3/13/2011

भोग

(माझ्या सर्वांत आवडत्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'ओल्डबॉय' (हिंदीत 'ज़िंदा' ही निर्लज्ज, भ्रष्ट कॉपीदेखील आहे). त्यामध्ये मध्यवर्ती पात्राला अचानक किडनॅप करून कोठडीत बंद केलं जातं. कशासाठी, कुणी, किती काळासाठी ह्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. खोली एखाद्या हॉटेलच्या खोलीसारखी मूलभूत सोयींनी युक्त, पण बाकी काहीच नाही. अशी चौदा वर्षं तो काढतो. त्याच्या अवस्थेवर सुचलेली एक कविता. अर्थात कविता जास्त कळण्यासाठी सिनेमा बघितलेला असणं चांगलं. पण एक वॉर्निंग ही की हा सिनेमा फार म्हणजे फारच बोल्ड आणि हिंसक आहे, सर्वांना झेपणारं काम नाही.)

एकांती बसलो इथे मी
शांत अन हतबुद्धही
पाहतो चोहीकडे अन
नाही पाहत काहीही

दृष्टीस पडणे हे कधी का
पाहण्यासम भासते?
स्थिरचित्रही भिंतीवरीचे
पाहूनी मज लाजते

चलचित्र जेव्हा माणसांचे
भ्रम उभारू लागले
गंध अन संवेदनांचे
बंध निसटू लागले

एक केवळ गंध उरला
गूढ अन परिचित असा
संगीत येई घेऊनी ते
मूर्च्छनेचा एक ठसा

मोजतो मी दिवस वर्षे
अन कधी सेकंदही
वाट बघणे हेच हाती
निस्तेज मग ते अंकही

सर्वकाही तेच ते पण
भास अन आभासही
वीट येतो घेऊनी ते
श्वास अन उच्छवासही

सोडले जेव्हा पळांचे
मांडणेही गणित मी
मांडला मी ठोकताळा
केली मी पापे किती

कोण तो घायाळ इतका
सूड ज्याचा संपे ना
कोण जो निष्ठुर इतका
की मला संपवेही ना

भरली मग पाने वहीची
एकमेकांमागुनी
थक्क झालो मी पुन्हा
ती सर्व पापे पाहूनी

एकदा मी फक्त त्या
चळतीकडे मग पाहिले
भोग माझ्या भाळीचेही
शेवटी ओशाळले

34 comments:

  1. एक केवळ गंध उरला
    गूढ अन परिचित असा
    संगीत येई घेऊनि ते
    मूर्च्छनेचा एक ठसा...सुंदर....


    भरली मग पाने वहीची
    एकमेकांमागुनि
    थक्क झालो मी पुन्हा
    ती सर्व पापे पाहुनी......
    अहा...क्या बात है !!!!

    ReplyDelete
  2. 'एकदा मी फक्त त्या
    चळतीकडे मग पाहिले
    भोग माझ्या भाळीचेही
    शेवटी ओशाळले'

    खूप परिणामकारक आहे...

    ReplyDelete
  3. Anonymous9:29 PM

    >>> एकदा मी फक्त त्या
    चळतीकडे मग पाहिले
    भोग माझ्या भाळीचेही
    शेवटी ओशाळले

    जम्या रे बाबा एकदम सही जम्या...

    लिहीत रहा ’बाबा’ तू....

    ReplyDelete
  4. क्या बात...क्या बात.. मस्तच जमली आहे.

    ReplyDelete
  5. सुंदर! सिनेमा मनापासून पाहिलास आणि कविता लिहिलीस हे कळतंय. आवडली कविता.

    ReplyDelete
  6. मस्त्..सुंदर...अप्रतिम..मनाला भावली रे बाबा...!!

    ReplyDelete
  7. >>मोजतो मी दिवस वर्षे
    अन कधी सेकंदही
    वाट बघणे हेच हाती
    निस्तेज मग ते अंकही

    मस्त! ओल्डबॉयवाल्याला सूट होतात. :)

    >>सर्वकाही तेच ते पण
    भास अन आभासही
    वीट येतो घेऊनी ते
    श्वास अन उच्छवासही

    मस्त! बर्‍याच जणांना सूट होतात. :)

    यावरुन ठाकूरांच्या ओळी आठवताहेत.
    I keep gazing on the far away gloom of sky, & my heart wonders wailing with the restless wind..
    हा Restlessness तुझ्या कवितेत जाणवतोय.

    ReplyDelete
  8. बाबा! सुपर्ब! ग्रेट! खूपच भावली! लिहित रहाच!

    ReplyDelete
  9. सुपर्ब !!! प्रचंड आवडली. तू खरंच उत्कृष्ट कवी आहेस !!

    ReplyDelete
  10. माऊताई,
    मी त्या सिनेमात आणि खासकरून त्या व्यक्तिरेखेत खूप इन्व्हॉल्व्ह झालेलो काल सहजच आठवलं आणि मग कविता सुचली.. :)

    ReplyDelete
  11. अनघाताई,
    त्या सिनेमात पापांचा पाढा लिहून झाल्यावर तो खूप छान वाक्य म्हणतो,
    "I thought I had lived a normal life but.. I have sinned too much."

    ReplyDelete
  12. तन्वीताई,
    ती व्यक्तिरेखा डोक्यात पार भिनलीय माझ्या... आणि काल फार आठवण येत होती त्या सिनेमाची.. :D

    ReplyDelete
  13. योगेश,
    धन्यवाद भावा! :) मंडळ लई भारी आहे ;)

    ReplyDelete
  14. कांचनताई,
    मी पाहिलेला पहिला 'आंतरराष्ट्रीय सिनेमा'.. फार प्रभाव टाकून गेला माझ्यावर... कधीच विसरू शकणार नाही असा!
    धन्यवाद! :)

    ReplyDelete
  15. सारिका,
    खूप खूप आभार! त्या विचित्र सिनेमातल्या विचित्र व्यक्तिरेखेवरची कविता भावली हे पाहून बरं वाटलं! :)

    ReplyDelete
  16. मीनल,
    ओल्डबॉयचा 'तो' बर्‍याच एकटेपणाने ग्रस्त लोकांचा प्रतिनिधी म्हणून पाहता येऊ शकतो.. :)
    आणि,
    >>I keep gazing on the far away gloom of sky, & my heart wonders wailing with the restless wind..
    हे वाक्य छान आहे...आवडलं..
    >>हा Restlessness तुझ्या कवितेत जाणवतोय.
    तो सिनेमा तसंच काहीसं वातावरण निर्माण करतो... Restless आणि Desperate.. :)

    ReplyDelete
  17. विनायकजी,
    खूप खूप धन्यवाद! :)

    ReplyDelete
  18. संकेतानंदा,
    थ्यांक्स फार दि काम्प्लिमेंट डा! :D

    ReplyDelete
  19. Anonymous12:24 AM

    >>> ती व्यक्तिरेखा डोक्यात पार भिनलीय माझ्या... आणि काल फार आठवण येत होती त्या सिनेमाची.. :-D

    अं... अं... हं....

    करू ना मग आज फोन घरी :)

    ReplyDelete
  20. वाह..मस्तचं रे

    ReplyDelete
  21. तन्वीताई,
    हेहेहेहे.... कर कर घरी फोन!!!! :D:D

    ReplyDelete
  22. सुहासा,
    धन्यवाद भाऊ!!! :)

    ReplyDelete
  23. 'ओल्डबॉय' विशेष आवडला नव्हता (त्यामुळे जिंदा तर आउट ऑफ क्वेश्चन) पण तुझी कविता प्रचंड आवडली. अगदी सगळे भाव व्यक्त होतायत ओल्डबॉय मधले !!

    ReplyDelete
  24. कविता सुंदर आहे.. ओल्ड्बॉय अतिशय आवडला होता.. आणि जिंदा त्याआधी पाहील्यामुळं तो ही खुप आवडला होता.. तो भ्रष्ट आणि निर्लज्ज कसा काय बुवा?

    ReplyDelete
  25. हेरंब,
    ओल्डबॉय तसा काही बाबतींत बराच विचित्र असल्याकारणे त्याचे हार्डकोअर फॅन्स कमीच आहेत! अन तसंही आपलं नेहमीच असं असतं :)
    धन्यु रे भाऊ!

    ReplyDelete
  26. आनंद,
    भ्रष्ट अशासाठी की ओल्डबॉयच्या मूळ प्लॉटमध्ये अत्यंत टुकार असे बदल करण्याचा क्षीण प्रयत्न होता आणि निर्लज्ज अशासाठी की कुठलीही परवानगी न घेता, कित्येक सीन्सचे सीन्स कॉपी मारून पुन्हा वर आम्ही प्लेगिअरिझम केलेला नाही अशी सारवासारव! असो!

    ReplyDelete
  27. निर्लज्ज पटलं.. भ्रष्ट नाही..

    ReplyDelete
  28. आनंद,
    तो पर्स्पेक्टिव्ह आहे शेवटी.. ज़िंदातली प्लॉट होल्स मी मोजत बसलो तर आठवडा जाईल माझा अन तरीही तू मान्य करणार तर नाहीस.. त्यामुळे जाऊ दे! :)

    ReplyDelete
  29. अप्रतिम कविता आहे...

    'झिंदा'-साठी Strings -ने गायलेल्या त्या गाण्या एवढेच परिणामकारक ... खरंच अप्रतिम

    ReplyDelete
  30. नमस्कार
    नुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टाचालू झाला आहे.तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास संपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
    धन्यवाद

    ReplyDelete
  31. श्रीराज,
    धन्यवाद रे भाऊ! ते गाणं माझंही प्रचंड आवडतं आहे! :)

    ReplyDelete
  32. मराठीनेटभेटब्लॉगकट्टा,
    धन्यवाद! :)

    ReplyDelete
  33. Anonymous10:24 PM

    बाबा मस्त जमलीये कविता ..बाकी 'ओल्डबॉय' अजून पाहिलेला नाही पण जिंदा मलाही आवडला होता ...

    ReplyDelete