स्वागत!

नमस्कार!
माझ्या ब्लॉगवर स्वागत!

3/24/2011

वाईट दिवस

सकाळी घड्याळाचा गजर वाजलाच नाही
वेळेवर झोप उडालीच नाही
चहाचं आधण ऊतू गेलं
अन इस्त्री केलेल्या एकमेव शर्टाचं बटण तुटलं
चुरगळलेल्या शर्टावर चहाचा थेंब आणि
बससाठीची धाव नेहमीचीच सेम
आज नेमकी बस डोळ्यासमोर सुटली
कधी नव्हे ती पावलं रिक्षाकडे वळली
एरव्हीचे रिकामटेकडे रिक्षावाले आज कामात गर्क होते
एरव्हीचा तोंडी अपमान आज फक्त नजरेनंच करत होते
चरफडत उन्हात स्टेशनाकडे चालत
निघालो सोमवार बाजाराची गर्दी पाहत
आज ट्रेनांना कशानं दुप्पट गर्दी
डब्यामध्ये नेमके संगीतरसिक दर्दी
स्टेशनातनं बाहेरचीसुद्धा बस पुन्हा चुकली
चरफडतच पुन्हा रिक्षाकडे नजर गेली
चमत्कारच की रिक्षावाला चक्क हो म्हणाला
त्याक्षणी कदाचित मुलीचा होकारही असता मिळाला
माझ्याच आनंदाला माझीच नजर लागली
रिक्षा ट्रॅफिकात दोन तास थांबली
घामेजलेला शर्ट आणि आंबलेलं मन
ऑफिसातला लेट पंच अन नुसतीच तणतण
"बेक्कार दिवस आहे यार.." शेजार्‍याला म्हणालो
तो दिसला नाही म्हणून नुसताच सुस्तावलो
"त्याचं कळलं नाही का?" आवाज आला दुरून
प्रश्नार्थक नजरेनंच पाहिलं मी दोन टेबलं सोडून
"दोन तासांपूर्वी इथेच एक चौक आधी
घाईत रस्ता ओलांडताना आला तो गाडीखाली
नेला लगेच उचलून सगळ्यांनी हॉस्पिटलात
आहे ठीक आता पण तीनेक आठवडे घरात"
ट्रॅफिकचा गोंधळ आता माझ्या नीट लक्षात आला
वाईट दिवस माझा चक्क वरदान वाटू लागला

38 comments:

 1. हाहा.. सही :)

  बिचारा शेजारी.. :(

  ReplyDelete
 2. बाबा तू कवितापण चांगल्या करतोस की. मागे काय ते एक कविता करत नाही की अशी काही पोस्ट टाकली होतीस..
  रच्याक मी तसं फ़ारसं कवितांच्या वाट्याला जात नाही माहित असेल तुला पण म्हटलं आज नेमकं मॅच जिंकुन तू का वाईट दिवस म्हणतो पाहावं तर कहानी आपलं कविता में ट्विस्ट...

  ReplyDelete
 3. एकदम एकदम! मुंबईकराचा दिवस नजरेसमोर आला!
  सही! :)

  ReplyDelete
 4. hey baba sahi hai bhidu....!!!

  ReplyDelete
 5. मस्त रें बाबा....

  ReplyDelete
 6. आवडली. अशाच धाटणीचं एक ईमेलही येत होतं मध्यंतरी की तुम्हाला उशीर झाला तर चरफडू नका इ.इ.. पण तू कवितेमधून तेच सगळं नेमक्या शब्दांत मांडलं आहेस. मस्तच!

  ReplyDelete
 7. एकदम सही बाबा

  ReplyDelete
 8. सही सही........

  ReplyDelete
 9. सही! बाबा! मस्तच! :):)

  ReplyDelete
 10. :) nice nice... liked it :D

  ReplyDelete
 11. हेरंबा,
  त्याचा दिवस खरंच वाईट असणार! :-S

  ReplyDelete
 12. अपर्णा,
  मला खरंच अजूनही कविता फारशा नीट जमत नाहीत.. फक्त त्या पोस्टनंतर इरेला पेटून बरेचदा यशस्वीरित्या पाडण्याचा प्रयत्न केला.. :)
  ही म्हणजे असंच कधीतरी जाणवलेलं काहीतरी!
  धन्स गं! :)

  ReplyDelete
 13. अनघाताई,
  अगदी टिपीकल दिवस आहे हा! :)

  ReplyDelete
 14. सारिका,
  धन्यवाद! :)

  ReplyDelete
 15. अमित,
  :) धन्यवाद!

  ReplyDelete
 16. सुहास,
  धन्यवाद भावा! :)

  ReplyDelete
 17. कांचनताई,
  खूप आभार! बरेचदा आपण त्रागा केल्यानंतरच तो व्यर्थ असल्याची जाणीव होते ना.. तसंच काहीतरी सुचलं! :)

  ReplyDelete
 18. सिद्धार्थ,
  धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 19. इंद्रधनू,
  आभार! :)

  ReplyDelete
 20. स्नेहल,
  खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 21. विनायकजी,
  खूप खूप धन्यवाद! :)

  ReplyDelete
 22. सौरभ,
  भावा! धन्स! :D

  ReplyDelete
 23. मी दिलेल्या कमेंट्स का गायब होत आहेत...डिलिटतोस की काय...ह्म्म्म्म्म्म्म्म????

  ReplyDelete
 24. माऊताई,
  अगं नाही.. माहित नाही काय लफडं आहे ते! :(

  ReplyDelete
 25. मस्त बाबा.. हे लय भारी

  चमत्कारच की रिक्षावाला चक्क हो म्हणाला
  त्याक्षणी कदाचित मुलीचा होकारही असता मिळाला

  ReplyDelete
 26. बाबा,खुप दिवसांनी आलो नि इथे "वाईट दिवस" बघितला.पण वाईटात चांगली गोष्ट अशी कि तू मुंबईकरांचे दुखणे नेमक्या शब्दात पकडले.मस्त.

  ReplyDelete
 27. आनंद,
  मुंबईच्या रिक्षावाल्यांची मस्ती पाहिलीस ना तर तुला त्या वाक्यांमधला दर्द कळेल! :D

  ReplyDelete
 28. mynac दादा,
  बर्‍याच दिवसांनी आलास! :) मुंबईकराचं दुखणं आहे खरं! :D:D

  ReplyDelete
 29. बाबा, तुम्हा मुम्बैकरांना गर्दी एन्जॉय करता येत असेल कि नाही अशी आमच्या सारख़्याला आपली एक उगीच भाबडी शंका वाटते.खरं तर कारण काहीच नाही पण आम्ही पुणेकर त्या बाबतीत अगदी कोडगे झालो आहोत.नुसती एकदा कधीतरी संध्याकाळची तुळशीबागेच्या आसपास चक्कर टाक,लोक ती कशी एन्जॉय करत असतात हे पहाणं सुद्धा एक एन्जॉयमेन्ट आहे,आणि ही एन्जॉयमेन्ट त्या एन्जॉयमेन्टच्या वरची एन्जॉयमेन्ट आहे.

  ReplyDelete
 30. बाबा,बऱ्याच दिवसांनी,कारण माझ्याकडचे एपिक ब्रौसर कॉम्प्युटर मधुन उडले त्यामुळे मराठी टायपिंगची बोंब झाली,आणि प्रतिक्रिया मराठीत म्हणजे कशी घरी दिल्या सारखी वाटते.आमच्या मार्केट मधल्या ईंग्रजी रोज असतातच रे पण त्या गुळमुळित वाटतात.तो फ़ोर्स नसतो,बराहने हात दिला.शिकलोन काय!

  ReplyDelete
 31. बर्याच दिवसांनी कमेंट तोय ........... बाबा अजूनपण जोरातच आहे न राव......

  ReplyDelete
 32. mynac दादा,
  मी अर्धवट का होईना पुण्याचा सुद्धा आहे! :D पण मुंबईचे लोक बेसिकली काहीच एन्जॉय करत नाहीत.. ना एकही धड ऋतू आणि ना धड शांतता.. सगळंच धावतपळत.. गर्दी असल्यावर गर्दीचा त्रास आणि नसली तर त्याचा त्रास.. त्रांगडं आहे झालं! :D
  बराहा बेस्ट आहे.. पण फायरफॉक्स (४ च्या आधीचे) त्यामध्ये प्रमुख प्लगिनसुद्धा उपयुक्त प्रकार आहे.. ट्राय करून बघ कधी! :)

  ReplyDelete
 33. सागर,
  खरंच बर्‍याच दिवसांनी आलास... आपलं तर काहीतरी चालूच आहे झालं! :)

  ReplyDelete
 34. Anonymous10:32 PM

  बाबा मस्त....

  छान कविता लिहू लागला आहेस तू...लगे रहो...!!!

  ReplyDelete
 35. मस्त छान,

  ReplyDelete
 36. Anonymous1:55 PM

  Kavita chan ahe... tu kavita pan chan kartos..
  Shami.

  ReplyDelete