं. मनातल्या मनात सगळ्यांनी आनंदरावांना अन त्यांच्या मराठवाडी पाहुणचाराला दुवा दिले अन चटचट फ्रेश होऊन जेवण्यासाठी बाहेर पडलो.
सागरचं कॉलेजशिक्षण नांदेडात झालेलं असल्यानं, तो आमचा ऑफिशियल गाईड होता. तो कॉलेजात असताना ज्या घरगुती मेसमध्ये जेवत असे, त्या मेसमध्येच तो आम्हाला घेऊन गेला.
ह्या मेसचे चालक अन मालक 'काका' म्हणजे एक वल्ली. चार जणांच्या टेबलावर आम्ही चौघे बसलो होतो, अन सागर गपचूप दुसर्या टेबलावर बसला होता. तेव्हा सुहास सागरला म्हणाला, "ये इथे, ऍडजस्ट करू." सागर खुणेनं नको म्हणेस्तो काकांनी पाहिलं, अन मिश्किल हसून म्हणाले, "शिस्त म्हणजे शिस्त! बस तिथेच." आम्ही सगळे आधी ओशाळवाणे आणि मग खळखळून हसलो. अगदी ताजं, घरगुती जेवण मिळाल्यावर सगळेच पोटभरून जेवले. अन जेवताना काकांची तिथल्या जेवायला येणार्या कॉलेजच्या पोरांवरची मायाही पाहिली. मोबाईलवर बोलणार्याला "अरे #4, ठेव तो मोबाईल, जेवून घे आधी नीट." असं म्हणून धपाटा घालणारे काका घरापासून दूर मिळणं हे त्या मेसच्या पोरांचं भाग्य.
मग जेवणं झाल्यावर काकांचे आभार मानून आमची वरात सागरसोबत "पागल पान भंडार" कडे गेली. तिथे पान घेऊन आम्ही दिवसाच्या खादाडीची इतिश्री केली. मग बर्याच दूर असलेल्या हॉटेलपर्यंत चालत चालत जाऊन भरपेट झालेलं जेवण जिरवलं. रस्त्यात पोट भरलेलं असल्यानं गप्पा अन गंमतीजमतींना ऊत आला होता. दिवसभराचा प्रवासाचा शीण हळूहळू अंगावर येत होता. रूमवर पोचल्यावर थोडा वेळ टीव्ही बघत पुन्हा टवाळक्या केल्या अन मग सुहास, भारत आणि सचिन झोपी गेले. मी अन सागर स्टार न्यूजवर लागलेले 'करमणुकीचे' कार्यक्रम पाहत बराच वेळ गप्पा मारत होतो. मग १२.३० च्या आसपास कधीतरी आम्हीही निद्राधीन झालो. सकाळी ७ ला उठून आप्पाच्या लग्नासाठी तयार जे व्हायचं होतं.
क्रमशः
भाग २
भाग ३
Subscribe to:
Posts (Atom)