१९२० च्या आसपासचं दशक होतं. तुर्कस्तान पहिल्या महायुद्धात पराभूत झाला होता. तुर्कस्तानचा राजा म्हणजेच "खलिफा", ज्याला जगभरातले सगळे सुन्नी मुसलमान आपला नेता मानत, त्याची गणना पराभूतांमध्ये होत होती. तुर्कस्तानच्या सैन्याच्या सेनापतीनं म्हणजेच मुस्तफा केमाल पाशानं(पाशा म्हणजे जनरल) 'टर्किश नॅशनल मूव्हमेंट' सुरू केली. त्यानं स्वतंत्र तुर्कस्तानाची घोषणा केली. 'खलिफा'ची खिलाफत रद्द करून त्याला लोकशाही आणायची होती. पराभूत होत असलेल्या तुर्कस्तानात त्यानं आपल्या 'आझाद हिंद सरकार' पद्धतीनं एक सरकार स्थापन केलं आणि स्वतःच सैन्यप्रमुख बनून मित्र राष्ट्रांविरुद्ध लढा सुरू केला. मित्र राष्ट्रांनी मूळ तुर्की संसद बरखास्त केली आणि तेव्हाच केमाल पाशानं स्वतःची संसद सुरू करून वाटाघाटी सुरू केल्या. मग लुसॉनच्या करारानुसार 'रिपब्लिक ऑफ टर्की' ची स्थापना झाली.
त्यानं आधुनिक तुर्कस्तानचं स्वप्न बघितलं होतं. केमाल पाशानं सर्वप्रथम 'खलिफा' ला पदच्युत केलं. 'खिलाफत' रद्द केली. त्याकाळात तुर्कस्तानात अरबी संस्कृती मूळ धरत होती. धर्मसंस्थेची राज्यकारभारावर पकड होती. केमाल पाशाला नेमकं हेच खटकत होतं. तो स्वतः एक भाविक मुसलमान होता, पण त्याला राजकारण आणि धर्मकारण, न्यायव्यवस्था आणि धर्मव्यवस्था आणि शिक्षण आणि धर्मव्यवस्था ह्यांची सांगड खटकत होती. त्यानं सगळंच्या सगळं बदलून टाकायचा चंग बांधला. त्यानं सैन्यप्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि निवडणुका लढवल्या. घवघवीत यश मिळाल्यावर त्यानं सर्वप्रथम सगळ्या मदरशांच्या मान्यता रद्द केल्या. अरबी संस्कृतीचं उच्चाटन होण्यासाठी, तुर्की भाषेसाठी फोनेटिक लॅटिन लिपी दत्तक घेतली आणि जुनी अरेबिक लिपी रद्द करून टाकली. युरोपीय शिक्षणपद्धतीवर आधारित आधुनिक शिक्षणपद्धती आणण्याच्या दिशेनं संशोधन सुरू केलं. धर्मनिरपेक्ष राज्यघटना स्वीकारून त्यानं राजकारणातून धर्म दूर केला. आणि इथेच न थांबता, इस्लामिक लॉ ची मान्यता काढून इतर युरोपीय कायद्यांवर आधारित न्यायव्यवस्थेचा त्यानं स्वीकार केला. त्याला सर्व धार्मिक संस्थांकडून टोकाचा विरोध झाला. पण त्याचा स्वच्छ उद्देश आणि खंबीरपणा ह्यामुळे तो लोकांमध्ये टिकून राहिला. त्याला प्रेमानं 'अतातुर्क' म्हटलं जातं. अतातुर्क म्हणजे तुर्कांचा पिता.
थोडंच दूर आशियात, मो.क. गांधी नावाचा एक माणूस राष्ट्रीय चळवळीत मुसलमानांना सामील करण्यासाठी त्याच वेळी एक घातक चाल खेळला. त्यांनी 'खिलाफत' रद्द करण्याविरुद्ध भारतात चळवळ सुरू केली. तिकडे अतातुर्क सर्व मुसलमानांच्या भल्यासाठी 'खिलाफत' रद्द करत होता, तर इथे होणारा भारतीय 'राष्ट्रपिता' भारतातील मुसलमानांसकट सर्वांनाच दुहीकडे लोटणारी एक अर्थहीन 'खिलाफती'च्या रद्द होण्याविरोधात चळवळ उभारत होता.
अनेक वर्षं लोटली. अतातुर्क गेला आणि हळूहळू तुर्कस्तानात कट्टरता मूळ धरू लागली. अतातुर्कचा पक्ष सत्तेपासून दूर झाला आणि थोडा कट्टर पक्ष सत्तेत आला. त्यांनी हेडस्कार्फवरची बंदी उठवणे वगैरे प्रकार करून पाहिले, पण अतातुर्कचे संस्कार अजून बळकट होते. त्याच्या संस्कारात मुरलेलं सैन्य आणि न्यायव्यवस्था सरकारला पुरून उरत होते. अतातुर्क जात्याच सैन्यप्रमुख असल्यानं त्याच्या कारकीर्दीत सैन्याचे अधिकार जास्त होते आणि सैन्य त्याच्याच प्रभावाखाली राहिल्यानं कायम धर्मनिरपेक्ष राहिलं. अतातुर्कने आणलेली स्वतंत्र न्यायव्यवस्था काही बाबतींमध्ये राज्यव्यवस्थेपेक्षाही जास्त अधिकार राखून होती. आणि हे मुद्दे, आदर्श लोकशाहीच्या थोडे विरोधात जातात. नेमक्या ह्याच मुद्द्यांचा फायदा घेऊन, युरोपियन युनियनचा जयघोष करत कट्टर पक्षानं सरकारचे अधिकार वाढवणारी संविधानदुरूस्ती सार्वमतासाठी आणली आणि ती पासही झाली. आता, धर्मनिरपेक्ष सैन्याचे आणि न्यायव्यवस्थेचे पंख छाटले जाणार! त्यांच्या आधाराने असलेला अतातुर्कचा पक्षही थोडासा बॅकफूटवर गेलाय.
आणि धर्माच्या नावाने चळवळी उभ्या करून दुहीची बीजं रोवणार्या गांधींचा पक्ष मात्र भारतात अजूनही 'धर्मनिरपेक्ष' म्हणून टिमकी बडवत असतो.
पण विरोधाभास पहा. आज जो अतातुर्कच्या धर्मनिरपेक्ष पक्षाचा नेता आहे. त्याच्या बोलण्याच्या आणि दिसण्याच्या पद्धतीमुळे त्याला तुर्कस्तानचा "गांधी" म्हणतात.
---अतातुर्कच्या आत्म्याला किती वेदना होत असतील.
मला गांधींची वरची खेळी राजकीय होती की नाही हे मला माहीत नाही, पण एक मत नोंदवतो. आपल्याकडे सगळ्यांना देवत्व बहाल करण्याची पद्धत आहे, त्यामुळे त्यांच्या चुकीच्या गोष्टी पण बरोबर धरल्या जातात. हे मान्य केलं पाहिजे की महापुरूष पण मर्त्य मानव होते. शिवाजीमहाराज, राणा प्रताप, झांशीची राणी, टिळक, सुभाषबाबू, गांधी हे सगळे खचितच कर्तृत्वाने महान असले तरी सगळ्यांच्या हातून चुकादेखील झाल्या आणि काही गंभीर चुकादेखील कदाचित. त्यांच्या चांगल्या कामांवरून स्फूर्ती आणि चुकांवरून धडा शिकला पाहिजे आपण, त्यांना डेमी-गॉड करून त्यांच्या नावावर नसते वाद घालण्यापेक्षा. चूक ही कितीही महान माणसाने केली तरी तिला चूकच म्हटलं पाहिजे.
ReplyDeletehttp://en.wikipedia.org/wiki/Mustafa_Kemal_Atat%C3%BCrk
ReplyDeleteवाचण्यासारखं आहे.
सुंदर... !!
ReplyDeleteसावरकरांचं 'गांधी गोंधळ' वाचलं असशीलच. त्यात मो क गांधींच्या अशा अनेक विरोधाभासांवर सावरकरांनी कडाडून हल्ला केलेला आहे..
छान लिहल आहेस.ही तुर्कस्तानची माहिती माहित नव्हती.पण अगदि शाळेत असतांनापासुन मला गांधी कधीच पटले नाही.
ReplyDeleteFor a little more elaboration of situation after Ataturk in Turkastan, you may refer to "The Snow" by Orhan Pamuk.. though it is a fiction work, it provides quite a good insight and analysis of the political/religious atmosphere prevailing after Ataturk..
ReplyDeleteगांधी हे अतिशय कसलेले राजकारणी होते...भावनांच्या गोंधळात आपली पोळी कशी भाजुन घ्यायची याची उत्तम जाण होती...जाउ दे ....त्यांच्या राजकारणाची आज फ़ळ आपण भागतो आहोत.
ReplyDeleteबाकी तुर्कस्तानाबद्दल वाचायला आवडल...मस्त लिहल आहेस.
स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या खिलाफत चळवळीला उद्देशून म्हणायचे "खिलाफत ही नसती आफत आहे!"
ReplyDeleteपाशा आणि तुर्कस्तानाबद्दल ऐकून आहे त्याने त्या देशाला धर्माधेतून भर काढले आहे आणि एक पुरोगामी मुस्लीम देश बनवला आहे
ReplyDelete'खिलाफत'बद्दल खूप काही बोलण्यासारखे आहे पण जाऊ देत
मस्त लिहिले आहेस.
विभि, मस्तच. अरे ह्या गांधींनी ती खिलाफत चळवळ सुरू केली नसती ना तर कोट्यावधी जीव आत्तापर्यंत वाचले असते. प्रचंड कन्फ्युज्ड माणूस होता. म्हणजे काही गोष्टी चांगल्या होत्या पण स्वत:चं म्हणणं न तपासून घेता त्याचाच दुराग्रह धरत बसायचं आणि अंगाशी आलं की "माझे सत्याचे प्रयोग" लिहायचे. :-))
ReplyDeleteपण त्यांच्या खिलाफत चळवळी सरख्या एका सत्याच्या (की असत्याच्या) प्रयोगाने सगळ्या जगाला वेठीस धरलंय त्याचं काय? तरीही ही व्यक्ती म्हणजे शांततेचं प्रतिक आणि म्हणूनच २ ऑक्टोबर जागतिक शांतता दिन (की दीन?).
After all Gandhi too was product of his time!
ReplyDeleteत्यांना जे चांगल वाटल ते त्यांनी केल. (चांगल का वाईट ते त्यांना आणि देवालाच माहीत.)
ReplyDeleteपण
धर्माच्या नावाने चळवळी उभ्या करून दुहीची बीजं रोवणार्या गांधींचा पक्ष मात्र भारतात अजूनही 'धर्मनिरपेक्ष' म्हणून टिमकी बडवत असतो.
+१२३४५६७८९
बाबा,
ReplyDeleteमस्त.जाता जाता थोड विषयांतर.मो.क.गांधींमुळे.
मागे कुठे तरी वाचल्याचे स्मरते कि ब्रिटीश कायद्या नुसार तेथील सरकारी गोपनीय कागद पत्रे काही वर्षानंतर(नक्की किती वर्षा नंतर ते आठवत नाही)अभ्यासकांना उपलब्ध करून दिली जातात.त्या प्रमाणे एका पाकिस्तानी इतिहासकार स्त्रीने आपल्याला नि पाकिस्तानला जेव्हा स्वातंत्र्य बहाल केले त्या कालखंडाचा अभ्यास करून जे पुस्तक लिहिले त्यात "आपापल्या "स्वातंत्र्या" करिता हिंदू-मुसलमान नेते खास करून गांधी,नेहरू,जिना हे प्रचंड उतावळे झाले होते नि ब्रिटिशांनी त्या साठी त्यांना ज्या ज्या अटी घातल्या/लादल्या त्या त्यांनी फारसा(?)सारासार विचार न करता पटापट मान्य केल्या"असे ब्रिटिशांनी नोंदविलेले मत तिच्या पुस्तकात दिले होते.अर्थात त्या पुस्तकावर नेहमी प्रमाणे लगेच बंदी आली हे सांगणे नकोच.असो.
ओंकार,
ReplyDeleteतुझ्याशी ह्याहून जास्त सहमत मी होऊ शकत नाही. (Couldn't agree with you more! चं भाषांतर :D)
धन्यवाद रे भाऊ!
आणि हो रे.. जबरदस्त माहिती आहे त्या लिंकेत, मी फार पूर्वीच आडवी घातलीय ती माहिती..आणि ह्या लेखातलीही बरीचशी माहिती मला तिथे कळलेली होती!
हेरंबा,
ReplyDeleteसावरकर कडाडून हल्ले करून करून थकले, पण आपले लोक कानांवर हात ठेवून गांधींची माकडं बनून राहिले.. :(
देवेन,
ReplyDeleteधन्स रे भाई!
गांधींचे विचार कसेही असले, तरी त्यांच्या कृती खूप कन्फ्युज्ड होत्या..आणि त्यांनी स्वतःच्या तत्वांपायी देशाला पणास लावलं होतं, हे मला नेहमीच खटकतं!
सुदीपजी,
ReplyDeleteखूप धन्यवाद! मी नक्की शोधतो "The Snow".
योगेश,
ReplyDeleteअरे तेच दुःख आहे. तत्व गांधींची, लढा गांधींचा!
अरे! आपण देशासाठी लढत होतो की गांधींसाठी?
गांधींनी उपोषणं करून आधी इंग्रजांना ब्लॅकमेल केलं आणि मग आपल्याच सरकार आणि पर्यायानं जनतेला! वाईट वाटतं..
अरे अतातुर्कबद्दल जेव्हापासून वाचलं तेव्हापासून त्यानं गारूड केलंय माझ्यावर! तेव्हापासून तुर्कीतल्या घटनांकडे लक्ष असतं माझं!
सावरकरांनंतर जर मी कुठल्या नेत्याला मानतो, तर तो अतातुर्क!
निरंजन,
ReplyDeleteसावरकरांनी नेहमीच अशा आफती वेळीच ओळखल्या होत्या. पण दुर्दैवाने सावरकरांच्या बोलण्याकडे लक्ष न देण्यातच सगळ्यांनी धन्यता मानली..
अंदमानमध्ये न मरता, सुखरूप परत आल्याच्या गुन्ह्याची ती शिक्षा होती!
विक्रम,
ReplyDeleteसावरकर किंवा अतातुर्कासारखा नाही, पण त्यांच्या एक शतांश जरी नेता आपल्याला मिळाला ना, तरी आपला देश कुठच्या कुठे जाईल!
पण दुर्दैव आहे आपलं...!
अलताई,
ReplyDeleteअगदी!
गांधी प्रचंड विरोधाभासी कृती करायचे आणि त्यांच्या कृती क्वेश्चनेबल नसायच्या. टेक्निकली ते आपले नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते.
कारण पाकिस्तानसाठी त्यांनी आपल्याच देशाला वेठीस धरलं होतं! x-(
सविताताई,
ReplyDeleteयथार्थ वर्णन! :)
सचिन,
ReplyDeleteखरं आहे! पण म्हणूनच त्यांना माणूस म्हणून पाहिलं पाहिजे... आपल्याकडे जो प्रकार चालतो, तो निंदनीय आहे!
mynac दादा,
ReplyDeleteहे त्याकाळच्या स्थितीचं यथायोग्य वर्णन दिसतंय... कारण त्या कालखंडाशी निगडीत बर्याचशा पुस्तकांमध्ये असेच उल्लेख आढळतात!
:)
ही पोस्ट बरीच उशीरा आली, आणि पोस्टच्या आशयाशी १००% सहमत.
ReplyDeleteआपल्या नेत्यांची शून्य दूरदृष्टी हे आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.
ReplyDeleteअगदी मखमली शालजोडीतले मारलेत... छानच...
ReplyDeleteआनंदा,
ReplyDeleteदेर आये लेकिन शायद दुरूस्त आये ;)
अनघा,
ReplyDelete:(
सौरभ,
ReplyDeleteअरे आपला देश रोज एव्हढे जोडे, तेही करकरीत खातोय ना, ते बघून जीव जळतो..
आपण आपले आयुष्यभर शालजोडीतलेच मारत राहणार! :(
Gandhinna Shivya ghalanya palikade hya pidhine desha sathi kahi kela nahi..
ReplyDeleteAni Sawarkar he mahan hote te Hindu muslim eki magat hote pan te Andaman la janya adhi nanatar che Sawarkar fakta Gandhi virodhi hote
Gandhinni je kela deshasathi te kuthalyach netyani kela nahi
ReplyDeleteugich apala Pakistan tyanni banavala ani sagalyacha mul Khilaphat chalaval he ekdam saf chuk ani aikiv dyanavar adharit conclusion ahe
Engraj ani Jinnha ani Muslim Raje jase Hydrabad, Junagadh che raje hyanni kahich kela nahi sagala kela te Gandhinnich
waa
हेमंत,
ReplyDeleteखरं आहे तुमचं!
गांधींना शिव्या घालण्यापलिकडे ह्या पिढीनं काहीच केलं नाही... आणि गांधींना देव बनवण्यापलिकडे मागच्या पिढीनं काहीच केलं नाही!
बाकी, सावरकरांचा गांधींना विरोध नव्हता, तर देश=कॉन्ग्रेस ह्या गांधींच्या धोरणाला होता, आणि ज्याचा पुढचा अर्थ होता, कॉन्ग्रेस=गांधी म्हणजेच देश=गांधी!
त्यांचं थोडं साहित्य वाचा. म्हणजे कदाचित त्यांचा दृष्टिकोन थोडासा समजू शकेल.
बाकी, मी काही मोठा डॉन नव्हे, पण त्यांच्या धरसोड धोरणांची फळं मीही भोगतोच आहे!
Anonymous,
ReplyDeleteखरं आहे, गांधींनी देशासाठी जे केलं, ते कुणीच केलं नाही..
एक प्रचंड मोठं कन्फ्युजन!
आज आपण ह्याच कन्फ्युजनची फळं भोगतोय.
गांधींनी पाकिस्तान बनवला असेल नसेल, पण त्यांच्या पालनपोषणाची जवाबदारी घेऊन उपोषणाला बसून देशाला वेठीस कुणी धरलं होतं?
आणि खिलाफत चळवळीत दुहीची बीजं नव्हती??? बरं मग पुढे मी काय बोलू!
>>Engraj ani Jinnha ani Muslim Raje jase Hydrabad, Junagadh che raje hyanni kahich kela nahi sagala kela te Gandhinnich
इंग्रजांना चांगलं मी कुठे म्हटलंय असं मला वाटत नाही आणि बाकी तुम्ही लिहिलेल्या घटना खूप नंतरच्या आहेत आणि खिलाफत खूप जुनी!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
गांधींना शिव्या घातल्या की अनेकांना मोकळे मोकळे वाटते असे सध्याचे चित्र आहे.
ReplyDeleteमी इतकेच म्हणीन. "प्रत्येक नाण्याला २ बाजू असतात. एका वेळी आपण एकाच बघू शकतो. दोन्ही नाही..." :)
रोहन,
ReplyDeleteगांधींना शिव्या घालणे हा ह्या लेखाचा हेतू नाहीये!
पण गांधींच्या चुका लोकांसमोर आणणे हा एकमेव हेतू आहे. गांधीभोवती जे देवत्वाचं वलय लावलंय ते भेदायचा प्रयत्न आहे!
आज गांधींना मरून ६० वर्षं झालीयेत.. तेव्हा नाण्याची दुसरी बाजूही आपल्यासमोर आली असायला हरकत नाही! एस्पेशली देशाची अवस्था पाहता!
तुर्कस्थानातील खलीफा विरुद्ध चळवळ हा तेथील लोकशाहीचा एक भाग होता ,आपल्या देशात कर्मकांड,जातीपाती,अंधश्रद्धा या विरुद्ध उठाव संत्कालापासून होत आहे.अजूनही परिवर्तन नाही....
ReplyDeleteखालीफाचा पुळका हिंदुस्थानातील मुस्लीमानला आला होता, त्यावेळी जीना मुस्लीमानला घेवून ब्रीटीशानला फेवर झाला होता या हिंदू मुस्लीम फळीचा फायदा इंग्रजानला होईल या साठी गांधींनी खिलाफतिला पाठींबा देवून मुस्लीम सानाजाची एकजूट राखली.
Anonymous,
ReplyDeleteखलिफाविरुद्ध चळवळ सुरू झाली, तेव्हा लोकशाही म्हणजे काय? इथपासून तिथे सुरूवात होती. पहिल्या महायुद्धामधील पराभवाच्या छायेत असलेलं, इंग्रजांच्या कराल जबड्यात जाण्याच्या मार्गावर असलेलं असं तुर्कस्थान हे छोटं राष्ट्र होतं. त्यांची राष्ट्रीय अस्मिता जागवून लहरी खलिफाच्या आणि कट्टर धर्मव्यवस्थेच्या कचाट्यातून सामान्यांना सोडवण्यासाठी अतातुर्क ह्या लोकविलक्षण नेत्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलं.
त्याचं कार्य उभ्या मानवजातीसाठी आदर्श होतं. त्याला शंभर वर्षं पुढचं भवितव्य दिसत होतं. आणि उलट गांधींनी तात्पुरत्या उद्दिष्टांसाठी कायमची दुहीची बीजं पेरली. जर जिना मुसलमानांना घेऊन ब्रिटीशांना फेवर झाला होता, तर गांधींनी मुसलमानांचं प्रबोधन करायला हवं होतं.
पण मेख इथेच होती. गांधींचा करिष्मा मुसलमानांना देशासाठी एकत्र आणू शकत नव्हता. त्यांना धर्माचाच आधार घ्यावा लागला. धर्मनिरपेक्षतेचा ह्याहून मोठा पराभव असू शकत नाही!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
I read one article in Loksatta today about Michael Manley, the fourth Prime Minister of Jamaica. It was under the heading "Tyanche Gandhi". Do read if you get time, I dont understand this urge to put every great leader in 'Gandhi' shoes. I agree अतातुर्कच्या आत्म्याला किती वेदना होत असतील.
ReplyDeletepilluwriter,
ReplyDeleteहल्ली फॅशनच आली आहे. गांधी हा ब्रँड मार्केट करण्यासाठी प्रत्येक चांगल्या नेत्याला जबरदस्तीनं ब्रँड ऍम्बॅसेडर बनवलं जातं! :)
खूप खूप आभार!