भाग १ आणि
भाग २ पासून पुढे
चॅप्टर थ्री - द रिटर्न
संध्याकाळी सुहास, सचिन अन भारतची बस निघाल्यानंतर मी अन सागर 'नांदेड बाय द नाईट' बघायला निघालो. आधी प्लॅन होता काही पुस्तकं विकत घ्यायची. मग जेवून कुठलातरी सिनेमा पाहायला जायचं. पुस्तकं घेण्याचं कारण की दुसर्या दिवशी १२ तासांचा कंटाळवाणा होऊ शकणारा प्रवास वाट पाहत होता. पण दैवयोगानं दोनेक दुकानं पालथी घालूनही हवी ती पुस्तकं हाती लागली नाहीत. मग सागर अजूनही दुकानांच्या शोधात होता, पण मीच जाऊ दे म्हटलं. तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात सागरला राहचलते ४-५ ओळखीचे मुलं-'मुली' भेटले. पण सागरनं फार न ताणता काढता पाय घेतला. मग आम्ही ठरवलं की एखादे ठिकाणी सफरचंदं घेऊ प्रवासासाठी म्हणून अन मग 'काकां'च्या मेसमध्ये जेवायला जाऊ. सफरचंद घेऊन रिक्षा शोधताना मला एक बुक स्टॉल दिसला. मी म्हटलं एखादं मासिक विकत घेऊ, प्रवासात अगदीच काही नाही असं नको व्हायला.
मी पुढे झालो अन स्टॉलवाल्याला लोकप्रभा मागितला. त्यानं लोकप्रभा काढून समोर ठेवला मी दहाची नोट काढून त्याला दिली अन तो दोन रूपये काढून मला परत देत असतानाच मागून सागरनं वाचलं 'आध्यात्मिक विशेष'. मी लोकप्रभा उचलला अन नीट पाहिला. 'स्वामी समर्थ' वगैरेंचे फोटो होते अन तो चक्क 'आध्यात्मिक विशेष' अंक होता. मी सेकंदभर विचार करून तो खाली ठेवला अन दुकानदाराला म्हटलं, "हा राहू दे, चित्रलेखा द्या." दुकानदाराच्या चेहर्यावरची रेषही नाही हलली. त्यानं शांतपणे आतून चित्रलेखा काढून मला दिला अन दोन रूपये परत घेतले. मी चित्रलेखा डोळे फाडून चेक केला, तर तो 'सेलिब्रेटी हेल्थ गुरू' असं काहीसं मुखपृष्ठवाला होता. माझी नजर सहजच दुकानदाराकडे गेली. आता मात्र तो माझ्याकडे पाहून मिश्किल हसला अन म्हणाला, "दहापैकी नऊजणांनी ह्या आठवड्यात लोकप्रभा घेऊन परत ठेवलाय!" मी अन सागर मनापासून हसलो. अन रिक्षा केली.
पण संध्याकाळचे पावणेआठ-आठच होत होते. अन मी साडे-चार पाचच्या आसपास मोठा ग्लासभरून बोर्नव्हिटा घेतलेला होता. त्यामुळे मला फारशी भूक लागलेली नव्हती. सागरही जेवण नकोच म्हणाला (मी नको म्हणत असल्यानं की काय ठाऊक नाही). मग आम्ही सागरच्या मते हॅपनिंग स्पॉट असणार्या 'भाग्यनगर' भागात गेलो. तिथे एका ठिकाणी संध्याकाळभर उत्तम पाणी-पुरी अन संध्याकाळ उतरली की उत्तम पावभाजी मिळते असं सागरचं म्हणणं होतं. पण मला पावभाजीही खायची इच्छा नव्हती. मग आम्ही एका छोट्या हॉटेलात पाववडा अन वडापाव असं कॉम्बो खाल्लं.
ह्या भाग्यनगरमध्ये मी एक वेगळीच गोष्ट पाहिली. तिथे एका विशिष्ट ठिकाणी पाच-दहा मूकबधिरांचा एक गट एकत्र येऊन त्यांच्या खाणाखुणांच्या भाषेत गप्पा मारत होता. हे मी आदल्या रात्रीही पाहिलं होतं. सागरच्या म्हणण्यानुसार हा गेले कित्येक वर्षांचा शिरस्ता आहे. 'मूक-बधिरांचा कट्टा' ही संकल्पनाच किती मस्त आहे. 'काय काय गोष्टी शेअर करत असतील आपापसात?' हा प्रश्न मनाला चाटून गेला.
वडापाव अन पाववडा झाल्यावर निवांतपणे चालत चालत आम्ही निघालो. सागरचा सिनेमाचा मूड वाटत नव्हता. मी अंदाज घेऊन त्याला विचारलं, "तुला खरंच सिनेमा पाहायचाय?" तो चटकन म्हणाला, "खरं सांगू? नाही. सगळे बकवास सिनेमे लागलेत. आपण मस्तपैकी गप्पा मारूया ना." मीही लगेच दुजोरा दिला अन चालत हॉटेलवर पोचून गप्पाष्टक सुरू केलं. मधेच चक्क आनंदचा परत फोन. "सगळं व्यवस्थित झालं ना? हॉटेलच्या रिसेप्शनवर काय झालं? उद्या सकाळी मी फोनवर अव्हेलेबल असेन, किंवा स्वतःच येऊन जाईन." मी म्हटलं, "अरे वेडा आहेस का तू? लग्न झालंय ना आज तुझं? उद्या येऊन जाईन वगैरे काय? आम्ही पाहून घेऊ काय होतं ते." आनंदचा पाहुणचार काही संपायचं नाव घेत नव्हता.
मग ह्याच्या त्याच्या कागाळ्यांवरून सुरू झालेल्या गप्पा टीव्हीवरचा 'पीस टीव्ही ऊर्दू' पाहून धर्मापासून ते पार जागतिक राजकारणापर्यंत पोचल्या. रात्रीचे ११.३० होत आले होते. सागरच्या दिनक्रमाप्रमाणे सागरला भूक लागली. मग आम्ही रात्री ११.३० वाजता जवळच असलेलय एस.टी. स्टँडवरचे पोहे खायला बाहेर पडलो. नांदेडात कॉलेजच्या दिवसांत केलेले सगळे प्रकार सागर मला दाखवत होता. गरमगरम पोहे अन कटिंग चहा मारून रात्री बारा वाजता आम्ही हॉटेलसमोरच्या रस्त्यावर निरर्थक फेर्या मारत होतो. मग थोड्या वेळाने वर जाऊन पुन्हा थोडा वेळ टाईमपास करून आम्ही एकदाचे झोपलो.
सकाळी ७ ला मी उठून बसलो. काही झालं तरी नऊला हॉटेलातून बाहेर पडणं भाग होतं. कारण नाश्ता करून १०.३० ची ट्रेन गाठायची होती. पण सकाळी सकाळी गरम पाणीच येईना. मग मी शेवटी कंटाळून गार पाण्यानेच आंघोळ उरकली अन तयार होऊन रिसेप्शनवर आलो. आदल्या दिवशी मारे आनंदला आश्वासन दिलं होतं, पण रिसेप्शनवाला काही आमचं ऐकेना. मग पुन्हा आनंदला फोन लावला. तो ही फोनवर सापडला! :-o
पण तो काही बोलायच्या आतच रिसेप्शनवाल्याला त्याची चूक समजली अन त्यानं आमची माफी मागून आम्हाला सोडलं. मी आनंदला सगळं व्यवस्थित झाल्याचं सांगितलं अन पुन्हा डोसे खायला निघालो. डोसे खाऊन, चहा पिऊन स्टेशनला आलो अन ऑलरेडी प्लॅटफॉर्मला लागलेल्या ट्रेनमध्ये चढून खिडकीची जागा पकडून बसलो. सागर माझ्यासमोरच बसला. ट्रेन सुटायला अजून अर्धा तास होता. डबा तसा रिकामाच होता. एक सीट सोडून माझ्या तिरक्या रेषेत दोन ग्रामस्थ बसले होते. त्यातला एकजण माझ्याकडे थोडा वेळ निरखून पाहत होता. मग तो उठून माझ्याजवळ आला अन आपलं तिकिट मला दाखवून म्हणाला, "साहेब, हे 'सेलू'पर्यंत जायला चालेल ना?" काय होतंय हे माझ्या लगेच लक्षात आलं अन मी फक्त मिश्किल हसलो. पण मी काही बोलायच्या आधी सागरनं ते तिकिट ओढलं अन बघून म्हणाला, "सेलू पर्यंत ना. चालेल की!" तो ग्रामस्थ ओशाळवाणंसं हसला अन सागरला संकोचानंच ,"ते ठीक आहे" अन माझ्याकडे बोट दाखवून म्हणाला, "पण साहेब बसलेत, ते सांगतील ना!" मी सागरकडे विजयी मुद्रेनं पाहिलं अन मी काही वेळापूर्वीच सागरला सांगितलेला किस्सा सागरला स्ट्राईक झाला. सागर मी घातलेल्या काळ्या कोटाकडे पाहून हसला अन त्या ग्रामस्थाला म्हणाला, "अहो, तो टीसी नाहीये." त्या ग्रामस्थाला कितपत अर्थबोध झाला माहित नाही पण तो ओशाळवाणंसं हसून उठून गेला. मी रावणासारखा हसू लागलो.
तो काळा कोट माझ्या वडिलांनी १९९६ साली ते अमेरिकेला गेलेले तेव्हा शिवलेला होता. त्या दोन महिन्यांच्या अमेरिकावारीनंतर तो कोट त्यांनी कधी लग्नांनाही घातल्याचं मला स्मरत नाही. पण ते जेव्हा उत्तर प्रदेशात राहणार्या माझ्या काकांकडे रात्रीच्या ट्रेननं जायचे तेव्हा तो कोट घालून जायचे. तेव्हा एकदा एक मुलगा बाबांना सीट ऍडजस्ट करून देता का विचारायला आला होता अन बाबांनाही दोन मिनिटं आपण एव्हढे स्मार्ट दिसतो का? हा प्रश्न पडला होता. बाबांनी सांगितलेला हा किस्सा माझ्या चांगल्याच लक्षात होता. पुढे त्या कोटाला उर्जितावस्था थेट २००७ मध्ये म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा युरोपात आलो तेव्हा आली. तेव्हापासून आजतागायत मी प्रत्येक लांब प्रवासात आवर्जून तो कोट घालतो. कधीकधी ऑफिसातही. तर जेव्हा हा कोट घालून मी ह्या ट्रेनप्रवासाला निघालो, तेव्हाच मला असं काहीतरी होणार हे अपेक्षित होतं अन मी हे सागरला आधीच बोलून दाखवलं होतं. पण पुढे जी गंमत घडली त्यानं ह्या सगळ्यावर कडी केली.
तो ग्रामस्थ जाऊन दोनच मिनिटं उलटली असतील. खिडकीजवळ एक भिकारी आला अन माझ्याकडे पाहून म्हणू लागला, "वकिलसाब ओ वकिलसाब! औरंगाबाद जा रहे हो इतना बड़ा केस लड़ने. गरीब की मदद करो और दुआ लेके जाओ. केस जीत जाओगे!" मी सागरकडे पाहून खो खो हसत होतो. दोनच मिनिटांत मी अजून एक प्रोफेशन चेंज केलं होतं.
थोड्या वेळाने सागर उतरला. मी आनंदला मेसेज केला सगळं व्यवस्थित झाल्याचा, तशी त्याचा फोन आला. तो सांगत होता की हॉटेलवाल्यानं त्याला फोन करून झाल्या त्रासाबद्दल त्याची माफी मागितली. मग मी त्याला म्हटलं आता जरा फोनपासून दूर हो! :) आणि एकदाची ट्रेन निघाली. मी सागरला टाटा केला अन सागर नांदेडातल्याच त्याच्या मित्रांकडे गेला. तिथे एक दिवस राहून तो दुसर्या दिवशी सकाळी त्याच्या घरी जाणार होता.
थोड्याच वेळात ट्रेन भरू लागली. पूर्णा रोडला माझ्यासमोर एक जोडपं अन त्यांची तीन लहान मुलं असे सहप्रवासी आले. फक्त माझं अन त्यांचं रिझर्व्हेशन होतं. मग पुढे पुढे एकेका स्टेशनवर रिझर्व्हेशनवाले येऊन बाकीच्यांना उठवू लागले. आमचा रिझर्व्ह्ड डबा असूनही जनरल डब्यासारखी गर्दी होती. टीसी एकदोनदा येऊन डबा नियमित करायचा व्यर्थ प्रयत्न करून गेला. पण नंतर तो येऊही शकणार नाही इतपत गर्दी डब्यात झाली. मनमाड जंक्शनला तर डब्यात एव्हढी माणसं चढली की मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. लहान लहान बाळांना घेऊन आया सरळ मधल्या मोकळ्या रस्त्यात फतकल मारून बसत होत्या. महाराष्ट्र अन बिहारमध्ये फरक एव्हढाच असावा की इथे माझी रिझर्व्ह्ड जागा आहे सांगितल्यावर अनरिझर्व्ह्ड माणूस सहसा बिनतक्रार उठून उभा राहतो. पण आता उठून उभं राहणे वगैरेच्या पलिकडे गाडी गेलेली होती. मी मनमाडला दोन वडे खाल्ले, पण माझं पित्त प्रचंड चढू लागलं होतं. त्यात मला मायनर क्लॉस्ट्रोफोबिया असावा, त्यामुळे चारी बाजूंनी आपण बंदिस्त झाल्याच्या भावनेमुळे मला मळमळल्यासारखं होऊ लागलं. अजून पाच तास मला एकाच जागी बसून काढायचे होते.
नशीबानं खिडकीतलीच जागा होती. अन समोरच्या पोरांच्या बाळलीला चालू होत्या. त्यामुळे करमणूक सुरू होती. हळूहळू मी स्टेबल झालो. मग पायांपाशी जी मोकळी जागा शिल्लक होती, तीही कुणालातरी बघवली नाही. कुणाचं तरी लहान मूल कुठूनतरी आणून त्या मोकळ्या जागेत सोडण्यात आलं. मी आता राग, क्रोध, चीड वगैरे येण्याच्या पलिकडे पोचलो होतो. कारण त्या डब्यात असलेल्या ९०% लोकांपेक्षा माझी जागा असूया वाटण्याजोगी होती. एक मुलगा तर चक्क बॅगा ठेवण्याच्या रॅकवर झोपून प्रवास करत होता. आणि मग माणसं वाढल्यावर बॅगा ठेवायला जागा नसल्याने त्यानं अन त्याच्या आईनं इतरांच्या शिव्याही खाल्ल्या. पण तो काही शेवटपर्यंत तिथून उतरला नाही. अख्ख्या डब्यात काहीना काही करमणूक चालूच होती. तास हळूहळू पण निश्चित वेगानं उलटत होते. एकदाचं कल्याण आलं अन पावलं हलवण्याइतकी जागा झाली. मग ठाण्याला झोपण्याइतकी जागा झाली आणि शेवटी एकदाचं दादर आलं. मी ठाण्यालाच पोचल्याचा मेसेज बनवून ठेवला होता, तो दादरला उतरल्या उतरल्या सगळ्यांना पाठवून दिला अन गंमत म्हणजे प्रत्येकाचं क्षणार्धात उत्तर आलं. आनंदचं उत्तर, "प्रवास व्यवस्थित झाला न?"
सुरूवातीला जो संवाद मी टाकला होता त्याचं कारण हेच. की आनंदरावांना प्रत्येक क्षण दुसर्यांची किती काळजी लागून राहिलेली असते हे मला सोदाहरण स्पष्ट करायचं होतं. मी पार दादरला पोचलो तरी आनंदची काळजी संपली नव्हती. मग त्याला परतचा एक मेसेज टाकला आणि तासाभरात अजून कुठलीही घटना न घडता घरी पोचलो. :)
सुट्टीतला एक फार महत्वाचा कार्यक्रम पार पडला होता. आणि माझ्या ब्लॉगचा ब्रेकही सुरू झाला होता.
आता ब्रेक संपलेला आहे. अन आप्पाच्या लग्नाची गोष्टही आता खर्या अर्थाने संपलेली आहे!
समाप्त
लै भारी!
ReplyDeleteमस्त लिहिलंय.
ऐ.. काला कोट... :) भारी एकदम.. :) मला वाटलेले ट्रेनमध्ये तू काही भारी झोल केलास की काय... :)
ReplyDeleteआनंदाचे लग्न चुकवले असले तरी लवकर भेट घ्यायची इच्छा आहे... पण हल्ली साहेब भेटत नाहीत ओन्लाईन.. :)
मस्त लिहीलंयस विभि. "काळा कोट आणि व्यवसाय बदलणं", "आलं", "बॅचलर हॅंगओव्हर पार्टी" सगळं मस्तच. आम्हालापण नांदेडप्रवास, नांदेड आणि अप्पाच्या लग्नाची सफर घडवोन आणल्याबद्धल धन्यवाद. :-)
ReplyDeleteविभी मस्त लिहीले आहेस...या वर्णनातुन तु आम्हाला पण मस्त फ़िरवुन आणलेस....बाकी काळा कोट आणि ट्रेनमधले किस्से झकासच...
ReplyDeleteआपण मस्तपैकी गप्पा मारूया ना." मीही लगेच दुजोरा दिला..>>>>बोईज Talks...इन शोर्ट कुचाळ्क्या.........सहिये..आम्हाला बोल लावा..सगळ्या ताया गोस्सिप करत रहातात म्हणुन...आता तुम्हीही तेच केलेत...नांदेडात कॉलेजच्या दिवसांत केलेले सगळे प्रकार सागर मला दाखवत होता.म्हणजे नेमके काय?????just joking...विभी तुझ्या मुळे घरबसल्या नांदेड दर्शन झाले रे...मस्त्त्त..............
ReplyDeleteकाय बोलू...?
ReplyDeleteलैई भारी :D
>>>>आम्हाला बोल लावा..सगळ्या ताया गोस्सिप करत रहातात म्हणुन...आता तुम्हीही तेच केलेत...
ReplyDelete+१००
बाबा पोहोचलास एकदाचा मा’लाडात’ तर :)... कोटचा किस्सा तुफान... मजा आली वाचताना...
आता लवकरच आम्हालाचा ’बाबा’च्या लग्नाची गोष्ट लिहायला मिळो... :) ... सगळे दुजोरा देतील बघ... :)
बाबा बाबा बाबा किती लिहिलंयस र
ReplyDeleteपण एका गोष्टीची उणीव प्रकर्षाने जाणवतेय ती म्हणजे
फोटोग्राफ्स....ते काय म्हणतात नां
वन पिक्चर इज इक्वल टू थौसंड वर्ड्स
फोटोने आणखी मजा येईल वाचायला..असतील तर लोड कर
कोटचा किस्सा लै भारी...वकिल साहेब...अर्रर्र...सॉरी सॉरी...टी.सी.. ;) ;)
ReplyDelete>>इन शोर्ट कुचाळ्क्या..
माउ ताई त्येला कुचाळक्या नव्हे मौलिक विचारांची देवाण घेवाण म्हणतात.. :) :)
तीनही लेख वाचल्यावर मगच प्रतिसाद देते आहे.अप्पालाही वाटलं नसेल आपल्या लग्नावर कुणी तीन पोस्टी लेख लिहिल म्हणून.सपा ने पार्टीला दिलेली टांग, आलं वाला जोक, तुझ्या कोटाच्या गमती वाचून सॉलिड मजा आली ;-).बाकी अप्पा पण मनातून वैतागला असेल तुमच्या सततच्या फोननी. कधी टळताय हे खात्री करायला तो सतत फोनवर असणार बघ ;-) आणि आता अस्सा गायबलाय की बोलता सोय नाही.
ReplyDeleteदोन दिवस मजा आली पण रविवारचा प्रवास जाम त्रासदायक होता.. त्याने माझी सोमवारची पूर्ण एनर्जी खाल्ली..बाकी वर्णन अप्रतिम आणि सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे आणणारे..
ReplyDeleteमग आम्ही जेव्हा ही देवाण-घेवाण करतो तेव्हा त्यालाही गॉसिप का म्हणता?????
ReplyDeleteलै भारी! कैच्याकै!
ReplyDeleteदेवकाका,
ReplyDeleteमंडळ आभारी आहे! :)
रोहन,
ReplyDeleteअरे झोल करायला सोड, ट्रेनमध्ये हलायलाही जागा नव्हती.. :D
फक्त काळ्या कोटाच्या कृपेने जो थोडाफार रिस्पेक्ट मिळाला तेव्हढाच एक 'क्वांटम ऑफ सोलास'! :P
अलताई,
ReplyDeleteआभार गं! खरंच जाम मजा आली, लिखाणाच्या निमित्तानं सगळं आठवायलाही! :)
श्रद्धाताई,
ReplyDeleteआभार गं! आप्पाचं लग्न कुणी मिस केलं असं वाटू नये हीच इच्छा होती! :)
माऊताई,
ReplyDeleteआम्ही गॉसिप वगैरे करत नाही बरं.. आम्ही जागतिक पातळीवर चर्चा करतो..ह्याच्या त्याच्या कागाळ्या म्हणजे थेट ओबामा, सार्कोझी वगैरेंच्या असतात...
असो..
:D:D
नांदेडास मजा आली लई...
सुहास,
ReplyDeleteमजा आली जाम यार!! ह्या सुट्टीतही कुठेतरी जाऊ एकत्र!
तन्वीताई,
ReplyDeleteआमचे गॉसिप नसतात नसतात नसतात!!! :D:D:D
काळा कोट महाप्रतापी आहे...
अन इतक्यात नको ती गोष्ट! भलत्यासलत्या गोष्टींना अजून वेळ आहे! :P
रणजित,
ReplyDeleteअरे फोटू माझ्या किंवा सुहासच्या बझवर चेक कर.. तिथे लिंक आहे..
धन्यवाद रे भाऊ! :)
योगेश,
ReplyDeleteमी खरंच वकील असतो तर मजा आली असती :P
अन वैचारिक देवाणघेवाण हाच योग्य शब्द आहे ह्याबद्दल दुमत नाही! :D
श्रेयाताई,
ReplyDeleteअगं लिहायच्या होत्या पोष्टी आधीच..पण योग असाच जुळायचा होता...सिरीज पूर्ण झाली अन आप्पा उगवला...
आप्पासाठी तीन काय कितीही पोष्टी लिहू शकतो :P
>>बाकी अप्पा पण मनातून वैतागला असेल तुमच्या सततच्या फोननी. कधी टळताय हे खात्री करायला तो सतत फोनवर असणार बघ
-ह्यात तथ्य असावं ;)
भारत,
ReplyDeleteअरे तरी तुमच्या प्रवासाचे फारसे डिटेल्स कळले नाहीत मला...
एकंदर आपल्या सगळ्यांनाच परतीचा प्रवास फारसा लाभला नाही म्हणायचा! :)
विनायकजी,
ReplyDeleteखूप आभार!! :)
>> आता लवकरच आम्हालाचा ’बाबा’च्या लग्नाची गोष्ट लिहायला मिळो<<
ReplyDelete+ १००००००००..
झक्कास एकदम.. मला वाटतं तुझ्या लग्नाचा आहेर म्हणून आप्पा 'कॅनव्हास' वर तीन चित्रं काढणार :D
हेरंब,
ReplyDeleteएकदमच आवरा!! :)
कॅनव्हासवर बहुतेक प्रभुजी सिरीज लिहावी लागेल त्याला :D:D
हेरंब+१००. :D
ReplyDeleteआणि आमच्या त्या कुचाळक्या अन तुमचे मौलिक विचार काय... तू सापड मला समोरासमोर... ( माझ्यासोबत उमा आणि तन्वी ही असणार बरं ):)
सफर सुफळ संपूर्ण झाली. तुझा काळ्या कोटातला फोटो बाकी एकदम शोभषच आहे. ;)
हेहेहे श्रीताई,
ReplyDeleteआमचे इचार मौलिकच असत्यात!! :D:D
अन काळा कोट :)
मस्त,अप्रतिम,एका ल्ग्न्नाची गोष्ट आवडली,
ReplyDeleteआयडीया! तू पण तुझं लग्न असंच कुठेतरी बाहेरगावी कर. आणि आधी परदेशवासियांना कळव...म्हणजे मग आम्हीं सगळे नीट बुकिंग बिकिंग करू.. आणि सगळे एकत्र प्रवास बिवास करू...खूपखूप गप्पा मारू...आणि मग त्या सगळ्या अनुभवांवर प्रत्येकजण कमीतकमी ३ अश्या पोस्टा लिहू!
ReplyDeleteकशी आहे आयडीयेची कल्पना?
:p
आणि हो! मला बोलाव पण!!! :)
...सगळ्या तीनही पोस्टा छान झाल्या आहेत...मित्राचं लग्न! :)
महेशकाका,
ReplyDeleteखूप धन्यवाद!!!
अनघाताई,
ReplyDeleteमला खरंच छोट्याशा गावात लग्न करायला आवडेल..माझ्या भावाच्या वेळेस मला तीच अपेक्षा होती, की मस्त गावामध्ये लग्न होईल... पण त्यांनी दादरला केलं.. नातेवाईकांना सोपं व्हावं म्हणून :(
माझंपण बहुतेक दादरच :(.. पण तुमच्यासाठी विरारहून बस ठेवीन... मस्त दोन-तीन तासांचा प्रवास..:D:D
अन तुला तर नक्कीच बोलावणार मी... :)
हेहे!! म्हणजे मी दादरला पहाटे पहाटे उठू...मग नटूथटू...मग ट्रेनने (?) दादरहून विरारला जाऊ आणि मग बसमध्ये बसून परत दादरला लग्नाला येऊ?! व्वा! कित्ती मज्जा! कोणकोण असणार पण माझ्याबरोबर बसमध्ये?! पिकअप करत करत जायचंय का मी सगळ्यांना? :D :D
ReplyDeleteहेहे अनघाताई,
ReplyDeleteतुझ्यासाठी तर मी दादरपासूनच बस सोडेन... दादर-विरार-दादर!! :D:D
लेट प्रतिक्रिया आहे पण द्यायचीच होती......बाबा आता हे लग्न आम्ही मिसलं असं वाटत नाही त्यामुळे हाबार्स.... however प्रत्येक लग्नात एक मुली (आणि आम्ही मुलगे) पाहायचा कार्यक्रम होतो त्यावर (मुद्दाम) प्रकाश टाकला नाहीस का?? अरे मी आणि माझी मावसबहिण आता आम्हाला मुलं झाली तरी मागच्या मायदेशदौर्यात लग्नात भेटलो तेव्हा आवर्जुन यावर प्रकाश टाकला...आता त्या लग्नात एकच काय तो बरा होता ही वेगळी गोष्ट पण....भावना कळल्या असाव्यात .... मग भाग चार टाकणार की अप्रकाशीत ठेवणार??
ReplyDeleteबाकी गोष्टी (गॉसिप) करण्यात पोरं किती आघाडीवर आहेत हे तू मान्य केल्यासारखं वाटतंय.....:)
अपर्णा,
ReplyDelete:)
'तो' कार्यक्रम सगळ्यांनी इंडिव्हिज्युअली केला... :D
व्हेरी पर्सनल :P अप्रकाशित चौथा भाग.. प्रायव्हेट डायरीज..
अन पुन्हा सांगतो..त्या वैश्विक चर्चा होत्या...झाकीर नाईकपासून ते बुश अन ओबामा ते ओसामा, हे गॉसिप्स होऊ शकत नाहीत! :P
धन्स गं!