आता मला महत्वाचा प्रश्न पडला. हे पार्सल मला पाठवण्याचा चावटपणा कुणी केला. होय, चावटपणाच. अहो मी 'बाबाईझम' किंवा अलम दुनिया ज्याला 'मिथुनिझम' म्हणून ओळखतात, त्या धर्माचा खंदा पुरस्कर्ता आहे. प्रेषित देखील होता ह्या धर्माचा, त्याला लोक 'बाबा' म्हणतात आदराने. त्यांच्या निर्वाणाला तीन दशके लोटलीत. काही भाविक त्यांना 'प्रेषित' मानतात, काही नुसताच सामान्य भक्त मानतात. पण त्यानं फारसा फरक पडत नाही. 'मिथुनिझम' मध्ये सर्वभक्तसमानता आहे. आमचा देव 'प्रभुजी मिथुनदा'. आमच्या देवापर्यंत पोचायला आमच्यात बडवे, मौलवी किंवा प्रीस्ट लागत नाहीत. आता महत्वाचा मुद्दा. 'गुंडा'चा आणि 'मिथुनिझम'चा काय संबंध? तर मंडळी. 'गुंडा' हा 'मिथुनिझम'चा 'धर्मचित्रपट' आहे! होय, धर्मचित्रपट. हा जगातला एकमेव धर्म आहे, जिथे धर्मग्रंथ नाहीये. धर्मचित्रपट आहे. धर्माचा संदेश आम्हाला तिथूनच मिळतो. हा संदेश 'बाबां'पर्यंत पोचवणारा आमचा फरिश्ता म्हणजे दिग्दर्शक कांती शाह.
गुंडाचे मुख्यत्वेकरून चार भाग पडतात.
१. खलकांड - ह्यामध्ये सर्व खलपात्रांच्या ओळखी आणि त्यांचे आपापसातले संबंध ह्यांवर प्रकाश पडतो. प्रमुख खलनायकाचा (प्रमुख खलनायकाचं नाव मी लिहू शकत नाही, कारण ते मिथुनींना अ-मिथुनींसमोर बोलणं हराम आहे) काटा काढण्यासाठी एक 'कफनचोर नेता' दुसर्या नावाजलेल्या गुंडाला सुपारी देतो. मग सर्व खलपात्रांच्या ओळखीचा एक दीर्घ प्रसंग आहे, ज्यात काही अतिशय गाजलेल्या ओव्या आहेत. उदाहरणार्थ, "मेरा नाम है पोते, जो अपने बाप के भी नहीं होते". ह्या प्रसंगातल्या अनेक ओव्या अ-मिथुनींसमोर वर्ज्य आहेत. त्यानंतर तो गुंड प्रमुख खलनायकाच्या बहिणीवर बलात्कार करून तिचा खून करतो. त्यावर मुख्य खलनायक अतिशय दीर्घ, ह्रद्य असं एक स्वगत म्हणतो, "मुन्नी, मेरी बहन मुन्नी! तो तू मर गयी. तू कटा हुआ गुर्दा, याने के मुर्दा हो गयी! लंबू(दुसरा गुंड) ने तुझे लंबा कर दिया, माचिस की तिली को खंबा कर दिया!" मला सांगा कुठल्या संवेदनशील माणसाला हे वाचून गलबलून येणार नाही? हे स्वगत हा गुंडाचा हायपॉईंट आहे. कारण इथे तो खलप्रवृत्तींची एक वेगळीच बाजू समोर आणतो. शेवटी खल देखील मानवच असतात असा एक मानवतावादी संदेशही ह्यातून जातो. अनेक खल मिथुनी पापक्षालनासाठी ह्या ओव्यांचं नित्य पठण करतात. असो. तर ह्यानंतर जेव्हा मुख्य खलपात्र लंबूला मारण्यासाठी घेराव घालतं, तेव्हा लंबूही एक दीर्घ संवाद म्हणतो. जो लिहिणं मला शक्य नाही. कारण, तो काही विशिष्ट परिस्थितींमध्येच उद्घृत करण्याचा सख्त अलिखित दंडक सारे मिथुनी मानतात. असे अनेक संवाद आहेत, जे अ-मिथुनींसमोर म्हणणं वर्ज्य आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी! तर ह्या वधावेळी मुख्य खलपात्र 'हम दो नंबरके धंदे करनेवालोंकी बहू-बेटियों की जान और इज्जत का कोई भरोसा नहीं होता' असं एक अतिशय सखोल तत्वज्ञानपूर्ण वाक्य म्हणतं. ह्या एका प्रसंगात, किंबहुना ह्या वाक्यातच कित्येक वाममार्गाला लागलेल्यांना योग्य मार्गावर आणण्याची ताकद आहे. ह्यानंतर लंबूवधाचा प्रसंग संपतो.
२. हमालकांड - ह्यामध्ये प्रभुजी हमाल म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करतात आणि त्याचबरोबर जगाला बंधुभाव आणि नागरिकशास्त्राचे धडेही देतात. ह्या कांडामध्ये प्रभुजींनी गुंडायुगात विमानतळ आणि गोदी अश्या दुहेरी कॉम्प्लेक्समधल्या हमालाचा अवतार घेतल्याचं स्पष्ट होतं. मग प्रभुजी विमानतळावर मुख्य खलपात्राच्या एका अनुयायाला गैरकृत्य करताना पकडतात आणि विमानतळापासून पार कोर्टापर्यंत पाठलाग करून पकडून देतात. आणि ह्याबद्दल बक्षिस मिळाल्यावर 'बाप पे पूत, पिता पे घोडा, कुछ नही तो थोडा थोडा' हा श्लोकही म्हणतात. ह्यानंतर प्रभुजी एका मुलीच्या लग्नासाठी पैसे कमी पडत असलेल्या म्हातार्या हमालाच्या मदतीसाठी मुख्य खलपात्राच्या पैलवानाला सहज चीत करून आपल्या निःस्वार्थी वृत्तीने आपल्या अवतारकार्याची एक चुणूक दाखवतात. पण त्याचबरोबर सामान्य हमालांप्रमाणेच दारू पिऊन धिंगाणाही घालून दाखवतात.
३. अन्यायकांड - ह्यामध्ये प्रभुजींची बहिण आणि एकंदरच त्यांच्या कुटुंबावर सर्व प्रकारचे अन्याय केले जातात. प्रभुजींच्या बहिणीचं फसवून लग्न लावून दिलं जातं आणि मुख्य खलपात्राचा भाऊ तिचा बलात्कार करून तिचा खून करतो. प्रभुजींचे वडिल जे पोलिसात हवालदार असतात, त्यांचा इन्स्पेक्टर बॉस त्यांच्यासमोर खुन्यांची मदत करतो. (पण प्रभुजींचे हवालदार वडिलही एकाच प्रसंगात मिश्या असलेले आणि नसलेले असे दिसून आपल्या दैवी अंशाचं दर्शन घडवतात, पण मर्त्य इन्स्पेक्टरला हा इशारा उमगत नाही आणि तो प्रभुजींच्या हातच्या अटळ मरणाच्या दिशेनं जातो.) ह्या दुर्घटनेनंतर प्रभुजी खलनायकांच्या घरी जातात, तो प्रसंग जर कुठल्या दा व्हिंची नं चितारला, तर 'लास्ट सपर' च्या तोडीचं पेंटिंग बनेल. प्रभुजी दरवाजात उभे आहेत आणि सर्व खलनायक समोरच बंगल्यातल्या जिन्यावर उभे आहेत. ह्याच प्रसंगात प्रभुजी आपल्या अवतारी असण्याचा प्रकट पुरावा देतात, जेव्हा ते सर्व खलपात्रांच्य 'मौत ची डेट' फिक्स करतात. आणि 'दो, चार, छे, आठ, दस...बस' ह्या मंत्राने तो प्रसंग संपतो.
४. धमालकांड - ह्यामध्ये प्रभुजींना आपलं अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी शस्त्र हातात उचलावी लागतात. आणि प्रभुजी सर्व खलपात्रांना एक एक करून संपवतात. ह्यामध्ये प्रभुजी एका खलनायकाचा वध करताना 'भिगी हुई सिगरेट कभी जलेगी नही, और यह तय है की तेरी मौत की तारीख कभी टलेगी नही' ही ओवी म्हणतात (इथे लोक 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि' चे संदर्भ शोधतात, शोधोत). प्रभुजींच्या शस्त्रांमध्ये बझूका लॉन्चरचाही समावेश आहे, जे प्रभुजी आपल्या लीलेनं एका यःकश्चित गाडीच्या डिकीतून घेऊन येतात. आणि हा लॉन्चर रिफील करावाच लागत नाही, तो आपोआप रिफील होत राहतो (इथे काही लोक द्रौपदीच्या न संपणार्या साडीचे रेफरन्स शोधतात, पण तो मूर्खपणा आहे कारण इथे द्रौपदीपण प्रभुजी आणि कृष्णपण.) अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा प्रभुजी बच्चू भिगोना ह्या राजकीय नेत्याचा वध करण्यासाठी म्हणून अशक्य अंतरावरून रायफलने चालत्या गाडीवर नेम धरतात, तेव्हा दुसरंच खलपात्र बच्चू भिगोनाचा खून करतं, मात्र पोलिस प्रभुजींना पकडतात. ह्याउलट प्रभुजी त्यानंतर सर्व खलपात्रांना स्वतः संपवतात पण पोलिस काहीही करू शकत नाहीत. ह्यातून हा संदेश मिळतो, की 'बळी तो कान पिळी'. आणि शेवटी तर प्रभुजी मुख्य खलपात्राच्या अनौरस संततीला आपलं अपत्य म्हणून स्वीकारून जगाला एक वेगळाच मानवतेचा संदेश देतात.
तर असा धर्मचित्रपट लाभलेला हा खराखुरा आधुनिक धर्म म्हणता येईल. तर ह्या आमच्याच धर्माविरुद्ध रचलेलं हे कुभांड मलाच पाठवण्याचा उपद्व्याप माझ्या लक्षात आला नाही.
मग मला अजून एक गहन प्रश्न पडला. कारण पाचच दिवसांपूर्वी मी 'गुंडा दिवस' मोठ्या आनंदानं साजरा केला. त्यादिवशी सगळे 'मिथुनी' दिवसभर 'निर्जळी' कडकडीत उपवास करतात. आणि संध्याकाळी 'गुंडा' तल्या एका श्लोकात सांगितल्याप्रमाणे (संदर्भ - हमालकांडातील प्रभुजींचे टल्ली होऊन असलेले गाणे. मूळ पंक्ति "क्यूं ये बर्फ पीता है व्हिस्की में डालके?") व्हिस्कीत टाकून बर्फ पिऊन उपवासाची सांगता करतात (नीट वाचा. व्हिस्कीत टाकून बर्फ पितात, बर्फ टाकून व्हिस्की पीत नाहीत.). सहसा मिथुनी हा सोहळा समूहात मिळून करतात. कुटुंबंच्या कुटुंब एकत्र येऊन हा सोहळा साजरा करताना मी कित्येकदा पाहिली आहेत. एकदा उपवासाची ऑफिशियल सांगता झाली की मग सगळे एकमेकांना मिठ्या मारून शुभेच्छा देतात. मग ज्या कुटुंबाचे सर्वाधिक सदस्य सहभागी असतील, त्या कुटुंबाला यजमानपदाचा मान मिळतो आणि जेवणाच्या पंगतींना वाढण्याची जवाबदारीही. जेवण अगदी हॉटेलातलही चालतं. त्यावर कुठलीही आडकाठी 'मिथुनिझम' करत नाही. फक्त सहसा गोड्या पाण्यातल्या माशांचा समावेश त्या दिवशी जास्त असतो जेवणात. कारण प्रभुजींना 'गोड्या पाण्यातले मासे' फार आवडतात. पण शाकाहारी-मांसाहारी सर्वांसाठी सोय असते. त्यामुळे मोठ्या आनंदात जेवणं होतात. पुन्हा इथल्या जेवणाचा नियम आहे, जोवर खाणारा 'दो, चार, छे, आठ, दस... बस'(संदर्भ - अन्यायकांडामध्ये प्रभुजी त्यांच्या बहिणीच्या हत्येनंतर खलनायकांच्या घरी जाऊन ज्या ओव्या म्हणतात, त्यातली शेवटची ओवी) म्हणत नाही, तोवर वाढतच राहायचं. जेवणं उरकल्यावर मग 'गुंडा' चा एक सामुदायिक खेळ होतो. त्यानंतर एकदा प्रभुजींच्या नावाचा जयघोष करून सगळे मिथुनी समाधानानं आपापल्या घरी जातात. ह्यावर मला अनेकांनी विचारलं की स्वतः प्रभुजी कधी सहभागी होतात की नाही. मी म्हटलं, अरे अज्ञानी जीवांनो, 'देवाला कधी धर्म असतो का? धर्म आपण मर्त्य मानव बनवतो. सण आपण साजरे करतो, देवाच्या नावानं!'
तर मुद्दा होता की आज त्या घटनेला १०० वर्षं पूर्ण होऊन पाच दिवस होत असताना मला हे पार्सल आलं कसं? आणि त्या पवित्र दिवशी आमच्या धर्मावर आलेल्या ह्या संकटाबद्दल मला काहीच कसं ठाऊक नव्हतं. मी लगेच ते पार्सल कुठून आलंय हे शोधायला सुरूवात केली. मग माझ्या लक्षात आलं की भारतातल्या अगदी मोजकी फॉलोईंग असलेल्या 'जो कर' ह्या संप्रदायाचा हे मला पाठवण्यात काहीही हात नाहीये. एक विलक्षणच गोष्ट होती. त्याचं झालं असं होतं.
'जो कर' हा अतिशय रद्दड आणि मूर्ख असे रोमॅन्टिक सिनेमे पाहणार्यांचा संप्रदाय होता. ते बहुधा 'श्श चुपरहा' आणि 'जोहर कर'(ह्याच्या नावावरूनच संप्रदाय सुरू झालाय) ह्या दिग्दर्शकांचेच सिनेमे पाहायचे. त्यांचा स्वतःचा आमच्यासारखा फुल फ्लेज धर्म नाहीये. ते स्वतःची जागा बनवायचा प्रयत्न करत होते. ह्याच त्यांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी आमच्यासारख्या प्रसिद्ध पण विचित्र धर्माचा प्रसिद्धीसाठी वापर करून घ्यायचं ठरवलं. सूर्यावर थुंकून लोकप्रियता मिलवायचा केविलवाणा प्रयत्न म्हणून ही अशी पार्सल बर्याच मध्यममार्गी लोकांना पाठवली. पण परिणाम उलटा झाला. आमच्या धर्मचित्रपटात असं आहे तरी काय? की ज्यामुळे इतका बवाल होतोय हे जाणण्यासाठी अनेकांनी उत्सुकतेपोटी 'गुंडा' पाहिला. आणि उलट आमच्या धर्माची लोकप्रियता रातोरात वाढली. 'गुंडा' जळणं तर राहिलं दूर, उलट लोकांनी अनेक दिवस वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल्स सगळीकडे फक्त आमच्याच 'मिथुनिझम'बद्दल लेख लिहिले, डॉक्युमेंट्रीज बनवल्या. ज्यामुळे 'जो कर' संप्रदायाचे वांधे झाले. त्यांनी अजून जोरात बोंबलायला सुरूवात केली. त्यांनी ४ सप्टेंबरला काही सीडीज जाळल्यादेखील, पण ते पहायला कुणीच गेलं नाही. उलट त्यादिवशी 'गुंडा दिवसा'ची सेलिब्रेशन्स मात्र सगळ्यांनीच अनुभवली.
त्या विचित्र दिवसामुळे 'मिथुनिझम'ची पताका सगळीकडे फडकली, पण 'जो कर' संप्रदाय मात्र अनुल्लेखानेच मारला गेला किंवा झालाच तर इतका बदनाम झाला की जवळपास नामशेषच झाला. कित्येक त्याच संप्रदायाच्या लोकांनी फुटून वेगळी चूल मांडली. आणि त्या फजितीमुळे त्यांनी तो दिवस विसरून जाणंच पसंत केलं. मिथुनींच्या तत्कालीन धुरिणांनी हा द्वेषपूर्ण दिवस विसरून जाण्याचं आवाहन मिथुनींना केलं त्यामुळे ही ऐतिहासिक घटना इतिहासाच्या पानात हरवून गेली होती. पण हे एक त्याकाळचं पार्सल माझ्या आजोबांनी जपून ठेवलेलं होतं. ते त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षाने मला पाठवण्याचं त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेलं असल्याने हे मला आलं होतं. पण तरी मला कळत नव्हतं, की त्या दिवसाचे सगळे पुरावे जर नष्ट झाले होते, तर आजोबांनी हे जपून का ठेवलं?
दुसर्या दिवशी सहज त्यातली एक गुंडा ची नसलेली डीव्हीडी माझ्या नजरेस पडली. ती मी उत्सुकतेपोटी लावली. आणि मला धक्काच बसला. त्यात माझ्या आजोबांचा माझ्यासाठी व्हिडिओ संदेश होता. त्याचा सारांश असा-
"मी प्रत्यक्ष 'बाबां'चा वंशज आहे. आणि आजच्या जगाला 'मिथुनिझम'च्या विजयाची किंवा त्यापेक्षा 'आक्रस्ताळेपणा'च्या पराभवाची ही विलक्षण कथा सांगण्यासाठीच माझी नेमणूक 'बाबां'नी केली होती."
सर्व मिथुनी आणि अ-मिथुनींना 'गुंडा दिवसा'च्या उशीरानेच शुभेच्छा!
अशक्य आहेस तू !! :D
ReplyDeleteअशक्य भारी लेख लिहिला आहेस. "मिथुनिझम"ची पताका अशीच सगळीकडे पसरेल, याची मला खात्री आहे.
ReplyDeleteजय प्रभुजी, जय गुंडा !
रच्याक, हे वाच ;)
ReplyDeletehttp://www.newson6.com/Global/story.asp?S=11532364
नमस्कार विद्याधर,
ReplyDeleteमी तुमचा ब्लोग खूप दिवसांपासून वाचत आहे.
तुम्ही मस्त लिहिता! गुंडा माझी पण आवडती फिल्म आहे.
तुम्ही रिक्षाच्या अवर्णनीय दृश्या बद्दल पण लिहाना.
आणि हो ते माकड पण प्रभूजींना मदत करते शेवटी :)
प्रभुजी ची पताका अटकेपार .......
ReplyDeleteजय प्रभुजी :)
प्रचंड...प्रचंड..प्रचंड...भारी...
ReplyDeleteहा हा हा... कैच्याकै भारी!
ReplyDeleteप्रचंड...भारी...:D :D :D
ReplyDeleteक्या बात... क्या बात... क्या बात............ !
ReplyDeleteबाबा,
ReplyDeleteमी ठरवलंय कि आत्ता कॉमेंट देऊन'गडबड गुंडा'करण्यात काहीच अर्थ नाही,आधी "गुंडा"ला पाहून घेतो.
This was Chinese to me! :-)
ReplyDeleteAshakya bhaari....
ReplyDeleteनो कॉम्मेंट्स..बस थकलोय हा हा हा...
ReplyDeleteजाम भारी :)
गुंडा पाहिल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही हे मला उमगलंय आता. फार तारीफ ऐकून होतो पण आता मिथुनिझम स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही! कधी येऊ दीक्षा घ्यायला?
ReplyDeleteहेरंबा,
ReplyDeleteमला माहितीये... हे माझ्याच मागच्या लेखातलं 'अशक्य' आहे! :)
आणि हो, अजून एका गुंडाचा वाढदिवस पाहून बरं वाटलं! ;)
अभिजीत,
ReplyDeleteधन्यवाद भाई!
आपल्यासारखे अनुयायी असतील, आणि देवही असा भारी असेल तर पताका कायम डौलाने फडाकत राहीलच! ;)
आणि अरे, तू गुंडावर लिहिणार होतास ना...
मी खरं तर तुझ्या लेखाची वाट पाहणार होतो, पण काल राहावलं नाही!
तू पण लिही ना भाई!
जय प्रभुजी! जय गुंडा!
प्रसाद,
ReplyDeleteवाचून खूप बरं वाटलं, की तुम्ही माझा ब्लॉग वाचता आणि तुम्हाला आवडतो देखील!
अहो, गुंडाची प्रत्येक फ्रेमच वर्णन करण्याजोगी आहे. गुलशनचा वध, चालू असलेल्या मारामारीतून निघून जाणारे प्रभुजी! ऍम्बॅसेडर गाड्यांचा सीन, मग तुम्ही म्हणता तो रिक्षाचा सीन, बजरंगबलीची मदत!
माझ्या बालबुद्धीला काल जेव्हढं आठवलं तेव्हढं लिहून टाकलं! गुंडाचं पूर्ण रसग्रहण करायचं झालं मला वेगळा ब्लॉग सुरू करावा लागेल ;)
बाय द वे,
तुमच्या प्रोफाईलवरून तुमचा सातार्याच्या फोटोंचा ब्लॉग बघितला, त्यातला अजिंक्यतार्यावरच्या मारूती मंदिरातला फोटो पाहून खूप आनंद झाला. मी प्रत्येक सुट्टीत जेव्हा सातार्याला जातो, तेव्हा रोज सकाळी त्या मंदिरात जातो! एकदम छान वाटलं... धन्यवाद!
सचिन,
ReplyDeleteअरे पताका ऑलरेडी अटकेपार आहे... मी फक्त माझा खारीचा वाटा उचलला! ;)
जय प्रभुजी!
योगेश,
ReplyDelete:D
धन्यवाद रे भाऊ!
अभिलाष,
ReplyDelete:))))
खूप धन्यवाद रे भाऊ! 'गुंड' चा उल्लेख आला की माझ्यात वीरश्री संचारते! ;)
तेजस,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत!
प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार!
असाच लोभ असू द्या!
विक्रम,
ReplyDelete:D
हे प्रत्यक्ष प्रभुजींचे शब्दच वापरल्याबद्दल मंडळ आभारी आहे!
mynac दादा,
ReplyDeleteबघून घे एकदा गुंडा!
एकदा तरी गुंडा अनुभवावा!
आम्ही गुंडा भक्त नेहमी म्हणतो, की जगात दोनच प्रकारची माणसं आहेत, एक ज्यांनी गुंडा पाहिलाय आणि दोन ज्यांनी पाहिला पाहिजे!
सविताताई,
ReplyDeleteगुंडा हा १९९८ सालचा मिथुनदांचा एक "बी' ग्रेड (आम्ही 'एम' ग्रेड म्हणतो) चित्रपट होता.
चित्रसमीक्षकांच्या मते तो, "So bad that its Good!"
ह्या कॅटेगरीतला आहे!
एक सोशल थ्रिलर म्हणून बनवलेला हा चित्रपट एक वेगळंच रसायन बनून गेलाय! माझ्यामते तो देशातला सर्वाधिक कल्ट फॉलोईंग असलेला चित्रपट आहे!
बघा कधी जमलं तर! :D
स्मित,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! असाच भेट देत राहा!
सुहासा,
ReplyDeleteलय धन्यवाद रे भाऊ!
गुंडा तू वाचून थकलायस... मी तर शिवधनुष्य उचललं होतं! ;)
विक्रांत,
ReplyDelete:D
पहिल्याच प्रसंगात गारद??... तिथे तर हळूहळू रंगत चढायला लागते मैफिलीची! :)
खूप खूप धन्यवाद!
ओंकार,
ReplyDeleteहे मात्र शंभर नंबरी बोललास...गुंडा पाहिल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही!
एकदा तरी गुंडा अनुभवावा!
अरे मिथुनिझम यूट्यूबवर पण स्वीकारता येतो बहुतेक! आमच्यात बडवे, मौलवी, प्रीस्ट लागत नाहीत ;)
Hello Vidyadhar
ReplyDeleteThanks for appreciating satara pictures..
There is one very good group on Facebook with Satara pictures
http://www.facebook.com/#!/group.php?gid=129545560410491&ref=ts
Just for your reference..Njoy
बाबा की जय हो !
ReplyDeleteगुंडाय नमः
मीही मिथुनदांचा भक्त आहे. अर्थात मी भक्तीतही समान्य आहे. संतपदाला पोचलो नाही आहे अजून. पण प्रयत्न चालू आहेत त्या दिशेने. :-) या धर्मचित्रपटात प्रभुजींच्या बहिणीच्या अंगीही दैवी शक्ती आहेत. स्वतःवर बलात्कार होत असताना दुसरी कोणतीही क्षूद्र बाई पळून गेली असती. पण प्रभुजींची बहीण ही गुरुमाऊली असल्यामुळे ती ओव्या म्हणते. ’तू है कुत्ते का पिल्ला! तेरी जिंदगी जैसे पानी का बुलबुला!’ यातून त्या खलपुरुषाचं जीवन किती क्षूद्र आहे हेच तर तिला जाणवून द्यायचं आहे. संपूर्ण भवसागरात खलपुरुषाचं जीवन म्हणजे एक छोटा थेंब (पानी का बुलबुला) हेच तर तिने दाखवून दिलं आहे... ;-)
ReplyDeleteप्रसाद,
ReplyDeleteखूप आभार!
हा ग्रुप ठाऊक नव्हता मला.
बाकी, असाच लोभ असू द्या!
नॅकोबा!
ReplyDeleteतू पाहिलायस गुंडा? नसलास तर पहाच! कैच्याकै अनलिमिटेड! :D
संकेत,
ReplyDeleteमी आधीच लिहिलंय..मिथुनिझममध्ये सर्वभक्तसमानता आहे! ;)
तू सामान्य वगैरे असूच शकत नाहीस त्यामुळे! :D
बाकी, प्रभुजींच्या बहिणीचं पात्रही दैवीच असायला हवं... तिची योजना पुढच्या रणकंदनाचं कारण बनण्यासाठीच असते, त्यामुळे ती खंबीर असते... :D
गुंडाबद्दल जितकं लिहावं, तितकं थोडं! :P
ते तर आहेच. किंबहुना या धर्मचित्रपटाशी संबंधित असलेल्या सर्वांनाच दैवी शक्तीचं वरदान आहे. प्रमुख खलपुरुषाच्या भावाचं नाव 'चूठीया' हे एका अतिप्रसिद्ध (आणि अतिवापरामुळे बुळबुळीत झालेल्या) शिवीची आठवण करून देतं. खलप्रवृत्ती अंगी असल्या की समाजाच्या शिव्याच पदरी यायच्या हाच सामाजिक संदेश दिग्दर्शकाला यातून द्यायचा आहे.
ReplyDeleteविभी, तुला साष्टांग रे बाबा. अशक्य सुटला आहेस तू. :D
ReplyDeleteकुठून कुठे भरार्या घेतो आहेस आणि त्याही लक्षावर... :) गुंडा पाहायची डेअरिंग होत नव्हती माझी पण आता तू इतके तेल ओतल्यावर आग लावीनच म्हणतेय...
हेरंब म्हणाला तेच म्हणते - ’अशक्य आहेस तू.’
ReplyDeleteसंकेत,
ReplyDeleteभाई...त्यातून तो खलपुरूषाचा भाऊ आणि शिखंडी हे महाभारतातलं पात्र ह्यांच्यातही साम्य आहे! इतके उच्च रेफरन्सेस असलेली ही अत्त्युच्च दर्जाची कलाकृती आहे यात वादच नाही! ;)
हाहाहा श्रीताई,
ReplyDeleteअगं गुंडा हे एक विचित्र रसायन आहे.. ते असंच बघितलं तर हिडीसही वाटू शकतं...पण वेगळ्या नजरेनं बघितलं तर जाम मजा येते! So bad that its good! :D
कांचनताई,
ReplyDelete:D
गुंडा पाहावा लागेल...
ReplyDeleteलैच अशक्य भारी लिहिली आहेस हि पोस्ट.
(हर्षभरीत उत्कट गळाभेट) तुझ्यासारखा एक परमभक्त पाहुन आनंद झाला... आम्ही रजनिदेवांचे परमभक्त... लवकरच आमचं एक मंडळ रजनिकांत बसवणार आहे. (जसा गणपती बसवतात तसंच). तुम्हीपण या.
ReplyDeleteसौरभ, माझ्याकडूनही उत्कट गळाभेट!
ReplyDeleteआपले धर्म जवळजवळचेच आहेत!
पण मला हा कन्सेप्ट फार फार फार भारी वाटला - रजनीकांत बसवणे...
मी अख्खा दिवस ऑफिसात हस हस हसलोय...
जब्बरदस्त!!!!!!!
सलमान कसा, मुसलमान असून गणपती बसवतो ना...तसाच मीही मिथुनी असूनही रजनीकांत बसवीन म्हणतोय! ;)
गुरुजी आपण महान आहात !
ReplyDeleteविशालदादा,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत! :D
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद रे!
बाबा... कैच्याकै अशक्य... :) आता आपण भेटलो की एक मिथून डान्स स्टेप करून दाखवायची रे तू... :)
ReplyDeleteरोहन,
ReplyDeleteआधी भेटूया तर खरं...मग एक स्टेप काय, अख्खं गाणं करून दाखवेन तुला! :)
पभु प्रभु ! तुमच्या मुळे माझ्या सारख्या अंधारात खितपत पडलेल्या, किड्या मुग्या सारखे जागणा-या.. पोरीच्या मागे धाव धाव धावणा-या पापी व्यक्तीचा उध्दार झाला प्रभो................... आजच प्र्निट काढतो देवाच्या फोटोची.... नजरे समोर २४ तास दिसेल अशी व्यवस्था करतो.... जय हो प्रभो !!!!
ReplyDeleteगुंडाची ओरिजनल प्र्निट मिळाणार नाही असे लेखावरून वाटत आहे, टोरंटबाबाच्या सहाय्याने शोध घेतो ;)
राजे,
ReplyDeleteदीक्षा घ्यायला थोडा उशीरच केलात...पण ठीकच!! गुंडा टोरंटवर नाही मिळणार बहुतेक...मी एकदा जालावर बरीच कांडं करून कुठूनतरी त्याची ओरिजिनल व्हिसीडी प्रिंट मिळवली होती. मजजवळ प्रिंट आहे.. :)
Youtube var sampurn movie changalya print madhe aahe
ReplyDeleteभारी
ReplyDelete