11/14/2010

वैचारिक साखळ्या आणि योगायोग

कुठेतरी वाचलं की बहुतेक संजय लीला भन्साळीचा हृतिक रोशन, ऐश्वर्या राय स्टारर 'गुज़ारिश' हा 'द इल्युजनिस्ट' ह्या इंग्रजी चित्रपटावर बेतलेला असण्याची शक्यता आहे. आता ह्यात नवीन काही नाही, पण मी सहजच कास्ट बघितली, तर एडवर्ड नॉर्टन ह्या नटाचं नाव मी त्यात वाचलं. आणि एकदम एक विचित्र विचारांची साखळी तयार झाली.
एडवर्ड नॉर्टन म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर लेजेन्डरी 'फाईट क्लब' येतो (हिंदीतही ह्याच नावाने सिनेमा आला होता. सुदैवाने तो कॉपी नव्हता, आणि बराही होता, पण मूळ 'फाईट क्लब'ला त्यात रेफरन्स केलं असतं तर अजून बरं वाटलं असतं. असो.) ब्रॅड पिट नावाच्या स्टाईलिश, हॅन्डसम, पीळदार शरीरयष्टीच्या आणि गुणी अभिनेत्याच्या वावटळीत साधा, हडकुळा आणि निरागस चेहर्‍याचा नॉर्टन घट्ट पाय रोवून उभा राहतो आणि सिनेमाला वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. सिनेमाच्या पोस्टरपासून सगळीकडे गाजला तो ब्रॅड पिट, पण प्रत्यक्ष सिनेमा पाहिला तर नॉर्टन कित्येक प्रसंगांमध्ये भारी पडताना दिसतो. त्यावेळेसच नॉर्टनबद्दल थोडीशी माहिती काढायचा प्रयत्न केलेला. नॉर्टन हॉलीवूडचा स्टार असूनही मेट्रोनं प्रवास करतो. साधा राहतो. आणि त्याला आयुष्यात कधीही हे बंद व्हावं असं वाटत नाही. हे नॉर्टनचं साधेपण मला त्याच्याशी कनेक्ट करून गेलं.
त्याच काही दिवसांमध्ये त्याचे इतर सिनेमे शोधताना 'प्रायमल फिअर' ह्या नावावर नजर स्थिरावली. अनेक दिवसांपूर्वी अजय देवगण आणि अक्षय खन्नाचा 'दीवानगी' पाहिल्यानंतर मित्र म्हणाला होता की हा 'प्रायमल फिअर' वरून जसाच्या तसा ढापलेला आहे, ते एकदम आठवलं. मग लगेच जुगाड करून 'प्रायमल फिअर' मिळवला आणि मित्र म्हणालेलं संपूर्ण सत्य असल्याचं उमगलं. पण फरक एव्हढाच होता की 'दीवानगी' 'प्रायमल फिअर'ची पायरेटेड कॉपी आहे. तर 'प्रायमल फिअर' मधला कोवळा एडवर्ड नॉर्टन, त्याची स्प्लिट पर्सनालिटी आणि त्याची आणि रिचर्ड गिअरची जुगलबंदी हे सिनेमाचे हायपॉईंट्स होते. पण सिनेमाचा अजून एक अविभाज्य घटक होता त्याचा अप्रतिम साऊंडट्रॅक. सिनेमात दोन अतिशय सुंदर स्पॅनिश-पोर्तुगीज धाटणीची गाणी तर जितक्या वेळा ऐकावी तितकी थोडी. शेवटची नावं येताना वाजणारं 'कन्साओ दो मार' ची तर मी कित्येक पारायणं केलीत. पण इथे अजून एक गंमत आहे. सुरूवातीलाच उल्लेख केलेल्या 'गुज़ारिश' मध्ये संजय लीला भन्साळीनं अशीच स्पॅनिश-पोर्तुगीज धाटणीची गाणी टाकली आहेत.
एका विचारावरून दुसर्‍या विचारावर जाताना मनाला क्षणभरही पुरतो, पण कधी कधी एक धागा दुसर्‍या धाग्याला जाऊन मिळतो तेव्हा खूप विचित्र वाटतं. 'गुज़ारिश' आणि 'द इल्युजनिस्ट' वरून सुरू झालेला धागा 'प्रायमल फिअर' च्या संगीतावरून पुन्हा 'गुज़ारिश' पर्यंत पोचला आणि मलाच गंमत वाटली.
असं अजून एकदा झालं होतं. तेव्हा तर फारच विचित्र गोष्ट घडली होती. मी 'फास्टर पुसीकॅट, किल! किल!' हा सिनेमा पाहिला होता. हा एक तत्कालीन 'ब' दर्जाचा हॉलीवूड सिनेमा असूनही हिंसाचारी स्त्रियांवर असल्याने नंतर कल्ट सिनेमा बनला आहे. आणि हा सिनेमा पाहिल्या पाहिल्या दुसर्‍या दिवशी मी 'द एग्झॉर्सिस्ट' पाहिला. मग शिरस्त्याप्रमाणे मी विकीपीडिया शोधलं आणि नट-नट्यांची माहिती शोधू लागलो. 'द एग्झॉर्सिस्ट'चा मुख्य नट 'जेसन मिलर' बद्दल वाचताना त्याच्या दुसर्‍या बायकोचं नाव (सुझान बर्नार्ड) ओळखीचं वाटलं. आणि मी त्या नावावर क्लिक केलं, तर लक्षात आलं की 'फास्टर पुसीकॅट, किल! किल!' ह्या सिनेमातला घाबरलेल्या तरूणीचं काम करणारी हीच ती नटी!
(टीप : 'द एग्झॉर्सिस्ट' आणि 'फास्टर पुसीकॅट, किल! किल!' हे दोन्हीही उत्तम सिनेमे आहेत.)

25 comments:

 1. विद्याधर, तू असे भरपूर सिनेमा बघत जा...अशी परीक्षणं लिहित जा...आणि मग मी विचार करत बसते कि मला कधी वेळ मिळणार हे सिनेमे बघायला???!!! :(
  :) छान छान. असेच बघत जा आणि आम्हांला थोडी जाग आणत जा!

  ReplyDelete
 2. Anonymous12:26 AM

  तुझ्या वैचारिक साखळी्च वर्तुळ मस्त पुर्ण झाल...बाकी द एग्झॉर्सिस्ट मधील काही दृश्य बॉलीवुडमधील बरयाच हॉरर सिनेमात सर्रास दिसतात.असो गुजारिश तरी पाहायचा आहे मला...

  ReplyDelete
 3. अनघा,
  सिनेमे एव्हढे बघतो तरी, हा राहिला, तो राहिला असं होतं बरेचदा :)
  सिनेमा बघितल्यावर उगाच काहीतरी अभ्यास करतो आणि त्यातू काहीतरी विचित्र लिंका लागतात कधीतरी. :D

  ReplyDelete
 4. देवेन,
  'द एग्झॉर्सिस्ट' हे खरंच अनेक हॉरर सिनेमांचं बायबल आहे. शास्त्र आणि श्रद्धा ह्यांच्यावर अधांतरी आणि कुठलाही निष्कर्ष न काढणारं भाष्य करतो म्हणून हा सिनेमा मला जास्त आवडला होता. त्याचबरोबर दिग्दर्शकाची पॅशन प्रत्येक अन् प्रत्येक फ्रेममध्ये दिसते. त्याच्या मेकिंगबद्दल वाचशील कधी तर दिग्दर्शकाच्या अन कलाकारांच्या वेडाला सलाम करावासा वाटतो.

  ReplyDelete
 5. बाबा, गुजारिशची जाहिरात बघताना अगदी सेम वाटलं मला. फक्त मला तो 'द प्रेस्टीज' सारखा वाटत होता. त्यातलं ते पाणी, 'ती' पेटी वगैरे प्रकार बघून (कारण मी इल्ल्युजनिस्ट अजून बघितला नाहीये. पण इल्ल्युजनिस्ट आणि प्रेस्टीज बरेचसे सारखे असल्याचं वाचलं होतं.).. इल्ल्युजनिस्ट डालो होऊन कधीपासून हार्डडिस्कमध्ये पडलाय आता बघून टाकतोच या आठवड्यात.

  ReplyDelete
 6. हेरंबा,
  अरे मी इल्युजनिस्ट आणि प्रेस्टीज दोन्ही पाहिले नाहीयेत. बघायचेच आहेत. टॉप प्रायोरिटीवर टाकलेत. बघू कसं कसं जमतंय ते! :)

  ReplyDelete
 7. ‘तो’ वर कमेंटच लिहिता येत नाहीये....

  ReplyDelete
 8. संकेत +१

  आय थिंक बाबाने त्या पोस्टवर कमेंट्स डिसेबल केले आहेत.

  ReplyDelete
 9. का बुवा? असो. ‘तो’ हा लेख मस्त आहे. डोळ्यांत पाणी आलं वाचून...

  ReplyDelete
 10. ‘तो’ हा लेख वाचून डोळ्यांत पाणी आलं...ektar madhe katha ani cinema he donhi majhe nasalele wishay hote ani ha lekh bolti band karana aahe plus tu comments disable kelet...jaast kaay lihu??

  ReplyDelete
 11. मी THE PRESTIGE आणि The illusionist दोन्ही पहिले आहेत. गुजारिश नल्लक असेल असे वाटत नाही. The Exorcist तीन वर्षं हार्ड-डिस्क मधे पडून राहिला,शेवटी न बघताच delete केला, कारण सांगायची लाज वाटते.(हा:हा:हा:)
  अशा वैचारिक साखळ्या आणि योगायोग कित्येकदा जुळून येतात, विशेषतः गूगलताना.माझा नेहमीचाच अनुभव आहे. छान मांडंलस.

  "तो" वरच्या कमेंट डिसेबल करुन छान केलंस.मला पटतंय.काही लेखांवरती कमेंट न येणं चांगलं असतं.

  ReplyDelete
 12. @संकेत, हेरंब, अपर्णा,
  मी 'तो' वरच्या कॉमेंट्स डिसेबल केल्यात. कदाचित ह्यासाठी की तो लेख मी केवळ माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी लिहिला होता आणि संकेतानंद म्हणतोय तेच कारण.

  ReplyDelete
 13. संकेतानंद,
  एग्झॉर्सिस्टचा अनुभव मिस केलास. :)

  ReplyDelete
 14. Anonymous3:26 AM

  विद्याधर, तू असे भरपूर सिनेमा बघत जा...अशी परीक्षणं लिहित जा...आणि मग मी विचार करत बसते कि मला कधी वेळ मिळणार हे सिनेमे बघायला???!!!
  छान छान. असेच बघत जा आणि आम्हांला थोडी जाग आणत जा!

  +१

  बाबा मला दिवानगी उर्मिला असूनही आवडला होता हे महत्त्वाचे (कारण तिच्याकडे अजय आणि अक्षयमूळे पुर्णत: दुर्लक्ष करणे शक्य होते) आता मुळचे शिणिमे मिळवून पहायला हवेत!!

  संजय लीला बन्सालीचा सिनेमा म्हटलं की हल्ली हिंमत करावी लागतेय पहायची सावरिया जाम डोक्यावरून पाणी होते, आता हृतिक आहे पण ऐश्वर्याताईंकडे दुर्लक्ष करावे लागणार, असो!!!

  तुझ्या बऱ्याच पोस्ट्स वाचायच्या बाकि आहेत, एक एक करून वाचते आता!!:)

  ReplyDelete
 15. तन्वीताई,
  हायेटस नंतर परतलीस ते बरं झालं!
  पहा समदे सिनेमे, वाच सगळे ब्लॉग्ज...भरून काढ आता बॅकलॉग्ज! ;)

  ReplyDelete
 16. Anonymous4:25 AM

  विद्याधर,

  ब्लॉग माझा तर्फे मिळालेल्या पारितोषिकाबद्दल हार्दिक अभिनंदन!!!

  ReplyDelete
 17. एडवर्ड नॉर्टन बद्दल सहीच.. तू बाबा ग्रेट आहेस...

  ReplyDelete
 18. निरंजन,
  उशीरा प्रतिक्रियेबद्दल सॉरी!
  खूप आभार तुमचे..असाच लोभ राहू द्या! :)

  ReplyDelete
 19. आनंदा,
  नॉर्टन लई भारीच आहे रे...मी बापुडा फक्त माहिती इकडची तिकडे करतो!:)

  ReplyDelete
 20. विद्या, ’तो’ वाचले आणि मघाशी मस्त बनलेला मूड पुन्हा एकदा काळाच्या गर्तेत ढकलला गेला. तुझ्या मित्राला शांती लाभो.

  अजून हा लेख वाचतेयं... लिहीतेच रे...

  ReplyDelete
 21. एक तर रिचर्ड गेअरवर माझा अतोनात जीव त्यामुळे त्याचे सिनेमे सहसा मी सोडत नाहीच. ’प्रायमल फिअर ’मस्तच होता. अर्थात दिवानगीही मला खूप भावलाच. अक्षय खन्नाची मी अक्षय पंखा आहे... :D गाणीही छान होती आणि अजयनेही माझ्यातही ताकद आहे हे दाखवायचा प्रयत्न मनापासून केलाय.

  ’फास्टर पुसीकॆट, किल!किल!’ मात्र मी पाहिलेला नाही. आता जोडीने दोन्हीही पाहतेच. :)

  ReplyDelete
 22. श्रीताई,
  :-|

  ReplyDelete
 23. प्रायमल फिअर मधे अभिनयाची जुगलबंदी म्हणजे काय ह्याचं प्रात्यक्षिकच होतं! आणि तसंच ते दीवानगीतही होतं...पण दीवानगीनं कथेत मार खाल्ला.
  फास्टर पुसीकॅट.. विचित्र सिनेमा आहे...मला त्या विचित्रपणामुळेच आवडला खरंतर... :)

  ReplyDelete
 24. जोडत गेलो की कुठे कुठे काय काय जोडत जाते... :) माझे असे हे भटकण्याबाबतीत होते.. :)

  गुझारीश पाहिला. बरा आहे. ह्रितिक आवडतो तसा. तसे मोठे केस ठेवायचा आता विचार आहे.. :D

  ReplyDelete
 25. रोहन,
  तुझ्याशी बोलून आणि ब्लॉगमधनं ते कळतंच.. :)
  रच्याक, तुझा मोठे केसवाला फोटो इमॅजिन करतोय! :D

  ReplyDelete