5/28/2010

स्वातंत्र्यसूर्य!

आज २८ मे. बर्‍याचश्या भारताच्या आणि कदाचित जगाच्या विस्मरणात गेलेला दिवस. उगाच खोटं कशाला बोला. मी ही मारून मुटकून लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. प्रसंग मोठा बांका आहे. सगळ्या राष्ट्रपुरूषांच्या जन्मदिवसांचं जसं मार्केटिंग होतं, तसं होत नाही ह्या दिवसाचं. पण हरकत नाही. पण ह्या विराट राष्ट्रपुरूषाची स्मृती मात्र माझ्या मनात कायम तेवत असते. वृथाचा गर्व नाही मला, सार्थ अभिमान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्या महापुरूषाला मी वंदन करतो. आज त्यांचा जन्मदिवस आहे. १२७ वर्ष होतील आज त्या ऐतिहासिक दिवसाला. एक असा दिवस ज्याने देशाचा इतिहास बदलायची क्षमता असलेल्या महापुरूषाचा जन्म पाहिला.
मी मुद्दाम 'बदलायची क्षमता' असलेल्या असं लिहिलंय. कारण सावरकरांचं पद्धतशीर खच्चीकरण करून तत्कालीन कॉन्ग्रेसच्या धुरीणांनी देशाला त्यांच्या विशाल दृष्टीकोनापासून वंचित ठेवलं. गांधीवधाच्या खटल्यात गोवणे, पाकिस्तानचा पंतप्रधान काश्मीर युद्धानंतर स्वतंत्र भारतदेशाच्या भेटीवर आला असताना जेलमध्ये टाकणे ह्या आणि असल्या अनेक कुरूप युक्त्या-प्रयुक्त्या वापरून सावरकरांना देशवासीयांच्या नजरेतून उतरवण्यात आले. पण खरे कृतघ्न आपले देशवासी. तेही ह्या ऍग्रेसिव्ह मार्केटिंग तंत्राला बळी पडून एका महान देशप्रेमी क्रांतिकारकाला विसरले.
एक असा मुलगा, ज्याला उच्च शिक्षण, उज्ज्वल भवितव्य आणि अतिशय चांगल्या घरातल्या पत्नीबरोबरचं आयुष्य खुणावत होतं. तो हे सगळं पणाला लावून फक्त देशप्रेमाखातर थेट इंग्लंडातून क्रांतिकारक कृतींची सुरूवात करतो. पिस्तुलं स्मगल करण्यापासून मॅझिनीचं आत्मचरित्र, १८५७चं स्वातंत्र्यसमर(ह्याला 'सेपॉय म्युटिनी' म्हणून हिणवलं जायचं, त्याचा उद्धार सावरकरांनी केला) असली सकस पुस्तकं लिहितो. तोच तरूण अनेक क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान बनतो. इंग्रज सरकारने एकतर्फी खटला चालवून ५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा दिल्यावर आपल्या आयुष्याची किंचितशीही चिंता न करता पटकन म्हणतो, "तुमचं सरकार इतके दिवस टिकणार आहे का?". ज्या तरूणाने आपल्या आयुष्याची तारूण्याची ११ सोनेरी वर्षे अंदमानला तेलाचा घाणा हाकण्यात काढली आणि तेथेही आपल्या असामान्य प्रतिभेने, त्या वातावरणातही हलक्या फुलक्या प्रेमकवितांपासून, जाज्वल्य राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या अनेक कविता आणि महाकाव्य जेलच्या भिंतींवर खरडली, पुन्हा बाहेर पडताना हे सगळं तोंडपाठ केलं अश्या मनुष्याबद्दल मी पामर काय म्हणणार. माझ्याकडे शब्द नाहीत.
हा देशभक्त येन केन प्रकारेण अंदमानातून बाहेर पडून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊ इच्छित होता. त्यासाठी त्याने सरकारकडे दयाअर्ज पाठवण्याचा प्रयोग केला. अर्थात सरकारला जाणीव होती, की जो माणूस आपल्या विरोधात एव्हढं सारं करत होता, तो दयाअर्जातल्या अटी किती पाळणार. पण आज महामूर्ख लोक ह्या अर्जांचा उल्लेख करून स्वातंत्र्यवीरांची दयावीर म्हणून संभावना करतात, तेव्हा काळीज तीळ तीळ तुटतं. म्हणजे ह्या लोकांचं काय म्हणणं होतं की सावरकरांनी तुरूंगातच खितपत पडून मरून जायला हवं होतं का?
स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या दूरदृष्टीला युद्धखोर, आक्रस्ताळे असं म्हणून हिणवलं गेलं. परिणाम आपल्यासमोर आहेत. चीनच्या गळ्यात गळे घालून काय साधलं आणि जातिव्यवस्थेमुळे काय मिळालं. दैवदुर्विलास पहा, जातिव्यवस्था मोडून टाका, आधुनिकीकरण करा म्हणणार्‍या सावरकरांचं चित्रही संसदेमध्ये लावण्यावर लोकांना आक्षेप आहेत, पण जातिव्यवस्था हा भारतीय समाजाचा कणा आहे म्हणणारे गांधी राष्ट्रपिता म्हणवले जातात. महान इटालिअन क्रांतिकारक मॅझिनीचं चरित्र लिहून हजारो तरूणांना स्फूर्ति देणार्‍या आणि इंग्रज सरकारला पुस्तकावर बंदी घालायला भाग पाडणार्‍या सावरकरांचा फोटो संसदेत लावण्यास विरोधही एका इटालिअन बाईच्या सांगण्यावरून देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाने करावा हासुद्धा एक दैवदुर्विलासच.
आज सावरकरांबद्दल अनेक गैरसमज अगदी सुशिक्षित लोकांमध्येही आहेत. सावरकर खरं तर कुणालाच समजले नाहीत. युद्धतयारी करा, जातिव्यवस्था मोडा, आधुनिकतेची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरा, हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून देशाला एक करा इतक्या सार्‍या युक्तीच्या गोष्टी फक्त एक माणूस सांगत होता, पण प्रत्येक वेळी मुद्दाम उलटं करून कॉन्ग्रेसने देशाचं वाटोळं केलं. द्विराष्ट्रवादाचा त्यांचा सिद्धांत आणि फाळणी ह्यांचा इतका काल्पनिक आणि सज्जड खोटा, चुकीचा संबंध (ह्याला बादरायण संबंध म्हणतात कदाचित) लावण्यात आला, की खरी व्हिलन कॉन्ग्रेस बाजूलाच राहिली, जणू काही फाळणी सावरकरांच्या सांगण्यावरूनच झाली होती. ते काळाच्या एव्हढे पुढे होते, की आम्ही छोटी माणसे त्यांना समजण्यात कमी पडलो. आमची लायकीच नाही. आजपासून अनेक वर्षांनीसुद्धा त्यांनी सांगितलेला आधुनिकतेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार लागू राहिल. देशातलं पहिलं अस्पृश्य पुजारी असलेलं मंदिर सावरकरांनी सुरू केलं, आपल्या मुलाची मुंजही केली नाही. जातिव्यवस्था मोडा म्हणताना त्यांनी कृतीसुद्धा केली. आधुनिकता, धर्म आणि राजकारण ह्याबद्दल त्यांच्यासारखेच जवळपास विचार असणारा तुर्कस्तानचा केमालपाशा ह्याच्यावर सावरकरांनी एक वस्तुनिष्ठ स्तुतिपर निबंध लिहिलाय. ह्यातूनच त्यांचा कुठल्याही धर्माबद्दल नाही, तर आंधळ्या धर्मप्रेमी जोखडांवर राग होता हे सिद्ध होतं. पुन्हा त्यांनी फक्त मुसलमान धर्मालाच का, हिंदू धर्मातल्या जोखडांवरही इतके जिव्हारी लागणारे योग्य वार केलेत की कट्टर हिंदुत्ववाद्यांना चीड यावी, उदाहरणार्थ, गाय हा फक्त उपयुक्त पशू आहे, देव नाही हा त्यांचा निबंध. पण तरीही सावरकरांना कट्टर हिंदुत्ववादी हे लेबल लावण्यात येतं. मला वाटतं सावरकरांचं चुकलंच, त्यांनी लढ्यातच देह ठेवायला हवा होता, मग त्यांचाही उदोउदो केला गेला असता, गुरूदत्त प्यासात म्हणतो, ते किती खरं आहे, "ये बस्ती हे मुर्दापरस्तों की बस्ती!"
सावरकरांनी अफाट लेखन केलंय, तेही एवढ्या धामधुमीत. त्यांचे अनेक निबंध वाचलेत आणि वाचायचेत. समग्र सावरकर वाचून काढायचेत. त्यांनी सांगितलेला मार्ग आपल्या आयुष्यात कितपत बाणवता येईल माहित नाही, पण त्यांना समजून घेऊन मी एक क्षुद्र माणूस प्रयत्न जरूर करणार आहे. सावरकर उभं आयुष्य कट्टरतेविरूद्ध लढले, पण मी मात्र कट्टर सावरकरवादी आहे.
ह्या लेखाचा प्रपंच सावरकरांचं उदात्तीकरण करणे हा बिलकुलच नाही. माझं अल्पज्ञान, माझं अनेकांशी बोलण, माझे आजवरचे अनेकानेक अनुभव मला जे सांगतात ते मी लिहिलं. माझ्या लिहिण्याने उजळावी इतकी काही सावरकरांची प्रतिमा कुणाची मिंधी नाही. ना ही माझ्या लोकांना ओरडून सांगण्याची गरज पडावी इतकी सावरकरांची महानता कुणाची मिंधी आहे. पण, सावरकरांचे अंदमानच्या सेल्युलर जेलवरचे शब्द एका कॉन्ग्रेसच्या केंद्रीय मंत्र्याने काढून टाकणे, के. आर. नारायणन ह्या राष्ट्रपतीपदावरच्या प्याद्याने मुदामहून सावरकरांच्या मरणोत्तर 'भारतरत्न' मिळण्याच्या शक्यतेवर वर्षानुवर्ष बसून राहणे, सावरकरांच्या मार्से इथल्या स्मारकाबद्दल सरकारची उदासीनता ह्या आणि असल्या अनेक बातम्या सढळ हस्ते उपलब्ध असताना त्यांच्याबाजूने त्यांच्या ह्या क्षुद्र भक्ताने काहीतरी लिहायचं ठरवलं बस. बाकी, त्यांची बाजू कुणी घ्यावी, आणि ती बरोबर असल्याचं एन्डोर्स करावं ह्याची गरज त्यांना तेव्हाही नव्हती आणि कधीच नसेल.
त्यांच्या स्मृतीस माझं नम्र आणि भावपूर्ण अभिवादन!

अद्यतन : घाईअगडबडीत लिहिला असल्याकारणे बर्‍याच चुका दिसत होत्या, त्या दुरूस्त केल्या. बाकी अजूनही काही नजरेतून सुटल्या असतील तर माफ करून टाका.;)

50 comments:

  1. उत्तम !
    भेटा - www.savarkar.org/mr/

    ReplyDelete
  2. आज मी पण स्वातंत्र्यवीरांवर लिहिणार होतो तेवढ्यात हा लेख वाचला. माझ्या मनातले सर्व मुद्दे इकडे आले आहेत (प्रोफेट मनकवडा कधी झाला :) )
    मस्त लेख.

    - तुमच्यासारखाच एक सावरकर भक्त !

    ReplyDelete
  3. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  4. विद्याधर मानलं तूला... सावरकरांविषयीचे उत्तम पोस्ट आहे हे!! आपल्या देशाची हीच तर व्यथा आहे...

    >>>>>>सावरकरांचे अंदमानच्या सेल्युलर जेलवरचे शब्द एका कॉन्ग्रेसच्या केंद्रीय मंत्र्याने काढून टाकणे, के. आर. नारायणन ह्या राष्ट्रपतीपदावरच्या प्याद्याने मुदामहून सावरकरांच्या मरणोत्तर 'भारतरत्न' मिळण्याच्या शक्यतेवर वर्षानुवर्ष बसून राहणे, सावरकरांच्या मार्से इथल्या स्मारकाबद्दल सरकारची उदासीनता ह्या आणि असल्या अनेक बातम्या सढळ हस्ते उपलब्ध असताना त्यांच्याबाजूने त्यांच्या ह्या क्षुद्र भक्ताने काहीतरी लिहायचं ठरवलं बस. बाकी, त्यांची बाजू कुणी घ्यावी, आणि ती बरोबर असल्याचं एन्डोर्स करावं ह्याची गरज त्यांना तेव्हाही नव्हती आणि कधीच नसेल.
    त्यांच्या स्मृतीस माझ नम्र आणि भावपूर्ण अभिवादन!

    अरे सारेच तर लिहीलेस तू!!! आणि काय लिहू.. तुला अनूमोदन देते...दरवर्षी भगूरला जाणे होतेच... त्यांच्या घरात गेले की मंदीरात गेल्यासारखे वाटते!!

    ReplyDelete
  5. बाबा, अगदी मुद्देसूद लेख झालाय.

    खरच काँग्रेस ने या महामानवाची खुपच उपेक्षा केली आहे.(काँग्रेस ने उपेक्षिलेला अजून एक महानायक म्हणजे सुभाषबाबू)

    आणि आजकाल तर लोक स्वता त्याचं लिखाण काहीही न वाचता मेडिया आणि बाकी काही विभूतीनी त्यांना जस कट्टर ठरवल आहे तसच लोकांनी त्यांना स्वीकारलय.



    सावरकरांच्या स्मृतीस माझं नम्र आणि भावपूर्ण अभिवादन!

    ReplyDelete
  6. आजपर्यंत वाचलेल्या सगळ्या पोस्ट मधले सर्वोत्तम पोस्ट!!

    ReplyDelete
  7. खरंय, मला स्वतःला सावरकर जास्त माहित नाहीत.
    किती उदासिनपणा... मात्र तुझा उत्तम लेख वाचुन बराच प्रकाश पडला. आता वाचन करतो.

    सावरकरांच्या स्मृतीस माझं नम्र आणि भावपूर्ण अभिवादन!

    ReplyDelete
  8. farach sundar....veer savarkaranche vichara aajahee apalyala preranadayi ahet....

    ReplyDelete
  9. खरंय, मलाही स्वतःला सावरकर जास्त माहित नाहीत. फुकटचं स्वातंत्र्य भोगणाऱ्यांपैकीच मी पण एक..

    पण तुझा लेख म्हणजे खरंच जागे करणारा आहे..

    सावरकरांविषयी अलिकडेच थोडंसं वाचल्यापैकी म्हणजे, आधुनिक मराठीला बरेच शब्द सावरकरांनी बहाल केलेत..

    सावरकरांच्या स्मृतीस माझंही नम्र आणि भावपूर्ण अभिवादन!

    ReplyDelete
  10. विद्याधरा, निव्वळ अप्रतिम.. बेहद्द खुश झालो.. प्रचंड आवडला लेख. शब्दाशब्दाशी सहमत..

    >> पण आज महामूर्ख लोक ह्या अर्जांचा उल्लेख करून स्वातंत्र्यवीरांची दयावीर म्हणून संभावना करतात, तेव्हा काळीज तीळ तीळ तुटतं. म्हणजे ह्या लोकांचं काय म्हणणं होतं की सावरकरांनी तुरूगातच खितपत पडून मरून जायला हवं होतं का?<<

    अरे अशा महामुर्ख लोकांना मुत्सद्देगिरी कशाशी खातात हे माहित नसतं. त्यांची लायकी तीच.

    या स्वातंत्र्यसुर्याला विनम्र अभिवादन !!

    ReplyDelete
  11. सिताराम वाळके8:05 AM

    छान लेख. अगदी मुद्देसूद लिहील आहे.

    ReplyDelete
  12. विभि, अरे या तुझ्या लेखातून स्वातंत्र्यवीरांवरील तुझे प्रेम ओसंडून वहाते आहे. अतिशय सुरेख लेख. सध्यातर सगळ्याच गोष्टींचा बाजार झाला आहे. असल्या कोत्या मनाच्या लोकांना स्वातंत्र्यवीरांसारखी महापुरूष व्यक्ती कळणार ही केवळ शक्यताच. इंग्रजांपेक्षा आपल्याच लोकांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे. कॉंग्रेस वाल्यांचं तर हे ब्रीदच आहे की मो क गांधी आणि नेहरू घराणे या व्यतिरीक्त देशाची सेवा कोणी केलीच नाही. हल्ली तर मो क गांधी सुध्दा फक्त फोटोतच असतात...कॉंग्रेस वाल्यांनी आपल्या देशाचे भूत-वर्तमान आणि भविष्य हे केवळ आणि केवळ नेहरू-घंडी (गांधी) घराणे आहे आता त्यात इटालीयन ची पण भर पडली आहे. राहुल बाबाने जर लग्न केले नाही (ऑफीशीअल) तर त्याच्या मुलांच्या वारशाचा प्रश्न येणार नाही पण मग वढेरा प्रियांका तयार आहेच आजीची गादी चालवायला.

    खरंच सावरकर बंधुंनी आपल्या सर्व सुखावर तुळशीपत्रं ठेवलं होतं. निर्लज्ज आणि कपटी राजकारणी लोकांना आणि संधी साधू पत्रकारांना हे कुठुन समजणार?

    जय स्वातंत्र्यवीर सावरकर!!

    ReplyDelete
  13. फारच छान लेख. महाराष्ट्राबाहेर आल्यावर उत्तरेच्या मित्रांशी बोलताना जाणवले त्यांना सावरकरांबद्दल अजिबात ज्ञान नाही. कॉंग्रेसच्या अपप्रचाराचे ते बळी आहेत.विशेष म्हणजे ते भाजप सारख्या पक्षाचे समर्थक होते. हीच गत शिवाजी महाराजांबद्दल आहे. उत्तरेच्या लोकांना महाराष्ट्राचा इतिहास शिकवला जात नाही. एक झपाटलेला काळ होता सावरकारांबदद्ल सगळं वाचायचो. शेषराव मो-याचा सावरकर सत्य आणि विपर्यास हे पुस्तक मी पहिल्यांदा ९वीत वाचले.
    ते भारावलेले दिवस मला पुन्हा आठवले. धन्यवाद.

    ReplyDelete
  14. छान लिहिलंय. अगदी तळमळीने लिहिलंय. आवडला मला लेख.

    ReplyDelete
  15. खरंच फ़ारच छान लेख आहे...मला स्वतःलाही सावरकरांबद्दल फ़र माहित आहे असं नाही...जितकं पुस्तकांत आणि त्यांच्या तुरुंगवास,ती उडी इतकंच...पण खरंय तुझं सगळ्याच स्वातंत्र्यवीरांचं मार्केटिंग सारख्या प्रमाणात झालं नाहीये हे दुर्दैव..पण ते झालं नाही म्हणून कुणाचंही मोल कमी होत नाही...आपण माहित नसलेले दुर्दैवी म्हणायचे...
    असो..अभिवादन त्यांच्या स्मृतीला...

    ReplyDelete
  16. विभि, अरे शब्द नाहीत रे अगदी अप्रतिम पोस्ट.
    माझ सावरकरांबद्दल वाचन काही मर्यादित पुस्तकाएवढच पण तूझा लेख वाचून आता मी जास्तीत जास्त वाचन आणि त्यांची तत्वे पाळण्याचा प्रयत्‍न करेन..कॉंग्रेसबद्दल काही बोलायलाच नको, त्याना गांधी एके गांधी हेच कळता...

    सावरकरांच्या स्मृतीस माझं नम्र अभिवादन!

    ReplyDelete
  17. सर्वप्रथम मी सर्वांचेच मनःपूर्वक आभार मानतो आणि दुसरं म्हणजे उशिरा उत्तरे देतोय, त्याबद्दल क्षमस्व, कारण मी कालपासून प्रवासात होतो, आता मायभूमीतून उत्तरे देण्यास भलताच आनंद होत आहे. आता सर्वांना उत्तरे देतो.

    ReplyDelete
  18. शेखर,
    सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. तुमची साईट पाहिली मी. फार चांगलं काम करत आहात तुम्ही. आवर्जून लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!

    ReplyDelete
  19. निरंजन,
    मी तुमच्या मनातले मुद्दे लिहिले म्हणजे आपला रेफरन्स पोइंट सेम आहे...आपण माणसं सूर्याकडे एकाच कोनातून पाहू शकतो ना!
    खूप खूप धन्यवाद !

    ReplyDelete
  20. ब्लॉगवर स्वागत गणेश.
    तुम्हालाही शुभेच्छा आणि प्रतिक्रियेसाठी आभार!

    ReplyDelete
  21. तन्वीताई,
    खरंच आपण खूप कृतघ्न होत चाललोत.
    >>त्यांच्या घरात गेले की मंदीरात गेल्यासारखे वाटते!!
    तो अनुभव घ्यायचाय मला! खूप इच्छा आहे! बघू कधी पूर्ण होते.
    धन्यवाद!

    ReplyDelete
  22. सचिन,
    खरं आहे तुझं म्हणण. सुभाषबाबूबरोबरही नेहरू असाच काहीसा गेम खेळले. त्यांचं योगदानही दुर्लक्षितच राहिलं. गौरतलब आहे, सावरकरांबरोबर संसदेत त्यांचहि तैलचित्र लागलं होतं.
    धन्यवाद!

    ReplyDelete
  23. महेंद्रकाका,
    खूप मोठी कोम्प्लीमेंट दिलीत. खूप खूप आभार!

    ReplyDelete
  24. आनंदा,
    तुझी चूक नाही. पिढ्यानपिढ्या अश्याच अंधारात राहिल्या. कुठेतरी कोणीतरी हि ज्योत तेवत ठेवायलाच हवी. आता तू वाच आणि अजून अनेकांना माहिती दे. ती वरती शेखरनि साइट दिलीय बघ. तिथून हो सुरु. मी पाठवतो माझ्याकडचे निबंध वगैरे.

    ReplyDelete
  25. नंदकिशोर,
    ब्लॉगवर स्वागत. होय त्यांचे विचार नुसते आजच नाही तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतात. फक्त ते योग्य रीतीने पोहोचणे आवश्यक आहे. धन्यवाद!

    ReplyDelete
  26. अनामिक,
    ब्लॉगवर स्वागत. तू म्हणतोस तसं आधुनिक मराठीतले दिग्दर्शक, महापौर, महानगरपालिका असले अनेक शब्द त्यांनीच आणले.
    आनंदला सांगितलं तसंच कधीही का होईना सुरुवात झाली पाहिजे आणि हे विचार जास्तीत जास्त लोकानपर्यंत पोहोचले पाहिजेत. तुलाही पाठवतो मी निबंध. साइटहि बघ वरची. धन्यवाद!

    ReplyDelete
  27. हेरंबा,
    धन्यवाद. अरे खरंच रे. विरोधासाठी विरोध करणारी बांडगुळ हि. ह्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार.
    आभार!

    ReplyDelete
  28. ब्लॉगवर स्वागत सिताराम.
    आणि प्रतिक्रियेसाठी खूप आभार!

    ReplyDelete
  29. खूप धन्यवाद अलताई,
    ब्लॉगवर स्वागत. खरंच, इन्ग्रजान्पेक्षा आपल्याच लोकांनी त्यांच्यावर जास्त अन्याय केला. ह्या गांधी घराण्याची चाटूगिरी करण्याची कोंग्रेस नेत्यांमध्ये लागलेली अहमहमिका पाहून किळस वाटते.
    खरी बलीदान्म कुणाला बघायचीही नाहीत आणि बघू द्यायचीही नाहीत.सगळंच बेगडी.
    असो. जय स्वातंत्र्यवीर!

    ReplyDelete
  30. साधक,
    ब्लॉगवर स्वागत. तुम्ही म्हणता ते ऐकून जे यापूर्वी ऐकलं होतं त्याची खात्री पटली. अतिशय पद्धतशीर निगेटिव्ह मार्केटिंग! व्होट बँक पोलीटीक्स चा एक अविभाज्य भाग!
    शेषराव मोरेंच पुस्तक मलाही वाचायचंय. नाव सुचवलत ते बरं झालं.
    खूप खूप धन्यवाद आणि प्रतिक्रियेबद्दलसुद्धा आभार!

    ReplyDelete
  31. देविदासजी,
    खूप खूप धन्यवाद. माझी तळमळ जाणवली हे पाहून बरं वाटलं आणि प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete
  32. अपर्णाताई,
    धन्यवाद. अगदी अगदी. मार्केटिंग, दुसरं काय. ती उडीसुद्धा डाउनप्ले करतात हल्ली.
    त्यांच्याबद्दल माहिती नसेल तरी त्यात दोष नाही पण कधीही सुरु करू शकतो आपण. जेव्हढ होईल तेव्हढ करायचं आपण.

    रच्याक, उसात आल्यावर सगळे बेकलोग भरतीयेस का..;)
    अग मी ते १४ दिवसांहून जुने पोस्ट्ससाठी कोमेंट मोडरेशन सेट केलं होतं. ते आता चेंज करून टाकलंय.

    ReplyDelete
  33. सुझे,
    धन्यवाद अरे. तुलाही पाठवतो माझ्याजवळचे थोडे निबंध. कोन्ग्रेसबद्दल तर… जाऊ दे!

    ReplyDelete
  34. Khoop sunder aahe lekh...!!! khoop aawadala...
    Ushira pratikriya dilya baddal sorry..( kharetar lekh aadhich vaachala hota pan admission chya dhavpalit tya diwashi post vachun lawakar jaave laagale..)

    ReplyDelete
  35. धन्यू मैथिली!
    उशिरा काय...एकच दिवस तर झालाय...;)
    बाकी ऍडमिशनची काय हालहवाल! नाहीतर सविस्तर पोस्टून टाक सगळं ब्लॉगावर!

    ReplyDelete
  36. मायभूमीत आलास आता आपल्या भेटीचा योग काढ...लवकर

    ReplyDelete
  37. Mastach ahe ha lekh. Mala mazya mitrane email ne link pathavali hoti. Mahan swatantryaveeravar thodese jagrutipar likhaan jelyabaddal abhinandan... asach lekh prapanch chalat raho...

    ReplyDelete
  38. होय सुहास,
    लवकरच भेटीची तारीख मुक्रर(:D) करू!

    ReplyDelete
  39. महेशजी ब्लॉगवर स्वागत!
    मी माझ्यापरीने पयत्न केला, तुम्हाला सगळ्यांना आवडला, बरं वाटलं! खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  40. खुप काही वाचायच राहिलय असं वाटतं..
    मस्त लेख..
    शब्द कमी आहेत या स्वातंत्र्यसुर्या बद्द्ल...

    या स्वातंत्र्यसुर्याला विनम्र अभिवादन !!

    ReplyDelete
  41. धन्यवाद आनंद,
    खरंच शब्दच पुरत नाहीत त्यांच्याबद्दल...
    प्रतिक्रियेसाठी खूप आभार!

    ReplyDelete
  42. अतिशय उत्तम लेख!

    ReplyDelete
  43. धन्यवाद क्रान्तिताई. आणि ब्लॉगवर स्वागत!

    ReplyDelete
  44. विभि...अप्रतिम पोस्ट आहे.

    ReplyDelete
  45. योगेश,
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  46. अप्रतिम .सुंदर.,चांगला ,लेख आवडला ...

    ReplyDelete
  47. हा देशभक्त येन केन प्रकारेण अंदमानातून बाहेर पडून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊ इच्छित होता. त्यासाठी त्याने सरकारकडे दयाअर्ज पाठवण्याचा प्रयोग केला. अर्थात सरकारला जाणीव होती, की जो माणूस आपल्या विरोधात एव्हढं सारं करत होता, तो दयाअर्जातल्या अटी किती पाळणार. पण आज महामूर्ख लोक ह्या अर्जांचा उल्लेख करून स्वातंत्र्यवीरांची दयावीर म्हणून संभावना करतात..

    याच पार्श्वभूमीवर १६६६ मध्ये राजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्राचा चुकीचा अर्थ घेऊन त्यांचा उपहास केला नाही हे हि नसे थोडके ...

    ReplyDelete
  48. होय रे रोहना, मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे!

    ReplyDelete
  49. Namaskar...Lekh kharach surekh aahe. Shabdanpeksha tyamagchi talmal manala bhidli. Swatyantrveer Savarkarache paay dharaychi layki nasleli mandali aajkal rashtracha karbhar hatalat aahet ani tumhi mhanta tase marketing gimicks karun kharya krantikaryala badnam karit aahet. Tumchya chalvalila manapasun shubhecha ani kahi sahayog apekshit aslyaas krupaya bedhadak suchavave. Atul Joshi

    ReplyDelete
  50. विश्वनाथ (अतुल),
    ब्लॉगवर स्वागत! खरंच माझी तळमळ माझ्या लेखनातून जाणवते आहे, अन वाचकांपर्यंत पोहोचते आहे ह्याचा फार आनंद वाटला! सावरकर अन त्यांच्या विचारांचं पद्धतशीर खच्चीकरण केलं गेलं आहे, ह्याचाही विशाद वाटतोच!
    तुमच्या प्रोत्साहन देणार्‍या छान प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार! नक्कीच लक्षात ठेवेन मी! :)
    असाच लोभ असू द्या!

    ReplyDelete