10/17/2010

एक आहे स्मायली...

गेल्या काही दिवसांपासून चॅट अगदी म्हणजे अगदीच कमी झालं. त्यामुळे एरव्ही दिवसात सहज केली जाणारी स्मायलींची उधळण कमी झाली. गुगल बंद ठेवलेलं असल्याने इतर कम्युनिटी साईट्सवरचा वावर थोडा वाढला आणि विविध प्रकारचे स्मायली दिसले. मग काल अशीच वेगवेगळ्या प्रकारच्या स्मायलींची चर्चा आणि तुलना करताना ही पोस्ट लिहायची कल्पना माऊताईनं दिली. मग फक्त 'स्मायली' ह्या शब्दावरून जे जे सुचलं, ते ते लिहायचा प्रयत्न केला. :)

स्मायली म्हणजे मराठीत भाषांतर केलं तर 'हसरा'. पण इंटरनेट ऊर्फ आंतरजालाने 'स्मायली'ला स्माईल शिवाय बरंच काही काही करायला लावलं. 'स्मायली' हे विशेषण न राहता विशेषनाम झालं. आणि त्याला अनेकानेक रूपांमध्ये पेश केलं जाऊन त्याच्या विशेषणपूर्ण नावामागे अनेकानेक विशेषणं जोडली गेली. स्मायली कधी चिडवणारा, तर कधी चिडणारा, कधी हसवणारा, तर कधी हसणारा आणि कधी कधी तर चक्क 'रडका' स्मायली (ऑक्झिमोरॉन म्हणतात इंग्रजीत अशा शब्दांना, मराठीत विरोधाभासी शब्द असं भारदस्त नाव सुचतंय मला)! जगभरातल्या इंटरनेट चॅट्स चा आधारस्तंभ – स्मायली!

नेटावर थोडी शोधाशोध केली तर कळलं, पहिला स्मायली फिल्मवर दिसला तो १९४८ साली चक्क 'इंगमार बर्गमन' ह्या गाजलेल्या स्वीडीश चित्रपट दिग्दर्शकाच्या 'हॅमस्टाड' ह्या सिनेमात. पण स्मायलीला आजच्या रूपात पहिल्यांदा डिझाईन करण्याचा मान 'हार्वे बॉल' ह्या माणसाला दिला जातो, त्यानं १९६३ साली हे डिझाईन बनवलं. वॉलमार्ट ह्या मोठ्या सुपरमार्केट चेनचं स्मायली हे कित्येक वर्षं ओळखचिन्ह होतं. पण स्मायली हे नाव आणि लोगो मात्र फ्रेंच पत्रकार फ्रँकलिन लुफ्रानिकडे आहे, ज्यानं पहिल्यांदा पेपरामध्ये चांगल्या बातम्यांसाठी हे चिन्ह वापरायला सुरूवात केली. पण ह्या सगळ्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉपीराईट इश्यूज आहेत. पण ह्या सगळ्या गोंधळापासून अलिप्त 'स्मायली' मात्र आपल्या जन्मदात्यांच्या हक्कावरून चाललेल्या भांडणांमध्ये न पडता, लोकांची भांडणं जमलीच तर सोडवण्याचं काम करतो.

एकतर स्मायली हे बायकी नाव आणि त्यात कुणीही त्याला कुठलीही क्रिया करायला लावावी. बिचारा दिवसाचे चोवीस तास कुठल्या न कुठल्या प्रमाणवेळेमध्ये कुणा न कुणाकडून एक्स्प्लॉईट केला जातो. होय, एक्स्प्लॉईट! शोषण होतं त्याचं. कारण वापर हा शब्द तेव्हा वापरतात जेव्हा तो प्रमाणामध्ये होतो. पण स्मायली काय, फुकट आहे मग केलं जातं शोषण! माझ्या मते शोषण ही वस्तू अथवा सेवा फुकटात मिळण्यामुळे निर्माण होत असलेली मानसिक वृत्ती आहे. आमचा एक साहेब म्हणतो, "काही लोकांची, 'मुफ्त में मिलेगा, तो फिनाईल भी पी लेगा' ही वृत्ती असते." तद्वतच ही प्रमाणाबाहेर स्मायली वापरण्याची माणसांची वृत्ती. ज्यानं स्मायलीचं शोषण चालू आहे.

स्मायली हा माझ्यामते जगातला एकमेव असा प्राणी असेल, जो जन्मतः हसरा असेल आणि नंतर त्याला जगानं रडवलं. आणि नुसतं रडवलंच नाही, तर जीभ काढून दाखवायला लावली, तर कधी दात काढून हसायला लावलं, कधी नुसतंच तोंड पाडायला लावलं तर कधी मौन पाळायला, कधी रागाने लाल व्हायला तर कधी गॉगल चढवून स्टाईल मारायला न जाणे त्याला काय काय करायला लावलं लोकांनी. आणि अजूनही अगदी आत्ता ह्या क्षणी देखील तो बापुडा कुणाच्या तरी बोटांच्या इशार्‍यावर विविध हावभाव करून दाखवत असेल आणि कुणाला तरी रिझवत, रडवत, चिडवत किंवा हसवत असेल. तो लोकांच्या बोटांवर नाचतो, पण वृत्तीनं मात्र अगदीच बोटचेपा आहे.

स्मायली एव्हढासा दिसतो, पण त्याची क्षमता प्रचंड आहे. कधीकधी १० ओळी लिहूनपण जो भाव व्यक्त होणार नाही, तो एक स्मायली व्यक्त करून जातो. त्यामुळेच मूलतः आळशी असलेली मानवी जमात स्मायलीच्या मागे एव्हढी दिवानी आहे. दोन ते तीन कळा दाबून मणभर भावना व्यक्त करण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्मायली. बोळकं असलेल्या लहान बाळापासून ते बोळकं झालेल्या आजीआजोबांपर्यंत सर्वांपर्यंत योग्य भावना योग्य रितीने पोचवू शकणारा एकमेव विश्वासू व्यक्ती म्हणजे स्मायली. कुठल्याही भाषेची आडकाठी नाही की कुठल्याही भाषेच्या काठीची गरज नाही असा स्वतःवर नं भुंकता देखील 'स्वयंभू' असणारा म्हणजे स्मायली. स्मायलीला फक्त चेहराच असतो (काही काही ठिकाणी पूर्ण शरीर असलेले द्विमिती स्मायलीही असतात, पण एकमितीवाल्या स्मायलीची मजा और आहे), पण त्यामुळे त्याच्या भावना व्यक्त करण्याला मर्यादा येण्याऐवजी त्यातली गंमत अजूनच वाढते. नुसती चॅटविंडोच कशाला, कागदाच्या कपट्यावर एक छोटासा स्मायली काढून कुणाला दिला तरी समोरच्याला भावना लगेच पोचतात. स्मायली खर्‍या अर्थाने वैश्विक आहे.

त्याला स्वतःचा असा एकच भाव आहे. एक स्मितहास्य, बस. त्यामुळे त्याचं चिन्ह तेच आहे. एअर इंडियाच्या महाराजाप्रमाणे तो कायम हसतमुख असतो. मग लोक त्याच्याकडून वाट्टेल ते करवतात. कधी कधी विचार येतो, की अशी अनेकानेक चांगली माणसं, जी फक्त दुसर्‍यांना दुःख होऊ नये म्हणून आपल्या भावभावना लपवून ठेवून दुसर्‍याला चांगलं वाटेल असं वर्तन करतात. किंवा समाजासाठी किंवा देशासाठी संपूर्ण आयुष्य देऊन फक्त इतरांच्यासाठी जगणारे लोक. ही सगळी माणसं म्हणजे एकप्रकारचे स्मायलीच असतात. दुसर्‍यांच्या भावभावनांसाठी स्वतःचं सगळं उधळून टाकणारी माणसं.

स्मायली हा खरं बघायला गेलं, तर एक महान अभिनेता आहे. कुठलीही भावना चटकन आणि तेही फक्त मुद्राभिनयाने व्यक्त करू शकणं हा त्याचा हातखंडा. पण कधी त्याची कथा लिहायची पाळी आली, तर ती शोकांतिकाच असेल असं का कुणास ठाऊक वाटतं. बालबुद्धीला अतितीव्रताण देऊन विशाल कल्पनाविस्तार करता माझ्यासमोर आत्ता 'एका तुफानाला कुणी चॅटविंडो देता का चॅटविंडो!" म्हणत भरकटणारा स्मायली येतोय. पण फरक इतकाच आहे की आबालवृद्धांपासून सगळ्यांना आवडणारा आणि आपल्याच वयाचा वाटणारा स्मायली स्वतः मात्र चिरतरूण आहे, चिरंजीव आहे. पण तो अश्वत्थाम्यासारखा भळभळती जखम घेऊन तेल मागत फिरत नाहीये, उलट तो जमलंच तर लोकांच्या जखमांवर फुंकर घालत फिरतोय.

31 comments:

 1. :)
  we use smileys because non-verbal conversation is sometimes more powerful than verbal. Faces tell you much more than the words. So we haven't been lazy to use smileys, its actually a powerful medium. Without smiley, sometimes a non-sarcasm may sound like sarcasm and vice versa. But smiley is unambiguous, short, heart-to-heart way of conversing.

  Kudos to the people who "invented" smileys!

  ReplyDelete
 2. ओंकार,
  फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये आलास तू! :)
  बरोबर आहे तुझं एका अर्थी...ते पावरफुल आहे म्हणून आपण जास्त वापरत असू...
  आपण शब्द वापरताना आळशीच होतो रे...पण स्मायली वापरताना नाही! :P
  खरंच ज्यांनी स्मायली शोधलाय, त्यांनी मानवतेसाठी...सर्व भाषांच्या सीमा तोडण्याचं खूप मोठं काम केलंय! :)
  (किती स्मायली बघ)

  ReplyDelete
 3. Anonymous8:45 PM

  क्या बात है.... :)
  :)
  :D

  हेहे... जास्तच झाल्यात ना स्मायली... :)

  असो, बाबा या विषयावर पोस्ट होऊ शकतं ही कल्पनाच अभिनव आहे आणि तो विषय तू लिहावास म्हणजे सोने पे सुहागा ...

  स्मायल्यांच्या (कसा विचित्र वाटतोय हा शब्द, स्मायलीजचा असे बरे वाटते) ईतिहास वाचायला मजा आली आणि हे पण जाणवलं की आपण बरेचदा किती सहज गोष्टी स्विकारतो, त्यांची निर्माणप्रक्रिया वगैरे विचारही मनात येत नाहीत...

  मान गये बाबाजी आपको!!

  ReplyDelete
 4. मस्त विद्याधर! मलाही जाम आवडतात हे स्मायली! न बोलता किती काही सांगुन जातात हे! आणि ह्यावर पोस्ट लिहिण्याची कल्पना मस्तच! :D

  ReplyDelete
 5. waahh wahh..........sahiyeeeeee.......[:)][:P][:d][;)][=))]\:d/]

  ReplyDelete
 6. क्या बात है!!! स्मायलीवरपण पोस्ट येऊ शकते, अशक्य विचार!!! बाकी स्मायली कोणी कधीही निर्मिल्या असोत, Yahoo!च्या स्मायली... all time best...

  ReplyDelete
 7. खुप टाकल्या नं मी ह्या स्मायल्या...मला पण ज्याम आवडतात..एकदम जवळीक निर्माण करतात..स्मायलीज शिवाय चॅट म्हणजे चिंचेच्या आंबट गोड चटणी शिवाय भेळ !!!जास्तीतजास्त स्मायल्या वापरुन गप्पा रंगवायच्या...मला सर्वात आवडणरे स्मायलिज म्हणजे..लोल,हामसुन हामसुन रडणे,आणि सॅड आणि नाचणारे..[\:D/]..सो...धन्यवाद..ह्या वर पोश्ट लिहिल्याबद्दल...बाबा तेरी जय हो !!!

  ReplyDelete
 8. Aaajkal Smiley hivay post tayar houch shakat nahit avdhi tyachi tyanchi savay jhaliy lokana :)

  baki post mast :) ;) :P

  ReplyDelete
 9. स्वतःवर न भुंकता देखील 'स्वयंभू' असणारा... अरारारारा... लई पांचट व्हता राव. अगदी राहुल गांधी बोलतो ना, त्येवडा. बाकी लेख छान आहे. आवडला.

  ReplyDelete
 10. :) :) :) :)

  :)) :)) :)) :))

  :D :D :D :D

  :P :P :P :P

  ;) ;) ;) ;)

  ReplyDelete
 11. एकदम भारी झाली नोंद, विद्याधर. विद्यार्थी असताना दिलेल्या विषयावर निबंध लिहिल्याप्रमाणे, परंतु अनेक नव्या गोष्टी मांडणारा झालाय लेख. एकदम आवडला. स्माईलीला आपण हसमुखराय म्हणायला हरकत नाही.

  ReplyDelete
 12. भॆय्याजी स्माइल !!! :-D
  मस्तच :-) !!!
  हा ’निबंध’ छान लिहीलाय !!! १५/१५ गुण !! =))

  ReplyDelete
 13. तन्वीताई,
  स्मायलीच स्मायली चोहीकडे! स्मायल्या हे अनेकवचन एकदम मस्त इंडियनाईज्ड वाटतं! :)
  आणि हो ना...मी पण 'निबंध' लिहायला घेतल्यावरच थोडासा रिसर्च केला... :P

  ReplyDelete
 14. अनघा,
  स्मायलींना आपण एकदम टेकन फॉर ग्रांटेड मानतो :)
  आणि कल्पनेबद्दल धन्यवाद माऊताईचे! :)

  ReplyDelete
 15. माऊताई,
  किती स्मायली ते! :D
  >>स्मायलीज शिवाय चॅट म्हणजे चिंचेच्या आंबट गोड चटणी शिवाय भेळ
  आमचे चार आणे..
  स्मायलीज शिवाय चॅट म्हणजे बटाट्याशिवाय चाट! (अतिपाणचट)..
  दुःखीवाला आणि जीभ काढून दाखवणारा असे दोन माझे खूप लाडके आहेत! आणि ऑफकोर्स ... डोळा मारणारा! ;)

  ReplyDelete
 16. सौरभ,
  अरे योगायोगाने आम्ही 'याहू आणि गुगलचे स्मायली' ह्याच गहन विषयावर साधक बाधक चर्चा करत असताना, 'स्मायली' ह्या विषयावर पोस्ट लिही, असं फर्मान सुटलं! मग लावलं विकीमातेला थोडं कामास! ;)
  धन्यवाद रे भावा!

  ReplyDelete
 17. विक्रम,
  हो ना रे भाऊ,
  स्मायलीशिवाय हल्ली काहीच पूर्ण वाटत नाही! :)
  खूप धन्यवाद रे!

  ReplyDelete
 18. संकेत,
  पाणचट आणि पाचकळ ह्या विनोदांमध्ये मी Th.D (Doctor of Thugonomics) करतोय...त्याच्या रेफरन्स मटेरियल्समध्ये (उदा. ट्विटर आवरा आणि फेसबुक आवरा, कैच्याकै वगैरे) आढळणार्‍या अनेकानेक विनोदांपैकी हा मला कैच्याकै आवडलेल्यांपैकी एक आहे. तो वापरण्याचा मोह मी 'आवरू' शकलो नाही
  हा विनोद वाचून मी ऑफिसात एव्हढा हसलो होतो की बाजूला बसणार्‍यानेपण ट्विटर आवरा जॉईन केलं :)
  बाकी,>>लई पांचट व्हता राव. अगदी राहुल गांधी बोलतो ना, त्येवडा
  ही कातिल कॉमेंट होती...कॉमेंट ऑफ द डे म्हणायला हरकत नाही! :)

  ReplyDelete
 19. हेरंब,
  :P :D :) ==)) \:d/ ;)

  आ भार! ;)

  ReplyDelete
 20. देविदासजी,
  खरंच लिहिता लिहिता लक्षात आलंच होतं की हा मस्तपैकी निबंध होणार आहे! पण मजा आली असंही लिहिताना!
  'हसमुखराय' हे नाव जाम आवडलं... :)
  खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 21. संकेत,
  खरं सांगतो, एकदम खरं...ज्याक्षणी स्मायली हा विषय ठरला, त्याक्षणी 'भैय्याजी स्माय्यल' हेच शब्द आधी डोक्यात आले! ते कुठे गुंफता येतात का हे पाहिलं, पण जमलं नाही! ;)
  शेवटी त्या शब्दांचे पायही पोस्टीला लागले...घोडं गंगेमध्ये न्हालं! :)
  धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 22. स्मायली बाबाची.. झक्कास आहे.. :-) ;-) :-0

  ReplyDelete
 23. There was a time when I too used a lot of smileys.. but nowadays I am getting tired of it ... so, stopped overusing it!

  ReplyDelete
 24. भारत,
  धन्यवाद रे भाऊ! :) :D

  ReplyDelete
 25. सविताताई,
  कधी कधी अति होतं...मग सिस्टम आपोआप रेग्युलेट होतो.. :)

  ReplyDelete
 26. स्मायली हा माझ्यामते जगातला एकमेव असा प्राणी असेल, जो जन्मतः हसरा असेल आणि नंतर त्याला जगानं रडवलं.

  aawadala lekh .

  ReplyDelete
 27. बायनरी बंड्या,
  ब्लॉगवर स्वागत!
  प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद!
  भेट देत राहा!

  ReplyDelete
 28. सुरेख... :D :P :) ;) .. आणि उरलेले सर्व स्मायली (रडके सोडून) .. जबरी झालाय निबंधोस्ट ;)

  ReplyDelete
 29. Anonymous9:25 PM

  :) :)) :D :P ;)

  खरच न बोलताही खुप काही सांगुन जातात हया स्मायली...पोस्ट भारीच..स्मायलीच शोषण..रडक्या स्मायली काय विरोधाभास आहे ना...

  ReplyDelete
 30. आनंद,
  'निबंधोस्ट' >> आवडलं... ;)

  ReplyDelete
 31. देवेन,
  :):D
  आपण एकदम गृहित धरतो रे बिचार्‍यांना... ;)

  ReplyDelete