(टीप - सदर कविता स्वतःच्या जवाबदारीवर वाचावी. आधी ही कविता आहे का हेच नक्की नाहीय, तरीही.)
कधी कधी वाटतं...
आरशात पाहताना प्रतिबिंब दिसावं...आणि ते ओळखता यावं...
कधी कधी वाटतं...
आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...
कधी कधी वाटतं...
गुलाब कुस्करला जाताना...बोटही रक्तबंबाळ व्हावं...
कधी कधी वाटतं...
वाट फुटत राहावी ...निवडावी लागू नये...
कधी कधी वाटतं...
पावलं पडत राहावीत...अन् वाट कधी संपू नये...
कधी कधी वाटतं...
चुकीच्या वाटेवर चालतानासुद्धा...धीर मात्र खचू नये...
कधी कधी वाटतं...
मागे वळून पाहताना...नजर अनोळखी वाटावी...
कधी कधी वाटतं...
श्वासांचं गणित मांडताना...एखादा हातचा निसटून जावा...
कधी कधी वाटतं...
एकदातरी उडता यावं...अन् क्षितिजापुढचं पैलतीर दिसावं...
कधी कधी वाटतं...
एकदातरी...स्वतःला डोळेभरून पाहता यावं...
>> आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...
ReplyDeleteहे जाम जाम आवडलं !
>> आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...
ReplyDeleteहे जाम जाम आवडलं !
+1
भारी आहे कविता... केशव मेश्रामांना टफ फाईट... :-)
ReplyDeleteवाह बाबा..मस्तच जमलीय..
ReplyDeleteआरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...हे जाम जाम आवडलं ! +1
>> आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...+100
ReplyDeletepan bara aahes na vibhi...kalji ghe re baba....
अरे पंत.. पद्याच्या राज्यात घुसले...
ReplyDeleteलक्षणं काही ठीक दिसत नाहीत...
कविता मात्र जमली आहे.. सुपर...
बाबा, बरा आहेस ना. कविता.
ReplyDeleteकधी कधी वाटत.....
आपणही एक कविता करावी .....आणि सर्वांनी ती वाचावी.
मस्त.
शेवटच्या एका ओळीत कविता कुठल्या कुठे घेवुन गेलाहेस मित्रा !
ReplyDeleteमुजरा सरकार :)
मंडळात स्वागत आहे :)
आता विभी तुला कविताच सुचणार रे...गाडी लाईनीवर आली म्हणायची...आता आनंद आणि सचिन ला पण सुचु लागतील..सगळे कवितेच्या राज्यात...
ReplyDelete'कधी कधी वाटतं...
ReplyDeleteएकदातरी उडता यावं...अन् क्षितिजापुढचं पैलतीर दिसावं...'
छान! सुंदर! :)
मला कधी कधी वाटतं...
एखादा क्षण 'लूप' मध्ये टाकावा...!'
:)
क्या बात... क्या बात..... क्या बात!!
ReplyDeleteआणि एक मोठ्ठा ग्रॅंड सॅल्यूट :)
बाबा अप्रतिम... आता तू कधी कधी नाही तर नेहेमीच कविताही किंवा असले काहीतरी लिहावेस असे मला वाटतेय....
सगळ्यांना आवडलेली ओळ तर आवडलीच पण संपुर्ण पोस्ट सुंदरच...
कविता वगैरे जमत नाही, तूच लिहल होतस ना ?
ReplyDeleteती पोस्ट कॅन्सल..
कविता छान आहे. :)
विद्याधरा, अरे एकदम हे काय? अजून मायदेशी पोचलाही नाहीस तू... तोच... बाकी कविता सहीच आहे.
ReplyDeleteनेमके मर्म आणि खंत पकडलीस पाहा शेवटच्या चार शब्दात...
हेरंब,
ReplyDeleteधन्यु :)
नॅकोबा,
ReplyDeleteधन्यावाद भाऊ!
संकेत,
ReplyDeleteआभार भावा...पदवीच दिलीस की रे तू इतक्यातच ;)
सुहास,
ReplyDeleteप्रयत्न रे... अजून शिशु आहे मी.. :D
आभार भाऊ!
माऊताई,
ReplyDelete:D
अगं आप आणि सपाचे दिवस आहेत...पण त्यांनी कविता सोड ब्लॉग लिहिणंही सोडून दिलंय... म्हणजे बघ आता ;)
मी बराच आहे अजून तरी :P
आनंद,
ReplyDeleteअरे अपघातानंच शिरलोय कवितेच्या राज्यात... ;)
आता कविता हाताला धरून बाहेर काढायची वाट पाहतोय :)
सचिन,
ReplyDeleteभाऊ अरे अगदी तसंच वाटत होतं मला... :)
धन्यु रे!
विशालदादा,
ReplyDeleteधन्यवाद रे...तुझ्याकडूनही थाप मिळाली म्हणजे मिळवली... :)
अनघा,
ReplyDeleteहो ना...तसं मलाही वाटतं कधी कधी... :)
कधी कधी वाटतं...
कधी कधी वाटतं ला अगणित दुसरी वाक्य जोडता येतील ;)
करून बघा तुम्हीसुद्धा ...
तन्वीताई,
ReplyDeleteअगं धूसरसं सुचतं कधी कधी..पण असंच तुटक, तुकड्या तुकड्यांचं...ह्यावेळ मात्र थोडंसं मूर्त स्वरूप आल्यागत वाटलं म्हणून पोस्टलं हिम्मत करून.. :)
विक्रांत,
ReplyDeleteखूप खूप आभार! :)
मस्त मस्त मस्त.. आवडली आपल्याला !!!!!!! सुंदर लिहीलंस.. कविता नाहीये रे ही टेक्नीकली, एक-एक ओळ म्हणजे सुंदर सुविचार आहे ;)
ReplyDeleteजाम आवडलं आम्हाला !! ब्लॉगविश्वातून तात्पुरता निरोप घेतांना छान वाचून जातोय याचा आनंद झाला..धन्यवाद !
मीनल,
ReplyDelete:D
"ती पोस्ट कॅन्सल" वाचून एकदम शाळाटायमाची आठवण झाली :)
श्रीताई,
ReplyDeleteअगं मनानं ऑलरेडी पोचलोय ना तिथे! :)
तुला आवडली मला छान वाटलं :)
संकेतानंद,
ReplyDeleteअरे परवा एक बझ टाकला होता..त्यावरून सुचलं असं काहीतरी करायचं ;)..कविता आहे की नाही ह्याच संभ्रमात होतो मी...
तू तात्पुरता निरोप घेतोयस ह्याचं मात्र थोडं वाईट वाटतंय..ये लवकर परत..मग आपण मिळून कैपाडू ;)
चॅप्टर टु : द पोएट ऑफ मिलान!
ReplyDeleteहे हे हे !!
धन्य बाबा ! मस्त जमलिए !
Sahiii....!!! :-) :-) :-)
ReplyDeleteदीपक,
ReplyDelete:D सही..तुझ्या लक्षात आहे..!!
धन्यवाद रे!!
मैथिली,
ReplyDeleteधन्स गं! :)
अरे वा! कविता पण आता! छान!
ReplyDeleteबरेच दिवसांनंतर भेट दिली ब्लॉग ला. छान जमलिये कविता.
कविता कि नवकाव्? ,सुंदर छान मस्त ,लई भारी आहे
ReplyDeleteकपिल,
ReplyDeleteधन्यवाद रे भावा...भेट देत राहा अधूनमधून!! :)
महेशकाका,
ReplyDeleteनवकाव्यच बहुतेक.. धन्यवाद :)
I read it twice in two different mood... both time liked it :)
ReplyDeleteसौरभ,
ReplyDeleteधन्स भावा! :)
बाबा रे काय झाल आहे तुला??
ReplyDeleteसार काही ठीक आहे ना??
>>>आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये.
हे खुप आवडल...मस्त मस्त मस्त...
योगेश,
ReplyDeleteआहे रे..अजून तरी सर्व काही ठीक आहे ;)
धन्स भाऊ!!
पावलं पडत राहावीत...अन् वाट कधी संपू नये...... :)
ReplyDeleteतू पोस्टा पाडत रहा... कैच्याकै आवरा होईल तेंव्हा सूचित केले जाईल.. :D
रोहना,
ReplyDelete:D
धन्यवाद भावा...!!