१.राजा हरिश्चंद्र ते मुग़ल-ए-आज़म
२.मुग़ल-ए-आजम ते शोले
३.शोले ते गुंडा
४.गुंडा च्या पुढचे
वरील वर्गीकरण हे माझं स्वतःच्या निरीक्षणाचं अपत्य आहे. अनेकांना ह्यावर अनेक साक्षेपी आक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं म्हणजे सुरूवातीला प्री-गुंडा आणि पोस्ट-गुंडा असे दोनच वर्ग मी करणार होतो. पण मग स्युडो-इंटलेक्च्युअल्स अर्थात दांभिक बुद्धिवाद्यांनी माझ्या प्रस्तुत लेखाकडे वाचनापूर्वीच पाठ फिरवली असती. मला आलमआरासुद्धा टाकायचा होता पण मग अति झालं असतं. म्हणून मग मांडवलीमध्ये मी चार कालखंड केले. नीट बघितलं तर प्री-गुंडा आणि पोस्ट गुंडा हे वर्ग योग्य ठरतात, पण ते सिनेमाच्या एकंदर जडणघडणीच्या दृष्टीने. आज मला सिनेमाच्या अंगभूत घटकांबद्दल ऊहापोह करायचाय, त्यामुळे वरील वर्गीकरण त्यादृष्टीने करण्यात आलेलं आहे.
रंगांबद्दल कदाचित ठाऊक असेल. लाल, पिवळा आणि निळा हे एका थिअरीनुसार तीन मूळ रंग आहेत. बाकी सगळे रंग ह्या तीन आणि ह्या तिघांपासून बनलेल्या रंगांची वेगवेगळी संगती मिसळून बनवता येतात. तर ह्या वैज्ञानिक सिद्धांताशीच मिळतंजुळतं एक स्फोटक विधान मी करणार आहे.
"आजच्या तारखेला बनणारा कुठलाही हिंदी सिनेमा 'राजा हरिश्चंद्र', 'मुग़ल-ए-आज़म', 'शोले' आणि 'गुंडा' ह्या चार मूळ आणि ह्या चौघांपासून बनलेल्या सिनेमांची वेगवेगळी संगती मिसळून बनवला जातो."
संपलं विधान! आता स्पष्टीकरण.
राजा हरिश्चंद्र हे भारतीयत्वाचं आद्य प्रतीक आहे. भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कारांचं सर्वोच्च उदाहरण. चित्रमहर्षी दादासाहेब फाळक्यांनी बनवलेली ही कलाकृती म्हणजे पहिला सिनेमा म्हणजे एका अर्थी भारतीय सिनेमाचा गोत्रपुरूष. तत्कालीन भारतीय मानसिकतेची नस अचूक पकडून त्यांनी जशी चित्रनिर्मिती केली त्याला तोड नाही. आणि तत्कालीन भारतीय मानसिकता आजही मुळाशी तशीच आहे. त्यामुळे हा एक मूलभूत घटक अर्थात महाभूत मानला गेलाय.
मुग़ल-ए-आज़म हा प्रेमकथात्मक भारतीय सिनेमामधला मैलाचा दगड आहे. पराकोटीचं प्रेम आणि पराकोटीची कर्तव्यबद्धता त्यावर पराकोटीचा खर्च असं एक वेगळंच रसायन म्हणजे मुग़ल-ए-आज़म. 'लार्जर दॅन लाईफ' असा गरीब मुलगी व श्रीमंत मुलाचा रोमान्स आणि त्या रोमान्सपायी पार शहेनशाहशी बगावत हे सगळे मसाले तत्कालीन भारतीय सिनेमाला एका वेगळ्या वाटेवर नेण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे हादेखील एक महाभूत मानला गेलाय.
शोले बद्दल मी खरंतर बोलण्याचीच गरज नाही. मुळात शोले हा काही परकीय सिनेमांवरून प्रेरित असल्याचं जरी म्हटलं गेलं असलं आणि प्रथमदर्शनी ते खरंही वाटत असलं, तरी शोलेमध्ये (असलीच तर) मूळ कलाकृतीचं जे काही भारतीयीकरण केलं गेलंय, त्याला तोड नाही. शोलेतला एक एक संवाद आणि एक एक सीन आजही भारतीय मानसामध्ये बसलाय आणि त्यामुळेच त्याच्याशी जवळिक करणारं काहीही उचलून धरलं जातं. शोलेनं भारतीय सिनेमाला अजून एक वेगळी वाट दाखवली आणि ती खूप बहुपेडी होती. म्हणूनच शोलेदेखील एक महाभूत मानला गेलाय.
आता चौथं महाभूत 'गुंडा'. होय. गुंडानं भारतीय सिनेमाला अजून एका नव्याच वाटेवर नेलं. तत्कालीन भारतीय सामाजिक स्थिती आणि स्थित्यंतरं तसंच ह्या स्थित्यंतरामुळे थोडीफार गोंधळलेली सामाजिक मानसिकता ह्यांवर परखड भाष्य करत प्रसंगी अतिशय खालच्या पातळीवर जात लिहिलेले मनोरंजनही करणारे संवाद आणि अत्यंत 'ऍब्स्ट्रॅक्ट' एडिटिंग तसेच कमी निर्मितीमूल्यामध्ये फारच थेट पद्धतीचं आणि नायकाचं मसीहा प्रमाणे केलं गेलेलं चित्रिकरण अशा वेगळ्याच वाटेवरून गुंडाचा प्रवास होतो. ही वाट पूर्वीही अनेक सिनेमांनी चोखाळली होती पण 'गुंडा'चं वेगळेपण आणि श्रेष्ठत्व दोन गोष्टींमुळे अधोरेखित होतं. एक म्हणजे 'गुंडा' ही 'त्या' विशिष्ट वाटेवरची निर्विवाद सर्वोच्च कलाकृती आहे. आणि दोन म्हणजे, 'त्या' वाटेला गुंडाने प्रदर्शनाच्या अनेक वर्षांनंतर राजमान्यता मिळवून दिली. ती दुय्यम म्हणून अभिजनांकडून नाकं मुरडली गेलेली वाट 'मुख्य प्रवाहा'त आणण्याचं श्रेय फक्त आणि फक्त गुंडाला जातं. त्यामुळेच गुंडाला चौथं किंवा चतुर्थ महाभूत म्हणून मी मानलंय.
तर ही झाली भारतीय सिनेमाची 'चतुर्महाभूते'. आजच्या भारतीय सिनेमाला उलटं पालटं करून कसंही पहा, ह्या चौघांपासूनच तो बनलेला असल्याचं तुमच्या लक्षात येईल. कुठलंही उदाहरण घ्या. अगदी 'हम आपके है कौन?' पासून सुरूवात करूया. 'राजा हरिश्चंद्र' ह्या कलाकृतीचं स्पष्ट प्रतिबिंब पडलेलं तुम्हाला दिसेल. त्यातला तळ्याकाठचा रोमान्स वगैरे पाहता 'मुग़ल-ए-आज़म' ही थोडाफार डोकावतो. बाकी कालानुरूप आलेली चकचकाटी निर्मितीमूल्य वगैरे वर्खं आहेत. अस्सल माल हा उपरोल्लेखित दोन महाभूतांपासूनच बनलेला आहे. (टीप - 'हम आपके हैं कौन?' बनेपर्यंत 'गुंडा' प्रदर्शित झाला नव्हता, नाहीतर 'गुंडा' चे निशान देखील दिसले असते.)
शोले ह्या महाभूतापासून बनलेले शेकड्याने सिनेमे असतील, त्यातले कित्येक तर सुपरहिटही ठरले, पण त्यातलं घटक महाभूत तर दिसतच. त्याचबरोबर 'आयटम सॉन्ग' ही देखील शोलेनं भारतीय सिनेमाला दिलेली (माझ्या मते) देणगी आहे. 'मेहबूबा मेहबूबा' ह्या गाण्याच्या अभूतपूर्व यशाने कित्येक सिनेमांमध्ये व्हिलनच्या कॅम्पातलं आयटम सॉन्ग घातलं गेलं असेल ह्याला गणतीच नाही. आणि हल्ली तर कुठेही आयटम सॉन्ग घालता येतं.
यश चोप्रा आणि करण जोहर ह्या द्वयीनं मात्र 'मुग़ल-ए-आज़म' च्या गायीचंच दूध काढायचं ठरवलं. त्यांच्या सर्व कलाकृती 'श्रीमंत बापाचा प्रेम सोडून आयुष्यात कसलीही विवंचना नसलेला मुलगा, प्रेमभंग किंवा प्रेम ह्या दुःखांपलीकडे काहीच दुःख नसलेलं एक जग ज्यामध्ये सगळेजण प्रचंड श्रीमंत असतात, प्रत्येकाला नातेवाईक असतात, नात्यांची जाम काळजी असते, महालांमध्ये राहतात आणि सारखे रडतात' ह्या तत्वांपासून बनतात. त्यामुळे त्यांचे बहुतांश सिनेमे हे 'मुग़ल-ए-आज़म' ह्या महाभूतापासून बनल्याचं स्पष्ट होतं. बाकी, राजा हरिश्चंद्र चं प्रतिबिंबही कुटुंबाच्या एकमेकांशी चाललेल्या वागणुकीवरून स्पष्ट दिसतं. शोले आणि गुंडा मात्र अभावानेच त्यांच्या सिनेमांमध्ये दिसून येतात. कारण ही दोन महाभूतं सर्वाधिक अवघड अशी आहेत.
पण पोस्ट गुंडा इरामध्ये मात्र सुरूवातीच्या कालावधीमध्ये बाकी तीन महाभूतांनीच धुमाकूळ माजवला होता. मी आधीच सांगितल्याप्रमाणे 'गुंडा' ची वाट ही अभिजनांनी नाकं मुरडलेली वाट होती. पण म्हणतात ना, खरं सोनं काळाच्या कसोटीवर नेहमीच जिंकतं. तद्वतच पूर्णपणे दाबून टाकलेलं असून देखील गुंडानं व्हिसीडी आणि इंटरनेटच्या मार्फत जनमनामध्ये चंचुप्रवेश केला. हळूहळू गुंडाबद्दलची जागृती एव्हढी झाली की लोकांना सिनेमात काही ठिकाणी सूचकपणे पेरलेले गुंडाचे रेफरन्स कळू लागले. मग गुंडाची वाट आधीच लोकमान्य झालेली असल्याने अल्पावधीतच राजमान्य झाली आणि त्याला 'सिनेमा ऑफ योअर' असं गोंडस नाव देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची मखलाशी केली गेली. पण आमच्यासारख्या हाडाच्या सिनेरसिकांना 'सिनेमा ऑफ योअर' म्हणजेच गुंडा हे लगेच लक्षात येतं.
पोस्ट गुंडा इरामध्ये 'गुंडा' ची काही वैशिष्ट्य पेरलेले अनेक सुपरहिट सिनेमे आले. जसं चित्रविचित्र वेशभूषा केलेले विनोदी खलनायक, मसीहा आणि पराकोटीचा अन्यायग्रस्त नायक संपूर्ण खलनायकी टोळीला एकहाती नेस्तनाबूत करणारा नायक, यमकामध्ये किंवा कवितांमध्ये किंवा वनलायनर्स मध्ये बोलणारा खलनायक, नायकाने खलनायकाच्या मृत्यूची तारीख (मौत की डेट) फिक्स करणे ही सगळी गुंडाचीच वैशिष्ट्य आहेत आणि ही वैशिष्ट्य लेवून अनेक सुपरहिट सिनेमे आले पण नजीकच्या काळात आऊट ऍन्ड आऊट गुंडा ज्यॉनरवाल्या सिनेमांची लाट आली. उदा. 'गज़नी', 'वॉन्टेड' आणि 'दबंग'.
चतुर्महाभूतांवर मला प्रत्येकी एक पोस्ट ह्या पद्धतीने विस्तृत चर्चा करावी लागेल, त्यामुळे चतुर्महाभूतांबद्दल तूर्तास इतकंच. पुढच्या लेखासाठी पुरेशी पूर्वतयारी झालेली आहे.
तर काल मी दबंग पाहिल्यामुळे आज आपण दबंगची चिरफाड करू. सर्वप्रथम - मला 'दबंग' प्रचंड प्रचंड आवडला. होय, 'वॉन्टेड' नंतर कित्येक दिवसांनी मूलतः 'गुंडा' वर आधारलेला चित्रपट पाहिल्याने असेल, पण जाम जाम मजा आली. मला कशी कुणास ठाऊक पण प्रचंड लवचिकपणे सिनेमा पाहण्याची हातोटी जन्मजात मिळालीय. त्यामुळे मी चित्रपटाच्या ज्यॉनरनुसार आपोआपच चष्मा बदलून सिनेमा पाहतो, त्यामुळे 'डेकालॉग' असो वा 'चांदनी चौक टू चायना' (होय मी हादेखील एन्जॉय केला होता) मला कंटाळा वगैरे प्रकार सहसा येत नाही. आणि 'दबंग' तर प्रत्यक्ष धर्मचित्रपटाशी साधर्म्य सांगतोय अशी हवा असल्याने मी चित्रपट सुरू व्हायच्या आधीच योग्य चष्मा लावून तयार होतो.
पण मजा इथेही झालीच. जेव्हा एखादा सिनेमा मला एकाच वेळी एकाहून जास्त चष्मे लावायला मजबूर करतो, तेव्हा मला तो सिनेमा जास्त आवडतो. 'दबंग'चं तसंच आहे. तो 'गुंडा' प्रमाणेच विसंगत आविर्भाव आणून अनेक ठिकाणी व्यवस्थेला शालजोडीतले लगावत पुढे सरकतो. 'सरकारतर्फे जखमी पोलिसांना ५०००० आणि मेलेल्यांना १ लाख' हा प्रसंग असू दे किंवा 'मोटे वाले उस तरफ, पतले वाले इस तरफ और फिट वाले मेरे पीछे' म्हणून मागे वळून जेव्हा नायक पाहतो, तेव्हा मागे कुणीच नसल्याचं पाहून तो म्हणतो 'क्या हो गया है पुलिस फोर्स को!' किंवा 'वो डकैत हमारे फंडरेजर थे और उन्होने रेज किया हुआ फंड आप ले गये' हा प्रसंग असू दे. त्यानंतर पोलिओ झालेल्या माणसाला 'बचपन में दो बूंद नहीं पिलायी क्या?' अशा संदेशपर प्रसंगात 'बाप को शराब पीनेसे फुरसत नहीं मिली' असं सणसणीत आणि विचित्रपणे दाहक ब्लॅक कॉमेडी स्टाईल उत्तर अशा विविध छोट्या छोट्या वरवर विसंगत वाटणार्या पण साथीनेच प्रचंड मनोरंजन करणार्या प्रसंगांतून दबंग पुढे सरकतो.
'वॉन्टेड' प्रमाणेच तोंडात बसतील असे डायलॉग्ज हे 'गुंडा' वरून घेतलेलं वैशिष्ट्य.
"१०१ कमिनों की बलि चढाई थी हमारे मां-बाप ने तब जाके हम पैदा हुए थे।" मुख्य खलनायक.
"हम उन्ही १०१ कमिनों के भगवान हैं, बदला लेने के लिये आये हैं।" नायक.
"जंगल में रहके सेर से बैर! देखो भैया हम आदमी थोडे जटिल किस्म के हैं।" मुख्य खलनायक.
"जंगल में शेर कम और शिकारी ज्यादा हो गये हैं, ज्यादा ज़ोर से दहाडना नहीं, वरना चमडी भी उधड सकती है!" नायक.
असले एक से एक गुंडा स्टाईल डायलॉग्ज. त्यात मुख्य खलपात्राचं नाव 'छेदी सिंग' हे 'गुंडा'तल्या मुख्य खलपात्राच्या नावावरूनच प्रेरित झाल्यागत वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे 'गुंडा' प्रमाणेच मुख्य खलपात्र इथेही नायकाच्या जवळपास संपूर्ण कुटुंबाच्या विविध प्रकारे छळाला कारणीभूत होतो. 'गुंडा'त नायकाच्या बहिणीचा वापर होतो, इथे भावाचा. 'लंबा करणे' हा वाक्प्रचार, जो की गुंडामुळे प्रसिद्ध झाला, त्याचाही कौशल्यपूर्वक कथानकामध्ये वापर करण्यात आलाय. एकट्याच धावणार्या नायकावर काटकोनात होत असलेला गोळीबार लगेच 'गुंडा'तला सीन डोळ्यापुढे आणतो. शेवटाकडे जेव्हा नायक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा घेऊन खलनायकाकडे पोचतो, तेव्हा गुंडातल्या ऍबॅसेडर्सचा आणि शेवटाकडला रिक्षाचा सीन तडक डोळ्यासमोर येतो. आणि गुंडाप्रमाणेच एव्हढं सगळं असूनही शेवटी खलनायकाबरोबर नायक वन ऑन वन फाईट करतो. पण खलनायकाचा शेवट मात्र वेगळा घेतलाय. तो मात्र 'गुंडा' तल्याच खलपात्राच्या भावाच्या खुनाप्रमाणे 'काव्यात्म न्याय' दर्शवणारा आहे.
बाकी, सलमानच्या पात्राची बिनधास्त दबंगाई आणि काय वाटेल ते करण्याची स्टाईल खरंच प्रभुजी मिथुनदांची आठवण करून देते. सलमाननं 'चुलबुल पांडे' पेललायही जबरा. एकीकडे तो दिसेल त्या खलपात्राला आणि मधे तर भावालासुद्धा हवा तसा फिरवून उडवून ठोकतो. कुठूनही कुठेही उड्या मारतो, गोळ्या घालतो. आणि त्याचबरोबर त्याचं भावाला ठोकताना गॉगलमागचं डोळे पुसणं, आई दगावल्याचं लक्षात आल्यावर दबंगाईच्या बुरख्यामुळे नीट रडताही न येणं आणि बापासमोर आपल्या दबंगाईचं खरं स्वरूप सांगताना हलकेच डोळ्यातून पाणी काढणं अशा प्रसंगांमुळे सिनेमाला बॅलन्स मिळतो. काही ऍक्शन सिक्वेन्सेस, 'मुन्नी बदनाम हुई' हे व्हिलनच्या कॅम्पातलं आयटम सॉन्ग, प्रेमामुळे बदलणारा नायक आणि यूपीचा बॅकड्रॉप हे 'शोले' ह्या महाभूतावरून घेतलेले प्रकार आहेत. स्वप्नवत रोमान्स, गरीब मुलगी हे 'मुग़ल-ए-आजम' वरून तर कुटुंब आणि नीतीमूल्य हे प्रकार 'राजा हरिश्चंद्र'वरून. एकंदरच 'दबंग' हे योग्य मिश्रण आहे.
त्यातही दिग्दर्शक अभिनवसिंग कश्यप (मी ऐकल्याप्रमाणे हा 'अनुराग कश्यप' चा धाकटा भाऊ आहे) काही ठिकाणी आपल्यावरचा टॅरँटिनोचा प्रभाव दाखवतो. वेगवेगळ्या ठिकाणी मारामारी करताना मधेच सलमानच्याच लोकप्रिय गाण्यांचे रिंगटोन्स व्हिलनच्या मोबाईलवर वाजू लागतात (इथे एक चूक आहे, सलमान ह्याला 'कॉलरट्यून' म्हणतो, जे माझ्या मते चूक आहे) आणि सलमान नाचता नाचता मारामारी सुरू करतो. पुन्हा लग्नाच्या वेळी बँडवाले 'अनुराग कश्यप'च्या सिनेमातलं गाणं वाजवतात. सिनेमाभर सलमान असताना 'काऊबॉय' सिनेमांच्या पद्धतीचं पार्श्वसंगीत वाजतं. सलमान स्वतःला रॉबिन हूड म्हणतो. अशा प्रकारे टॅरँटिनो स्टाईल इन-रेफरन्सिंग बरोबरच, सलमानची भ्रष्ट पोलिसांची टोळी आणि सलमान आपापसात जसं बोलतात (म्हणजे गंभीर विषयांवर एकदम कॅज्युअली), ते थोडंफार टॅरँटिनोच्या 'पल्प फिक्शन' वरून प्रेरित वाटतं. असो कदाचित मी अति सूक्ष्म निरीक्षणात शिरतोय.
अर्थात दबंगमध्येही अनेक सुटलेल्या जागा आहेत. पण सिनेमाचं विचित्र ज्यॉनर अशा गोष्टींना माफ करतं. अप्रतिम काम करणारा खलनायक सोनू सूद आणि सुंदर दिसणारी(थोडाफार अभिनय देखील करणारी) नायिका सोनाक्षी सिन्हा हे सिनेमाचे उर्वरित चांगले भाग. बाकी सिनेमात फक्त आणि फक्त सलमान आहे. 'गुंडा' प्रमाणेच नायकाचे नातेवाईक (विनोद खन्ना, डिंपल कपाडिया आणि अरबाज़ खान) हे फक्त खलनायकाशी वैयक्तिक शत्रुत्व निर्माण करण्यासाठीच सिनेमात आहेत.
एकंदर जवळपास ६०% गुंडा एलिमेन्ट असणारा 'दबंग' एकदातरी प्रत्येक सामान्य सिनेरसिकाने आणि 'गुंडा'ने भारतीय सिनेमा आणि सिनेरसिकांच्या आवडीनिवडींवर केलेले दूरगामी परिणाम पाहण्यासाठी सिनेअभ्यासकांनी पहायलाच हवा.
माझ्या मते ज्याप्रमाणे दारूच्या बाटलीवर ज्या पद्धतीनं किती टक्के अल्कोहोल आहे हे लिहिलेलं असतं, त्यापद्धतीनं प्रत्येक सिनेमाच्या पोस्टरवर किती टक्के 'गुंडा' आहे ते लिहायला हवं. जेणेकरून प्रेक्षकांना 'चष्मा' लावायला सोयीचं जाईल. आणि मी फक्त 'गुंडा' हे महाभूत एव्हढ्याचसाठी म्हणतोय कारण तेच सगळ्यांत 'स्ट्राँग' महाभूत आहे.
सलाम .........
ReplyDeleteछान लेख. अशा चश्मातून कधी बघितले नव्हते सिनेमांकडे.
ReplyDeleteडेव्हीड धवन/गोविंदा किंवा अंदाज अपना अपना कुठे बसतात असाही विचार आला.
विद्याधर, आधीही कधीतरी मी तुझी एक पोस्ट अर्धवट वाचली होती आणि त्याच्या सुरुवातीलाच तू म्हटलं होतंस कि बॉलीवूडचा तुझा सर्वात लाडका सिनेमा म्हणजे जंजीर. त्याचवेळी वाटलं होतं कि आपली मतं जुळतायत. आणि आज तुला दबंग खूप आवडला हे वाचून मला जे वाटलं होतं त्याला पुष्टीच मिळाली. मी आणि माझ्या लेकीने दबंग अतिशय एन्जॉय केला. मनसोक्त हसलो. शिट्या मारता येत नाहीत ह्याचे अगदी दुखः देखील केले. आणि एक गंमत म्हणजे आमच्या शेजारी बसलेले आजीआजोबा देखील आमच्या बरोबरीने खिदळत होते! फक्त दुसऱ्या दिवशी हा सिनेमा आम्हांला इतका आवडला हे ऐकून बऱ्याच भुवया उंचावल्या! आणि त्या भुवयांना परत आपापल्या जागी आणण्यासाठी मी देखील त्यांना हेच सांगितले होते! जॉनर वेगळा आहे...तुम्हांला त्या पठडीत देखील शिरता यायला हवे, तरच त्यातील गंमत कळेल...! ही पोस्ट लिहिल्याबद्दल आभार. :)
ReplyDeleteदबंग मी सुद्धा ताजा ताजा पाहिलेला असल्याने त्यातील दृश्य अजूनही प्रभावीपणे लक्षात आहेत. सारखे सारखे एकाच पठडीतले सिनेमे पब्लिक कंटाळलं होतं. काहीतरी मसालेदार हवं होतं, तेव्हा नेमक्या वेळेस दबंगची एन्ट्री झाली. कथानक सुमार असलं तरी डायलॉग्स मात्र प्रचंड सणसणीत होते. ते ज्या पद्धतीने हाताळले गेले त्याचं विशेष वाटतं कारण मुद्दाम डायलॉग मारायचाय म्हणून तसा संवाद लिहिला आहे असं वाटलं नाही.
ReplyDeleteहल्लीच ’वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ पाहिला (मुंबईच्या इंग्रजी स्पेलिंगमधे एक ए जास्त का टाकला कळलं नाही). त्यातही सुंदर डायलॉग्स आहेत. अजय देवणगण ते आपल्या स्टाईलने म्हणतो, तामुळे आणखीनच जबरी वाटतात.
हाहाहा.. अशक्य.. मी दबंग आणि गुंडा दोन्हीही पाहणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं ;)
ReplyDeleteसही आहे. दबंग पहायला हवा एकदा. आपल्या धर्मचित्रपटाचा ६०% अंश आहे या चित्रपटात म्हटल्यावर तर नक्कीच दर्शन घ्यायला हवं दबंगचं. आणि तेही मोठ्या भक्तिभावाने... ;-)
ReplyDeleteहाहा.. लोळालोळी.
ReplyDeleteसिनेमा जरी आवडला नसला (आमच्याकडं एकच चष्मा आहे, दुर्दैवाने) तरी लेख मात्र प्रचंड भावला.
बाबा जा रे ... अरे दोन दिवस आधी तर पहायचा दबंग...लगेच पोस्टायचे... मी परवा दबंग न पहाता We are family :(( पाहिला..... अर्थात ९५% प्रजा जाम जाम रडली, मी पण सुरूवात केली पण अमितने अशी काही कॉमेंट्री केली सुरू की आम्ही खो खो हसलो शेवटपर्यंत...
ReplyDeleteबाकि दबंग हमको आवडॆंगा नही ये तो मालूम है पण तुम्हारी पोस्ट वाचके अब जब वो टि व्ही पर आयेंगा तब हम ज्यरूर देखेंगे!!
(तसंही आपल्याला सगळे सिनेमे आवडतात हे आपले स्लोगन आहेच ना!!! :) )
सिनेमा कालच पाहिला. मस्त आहे एकदम .. फुल्ल टाइम पास.
ReplyDeleteएक वर्ग विसरलास तू.. तो म्हणजे राजा, राजवाडे, राजकन्या वगैरेचा काळ. त्या काळातले सिनेमे पण मस्त रहायचे. मला राजकुमार हा तद्दन ठोकळा असलेल्या राजेंद्र कुमारचा सिनेमा खूप आवडला होता. तसेच धर्म विर च्या पठडीतले सिनेमे ( काल्पनिक ) आवडायचे..
लेख मस्त झालाय.
मुण्ड्रु मुगम नावाचा रजनीचा एक चित्रपट आहे. (हिंदीत जॉन जॉनी जनार्दन)त्यात खलनायक एकम्बागम म्हणतो, माझं नाव ऐकल्यावर पाळण्यात रडणारं पोरगंही गप्प बसतं.
ReplyDeleteत्यावर रजनी म्हणतो, "आणि इन्स्पे. जॉन फर्नांडीस हे नाव ऐकल्यावर तेच रडणारं पोरगं एक हात स्वतःच्या तोंडावर आणि दुसरा हात आईच्या तोंडावर ठेवून गप्प बसवतं."
असे संवाद आजकाल ऐकायला मिळत नाहीत. बाकी दबंग कधी आद(ढ)ळला टीव्हीवर तर पाहू. एरवी आमच्यासाठी दक्षिण भारतीय चित्रपटांचा खुराक पुरेसा आहे.
:)
ReplyDeletesamikshak salam
I generally do not watch movies. If I watch , I watch them in pieces.. half an hour today and next half hour after few months etc. Hindi cinema always maintains the link, so no problem! BTW, who has written the dialogues?
ReplyDeleteBaba....... Dhanya jahalo.....Sagle Sahich...Ek Univ rahili....
ReplyDeleteDabangg che dialogues Gunda prerit nasun "Rajni" prerit ahet he swami sanketanand namud karu icchitaat..
Apalya ya dhaadashi davyache aamhi rajni-sampradaayi trivar nishedh karto.. MIND IT I SAY.....
शेवटी पाहिलास ना दबंग...वर्गीकरण योग्यच रे...संदर्भही छान दिलेस...ब्लॉगच नवीन रुपडपण मस्त...लगे रहो बाबा..तुझ्यासारखाच एक फ़िल्लमवेडा...
ReplyDeleteजबर्या रे.. साला गेले दोन विकांत तिकीट मिळत नाही आहे. दबंगचा रिव्हू आणि वर कांचन आणि तुझी पोस्ट वाचून कधी एकदा दबंग पहातो असं झालंय. "वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई"मध्ये अजयच्या डायलॉगनी मज्जा आणली होती आत्ता द बंगचे डायलॉग एन्जॉय करू...
ReplyDeleteविभि..भारी रे....च्यायला चित्रपटांचा किती अभ्यास केला आहे.
ReplyDeleteएवढाच अभ्यास तु Engineering ला पण केला होता का रे??? :) :)
>>>> एवढाच अभ्यास तु Engineering ला पण केला होता का रे??? :) :)
ReplyDelete:)
अजून एक स्मायली :)येकदम मनातला डाऊट रे यवगेशा!!!
बाबा,
ReplyDeleteथोडक्यात म्हणजे बघितला पाहिजे असे तुझे मत झाले आहे तर.ठीक आहे,जरूर विचार केला जाईल पण आमच्या प्रभात,विजय,वसंत अशा सारख्या थेटरात आल्या वर.
बाकी 'जगावर,जिंदगीमे अगर बडा आदमी बनना चाहते हो तो छोटी हरकते छोड देनी चाहिये(विधाता) किंवा 'तुम जिस स्कूल मी पढ रहे हो उस स्कूल के हम हेड मास्तर है (हाथ कि सफाई)सारखे संवाद पुन्हा एकदा हिट होतायेत हे वाचून मात्र गम्मत वाटली.म्हणजे पिटातली आवड आता बाल्कनी पर्यंत पोहोचली नि आमच्या गुत्याचे रुपांतर आता बार च्या रूपात पुढे आलं मग नशा चढायला वेळ कितीसा तो लागणार?
सचिन, खूप धन्यवाद रे भाऊ!
ReplyDeleteराजभाऊ,
ReplyDeleteतसं बघायला गेलं, तर अंदाज अपना अपना किंवा डेव्हिड धवन/गोविंदाचे सिनेमे हे शोले च्या ज्यॉनरची निगेटिव्ह ठरतात. थोडं दूरचंच आहे पण नातं आहे असं मला वाटतं. मीही खरंतर एका आऊट ऍन्ड आऊट विनोदी सिनेमाला महाभूतांमध्ये मोजणार होतो. पण ते तसं जमेना. ते दुय्यम रंगच आहेत. फर्स्ट डेरिव्हेटिव्हज! :)
खूप धन्यवाद!
कांचनताई,
ReplyDeleteडायलॉग्ज तर भारी आहेतच, पण सलमानच्या संवादफेकीमुळे (जी एकदम बेफिकीर आहे), ते एकदम आवडून जातात.
'वन्स अपॉन अ टाईम' मी अजून पाहिला नाहीय...पाहेन..
धन्यवाद गं!
हेरंबा,
ReplyDeleteहाहा...हे बेस्ट..
पण तरीही सांगतो..दबंग बघच जमलं तर..एकदा तरी सीटमधून उठवेलच बघ सलमान! :)
संकेत (आपटे),
ReplyDeleteहो ना रे..
एकदम भक्तिभावाने घ्यायला हवं दर्शन... ;)
आनंदा,
ReplyDeleteदोष चष्म्याचा आहे, तुझा नाही! :)
तन्वीताई,
ReplyDeleteWe are Family!!!!!!
खरंच आवरा!!
पण हसलात हे वाचून बसलेला धक्का थोडा सौम्य झाला :)
बाकी...दबंग पहाच...तुला आवडेल ह्याची खात्री देतो (भाऊ है अपुन)!!
महेंद्रकाका,
ReplyDeleteदबंग मस्त टीपी आहे!
राजकुमार, धरमवीर बघायला मजा यायची. पण त्यांचेदेखील कपडेपट वगैरे सगळं मुग़ल-ए-आज़म स्टाईलच असल्यानं, मी त्यांची सेपरेट गणती केली नाही. ;)
देविदासजी,
ReplyDeleteसाहजिकच 'गुंडा'चं ज्यॉनर आणि रजनीचे चित्रपट ह्यांच्यात बरंच साम्य आहे. अचाट संवादांचं लोण दक्षिणेकडून उत्तरेकडे आलं की उत्तरेकडून दक्षिणेकडे हे न सुटलेलं कोडं असलं तरी, ते टिकवून त्याचं संवर्धन करण्यात दक्षिणेचा महत्वाचा वाटा आहे हे मान्य केलंच पाहिजे!
दबंग पहाच जमल्यास!
विक्रम,
ReplyDeleteखूप आभार भाऊ!
सविताताई,
ReplyDeleteतुम्ही म्हणता ते यकदम पर्फेक्ट... हिंदी सिनेमाची बरेचदा लिंक लागतेच... :)
डायलॉग्ज बहुतेक दिग्दर्शक अभिनवसिंग कश्यपचेच आहेत! नक्की ठाऊक नाही..पण मस्त आहेत! :)
संकेत,
ReplyDeleteतोच आपल्या दोन धर्मांमधला वादाचा मुद्दा आहे. पण तो वाद मला कोंबडी आधी की अंडं ह्या धर्तीचा वाटतो. त्यामुळे जाऊदे!
आपल्या धर्मांना आलेले सुगीचे दिवस अनुभवूया! :))
देवेन,
ReplyDeleteअरे दबंगची इथेही आमच्या पब्लिकमध्ये चर्चा सुरूच होती. धर्मचित्रपटाशी साधर्म्य सांगतोय म्हटल्यावर बघणं भाग होतं ;)
खूप आभार रे!
योगेश आणि तन्वीताई,
ReplyDeleteएव्हढा अभ्यास मी Engineering ला केला असता, तर सिनेमाकडे आणि पर्यायाने कदाचित ब्लॉगकडे कधी वळलोच नसतो.. ;)
mynac दादा,
ReplyDeleteदबंग पहाच! माझ्या माहितीप्रमाणे विजयला ऑलरेडी लागलेला आहे!
बाकी
>>म्हणजे पिटातली आवड आता बाल्कनी पर्यंत पोहोचली नि आमच्या गुत्याचे रुपांतर आता बार च्या रूपात पुढे आलं मग नशा चढायला वेळ कितीसा तो लागणार?
हे मात्र आक्षी खरं बघ! :P
सिद्धार्थ,
ReplyDeleteअरे मिळेल मिळेल.. मी स्पेशल प्रभुजींकडे प्रार्थना करेन! :D
अनघा,
ReplyDeleteतुम्हाला दिलेलं उत्तर वर दिसत नाहीये मला..म्हणून पुन्हा टाकतो :P
प्रत्येक सिनेमा त्या त्या चष्म्यानेच बघितलेला चांगला असतो...तरच त्याला न्याय देता येतो! :)
नाहीतर मग विकतचा मनस्ताप! :)
एकदम बरोब्बर!! आणि आपल्या कपाटात असे बरेच चष्मे संग्रहित करणे आपल्या हिताचेच असते! :)
ReplyDeleteविद्याधर, मला आठवतं काही वर्षापुर्वी 'गुंडा' मित्राच्या घरी पाहिलेला. त्यातल्या गुंड्याचं नाव आजही आठवलं तरी मला खूप हसायला येतं. तुला तर माहितच असेल.तुझ्या पोस्टच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
ReplyDeleteदबंग पाहायचाय, पण तू म्हणतोयस तर तो चांगलाच असेल ;)
साष्टांग दंडवत ...
ReplyDeleteअशक्य आहेस तू....
श्रीराज,
ReplyDelete'गुंडा' चीज ही ऐसी है...एकदा बघितला की विसरणार नाही! :P
खूप आभार!
आणि हो दबंग पहाच!
सागर,
ReplyDeleteअरे दंडवत मला नाही...प्रभुजींना घाल! ;)
Hi Vidyadhar..
ReplyDeleteParat ekda masta post..
Gunda nantar cha loha movie mahit aselach na..
Its also awesome..
Tandya che dialogue..hehe
tyabaddal pan lihi na kahitari
And funny thing is top rated Marathi actors are working in this movie..
Loha has also Dharam paji, Manisha and Govinda for time pass..
But Prabhuji is not at his best due to Multi starrer movie..
प्रसाद,
ReplyDeleteखूप आभार!
'लोहा' हा देखील कांती शाहचं अजून एक रत्न आहे! :)
तांड्याभाईचे डायलॉग्ज तर अप्रतिम. आणि हो मल्टिस्टारर असला, तरी प्रभुजी "दिखनें में बेवडा, दौडने में घोडा और मारने में हथौडा हूं मैं!" म्हणून छाप सोडून जातातच! :)