12/02/2010

कधी कधी वाटतं...

(टीप - सदर कविता स्वतःच्या जवाबदारीवर वाचावी. आधी ही कविता आहे का हेच नक्की नाहीय, तरीही.)

कधी कधी वाटतं...

आरशात पाहताना प्रतिबिंब दिसावं...आणि ते ओळखता यावं...

कधी कधी वाटतं...

आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...

कधी कधी वाटतं...

गुलाब कुस्करला जाताना...बोटही रक्तबंबाळ व्हावं...

कधी कधी वाटतं...

वाट फुटत राहावी ...निवडावी लागू नये...

कधी कधी वाटतं...

पावलं पडत राहावीत...अन् वाट कधी संपू नये...

कधी कधी वाटतं...

चुकीच्या वाटेवर चालतानासुद्धा...धीर मात्र खचू नये...

कधी कधी वाटतं...

मागे वळून पाहताना...नजर अनोळखी वाटावी...

कधी कधी वाटतं...

श्वासांचं गणित मांडताना...एखादा हातचा निसटून जावा...

कधी कधी वाटतं...

एकदातरी उडता यावं...अन् क्षितिजापुढचं पैलतीर दिसावं...

कधी कधी वाटतं...

एकदातरी...स्वतःला डोळेभरून पाहता यावं...

43 comments:

  1. >> आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...


    हे जाम जाम आवडलं !

    ReplyDelete
  2. >> आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...


    हे जाम जाम आवडलं !

    +1

    ReplyDelete
  3. भारी आहे कविता... केशव मेश्रामांना टफ फाईट... :-)

    ReplyDelete
  4. वाह बाबा..मस्तच जमलीय..

    आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...हे जाम जाम आवडलं ! +1

    ReplyDelete
  5. >> आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...+100
    pan bara aahes na vibhi...kalji ghe re baba....

    ReplyDelete
  6. अरे पंत.. पद्याच्या राज्यात घुसले...
    लक्षणं काही ठीक दिसत नाहीत...
    कविता मात्र जमली आहे.. सुपर...

    ReplyDelete
  7. बाबा, बरा आहेस ना. कविता.
    कधी कधी वाटत.....
    आपणही एक कविता करावी .....आणि सर्वांनी ती वाचावी.

    मस्त.

    ReplyDelete
  8. शेवटच्या एका ओळीत कविता कुठल्या कुठे घेवुन गेलाहेस मित्रा !
    मुजरा सरकार :)
    मंडळात स्वागत आहे :)

    ReplyDelete
  9. आता विभी तुला कविताच सुचणार रे...गाडी लाईनीवर आली म्हणायची...आता आनंद आणि सचिन ला पण सुचु लागतील..सगळे कवितेच्या राज्यात...

    ReplyDelete
  10. 'कधी कधी वाटतं...
    एकदातरी उडता यावं...अन् क्षितिजापुढचं पैलतीर दिसावं...'
    छान! सुंदर! :)
    मला कधी कधी वाटतं...
    एखादा क्षण 'लूप' मध्ये टाकावा...!'
    :)

    ReplyDelete
  11. Anonymous11:14 PM

    क्या बात... क्या बात..... क्या बात!!
    आणि एक मोठ्ठा ग्रॅंड सॅल्यूट :)

    बाबा अप्रतिम... आता तू कधी कधी नाही तर नेहेमीच कविताही किंवा असले काहीतरी लिहावेस असे मला वाटतेय....

    सगळ्यांना आवडलेली ओळ तर आवडलीच पण संपुर्ण पोस्ट सुंदरच...

    ReplyDelete
  12. Excellent dude !!!!!!!!!

    ReplyDelete
  13. कविता वगैरे जमत नाही, तूच लिहल होतस ना ?
    ती पोस्ट कॅन्सल..
    कविता छान आहे. :)

    ReplyDelete
  14. विद्याधरा, अरे एकदम हे काय? अजून मायदेशी पोचलाही नाहीस तू... तोच... बाकी कविता सहीच आहे.
    नेमके मर्म आणि खंत पकडलीस पाहा शेवटच्या चार शब्दात...

    ReplyDelete
  15. हेरंब,
    धन्यु :)

    ReplyDelete
  16. नॅकोबा,
    धन्यावाद भाऊ!

    ReplyDelete
  17. संकेत,
    आभार भावा...पदवीच दिलीस की रे तू इतक्यातच ;)

    ReplyDelete
  18. सुहास,
    प्रयत्न रे... अजून शिशु आहे मी.. :D
    आभार भाऊ!

    ReplyDelete
  19. माऊताई,
    :D
    अगं आप आणि सपाचे दिवस आहेत...पण त्यांनी कविता सोड ब्लॉग लिहिणंही सोडून दिलंय... म्हणजे बघ आता ;)
    मी बराच आहे अजून तरी :P

    ReplyDelete
  20. आनंद,
    अरे अपघातानंच शिरलोय कवितेच्या राज्यात... ;)
    आता कविता हाताला धरून बाहेर काढायची वाट पाहतोय :)

    ReplyDelete
  21. सचिन,
    भाऊ अरे अगदी तसंच वाटत होतं मला... :)
    धन्यु रे!

    ReplyDelete
  22. विशालदादा,
    धन्यवाद रे...तुझ्याकडूनही थाप मिळाली म्हणजे मिळवली... :)

    ReplyDelete
  23. अनघा,
    हो ना...तसं मलाही वाटतं कधी कधी... :)
    कधी कधी वाटतं...
    कधी कधी वाटतं ला अगणित दुसरी वाक्य जोडता येतील ;)
    करून बघा तुम्हीसुद्धा ...

    ReplyDelete
  24. तन्वीताई,
    अगं धूसरसं सुचतं कधी कधी..पण असंच तुटक, तुकड्या तुकड्यांचं...ह्यावेळ मात्र थोडंसं मूर्त स्वरूप आल्यागत वाटलं म्हणून पोस्टलं हिम्मत करून.. :)

    ReplyDelete
  25. विक्रांत,
    खूप खूप आभार! :)

    ReplyDelete
  26. मस्त मस्त मस्त.. आवडली आपल्याला !!!!!!! सुंदर लिहीलंस.. कविता नाहीये रे ही टेक्नीकली, एक-एक ओळ म्हणजे सुंदर सुविचार आहे ;)
    जाम आवडलं आम्हाला !! ब्लॉगविश्वातून तात्पुरता निरोप घेतांना छान वाचून जातोय याचा आनंद झाला..धन्यवाद !

    ReplyDelete
  27. मीनल,
    :D
    "ती पोस्ट कॅन्सल" वाचून एकदम शाळाटायमाची आठवण झाली :)

    ReplyDelete
  28. श्रीताई,
    अगं मनानं ऑलरेडी पोचलोय ना तिथे! :)
    तुला आवडली मला छान वाटलं :)

    ReplyDelete
  29. संकेतानंद,
    अरे परवा एक बझ टाकला होता..त्यावरून सुचलं असं काहीतरी करायचं ;)..कविता आहे की नाही ह्याच संभ्रमात होतो मी...
    तू तात्पुरता निरोप घेतोयस ह्याचं मात्र थोडं वाईट वाटतंय..ये लवकर परत..मग आपण मिळून कैपाडू ;)

    ReplyDelete
  30. चॅप्टर टु : द पोएट ऑफ मिलान!
    हे हे हे !!
    धन्य बाबा ! मस्त जमलिए !

    ReplyDelete
  31. Sahiii....!!! :-) :-) :-)

    ReplyDelete
  32. दीपक,
    :D सही..तुझ्या लक्षात आहे..!!
    धन्यवाद रे!!

    ReplyDelete
  33. मैथिली,
    धन्स गं! :)

    ReplyDelete
  34. अरे वा! कविता पण आता! छान!
    बरेच दिवसांनंतर भेट दिली ब्लॉग ला. छान जमलिये कविता.

    ReplyDelete
  35. कविता कि नवकाव्? ,सुंदर छान मस्त ,लई भारी आहे

    ReplyDelete
  36. कपिल,
    धन्यवाद रे भावा...भेट देत राहा अधूनमधून!! :)

    ReplyDelete
  37. महेशकाका,
    नवकाव्यच बहुतेक.. धन्यवाद :)

    ReplyDelete
  38. I read it twice in two different mood... both time liked it :)

    ReplyDelete
  39. सौरभ,
    धन्स भावा! :)

    ReplyDelete
  40. बाबा रे काय झाल आहे तुला??
    सार काही ठीक आहे ना??

    >>>आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये.

    हे खुप आवडल...मस्त मस्त मस्त...

    ReplyDelete
  41. योगेश,
    आहे रे..अजून तरी सर्व काही ठीक आहे ;)
    धन्स भाऊ!!

    ReplyDelete
  42. पावलं पडत राहावीत...अन् वाट कधी संपू नये...... :)

    तू पोस्टा पाडत रहा... कैच्याकै आवरा होईल तेंव्हा सूचित केले जाईल.. :D

    ReplyDelete
  43. रोहना,
    :D
    धन्यवाद भावा...!!

    ReplyDelete