भाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५, भाग -६, भाग -७, भाग -८, भाग -९, भाग -१०, भाग -११, भाग -१२, भाग -१३, भाग -१४, भाग -१५, भाग -१६ आणि भाग -१७ पासून पुढे
"पण पोलिसांचा खबर्या ते वॉन्टेड क्रिमिनल हा प्रवास कसा काय झाला?" रेखानं अचानकच विचारलेल्या प्रश्नानं नरेंद्रची ट्रेनच्या खिडकीबाहेर बघताना लागलेली तंद्री भंग पावली.
त्यानं एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग बोलू लागला, "मी इमाने-इतबारे पोलिसांना खबरा देण्याचं काम करत होतो. काम तसं जीवावर बेतणारंच होतं, पण मला जीवाची कसलीच काळजी नसल्याचा साक्षात्कार मला ट्रेनमध्ये झाला होता. त्याप्रमाणेच पुढे सर्व सुरू होतं. सगळ्यात विचित्र मला ह्या गोष्टीचं वाटत होतं, की केलेल्या खुनांबद्दल मला काहीच वाटत नव्हतं. मला कुठेही अपराधी भावना आली नाही की स्वतःबद्दल घृणा वाटली नाही. मला काहीच वाटत नव्हतं हे सत्य होतं. जणू काही मी आयुष्याचा एक दिवस संपवून दुसरा सुरू केला होता. मुळात मला कसल्याच भावना राहिल्या नव्हत्या. कदाचित माझा भावनिक मृत्यू झाला होता."
"ह्म्म."
"तुला खरं वाटणार नाही मी काय बोलतोय ते. पण माझ्या जागी असणं किती विचित्र असेल हे तुला कळणार नाही. अवघड म्हणत नाही मी, विचित्र. जणू जगाला दोनच रंग उरलेत. काळा अन पांढरा. जिवंत आणि मृत, बस."
"बस बस. पुढे बोल."
"त्याच विचित्र मानसिक स्थितीमध्ये मी नक्षलवादी ट्रेनिंग घेतलं. बंदुका चालवणे, विविध प्रकारचे मार्शल आर्ट्स, सर्व्हायव्हल टेक्निक्स, डोंगरदर्या, दारूगोळा. मी मुळात इंजिनियर असल्यानं आधुनिक उपकरणं हाताळायला मी पटकन शिकलो. त्यामुळे मी त्यांच्या गुप्तचर विभागात होतो. रतन सहदेव त्यांच्यातला लेजेंड होता. तुझा विश्वास बसणार नाही, पण नक्षलवाद्यांकडच्या सगळ्या यंत्रणा आपल्या आर्मीएव्हढ्याच किंवा कांकणभर सरसच असतील. कारण त्या चीन, आयएसआय, सीआयए इत्यादींकडून येतात."
"सीआयए?"
"होय. ते एक विचित्र नेक्सस आहे. कोण कुणासाठी काम करतं हेही समजणं अवघड होतं बरेचदा. पण ते पुढे सांगतो. तर मी खबरा पोचवत असतानाच माझ्या ध्यानात आलं, की ह्या खबरांचा पोलिस गावकर्यांचे जीव वाचवण्यासाठी किंवा नक्षलवादी गटांवर छापे मारण्यासाठी करत नसून गावकर्यांना लुटण्यासाठी आणि नक्षलवादी गटांना राजकारण्यांच्या तालावर नाचवण्यासाठी करत होते. त्यांच्या सोयीनुसार नक्षली नेत्यांची एन्काऊंटर्स होत होती, किंवा नक्षली नेत्यांकडून खंडण्या घेऊन छुपा कारभार सुरू होता. शस्त्र, ड्रग्ज, हवाला सगळंच. ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझा कॉन्टॅक्ट असलेल्या पोलिसाला जाब विचारला, तेव्हा तो त्यांच्यातलाच असल्याची माहिती काढायला मला वेळ लागला नाही."
"मग?"
"मग काय? त्याला मारलं मी." नरेंद्र शांतपणे तिच्या नजरेला नजर देऊन म्हणाला. ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. तो पुढे बोलू लागला, "त्यानंतर मी कट्टर नक्षलवादी बनायचा प्रयत्न करू लागलो. तळ्यात मळ्यात राहण्याचा मला कंटाळा येऊ लागला होता. कंटाळा ही एकच भावना शिल्लक राहिली होती बहुदा. पण मग मी गावकर्यांची विविध प्रकारे मदत करणं अन्य गटांपासून किंवा पोलिसांपासून वेळप्रसंगी संरक्षण करणं इत्यादी गोष्टी करू लागलो."
"मग कल्पना कुठे?" रेखा मध्येच म्हणाली.
"सांगतोय सगळं पुढे." नरेंद्र एक एक शब्दावर जोर देत म्हणाला, "मी ट्रेनिंगला लागल्यापासूनच कल्पनाशी माझी ओळख झाली होती. ती लहानपणापासून त्याच गावांमध्ये लहानाची मोठी झालेली. ती स्त्रियांना ट्रेनिंग देत असे. पण मदतकार्य, धडक कृती इत्यादी वेळी आम्हाला एकत्र काम करावं लागे आणि बरेचदा सराव मोहिमा असत, त्यावेळीही आमचं बोलणं होई. मी बाहेरून आलेलो असल्यानं तिला माझ्याबद्दल फार कुतूहल असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. सुरूवातीला तिला माझ्याबद्दल संशय असल्यानं ती माझ्याशी जास्त बोलत असे आणि माझ्यावर नजर ठेवून असे. पण मी ते फार पूर्वीच ताडलं होतं आणि त्यामुळे माझं खबरा पोचवणं अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळे मी तिच्याशी हळूहळू फ्लर्ट करू लागलो. गोड बोलू लागलो. तिला थोडीशी स्पेशल ट्रीटमेंट देऊ लागलो. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. तिचा संशय कमी होऊन ती माझ्याकडे आकर्षित झाली. मी नकळत घोडचूक करून बसलो होतो. माझ्या मनात प्रत्यक्ष काहीच नव्हतं, पण ती गुंतत चालली होती.
आणि मग जेव्हा मी पूर्णवेळ नक्षलवादी बनलो, तेव्हा मी पोलिसाला मारलं म्हणून ती माझ्या अजूनच प्रेमात पडली. माझ्यासाठी सगळं अवघड होऊन बसलं. आता तिच्याशी प्रेमाचं नाटक करण्याची मला काहीच गरज नव्हती. पण न करूनही काय स्पष्टीकरण देणार होतो? पण एक मात्र होतं, मी स्वतःला आमच्या गटाच्या नक्षल विचारासाठी वाहून घेतलं होतं. पण मग एक दिवस आक्रीत घडलं. आमचा नेता मारला गेला आणि जो नवा नेता बनला, तो पैसे आणि दहशतीसाठी राजकारण्यांशी छुपी हातमिळवणी करू लागला. मी गुप्तहेर विभागात होतो, त्यामुळे मी अधून मधून काही कामगिर्या करत असे."
"म्हणजे खून."
"ह्म्म. इफ यू पुट इट ब्लंटली." असं म्हणून तो पुढे बोलू लागला, "तर ह्या कामगिर्या आम्ही बरेचदा सहकारी संघटनांसोबत करत असू. राजकारणी, नेते, समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी इत्यादी लोकांचे 'खरे' चेहरे आम्हाला दाखवले जात असत आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी आम्हाला मिळत असे. पण अर्थातच आम्हाला ते नक्की कोण हे सांगितलं जात नसे. त्यावेळेस मी उल्फा, बोडो, चीनी गुप्तहेर ह्या सर्वांसोबत काम केलं आणि त्याच काळात मी आयएसआयसोबत अर्थात जावेदसोबत काम केलं. पण मी जसजसा शिकत होतो, मला मी नक्की कुणाबरोबर आणि काय काम करतोय ते शोधून काढण्याची अक्कल येऊ लागली. जे चेहरे 'खरे' म्हणून दाखवले जाताहेत, ते सर्व बनावट आहे आणि आपण फक्त काही ठराविक नक्षलवादी नेत्यांच्या आणि त्यांच्या आश्रयदात्या राजकारण्यांच्या आणि प्रशासकीय अधिकार्यांच्या मार्गातले काटे काढत आहोत हे लक्षात येऊ लागलं. सामान्य, गरीब पिचलेल्या माणसासाठी लढण्याऐवजी त्यांच्याच पाठीराख्यांचं रक्त सांडतोय हा साक्षात्कार झाला. सरकारी जुलूमाविरोधात क्रांतीच्या नावाखाली देशद्रोह करतोय हे माझ्या लक्षात येऊ लागलं. मला ते सगळे प्रकार लगेच कळू लागल्यामुळे माझा भ्रमनिरास झाला.
माझी त्यावेळेस सर्व बाजूंनी घुसमट होत होती. हातनं होत असलेल्या खुनांचं काहीच वाटत नव्हतं. एखाद्या जिवंत व्यक्तीला मारल्यावर जो मनावर परिणाम होऊ शकतो तोच मुळात होत नव्हता. राग, लोभ, मत्सर, प्रेम वगैरे काहीच उरलं नव्हतं. उरली होती एकच आदिम भावना, हिंसेची. कल्पनाच्या माझ्याबद्दलच्या भावना फारच गहिर्या होत चालल्या होत्या आणि मला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. आणि तेव्हाच हा सत्तापलट झाला.
अशातच एके दिवशी माझ्या आणि कल्पनाच्या नात्यानं एक नको ती पायरी ओलांडली आणि मला मी काय करून बसलोय ह्याचा साक्षात्कार झाला."
रेखाच्या चेहर्यावरचे भाव एकदम पालटले. नरेंद्रच्या ते लक्षात आलं आणि तो बोलायचा थांबला.
-----
"तुम्ही जेलमधून बाहेर आला आहात, तर तिथे कुणाला शंका येत नाही का?" रमेश डोळ्यांवरचा गॉगल काढून टेबलावर ठेवत म्हणाला.
"मी लॉन्ड्री करतोय." शिंदे कटिंग चहा भुरकत म्हणाले.
"आता हे जेलमधल्या कैद्याचं नाटक बेकायदेशीर राहिलेलं नाही शिंदे."
"म्हणजे?"
"आता 'ते' लोकंपण माझ्या साईडनं आहेत."
"कसं काय?"
"मी सिन्नरकरांना भेटल्याचं त्यांना लक्षात आलं असावं बहुदा, त्यामुळे घाईगडबडीनं त्यांनी मला स्वतःच्या बाजूनं करून घ्यायचा उपाय शोधलाय."
"काय?"
"त्यांनी मला माझ्या बहिणीच्या खुन्याचं नाव सांगितलं." रमेश अत्यंत शांतपणे म्हणाला.
"काय?" शिंदेंचा आवाज एकदम चढला, "मग तुम्ही इतके शांत कसे?"
"मी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवू शिंदे? नाव काय सांगितलं ते तरी ऐकाल."
"काय?"
"रतन सहदेव."
"..."
"त्यांनी मला डीएनए एव्हिडन्स दिला आहे. आता बोला."
"मग अजून काय पाहिजे आहे तुम्हाला."
"ते लोक काहीही फॅब्रिकेट करू शकतात शिंदे."
"तरी..."
"आय नो. मी चान्स घेत नाहीच आहे. एवीतेवी रतन हाच आपला पुढचा धागा आहे."
"मग आता पुढे?"
"त्या बाईबद्दल आणि प्रत्यक्ष तुरूंगफोडी पाहिलेल्या माणसाबद्दल अजून माहिती मिळाली का?"
"नाही साहेब. प्रत्यक्ष पळताना पाहिल्याचं खूप जण सांगतात पण काहीतरी गडबड आहे. नुसत्या बढाया आहेत. त्यादिवशीच्या सगळ्यांच्या पोझिशन्सचा आता मला बर्यापैकी अंदाज आलाय. त्यावेळेस पळण्याच्या प्रत्यक्ष जागेजवळ जे जे लोक असू शकत होते, त्यांच्यावर मी नजर ठेवून आहे. त्यातला एकजण एकदम निवांत असतो, त्याला कसलीच काळजी नसते. त्यावरून त्याचा घडलेल्या गोष्टीशी काहीतरी संबंध असावा, बहुतेक त्यानं प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी पाहिल्या असाव्यात आणि तो त्यांचा आतला माणूस असावा असं मला वाटतं. पण तो असा सांगणार नाही. त्याला विश्वासात घ्यावा लागेल." शिंदे पिण्याचा आविर्भाव करत म्हणाले.
"त्या सगळ्यांची नावं द्या मला, मी त्यांच्या कुंडल्या मांडून पाहतो." रमेशनं एक कागद पुढे केला.
शिंदेंनी चटचट त्या कागदावर चार नावं खरडली.
"रतनबद्दल पोलिसांनी काय सांगितलं ते आधी व्यवस्थित सांगा आता."
"फारच बोलकी माहिती आहे साहेब, म्हणूनच वेळ काढून या म्हटलं होतं मी."
"ह्म्म."
"रतन ज्या दिवसापासून पकडला गेला, त्यानं तोंडातून एक शब्दही नाही काढला. त्याला फक्त फाशी हवी होती बहुतेक. त्यामुळे तो गप्प राहिला. खटल्यातही आणि जेलमध्ये इंटरोगेशनलाही. कुणाचंही नाव सांगितलं नाही त्यानं. त्यानं आधीच आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याचे हात कायम बांधलेले असत. पण तो तसा शांत होता. आक्रस्ताळेपणा नाही, आदळआपट नाही. इथे आल्यानंतर त्याला वेगळ्याच बराकमध्ये सेपरेट सेलमध्ये ठेवलेलं होतं. त्याचा मोकळा वेळही त्याच मैदानात पण एका जाळीच्या पलिकडे असायचा. तो फक्त येऊन शांत बसायचा आणि परत जायचा. पण जसजसा खटल्यामध्ये वेळ जाऊ लागला, तो अस्वस्थ होऊ लागला. तो काही बोलत नसूनही न्यायप्रकिया प्रचंड वेळखाऊ ठरत होती. त्यानं मागितला नसतानाही आपल्या न्यायव्यवस्थेप्रमाणे त्याला जो वकील मिळाला, तो हाय प्रोफाईल केस पाहून मायलेज खाण्यासाठी विविध स्टंट्स करू लागला. रतन १७ वर्षांचा असून त्याला बालगुन्हेगार म्हणून केस चालवावीपासून ते पकडला गेलेला रतन हा खरा गुन्हेगार नाहीच असली वक्तव्य करण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्यामुळे खटला उगाचच खेचला जाऊ लागला. मग रतनवरची रिस्ट्रीक्शन्स थोडी कमी झाली. त्याला मोकळ्या वेळी इतर गुन्हेगारांसोबत सोडण्यात येऊ लागलं. आणि त्याची पुराणिकसोबत ओळख झाली."
"चिटफंडकार पुराणिक?"
"होय. तो रतनसोबत तासनतास बोलत बसायचा."
"पण रतन बोलू लागला होता?"
"नाही. रतन गप्पच बसून राहायचा, पण पुराणिक तासनतास बोलायचा आणि वल्लभचा ग्रुप त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसून पुराणिकचं बोलणं ऐकायचा."
"म्हणजे पळालेला तिसरा कैदी."
"होय. तुरूंगात एक समाजसेवी संस्था यायची गांधीवाद शिकवायला. थोड्या दिवसांतच रतनलाही त्यांचे स्वयंसेवक सभांना घेऊन जाऊ लागले. आणि रतनला फाशी डिक्लेअर झाली. पण काहीतरी झालं आणि रतनच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल झालं. आणि रतन अजूनच अस्वस्थ राहू लागला. त्यानं सभांना जाणं, पुराणिकबरोबर बसणं बंद केलं. काही दिवस तर त्यानं अन्नपाणीही सोडलं, पण तुरूंगाच्या अधिकार्यांनी त्याला सलाईन लावून जगवलं. सुप्रीम कोर्टातही त्यानं गप्प राहणंच पसंत केलं, पण त्याच्या वतीनं एका वकीलाला वकीलपत्रही दिलं गेलं होतं."
"म्हणजे? त्याला मरायचं होतं पण त्याच्या वतीनं कुणीतरी हे करत होतं? त्याच्या मनाविरूद्ध? आणि कुणालाच ती व्यक्ति कोण हे माहित नव्हतं?"
"बहुतेक त्याला स्वतःलाही. पण सुप्रीम कोर्टातही फाशीवर शिक्कामोर्तब झाल्यावर तो पुन्हा नॉर्मलला आला. त्याला भेटायला 'ती' शिक्षिका बाई येतंच होती. पण तिचं काय सांकेतिक बोलणं चालायचं ते कुणालाच कळायचं नाही. पण त्यानंतर पुन्हा गडबड झाली आणि रतनच्या वतीनं राष्ट्रपतींकडे माफी याचिका गेली."
"पण रतन बोलू शकत होताच ना? मग तो बोलत का नव्हता की हे सर्व मी करत नाहीये. मला असलं काही करायचं नाही वगैरे."
"तेच कुणाला कळत नाही. दरवेळेस असं काही झालं की 'ती' शिक्षिका बाई त्याला भेटायला यायची आणि मग तो अस्वस्थ होऊन परत सेलमध्ये जायचा. पण माफीअर्ज झाल्यावर मात्र कडेलोट झाला. कारण माफीअर्ज जाणं म्हणजे आपल्या देशात जवळपास फाशी रद्द झाल्यासारखंच. आणि पुन्हा त्यानं जर असं म्हटलं असतं, तर त्याच्या वकीलांनी 'मानसिकदृष्ट्या अक्षम' असा युक्तिवाद मांडला असता आणि फाशीच रद्द झाली असती. पण ह्यावेळेस बाई भेटून गेल्यावर कसं कुणास ठाऊक रतनकडे ब्लेड आलं आणि त्यानं स्वतःची नस कापून घेतली, पण वल्लभनं हवालदारांना त्याच्याकडे पाहून यायची टीप दिली आणि वेळीच त्याचा जीव वाचला. रतन मानसिकदृष्ट्या अक्षम आहे असं कुणालाच म्हणायचं नव्हतं, म्हणून मग ते तसंच दाबून ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यानं स्वतःचं डोकं भिंतीवर आपटायचा प्रयत्न केला पण अपयशी ठरला. स्वतःच्या पायजम्याची फाशी लावून घ्यायचा प्रयत्न केला. मोकळ्या वेळेत जाळीवर स्वतःची नस कापून घ्यायचा प्रयत्न केला, पण पुन्हा वल्लभमुळे त्याचा जीव वाचला. वल्लभच्या ग्रुप त्याच्यावर कायम नजर ठेवून असे. कारणं काय ती कळायला मार्ग नाही."
"कारण रतनही एकेकाळी नक्षलवादी होता." रमेश म्हणाला.
"ओह्ह. तरीच. पण मग त्याला जबरदस्तीनं पुन्हा सभांना नेऊ लागले आणि हळूहळू त्याचा तो भर ओसरला. त्या संस्थेची एक विवक्षित स्वयंसेवक त्याच्यामध्ये फारच लक्ष घालू लागल्यावर तो पूर्वपदावर येऊ लागला आणि चक्क बोलायला लागला."
"ह्म्म. ही तीच का जिनं त्याला पळायला मदत केल्याचं सांगतात?" रमेश म्हणाला.
"होय. तीच."
"मग तिच्याबद्दल काय माहिती?"
"तिच्याबद्दल फार माहिती मिळत नाहीये हो. ती त्या गांधीवादी संस्थेची स्वयंसेवक होती. रतनशी फार बोलायची. बाकी फारशी माहिती नाही कुणाला. तिला रतनमध्येच जास्त इंटरेस्ट होता. संस्थेचं नाव अहिंसा ट्रस्ट."
"ह्म्म." रमेश स्वतःशीच म्हणाला आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, "काय म्हणालात? अहिंसा ट्रस्ट?"
"हो. का?"
रमेशच्या डोक्यात एकदम कनेक्शन्स लागायला लागली.
विराज गेल्यानंतर जेव्हा रमेश विराजच्या कुटुंबाला भेटायला गेला होता. तेव्हा तिथे त्याला कळलं की विराजची विधवा आता विराजच्या कुटुंबासोबत लातूरमध्ये राहत नाही. विराजच्या मृत्यूनंतर तिनं घर सोडलं होतं. आणि ती पुण्याच्या एका स्वयंसेवी संस्थेत कार्य करायला म्हणून गेली होती. आणि त्यांनीही संस्थेचं नाव हेच सांगितलं होतं. 'अहिंसा ट्रस्ट'. आता पुढची चौकशी अहिंसा ट्रस्टमध्येच करणं भाग होतं.
"पण बबन महाडिकचं काय? तो कुठे येतो पिक्चरमध्ये?" प्रकट रमेश म्हणाला.
"तेच तर ना साहेब. पोलिसांच्या मते त्यांचा एकमेकांशी दूरान्वयानंही संबंध नव्हता. बबन महाडिक लीडर लोकांचा माणूस म्हणून त्याची वट असायची. आणि तो अन त्याच्या ग्रुप वेगळाच असायचा."
"हम्म. कदाचित कैद्यांपैकीच कुणाकडून तरी आपल्याला संपूर्ण कथेचा उलगडा होईल."
"बरं. पण मग तुम्ही?"
"अहिंसा ट्रस्टकडे जातो आता."
"पण तुम्ही अहिंसा ट्रस्टमधून कुठे जाणार आहात? तिनं खोटं नाव दिलं असलं तर?"
"हरकत नाही. मला सगळे मार्ग चोखाळले पाहिजेत. कारण मला ह्या पळालेल्या चौघांपैकी एकाचा तरी माग हवा आहे शिंदे. त्याखेरीज रतनपर्यंत पोचणं महामुष्किल आहे. बबनचा मृत्यूदेखील का आणि कसा झाला ते कळायला हवं." शिंदेंनी मान डोलावली. मग तो पुढे म्हणाला, "तुम्ही जास्तीत जास्त उद्या रात्री तिथे थांबा. परवा काही झालं तरी बाहेर या. कारण माझा ह्या लोकांवर विश्वास नाही." रमेशनं डोळ्यांवर पुनश्च गॉगल चढवला आणि तो उठून निघून गेला.
-----
रेखानं नजर फिरवली होती आणि ती एकटक खिडकीबाहेर पाहत होती. नरेंद्र तिच्याकडेच पाहत होता. आपण सत्य सत्य म्हणून सांगताना काय बोलून गेलो हे त्याच्या लक्षात आलं होतं. तिच्या मनात काय सुरू असावं ह्याचा त्याला थोडा थोडा अंदाज येत होता. पण कुठेतरी आत त्याला जाणवत होतं, की हे पूर्वीसारखं नाहीये. कल्पनाच्या बाबतीत जसं घडलं होतं, तसं हे नव्हतं. कुठेतरी आतमध्ये त्यालाही रेखाबद्दल काहीतरी वाटत होतं. त्यानं खूप विचार केला आणि मग हलकेच तिच्या हातावर हात ठेवला. तिनं आधी हाताकडे मग त्याच्याकडे पाहिलं. तिचे डोळे डबडबले होते. त्याच्या डोळ्यात अपराधी भाव होते आणि चेहरा नेहमीप्रमाणेच कोरा. तिनं त्याचा हात झटकायचा प्रयत्न केल्यावर त्यानं तिचा हात घट्ट धरला. तिच्या भरल्या डोळ्यांतले अश्रू हलकेच गालांवरून ओघळले. ती बाहेर पाहू लागली. नरेंद्रनं तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि तिच्या गालांवरचे ओघळ स्वतःच्या बोटांनी पुसले. तिनं नजर खाली केली, तर त्यानं तिच्या हनुवटीला धरून हलकेच तिचा चेहरा वर केला. उजवा हात त्यानं अजूनही घट्ट धरून ठेवला होता. शेजारच्या कंपार्टमेंटमधले लोक त्या दोघांकडेच पाहत होते. आणि ते दोघे एकमेकांच्या डोळ्यांत एकटक पाहत होते.
असाच काहीवेळ गेल्यावर तो हळूच म्हणाला, "माझं तुझ्यावर.. प्रेम आहे सायली."
तिच्या चेहर्यावरचे भाव एकदम पालटले आणि ती एकदम मुसमुसून रडायला लागली. त्यानं तिला जवळ ओढलं आणि तो थोडा जागेवर सरकला आणि दोघेही त्याच्याच सीटवर बसले. आणि तो तिला हलकेच थोपटू लागला.
"तू मला पण सोडून निघून जाशील का एक दिवस?" तिनं थोडासा भर ओसरल्यावर हुंदके देत विचारलं.
"कधीच नाही." तो क्षणाचाही विचार न करता म्हणाला.
-----
"रतन फासीचा कैदी होता रे भाऊ. त्याला आपण फारसा ओळखायचो नाय." म्हमद्या पूर्ण टाईट झाला होता.
"मग? कसा काय त्याचा खास झालास तू?"
"लय लंबी कहाणी है भौ." म्हमद्या अजून एक घोट मारत म्हणाला.
"मग सांग की आरामात, अख्खी रात्र आणि अख्खा खंबा पडला आहे आपल्याकडं." शिंदे डोळे मिचकावत म्हणाले.
"रात भर जाम से जाम टकरायेगा.. रात भर जाम से.." म्हमद्या थोडासा जास्तच झिंगल्याचं शिंदेंच्या लक्षात आलं तशी ते लगेच गाडी विषयावर आणू लागले.
"रतन नक्की कसा होता जेलमधे?"
-----
"त्या रात्रीनंतर दुसर्या दिवशी सकाळीच मी एक मोठा निर्णय घेतला." नरेंद्र रेखाला हलकेच थोपटत म्हणाला. बाहेर मिट्ट काळोख पडला होता. सगळा डबा शांत झोपला होता. ट्रेन आपल्याच लयीत थडथडत जात होती. बाहेर माळरानंच माळरानं एकामागे एक पळत होती. रेखा नरेंद्रच्या बाहुपाशात एकदम थकल्यासारखी रेलून बसली होती.
"सकाळी आमचा नेता मैदानात बसून सराव पाहत होता. बाकी लोकही त्यांची त्यांची कामं करत होते. नक्षलवादी कॅम्प म्हणजे एखादी छोटीशी वसाहतच असते."
"हो त्यादिवशी कल्पनाकडे पाहिली ना." ती बोलली आणि एकदम कल्पनाचं नाव आल्यामुळे तिला थोडंसं वाईट वाटलं.
"ह्म्म. तशीच थोडीफार. तर मी युनिफॉर्म घातला नाही. साधे कपडे घातले, एके-४७ उचलली आणि सरळ जाऊन आमच्या नेत्यावर मैदानातच सर्वांदेखत गोळ्या झाडल्या. सगळे एकदम अवाक् झाले. त्याचं निश्चेष्ट शरीर छिन्नविच्छिन्न होऊन माझ्यासमोर पडलेलं होतं आणि मला नेहमीसारखंच काहीही वाटत नव्हतं. मी शांतपणे सर्वांवरून नजर फिरवत होतं. मी बंदूक बाजूला फेकली आणि कुणीतरी पुढे येऊन माझ्यावर झडप घालेल किंवा मला गोळ्या घालेल ह्याची मी वाट पाहू लागलो. पण पाच मिनिटं झाली तरीही भर ओसरत नव्हता. कल्पनादेखील अवाक् होऊन स्तब्ध उभी राहून पाहत होती. आणि अचानकच एकाला कंठ फुटला. आणि तो चक्क माझा जयजयकार करू लागला."
"काय?"
"होय. आणि त्याच्यापाठोपाठ सर्वांनीच त्याच्या सुरात सूर मिसळला आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांना कुणालाच हा नेता आवडत नव्हता आणि मी त्याला असा संपवल्यामुळे ते माझ्या धडाडीवर खूष झाले आणि त्यातल्या एकानं मी फेकलेली बंदूक परत माझ्या हातात दिली आणि मी नवा नेता असल्याचं जाहीर करून एकच गलका सुरू केला.
मी ह्या झालेल्या घटनेनं भांबावून गेलो. मला काय करावं तेच कळेना. लोक माझा जयजयकार करत होते आणि कल्पना खुषीनं आणि कौतुकानं माझ्याकडे पाहत होती. आणि तेव्हढ्यातच मला कल्पना सुचली.
मी जोरात ओरडून सगळ्यांना शांत केलं आणि बंदूक घेऊन कल्पनाच्या दिशेनं चालत गेलो. सगळे काय होणार म्हणून पाहू लागले. कल्पनाच्या डोळ्यात आशा, उत्कंठा आणि कौतुक दाटून आलं होतं. मी ती बंदूक तिच्या हातात दिली आणि जोरात ओरडून सर्वांना आजपासून मी नव्हे तर कल्पना नवी नेता असल्याचं सांगितलं. आणि मी गट सोडून कायमचा जात असल्याची घोषणाही मी त्याच क्षणी केली. सर्वत्र शांतता पसरली. कल्पनाच्या डोळ्यातले त्यावेळचे व्यथित भाव मी आजही विसरू शकलेलो नाही. मी अजून काहीही न बोलता तिथून निघून गेलो. त्यादिवसानंतर मी कल्पनाला भेटलो तो परवाच." आणि नरेंद्र बोलता बोलता थांबला. रेखाला दमल्यामुळे आणि मनावरचं बरंच ओझं उतरल्यामुळे शांत झोप लागली होती. त्यानं तिला थोपटणं थांबवलं.
ट्रेनच्या खिडकीतून मंद चंद्रप्रकाश येत होता. त्या प्रकाशात रेखाचा डोळे मिटलेला शांत चेहरा खूपच सुरेख दिसत होता. इतक्या दिवसांच्या सोबतीत त्यानं रेखाला कधीच इतक्या जवळून निरखून पाहिलं नव्हतं. तिची रेखीव जिवणी, सरळ तरतरीत नाक आणि आखीव भुवया. खिडकीतून येणार्या थोड्या वार्यानं तिच्या बॉयकट केसांमध्ये हलकीशी सळसळ होत होती. नरेंद्र तिच्याकडे पाहतच राहिला. आणि त्याला त्याची आणि तिची पहिली भेट आठवली.
-----
रमेश 'अहिंसा ट्रस्ट' च्या ऑफिसात बसून तिथले रिस्पॉन्सिबल येण्याची वाट पाहत होता. तिथे लगबगीनं काम करणारी, फोनना उत्तरं देणारी चुणचुणीत मुलगी पाहून त्याला आपल्या बहिणीची आणि पर्यायानं सुवर्णाची आठवण येऊ लागली. आणि गेल्या काही दिवसांतला सगळा घटनाक्रम त्याच्या डोळ्यांसमोर झरझर येऊ लागला.
रमेशनं ट्रिगर ओढला पण ट्रिगर जाम झाला होता. त्यानं पुनःपुन्हा तोच प्रयत्न केला पण ट्रिगर काही केल्या हलेना. आणि रमेशला साक्षात्कार झाला की आपला मृत्यू आत्ता लिहिलेला नाही आणि असा लिहिलेला नाही. आणि त्याक्षणी त्याला आपण काय पळपुटेपणा करतो आहोत ह्याची जाणीव झाली आणि स्वतःचीच लाज वाटली. झाल्या चुका त्या निस्तरणं हे आपल्या ह्या आयुष्याचं उद्दिष्ट करायचा निर्णय त्यानं त्याचक्षणी घेतला. असं ठरवल्यावर त्याला थोडंसं बरं वाटू लागलं.
त्यानं भरलेल्या बॅगा उचलल्या आणि घर बंद करून तो बाहेर पडला. मोबाईल फोनचं सिमकार्ड काढून जाळून त्यानं फेकून दिलं आणि तडक मुंबई गाठली. मुंबईत तो सर्वप्रथम शिंदेंना भेटला आणि त्यांना त्यानं अथपासून इतिपर्यंत सर्व काही सांगितलं. शिंदेंना सगळं सांगितल्यावर त्याला त्याच्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. तो एकदम शांत झाला. तोवर त्याच्या कानावर एसीपी आणि पत्रकाराच्या डबल मर्डरमुळे हाहाकार उडाल्याच्या बातम्या आल्या. त्या राती गावाच्या दुसर्या टोकाला देवीचा उत्सव असल्यानं सगळे गावकरी तिथे होते आणि त्यामुळे डबल मर्डरला साक्षीदारच नसल्याचीही बातमी त्याला कळली. रमेश जणू काही व्यसनमुक्ती करत होता. तो स्वतःला बहिणीच्या आणि सुवर्णाच्या मृत्यूपासून वेगळं काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्यानं स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. आश्चर्य म्हणजे कर्नल आणि त्याच्या माणसांकडूनही त्याच्याशी कुणी संपर्क केला नव्हता. कदाचित त्यांनाही तोवर रमेशचा माग लागला नव्हता. शिंदे त्यांच्यापरीनं त्याची सर्व मदत करत होते. त्याला सगळ्या बातम्या देत होते आणि स्वतःची नोकरी सांभाळून रोज त्याला भेटायला, त्याच्याशी बोलायला जात होते.
अशातच त्याला नवं खूळ चढलं. राजे आणि डॉ. काळेंच्या पत्नींना त्यानं जे जे केलं ते सर्व सांगून टाकायचं आणि मग त्या जी शिक्षा देतील ती मान्य. शिंदेंनी त्याचं मन वळवायचा परोपरी प्रयत्न चालवला पण रमेश त्यांना दाद देईना. त्यानं ते एकदम मनावरच घेतलं. आणि तेव्हाच नैतिक जवाबदारीतून इंदूरचे कमिशनर सिन्नरकरांनी राजीनामा दिल्याची बातमी आली आणि आश्चर्य म्हणजे ते रमेशचा माग काढत मुंबईला रमेशकडे आले. तिथेच चित्र पालटलं. त्यांनी रमेशला राजे आणि डॉ. काळे आणि त्याचमार्फत त्याच्या बहिणीच्या अन सुवर्णाच्या खुनामागे कोण आहे ते शोधून काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आणि त्याच्या डोक्यावरून माफी मागण्याचं भूत उतरवलं.
मग त्या तिघांनी मिळून प्लॅन बनवला आणि त्याअंतर्गतच शिंदे अंडरकव्हर जेलमध्ये कैदी म्हणून गेले, सिन्नरकर त्यांचे जुने कॉन्टॅक्ट्स वापरून माहिती काढू लागले आणि रमेश सगळे तुकडे जुळवायचा प्रयत्न करू लागला.
अहिंसा ट्रस्टच्या ऑफिसात शिरतानाच आपण योग्य ठिकाणी आलो आहोत ही जाणीव त्याला होऊ लागली होती. इथे काहीतरी कामाचं मिळणार असं त्याला आतून वाटत होतं, त्यामुळेच तो कितीही वाट पाहावी लागली तरी चालेल, ह्याच तयारीनं तिथे बसला.
रमेशची तंद्री त्याच मुलीच्या बोलावण्यामुळे तुटली. त्या ऑफिसातले रिस्पॉन्सिबल आले असल्याचं अन त्यांनी रमेशला त्यांच्या कक्षात बोलावल्याचं तिनं त्याला सांगितलं. रमेश धन्यवाद म्हणून उठला आणि तिनं दाखवलेल्या दिशेनं गेला.
क्रमशः

No comments:
Post a Comment