स्वागत!

नमस्कार!
माझ्या ब्लॉगवर स्वागत!

8/12/2010

कैच्याकै

माझा जन्म पुण्याचा आहे आणि मी मुंबईत लहानाचा मोठा झालो. मला ठाऊक आहे, की मी हे इतक्या वेळा सांगितलंय, की 'माझा जन्म..' हे वाचल्यावर पुढचं वाक्य लिहायचीही गरज उरणार नाही मला. तरीही पुन्हा सांगतो, कारण ह्या माहितीची पुढच्या लेखाला तेव्हढीच गरज आहे, जेव्हढी मुक्तपीठ वरच्या प्रतिक्रिया एन्जॉय करण्यासाठी लेख वाचण्याची.

तर असं आहे, की माझे वडील सातार्‍याचे आणि ते माझ्या जन्माआधी मुंबईत येऊन बरीच वर्षं झाली होती. त्यामुळे त्यांची भाषा वेगळीच पण बर्‍यापैकी मुंबईकर झाली होती. आई कोकण/पुण्याची त्यामुळे तिचा वेगळाच शब्दसंग्रह, ज्याला मुंबईकर मराठीचा तडका. आता मागचं वाक्य नीट पहा. फोडणी नव्हे, तडका. हे मुंबईकर मराठी. फोडणी पुणेरी भाषेची असते, आमचा तडका. कारण मुंबईकर मराठीवर गुजराती, हिंदी आणि हल्लीची पोरं इंग्रजी शाळांमध्येच जात असल्याने इंग्रजीचे मुख्यत्वेकरून संस्कार आहेत. बरं इथे मी मध्यमवर्गीय मुंबईकर मराठीची गोष्ट करतोय. उदाहरणार्थ, 'वांधा' हा शब्द मूळचा बहुधा गुजराती लोकांचा आहे, पण मुंबईत मराठी काय सगळ्यांच भाषांमध्ये वापरतात. 'तडका' हा पंजाबी/हिंदी शब्द असाच अलगद मराठीत वापरला जातो. सगळ्यात मस्त गोष्ट 'बिंदास' ह्या शब्दाची आहे. मूळ मराठी शब्द 'बिनधास्त', त्याचा दाक्षिणात्य लोकांनी अपभ्रंश केला, 'बिंदास'. हा शब्द मुंबैय्या(भैय्या शी यमक जुळतो नै!) हिंदीत दत्तक गेला आणि मजेशीर गोष्ट ही, की हल्ली मराठी माणसं सुद्धा 'बिंदास' असा उच्चार अगदी बिंदास करतात.

तर नेहमीप्रमाणेच मी विषयावरून वाहावत गेलो. मूळ विषयावर परत येऊ. माझ्या घरी असं जबरा मराठी भाषिक वैविध्य असल्याने, माझं मराठी स्पेशल असणं भाग होतं. पण पुलं म्हणतात ना, 'नारळ आणि मुलगा, कसा निघेल ते सांगता येत नाही', तस्मात आमचं मराठी हे 'ना घर का, न घाट का' असं झालं. मागच्या वाक्यात वापरायला मला मराठी म्हण सापडेना. हां आत्ता आठवली, 'कशाचं काय अन् फाटक्यात पाय'. चुकीची असावी बहुधा, पण असो. आम्ही प्रयत्न तर केला.

हां, तर आमच्या मातोश्री कोकणात शाळा आणि पुण्यात कॉलेज अन् नोकरी केलेल्या. त्यामुळे फटकळ शब्दांचा संग्रह त्या योग्य वेळी बटव्यासारखा मोकळा करतात. 'खुटापर्‍यागत बसू नकोस', 'निवणं करून कशासाठी बसले आहात', 'सपाज्ञा देउ नकोस (की करू नकोस?)' हे आणि असे अनेक वाक्प्रचार मला कळतात, पण मला योग्य वेळी इतक्या वर्षांचा दांडगा श्रवणानुभव असूनही वापरता येत नाहीत. पण तिच्या बोलण्यात पुणेरी तिरकसपणापेक्षा कोकणी फटकळपणा जास्त आहे. त्यामुळे ती रागावून बोलली तरी तिलाच जास्त त्रास होतो. आम्हा दगडांना सहसा जास्त काही वाटत नाही. उलट बाबांची केस आहे. बाबांचा शब्दसंग्रह सातारी आहे. ते कधीच 'चावी' वापरत नाहीत, फक्त 'किल्ली'. ते भाज्या कापू शकत नाहीत, फक्त 'चिरता' येतात. 'टोमॅटो' चं स्पेलिंग अचूक ठाऊक असूनही, ते फक्त 'टामाटू'च खातात, माझ्यासाठी ते नेहमी 'बारके बारके' पेरू आणतात आणि 'मामुली' गोष्टींमुळे त्यांना फरक पडत नाही. सातारी लोकांना सहसा वाक्प्रचार ह्या भाषाविशेषाविषयी प्रेम नसतं, तद्वत माझे वडिल वाक्प्रचारांच्या फंदात पडत नाहीत. पण रांगडेपणा भरपूर. बोलताना फारसा विचार करायचा नाही. फटकळ नव्हे, लहेजाच रांगडा. म्हणजे उदाहरणार्थ. "नमस्कार, काय म्हणता?" च्या ऐवजी, "काय लेका, हैस कुठं?" अर्थात बाबांच्या मूळ भाषेलाही मुंबईचा तडका बसलाय, त्यामुळे हे 'लेका' वगैरे मी सातार्‍याला गेल्यावर माझ्या आतेभावाच्या तोंडूनच ऐकतो.

बरं मी मराठी शाळेत शिकलो. पण सगळी पोरं शहरीच आणि शाळेतलं मराठी आपलं प्रमाणित अधिकृत मराठी असतं. त्यामुळे काही विशेष बदल संभवत नव्हता. पण माझ्या इमारतीमध्ये राहणार्‍या इंग्रजी मिडियमच्या पोरांमुळे आणि त्यांच्या 'बड्डे' ला केक खायला जात असल्याकारणे माझ्या शब्दसंग्रहात, आमच्या 'बिल्डिंग'ची 'बॅगसाईट' (मागची बाजू) आणि 'टेरेस' अशी भर पडली होती. भरीस भर म्हणून मी क्रिकेट खेळताना 'फास बॉल' टाकायचो आणि बरेचदा 'क्लीन बोल्ट' व्हायचो. आणि मी बिल्डिंगमधल्या लहान पोरांमध्ये गणना होत असल्याने बरेचदा 'इंटर पिंटर' असायचो (म्हणजे दोन्ही टीम कडून खेळायचो, 'लिंबू टिंबू' ह्या मराठी कारकुनाला 'अकाउंटंट' म्हणायची पद्धत आहे ती). मग इंजिनियरिंग कॉलेजात पोचेस्तोवर हळूहळू अनेक रोजच्या वापरातले शब्द इंग्रजी झाले होते. पण वर्गातल्या हॉस्टेलाईट पोरांच्या विविध भाषांशी ओळख होऊ लागली होती. सगळ्यात लगेच लक्षात येणारा लहेजा म्हणजे नागपुरी. "अबे काय करून राहिला बे तू?" "मी इथे तुझी वाट पाहून राहिलो न बे!" ही वाक्यरचना मला जाम म्हणजे जाम आवडते. पण नागपुरी पब्लिकची दुसरी सवय म्हणजे आपापसात बरेचदा हिंदीत बोलतात. हे मला न उलगडलेलं कोडं आहे. बाकी वैदर्भीय बंधूंची बोली ही नागपुरीसारखीच थोडीफार, पण त्यातही व्हेरियेशन्स असतात. त्यांना आपापसात बरोबर कळतं कोण कुठला आहे. माझा त्यामध्ये विशेष अभ्यास नसल्याने आत्ता जाऊ दे.

पुढे नोकरीला लागलो तर तिथेही माझ्या पुढच्याच टेबलवर माझा मित्र नागपुरी. बरेच दिवस त्याच्याबरोबरच प्रोजेक्टवर होतो. त्यामुळे नकळत मी त्याच्याशी त्याच्याच बोलीत बोलायला लागलो. ही माझी समस्या आहे. माझा लहेजा फार सहजपणे समोरच्यासारखा होऊन जातो. ६वी-७वीत असताना मी महिनाभर वडगाव बुद्रुकला राहिलो होतो, माझ्या आजोबांच्या घरी. तिथल्या गावातल्या पोरांबरोबर खेळायला जायचो. आईलाच माझ्या लहेजाची काळजी लागली. पण मग मुंबईत परतल्यावर महिन्याभरात मी नॉर्मलला आलो.

तर माझ्या ह्याच समस्येचा मला सध्या भारी त्रास होतोय. त्याचं झालं असं.

मी मराठी ब्लॉग विश्वामध्ये जानेवारी २०१० मध्ये इवल्याश्या पावलांनी, दबकत दबकत चंचुप्रवेश केला. गरीबासारखा पोस्टा लिहायचो. चार-दोन भली माणसं, 'मराठी ब्लॉग विश्व' च्या कृपेनं चक्कर टाकून जायची. एखादा अतिशय भला भेटदाता, प्रतिक्रियाही देऊन जायचा. मी सुखावायचो. काही प्रथितयश ब्लॉगकारांचे ब्लॉग्ज आणि त्यावरच्या प्रतिक्रियांचा पाऊस पाहून डोळे दिपून जायचे. कधीतरी आपला ब्लॉगही असा होईल का? अश्या निरर्थक स्वप्नांमागे मन दुडूदुडू धावायचं. हो दुडूदुडू, कारण तेव्हा मी मराठी ब्लॉगिंगमधलं बाळ होतो. अर्थात अजून मोठा झालो नाहीये, पण तेव्हा बाळ होतो हे कन्फर्म. तर अश्या वेळी, एक फरिश्ता माझा फॉलोअर झाला. त्याचं नाव मी सांगत नाही, पण आडनाव पत्रे होतं. त्याचं नाव सांगायला मला फार आनंद झाला असता, पण असो. आणि माझा आत्मविश्वास दुणावला. मग मी अजून जोमाने आपल्या मतांची पिंक टाकायला लागलो. मग कळलं, की जितकं जास्त वाचेन तितकं जास्त लिहिता येईल, मग मी अजून ब्लॉग्ज वाचायला घेतले. त्या फरिश्त्याशी नेट ओळख झाली. मग अनेक प्रथितयश ब्लॉगर्सच्या ब्लॉग्जवर प्रतिक्रिया देऊन देऊन त्यांच्याशी ओळखी काढल्या. मग गुगल बझ नामक एका झंझावातानं अनेकानेक ओळखींची कवाडं उघडली. रोजच्या रोज कित्येक मराठी ब्लॉगर्स आणि ब्लॉगवाचकांशी ओळखी झाल्या आणि इथेच घात झाला.

महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या नव्हे जगाच्या कानाकोपर्‍यातल्या अनेकानेक लोकांशी रोजच्या रोज बोलण्यामुळे माझ्या भाषेची वासलात लागली. आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झाला. मीच हरवलो. हे म्हणजे, अमिताभपासून सगळ्या गायकांच्या आवाजात गाणी गाऊन गाऊन सुदेश भोसलेंचा स्वतःचाच आवाज कुणाला ठाऊक नाही, तसं झालं. इतके विविध शब्द माझ्या संग्रहात आलेत की हल्ली मी जे लिहितो, ते मीच लिहिलंय का असा प्रश्न मला पडतो. बरं, हे शब्द स्पेशल आहेत. ते अर्थांसकट इथे मी स्वतःच्याच आठवणीसाठी देतोय. जेणेकरून आजपासून काही वर्षांनी जेव्हा माझी भाषा पुन्हा एकदा बदलून गेली असेल, तेव्हा हा लेख मला माझ्या आजच्या स्थितीची कल्पना देईल.

१. भारी - भारी म्हणजे मुंबईकर मराठीत झकास. मी भारी हा शब्द दोन-तीन महिने पूर्वीपर्यंत कधीच वापरला नसेल. आणि आजच्या तारखेला, ह्या शब्दाशिवाय माझा दिवस पुरा होत नाही. कुठलीही चांगली गोष्ट 'भारी'च असते, असा माझा ठाम समज झालाय.

२. प्रचंड - प्रचंड हा शब्द मी पुस्तकात कित्येकदा वाचलाय, पण मी बोलीभाषेत तो वापरेन असं मला कधी स्वप्नातही वाटलं नसेल. आज मी हा शब्द कशाच्याही मागे लावतो. 'तो प्रचंड त्रास देतोय मला' पासून 'त्याने प्रचंड वेळ काढला.'

३.प्रचंड भारी - हे डेडली कॉम्बो आहे. प्रचंड भारी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. एखादी गोष्ट प्रचंड भारी आहे म्हणजे अतिशय सुंदर किंवा अतिशय झकास किंवा अतिशय .... भारी आहे!

४. कैच्याकै भारी - ओके, आता ह्यासाठी मला कैच्याकैचा अर्थ सांगावा लागेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्याची अजिबात गरज नाही. कैच्याकै भारी म्हणजे 'ब्युटिफुल, मोअर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल' मधल्या 'मोस्ट ब्युटिफुल' सारखं आहे. म्हणजे, ह्यापुढे उच्च दर्जा नाही. ह्यापुढे दाद असूच शकत नाही. उदाहरणार्थ, लतादीदी कैच्याकै भारी गातात, सचिन तेंडुलकर कैच्याकै भारी क्रिकेट खेळतो आणि विद्याधर भिसे कैच्याकै भारी पकवतो. ओके, शेवटचा वाक्यातला प्रयोग चुकलाय पण असो.

थोडक्यात, कुठल्याही विशेषणापुढे 'प्रचंड' आणि 'कैच्याकै' हे लावता येतात. पण 'कैच्याकै' वेगळा वापरला तर मात्र अर्थ बदलतो बरं का. तेव्हा इथे थोडं सांभाळावं लागतं.

५. कैच्याकै - कैच्याकै ह्या शब्दाचा 'काहीच्या काही' ह्या शब्दसमूहाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. हां, काही भाषाप्रभू कैच्याकै हे अपभ्रंश झालेलं रूप असल्याचा दावा करतील, पण करोत बापडे. आमच्या मते ते फक्त 'होमोफोन्स' (सारखा उच्चार असलेले) आहेत. पण, ह्याच भाषाप्रभूंमुळे काही लोक कैच्याकै ला 'काहीच्या काही' च्या ऐवजी वापरतात. कैच्याकैचा खरा(!) अर्थ 'आऊट ऑफ धिस वर्ल्ड' असा आहे. आता कुणी म्हणेल, मराठी काय अर्थ. अरे मनुष्यांनो, हा एकमेवाद्वितीय शब्द आहे. मराठीत ह्या शब्दाला समानार्थी शब्दच नाहीये. आणि इंग्रजीतही अख्खा शब्दसमूह वापरावा लागला.

६. निवांत - हा शब्द मी पुस्तकांमध्ये वाचला होता, पण मग हल्ली ब्लॉग आणि बझच्या कृपेने मीदेखील सर्रास वापरू लागलोय. कुणी विचारलं काय चाललंय, की मी 'निवांत' असं उत्तर देईन हे मला ५ महिन्यांपूर्वी कुणी म्हणालं असतं तर मी निवांतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं.

७. अशक्य - अशक्य ह्या शब्दाचे 'शक्य नसलेलं' ह्यापलिकडेही अर्थ आहेत, हे जर नेपोलियनला वेळेत कळलं असतं, तर त्यानं त्या शब्दासकट डिक्शनरी छापली असती. अशक्य म्हणजे 'प्रचंड' आणि 'कैच्याकै' ह्यामधली पातळी. अशक्य सुंदर म्हणजे अतिशय सुंदर. ऑन सेकंड थॉट्स, असं पाहिजे - 'भारी, प्रचंड भारी, अशक्य भारी'. कैच्याकै म्हणजे 'आऊट ऑफ धिस वर्ल्ड' आहे ना! पण अशक्यचा दुसरा अर्थ म्हणजे 'शब्दांपलिकडे' म्हणजे 'कैच्याकै' सारखं नाही, ऍक्च्युअली कशासारखंच नाही. म्हणजे, आता बघा, एखाद्यानं तुम्हाला तुमच्या आवडत्या मुलीसमोर दुसर्‍याच मुलीबद्दल चिडवलं, तर तुमच्याकडे काय शब्द असतात त्याच्यासाठी? मागचा प्रश्न नीट वाचा मी शब्द म्हणतोय, शिव्या नव्हे. असा शब्दांपलिकडला आशय सभ्यपणाने व्यक्त करायचा असेल तर, 'अशक्य आहेस तू!' एव्हढं म्हणता येईल.

आता असा शब्द जो मी अभिजीत वैद्यला भेटण्यापूर्वी ऐकलाही नव्हता आणि आता सर्वांत जास्त वापरतो.

आवरा - 'आवरा' हा शब्द मी ऐकला नव्हता असं नाही. 'चला आता दप्तराचा पसारा आवरा नाहीतर फटके मिळतील' अश्या आशयाने ऐकला होता. पण आवरा हे पाणचटपणाचं एकक आहे हे मला अभिजीतमुळे कळलं. एखाद्या लेखावर खूपच 'आवरा' कॉमेंट्स येताहेत, किंवा अमकातमका 'आवरा' फॉर्ममध्ये आहे ,अश्या पद्धतीने ते विशेषण म्हणूनही वापरलं जातं. आता ते विशेषण आहे म्हटल्यावर, आवरा, प्रचंड आवरा, अशक्य आवरा आणि कैच्याकै आवरा असेही वाक्प्रयोग हल्ली मी बरेचदा करतो.

आता लोकं 'आवरा' म्हणण्याच्या आत ही साता उत्तरांची कहाणी साठा उत्तरीं सुफळ संप्रूण(संपूर्ण) करतो!

विशेष टीप - वरती शब्दांचा क्रम हा त्यांची प्राथमिकता किंवा महत्व दर्शवत नाही, तो कसाही आहे. आणि 'आवरा'ला अनुक्रमांक न देणं हे त्याचं निर्विवाद वर्चस्व दर्शवण्यासाठी वापरलं गेलेलं 'गिमिक' आहे.

67 comments:

 1. प्रचंड भारी
  कस सुचत रे?

  ReplyDelete
 2. 'कैच्याकै भारी' झालीये पोस्ट.
  (संदर्भासाठी क्र ४ पहाणे.)

  ReplyDelete
 3. कैच्याकै भारी पोस्ट... :)
  सहज सध्या पद्धतीने एखाद्या विषयावर तू सहज लिखाण करू शकतोस बाबा हेच एकदा सिद्ध होतंय ह्या पोस्टवरून.

  आणि तुझ्जा शब्द संग्रह वाढलाय हे अधिक चांगले की पण आपल्या बोलीभाषेचा बाज घालवायचा नाय... :) काय!!!

  आणि हो शब्दांचे म्हणशील तर आपल्या मुंबईमध्ये त्याची काय कमी नाय. आपले शेवटी एकच धोरण >>> सर्व समावेशक. :D

  ReplyDelete
 4. भाssरी
  कैssच्याssकै भारी

  ReplyDelete
 5. प्रचंड भारी
  कैssच्याssकै भारी..morning @5..reading ur post...n commenting this...again n again ha..भाssरी
  कैssच्याssकै .....[:P]

  ReplyDelete
 6. महेंद्र5:11 PM

  अशक्य!! आवरा रे कोणीतरी याला....:)
  एकदम सही पोस्ट.

  ReplyDelete
 7. भारी, अशक्य भारी, कैच्याकै, कैच्याकै भारी, ........आवरा........अशक्य आवरा.....(हे तुझे शब्द)

  खूप मस्तच! (हा माझा एकच शब्द) :-)

  ReplyDelete
 8. या भिंतीत दडलाय तरी काय? आणखी येउद्यात.... कैच्याकय पोस्ट बाला....

  ReplyDelete
 9. लेकाच्या,अशक्य भारी लिहलास बर का.

  च्यामारी धरून फटाक..........
  (हा शब्द कसा काय विसरलास)

  ReplyDelete
 10. वाह विभी! झकास पोस्ट. १० पैकी १० गुण!!

  ReplyDelete
 11. कैच्याकै....
  आवरा...आवरा...रे ह्या विभ्याला अशक्य सुटला आहे.

  ReplyDelete
 12. लै भारी. आवडले.
  मला लै भारी वापरायला आवडते. लै भारी शिनेमा, लै भारी गाणे इ. :)

  ReplyDelete
 13. "कैच्याकै" च्या आधी आणि अशक्यच्या नंतर आम्ही अजून एक शब्द वापरतो. "ख्खर्राब्ब". आणि वारंवार वापरला जातो.

  ReplyDelete
 14. अशक्य भारी आहेस बाबा तू....कैच्याकै सुटतोस कुठल्याही विषयावर :)

  काका-काकूंचे शब्दप्रयोगही लय भारी एकदम!!

  ते जे धोबी का कुत्ता लिहीले आहे त्याला मराठीत ’त्रिशंकू’ म्हटले जाऊ शकते....

  ReplyDelete
 15. मस्तच!
  निवांत - ह्या वर माझं एक पेटंट आहे - कोणी विचारलं कसा काय चालू आहे कि मी सांगतो - 'हेक्टिक schedule "निवांत" पणे चालू आहे ! '

  ReplyDelete
 16. "विद्याधर भिसे कैच्याकै भारी पकवतो. ओके, शेवटचा वाक्यातला प्रयोग चुकलाय पण असो". +++१
  झक्कास पोस्ट झालीये .....

  ReplyDelete
 17. yuvraj1:04 AM

  jabaradasta Mitra,

  ReplyDelete
 18. हा 'फास बॉल' यकदमच फास्टात पडलाय!
  कैच्याकै भारी...
  रच्याक, सात महिन्याच्या या बाळाला सुदॄढ बालक स्पर्धेत पहिला क्रमांक नक्की मिळणार :)

  ReplyDelete
 19. कडक येकदम...

  ReplyDelete
 20. रच्याक, सात महिन्याच्या या बाळाला सुदॄढ बालक स्पर्धेत पहिला क्रमांक नक्की मिळणार :)
  +100

  ReplyDelete
 21. कैच्याकै भावा.. अशक्य भारी...
  निवांत.. कळलं.. कळंल...
  आय क्नो रे ... ;)
  तुला दंडवत रे बाबा.. लय भारी लिहितो तू...

  >> विद्याधर भिसे कैच्याकै भारी पकवतो. ओके, शेवटचा वाक्यातला प्रयोग चुकलाय पण असो

  प्रयोग चुकला नाही.. परफेक्ट आहे ते ;)

  ReplyDelete
 22. atishay changala lekh zalaay. kase suchate etake sagale.

  ReplyDelete
 23. साबा,
  अरे सुचायचं काय..सत्यकथन आहे! :D

  ReplyDelete
 24. हाहा हेरंबा,
  धन्यवाद रे!

  ReplyDelete
 25. रोहना,
  धन्यवाद रे भाऊ!
  मुंबई आहेच तशी - सर्वसमावेशक...ताप व्हायला लागलाय त्या गोष्टीचा आता हे मात्र खरं! ;)

  ReplyDelete
 26. सुहासा,
  लय लय धन्यवाद!

  ReplyDelete
 27. माऊताई,
  अगं पहाटे पाचला उठून तू 'माझा' ब्लॉग वाचलास..ही अचिव्हमेंट आहे.. :D

  ReplyDelete
 28. महेंद्रकाका,
  लय लय आभारी आहे! :D

  ReplyDelete
 29. अलताई,
  खूप खूप धन्यवाद गं!

  ReplyDelete
 30. भारत,
  लय आभारी आहे राव...

  ReplyDelete
 31. आयला सचिन हो रे,
  च्यामारी धरून फटाक राहिला..पण हा शब्द मी अजून वापरत नाही..अजून श्रवणानुभवच चालू आहे..
  मंडळ लय भारी आहे! :P

  ReplyDelete
 32. अभिलाषभाऊ,
  शाळेत नेऊन सोडलंस एकदम!
  खूप आभार!

  ReplyDelete
 33. योगेश,
  आवरत नाहीये मी स्वतःलाच...
  आता मी एक सदर सुरू करणार आहे..'आवर रे' ;)

  ReplyDelete
 34. राजभाऊ,
  अरे, लै भारी मी सहसा लिहिताना वापरतोच...ते राहून गेलं तसं..फक्त मी ते लय असं वेगळ्याच लयीत लिहितो.. ;)
  खूप खूप आभार!

  ReplyDelete
 35. पंकज,
  ब्लॉगवर स्वागत!(प्रतिक्रियांच्या माध्यमातून)
  अरे हो..हा शब्द मी काही लोकांकडून आधीही ऐकलाय.. त्याच्या उच्चारात एक वेगळाच 'मज़ा' आहे!
  खूप आभार!

  ReplyDelete
 36. ताई,
  अगं घरी ये माझ्या..आणि आमचे प्रेमसंवाद ऐक...
  किंवा मी नसताना गेलीस तरीही तुला शब्दांची ट्रीट मिळेलच..
  'त्रिशंकू'..तसंच असेल..पण मस्त टोपणनाव वाटतं ना..शंकासुराला 'शंकू' म्हटल्यासारखं! :D

  ReplyDelete
 37. विक्रम,
  अरे बरेचदा असं होतं...'निवांत' ह्या शब्दातच ती जादू आहे... :)

  ReplyDelete
 38. सागर पुन्हा नवीन(हे मला प्रतिक्रियांमधल्या तीन सागरांमुळे करावं लागतंय)...
  खूप खूप आभार भाऊ..
  सत्याला कधीकधी मजेच्या कोंदणात घालून मांडावं लागतं..म्हणजे आपल्यालाच त्रास कमी होतो.. ;)

  ReplyDelete
 39. युवराज,
  लय लय आभार भाऊ!

  ReplyDelete
 40. मीनल,
  'फास' पडायची वेळ आलीय माझ्या मूळ भाषेला, इंग्रजीचा...
  त्यामुळे हे सगळे शब्द लय महत्वाचे हैत...
  खूप धन्यवाद..
  रच्याक, सुदृढ बालक स्पर्धा..एकदम ती डॉक्टरांच्या दवाखान्यातली बाळांची चित्र दिसायला लागली... :D

  ReplyDelete
 41. सागर कोकणे (३रा सागर),
  ब्लॉगवर स्वागत!
  चला माझ्या आणि भारतामध्ये असलेल्या चार सागरांपैकी तीन सागर ह्याच पोस्टच्या निमित्ताने पार झाले!
  खूप खूप आभार भाऊ!
  अशीच भेट देत राहा.

  ReplyDelete
 42. तन्वीताई,
  :D

  ReplyDelete
 43. आंद्या,
  कळंल... :P

  ReplyDelete
 44. डॉ. करंजेकर,
  ब्लॉगवर स्वागत!
  प्रतिक्रियेसाठी खूप आभार!
  असेच भेट देत राहा!

  ReplyDelete
 45. kaichya kahi bhari post

  ReplyDelete
 46. गौरव,
  ब्लॉगवर स्वागत!
  प्रतिक्रियेसाठी खूप आभार! असाच भेट देत राहा!

  ReplyDelete
 47. Anonymous5:19 AM

  दुसर्या कोणी पोस्ट लिहली असती तर ’कैच्याकै भारी’ असच लिहल असत पण खास तुझ्यासाठी.....

  क्या बात... क्या बात... क्या बात....

  ReplyDelete
 48. लेका आजच तुझं पोस्ट एकदम 'काटा' होत.
  काटा हा आमच्या वेळचा कॉलेज मधला"३)" साठी वापरला जायचा.थोड भंजाळल्यागत होईल पण माझा "पर्याव"(हा पर्यायचा पर्याय गृहीत धरावा)नाही.
  चू.भू.दे.घे.

  तुझा नवाकोरा पंखा

  ReplyDelete
 49. "बाबाचं रहस्य" उलगडायचं राहूनच जातंय.विद्या,(एकदम तिसऱ्याच कॉमेंट मध्ये एकेरीवर आलोना?पण ते केवळ आणि केवळ आपलेपणा वाटल्या मुळेच)तुझा मिथुन आधी पुण्यातच FTII ला होता हे तर माहित असणारच .नव्हे मी गृहीतच धरलंय,पण त्याने तेथेच हेलेन बरोबर लग्न सुद्धा केल होत हे माहित नसेल असं मी उगीचच गृहीत धरतोय.हि हेलेन म्हणजे आपली डान्सर हेलेन नाही तर तेव्हाची त्याची तिथली मैत्रीण.तो नंतर मेन स्ट्रीम मध्ये यायच्या आधीच तिच्या बरोबर त्याचा घटस्फोट सुद्धा झाला हा भाग वेगळा.योगिता बिगीता खूप खूप नंतरच्या.म्हणजे इव्हन दुलाल गुहाच्या,अमिताभ-रेखाच्या दो अनजाने मध्ये त्याने साइड किक पेक्षा सुद्धा जो खालचा रोल केला होता त्याच्या आधीची.योगिताला त्याने नंतर खूप नाव झाल्यावर हळूच किशोरकुमारच्या घरातून पळवली, असो.तुला वाटायचं जबरी पिळ्तोय.

  ReplyDelete
 50. बाबा सातारे मुंपुणेकर असं काहीसं झालंय..पण मस्तच जमलीय भयंकर (हा माझा प्रचंड भारी बरं का?) आवडलं बघ..फ़क्त प्रतिक्रिया निवांत आलीय कारण माझी आजकाल मध्ये मध्ये "टैमप्लीज" असते नं...:)

  BTW do I always come here to make it 50 for thecomments?? (and beleive me I like to see the 50s...)

  ReplyDelete
 51. देवेन,
  धन्यवाद भाऊ...स्पेशली 'क्या बात! क्या बात! क्या बात!' बद्दल..

  ReplyDelete
 52. mynac,
  अरे हे शब्दच आपला त्या त्या काळाशी, स्थळाशी जोडून ठेवणारा दुवा असतो.. 'काटा' लय आवडला शब्द...!
  अरे आपलेपणा वाटतो ह्यातच सगळं आलं! मी तर तुला पहिल्या कॉमेंटपासून अरे-तुरेच करतोय की! :)
  आणि अरे, मिथुनदाबद्दल ही इन्फो मला नवीन आहे...योगिता पहिली नव्हे आणि किशोरदाच्या घरातनं पळवली, हे ठाऊक होतं मला...इव्हन श्रीदेवी पुराणही ठाऊक आहे मला..पण हेलन हे नवीनच...त्याच्याबद्दल प्रत्येक माहिती आवडतेच आपल्याला! :P
  खूप धन्यवाद रे!

  ReplyDelete
 53. हाहा अपर्णा,
  खरंच आज माझं दुसरं अर्धशतक आणि ह्याचीही अर्धशतकी धाव तूच काढलीस...लय लय आभार बघ! :)
  रच्याक,
  मलासुद्धा भयंकर हा शब्द भयंकर आवडतो..माझी आई वापरते कधी कधी!

  ReplyDelete
 54. कुठच्या कुठ धरून फटाक आपटलीस हि पोस्ट
  च्यामारी लय म्हंजी लयच भारी बर का
  नादचखुळा

  ReplyDelete
 55. विक्रम,
  अरे लय जिव्हाळ्याचा विषय आहे राव!
  प्रतिक्रियेमध्ये जबरा शब्द वापरल्याबद्दल मंडळ आभारी आहे.. ;)

  ReplyDelete
 56. विद्या धन्यवाद.हि अवांतर किंबहुना बिन कामाची माहिती असण किंवा होण किंवा करून घेण हे आपण त्याच्यात कुठ तरी,कधी तरी,केव्हा तरी गुंतलो असायचच लक्षण,होत,आहे आणि राहील.पट्ठ्याला दाद ह्याच्या साठी फक्त द्यावीशी वाटते कि योगिता जेव्हा बऱ्यापैकी नाव असलेली हीरोईन होती आणि इंडस्ट्री तिला पिंकी नावाने ओळखायची तेव्हा म्हणजे ७२-७३ चा नवीन निश्चल-योगिता-अमिताभचा "परवाना" आठवतोय? तो आणि थोडा फार त्याच्या नंतरचा काळ त्याकाळी ह्याने म्हणे योगिताला एका पार्टीत बघितली आणि ठरवून टाकलं कि आता (शेवटचे)लग्न करीन तर फक्त हिच्याशीच......नंतरचा इतिहास हेतुपुरःस्सर टाळतोय. असो.अजून काही असंच अवांतर पुन्हा कधीतरी,केव्हा तरी,कशाला तरी... फक्त खपली काढायला.

  ReplyDelete
 57. अरे mynac,
  लय भारी रे...तुला जबराच माहिती आहे प्रभुजींची!
  नक्की नक्की सांगत जा अधून मधून..मला आवडतं जाम!
  सिनेमाशी संबंधित सगळंच!
  :))

  ReplyDelete
 58. Anonymous10:54 AM

  इथे वर इतक्या जनांनी इतके काही लिहिले आहे की वेगळे काही लिहायला आमच्याकडे शब्दच उरले नाहीत.

  ReplyDelete
 59. झंप्याभाऊ,
  ब्लॉगवर स्वागत!
  प्रतिक्रियेबद्दल आभार! असेच भेट देत राहा!

  ReplyDelete
 60. विभी, अरे स्वातंत्र्य आणि कैच्याकै वर टाकलेल्या दोन्ही प्रतिक्रिया दिसतच नाहीयेत.... कुठे गेल्या बाई... :(

  ReplyDelete
 61. काही कळत नाही गं..
  ऍक्च्युअली मी हल्ली ते वर्ड व्हेरिफिकेशनही काढून टाकलंय..! :(

  ReplyDelete
 62. निदान त्या नंतरच्या कमेंटस तरी दिसता आहेत नं...:) ब्लॉगर गंडले असेल तेव्हां कदाचित.

  ReplyDelete
 63. ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ... लौsssली झालिये पोस्ट

  ReplyDelete
 64. सौरभ,
  धन्यवाद रे भाऊ!

  ReplyDelete
 65. shekhar11:09 PM

  तसे प्रत्येक पिढीचे काही खास शब्द असतात। आमच्या वेळी " वडील " हा शब्द "खुप छान" या अर्थी वापरला जायचा। तो काय "वडील" गायलाय काल। काय "वडील" मुलगी आहे ती । "माफ" हा शब्द "बकवास" या अर्थी होता । काय "माफ pj" होता तुझा ।

  ReplyDelete
 66. शेखर,
  खरं आहे... आमचे अन आत्ताच्या शाळकरी मुलांचे शब्दसंग्रह एकदम वेगवेगळे असतात.. तरी काही काही शब्द आपलं स्थान टिकवूनही ठेवतात! :)
  धन्यवाद!

  ReplyDelete