भाग १, भाग २, भाग ३ आणि भाग ४ पासून पुढे
रमेश भणगेंच्या बोलण्याचा विचार करत होता. ही केस सुरू झाल्यापासून त्याला पुन्हा निद्रानाशाचा त्रास सुरू झाला होता. गादीवर पडल्या पडल्या तो त्यांच्या वागण्याचा आणि त्यांच्या प्रत्येक वाक्याचा ऍनालिसिस करत होता. त्याचा अंदाज खरा ठरला होता, ती केस त्याला वाटत होतं त्याहून खूप जास्त गुंतागुंतीची होती आणि ह्या सगळ्यामागे काहीतरी काळं गुपित दडलेलं होतं आणि कुणीतरी खूप शक्तिशाली माणूस किंवा गट मोठ्या कटाक्षानं ते गुपित, गुपितच राहावं ह्यासाठी प्रयत्नशील होता. 'त्या' तीन गुन्हेगारांच्या फाईल्स मिळणं अत्यावश्यक होतं आणि महत्वाचं म्हणजे राजेंचा खरा
ऑटॉप्सी रिपोर्ट किंवा त्यांच्या मृत्यूचं खरं कारण कळणं भाग होतं. 'डॉ. कुर्लेकर' त्याला एकदमच सुचलं. ते आपली मदत करू शकतात.
-----
"आता काय झालं?"
"..."
"हे काय? आता काय गर्लफ्रेंडसारखा अबोला धरणार आहेस?" नरेंद्र डोळे मिचकावत म्हणाला.
"मी आपली गप्पच बसते. कारण काही विचारलं तर प्लॉझिबल डिनायेबिलिटीच्या नावाखाली तू सांगणार नाही म्हणशील. इन केस यू डोन्ट गेट इट, यू आर इन्सल्टिंग मी." तिच्या नाकपुड्या फुरफुरत होत्या.
नरेंद्र दोन मिनिटं शांत बसला, "ह्म्म. ऑलराईट. काय विचारायचंय ते विचार. मी उत्तर देईन."
"ही गुवाहाटीची काय भानगड आहे? मला सगळं व्यवस्थित आणि तपशीलवार सांग."
"त्या रात्री जेव्हा मी क्षीरसागरला मारलं..."
"..आपण.."
"ओके, आपण जेव्हा क्षीरसागरला मारलं, तेव्हा मी त्याच्या लॉकरच्या चाव्या काढून घेतल्या."
"ज्या तो नेहमी गळ्यात घालून फिरतो असं मीच तुला सांगितलं होतं."
"एक्झॅक्टली. तर त्या चाव्या मी अलगद, मानेवर कुठेही खेचून काढल्याचा मार्क येणार नाही अशा तोडून घेतल्या. आणि दुसर्या दिवशी मी क्षीरसागरच्या घरी पोचलो."
"असाच?"
"ऑफकोर्स गेट-अप बदलून. खोटं नाक, हनुवटी आणि लेन्सेस लावून."
"बिना दाढी-मिशी?"
"प्रत्येक वेळी दाढी-मिशी हा बेस्ट गेट-अप नसतो. जेव्हा खून झालेल्याच्या नातेवाईकांकडे आपण जातो, तेव्हा ती
माणसं दुःखी असतात पण सावध असतात. तेव्हा दाढी-मिशी फार ऑबव्हिअसली संशयाचं कारण बनू शकतं. अशा
वेळेस त्यांना कॉन्सन्ट्रेट करायला एक डिटेल द्यावं."
"म्हणजे?"
"मी इथे मानेवर एक ॐ चा टॅटू लावून गेलो होतो. इट ऑल लाईज इन द डिटेल्स. लोक असलं काही दिसलं की बाकी पाहत नाहीत. खोटी हनुवटी आणि नाक नजरेत यायला बरंच कॉन्सन्ट्रेशन लागतं, ते होत नाही. तर असो. मी तिथे गेलो. आणि त्यांना प्रणवच्या हस्ताक्षरात लिहिलेलं मला पुण्याला मिळालेलं पत्र दाखवलं."
"कुठलं पत्र? तेच जे तीन दिवसांपूर्वी रात्री लिहित बसलेलास ते?"
"होय. की 'मी माझ्या चाव्या सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवतोय कारण मला जीवाला धोका असल्याची भीती आहे. माझा मेव्हणा ज्या व्यवहारांमध्ये गुंतलेला होता, त्याची फळं मलाही बहुतेक भोगावी लागतील, म्हणून मी इतके दिवस गप्प आहे. त्यामुळे माझ्या चाव्या आता माझ्या शरीरासोबत सुरक्षित नाहीत, मी त्यांना माझ्या मेव्हण्याच्या घरी, त्याच्या लॉकरमध्ये ठेवतो आहे. ह्या जागेची कुणाला शंका येणार नाही. माझ्या लॉकरमध्ये जे काही आहे, ते इतकं संवेदनशील आहे की ते तिथे आहे, म्हणूनच मी जिवंत आहे. मला पुढील दहा दिवसांमध्ये काही झाल्यास तू येऊन माझ्या कुटुंबियांना हे पत्र दाखव आणि चाव्या घेऊन लॉकर उघडून त्यातलं सर्वकाही माझ्या कुटुंबियांपर्यंत पोचव. ते माझ्या मेव्हण्याला लवकरात लवकर निरपराध सिद्ध करू शकतं.' आणि मायना वगैरे बाकी सगळं."
"पण त्यांना जराही शंका आली नाही?"
"कशी येईल, वर्तकच्या लॉकरचा कोडही एका वेगळ्या कागदावर होता असं मी सांगितल्यावर, दे हॅड टू गिव्ह मी अ चान्स."
-----
"डॉ. तुमच्याशिवाय माझी कोण मदत करणार?"
"रमेश, हे बेकायदेशीर आहे. कुणाला कळलं की मी ह्यात तुला मदत केलीय, तर माझ्या अब्रूचे आणि नोकरीचे
दोन्हीचे तीन तेरा वाजतील."
"डॉ. तुम्ही सिनियर डॉक्टर आहात. तुम्हाला मॉर्गला ऍक्सेस मिळेल. तुम्ही फक्त मॉर्गमध्ये शिरा आणि मला कसंतरी आत घ्या. मी बघतो पुढे काय ते."
"अरे पण मी सायकिऍट्रिस्ट आहे, मी मॉर्गमध्ये कशाला गेलो असा प्रश्न कुणी विचारला तर?"
"त्याचं सोल्युशन आहे. तिथला जो हवालदार आहे, त्याला मी ओळखतो. त्याला सध्या बरेच पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत. मी कालच त्याच्यासोबत बराच वेळ बोललो आणि त्याला नसलं तरी ओढवून त्याला डिप्रेशन असल्याची मी खात्री करून दिली आहे, त्याचसोबत त्याला तुमचा रेफरन्स दिला. त्याप्रमाणे त्यानं आज तुमच्यासाठी रिक्विझिशन भरलंय. तुम्ही त्याला अर्जंटली अपॉईंटमेंट द्या आणि तुमच्या घराजवळ असल्याने मॉर्गमध्येच येऊन भेटतो म्हणून सांगा."
"रमेश, इतकं काय आहे ह्या केसमध्ये? आय होप, तुला माहितीय तू काय करतोयस ते. मी तुझ्यासाठी माझंही करियर पणाला लावतोय."
"मला ठाऊक आहे मी काय करतोय. एका निरपराध, कर्तव्यदक्ष माणसाच्या मृत्यूचा तपास लावतोय. तुम्हाला आत शिरून ही किंवा ही खिडकी उघडायची आहे." रमेशनं हातातल्या मॉर्गच्या नकाशावर खूण केली.
-----
त्याची बायको आणि बायकोचा बाप, मला वर्तकच्या घरी घेऊन गेले आणि त्याच्या बेडरूममधलं पेंटिंग दाखवलं आणि त्याच्यामागे सेफ असल्याचं मला सांगितलं. वर्तकची बायकोसुद्धा ऑब्व्हिअसली त्याच बेडरूममध्ये झोपत असणार, म्हणजे वर्तकचं खरं सेफ त्या खोलीत नसणार ह्याची मला खात्री पटली. बीसाईड्स, ती खोली बाहेरूनही फारच ऍक्सेसिबल होती. वर्तकसारखा हजार घोळांमध्ये असणारा माणूस कमालीचा पॅरानॉईड असणार. मी पाणी मागवायच्या आणि मग प्यायच्या मिषानं खोलीवर एक नजर फिरवली. खिडक्यांची लॉक्स टॅम्पर्ड होती. आणि तीन ग्रिल्स बदललेली दिसत होती. कुणीतरी गेल्या काही दिवसांत बाहेरून आत आलं होतं. म्हणजे एक तर मला जे हवं होतं, ते ऑलरेडी गेलेलं होतं, किंवा अजूनही संधी होती. ती सगळी मंडळी माझ्याकडे मोठ्या आशेनं पाहत होती. मला चक्क थोडंफार अपराधी वाटू लागलं होतं."
"हाहाहा... अपराधी कशाबद्दल?" तिच्या हसण्यात विषाद होता.
"होय, मीही स्वतःशी तोच विचार केला. त्यांच्या स्थितीबद्दल वाईट वाटणं ठीक, पण अपराधी वाटण्याची काहीच गरज नव्हती. मग मी कामाला लागलो. त्यांनी ते पेंटिंग एक कळ दाबून बाजूला केलं आणि सेफ मला दाखवलं. मी सेफ नीट पाहिलं, ते नुकतंच हाताळलं गेलं होतं. त्याच्या डायलवर धूळ नव्हती आणि त्या सेफच्या दरवाजाभोवतीच्या धुळीच्या पॅटर्नवरून ते उघडलं गेल्याचं स्पष्ट होतं. आता हे सेफ उघडून काहीही उपयोग नव्हता. त्यामुळे हे ते सेफ नसल्याचं मी जाहीर केलं.
सर्वांनाच धक्का बसला. मग कुठलं सेफ? मी माझा आतला आवाज ऐकायचं ठरवलं. जर मी पॅरानॉईड असेन तर मी कुठे ठेवेन?
मी विचारलं, "घरात अशी एखादी खोली आहे का, जिथे खिडकी नाही?"
त्याच्या पर्सनल लायब्ररीला खिडकी नव्हती. आणि तो घरात असल्याचा जवळपास सगळाच वेळ लायब्ररीत घालवायचा. ऑफकोर्स त्याच्या सागवानी टेबलाखाली, ज्यावर त्याचे पाय कायम असायचे, त्याची सेफेस्ट जागा होती. मी ते सागवानी टेबल सरकवलं आणि खालचं लिनोलियम बाजूला केलं आणि तिथे त्याचं 'ते' सेफ होतं."
"पण तुझ्याकडे तर कोड नव्हताच."
"मला कोडची गरज नव्हती. ह्या शोधामुळे त्यांची सर्वांचीच बोलती बंद होती, त्यामुळे एकदम शांतता होती. मी नंबर माहित असल्याप्रमाणे, ते डायल कॉन्फिडन्टली पण हळुवार फिरवू लागलो आणि त्याच्या त्या विवक्षित 'क्लिक' ची वाट पाहत राहिलो, ऍज एक्सपेक्टेड काही क्षणांनी पहिली 'क्लिक' मग दुसरी आणि तिसरी. मी चटकन लिव्हर फिरवलं आणि जुगार चालला, सेफ उघडलं आणि मी शर्टाच्या बाहीत दडवलेला चाव्यांचा जुडगा अलवार आत सरकवला.
"दिवा लावता का जरा" असं म्हणत मी लिनोलियमला धक्का लावला आणि एकदम धुळीचा लोट उडाला, आत असलेली एकमेव छोटी फाईल, मी उचलून कोटाच्या खिशात सरकवली. दिवा लागल्यावर चाव्या मिळाल्या आणि आमचा मोर्चा क्षीरसागरच्या घराकडे वळला."
"एक ऑम्लेट आणि एक कटलेट. तू कटलेटच खाणार ना गं?" त्यानं मधेच तिला विचारलं आणि तिची तंद्री भंगली.
"अं. हो. कटलेट."
"ओक्के. लाओ जल्दी." त्यानं भारतीय रेलचे स्टँडर्ड पदार्थ ऑर्डर केले. गेले काही दिवसांच्या अनुभवावरून तिला ट्रेनमधलं कटलेट आवडतं, हा अंदाज त्याला आला होता.
"मधेच कुठे रे, ऑम्लेट-कटलेटवाला दिसला तुला?"
"एकाग्र तू होतीस, मी नव्हतो, मी फक्त घडलेली गोष्ट सांगत होतो."
"हो हो, तू तर झोपेतही आजू-बाजूला काय घडतंय त्यावर लक्ष ठेवून असतोस."
'त्याची कारणं तुला नाही कळली तरच उत्तम' असं तो मनात म्हणाला आणि प्रकट पुढे सांगू लागला, "तर आम्ही
क्षीरसागरच्या घरी गेलो. आणि त्याच्या बेडरूममध्ये, एका कपाटाच्या मागे त्याचं सेफ होतं."
-----
"एनी लक रमेश?" डॉ. कुर्लेकर रमेशला विचारत होते.
रमेश आत्ताच त्यांच्या क्लिनिकमध्ये नेहमीसारखा आला होता. "नाही डॉक्टर, बॉडीवरून तरी काहीही फाऊल-प्ले चा अंदाज येत नाहीय. त्यांचं पोस्ट-मॉर्टेम कुणी केलंय त्यालाच गाठणं भाग आहे. पण ते कळेल कसं?" असं म्हणून त्यानं डॉक्टरांकडे सूचक नजरेनं पाहिलं.
"रमेश, यू एक्स्पेक्ट टू मच फ्रॉम मी."
रमेशनं फक्त एक हलकं स्मित केलं.
डॉ. कुर्लेकरांनी चष्मा ऍडजस्ट केला आणि म्हणाले, "तू एव्हढा गुंतलेला पाहून मी माझ्या पद्धतीनं काही चौकशा केल्या आणि हे बघ काय सापडलं. त्यांनी पोस्ट-मॉर्टेमचा फॉर्म त्याला दाखवला. डॉ. काळे, हा एक तरूण सर्जन होता."
"होता?"
"होय. हा पोस्ट-मॉर्टेम रिपोर्ट सबमिट झाल्यावर तो एका रोड ऍक्सिडेंटमध्ये ठार झाला." डॉ. कुर्लेकरांनी रमेशकडे एक पेपर सरकवत म्हटलं.
"डॉ. काळेंचा पत्ता?"
"होय. मी एव्हढंच करू शकतो तूर्तास."
रमेशनं त्यांचे आभार मानले आणि तो बाहेर पडला.
-----
"ह्याचं सिक्रेट सेफ नव्हतं?"
"क्षीरसागर मस्त-मौला माणूस होता, त्याप्रमाणे त्याची लायब्ररी वगैरे असण्याच्या शक्यता नव्हत्या. आणि दुसरं म्हणजे, तो फक्त वर्तकचा यःकश्चित साला होता, त्याच्याकडे वर्तकची काहीही इन्फो नव्हती.पण तरीही त्याचा खून झाल्यामुळे त्याच्याही घरी कुणीतरी येऊन गेलं होतं पण मला त्यानं फरक पडत नव्हता. त्याच्या सेफमध्ये त्यांच्या उपयोगाचं काहीही नव्हतं."
"मग?"
"क्षीरसागर मस्तमौला असला, तरी हुशार होता. त्या चाव्या, दिसायला चाव्या होत्या, खरं तर त्या सगळ्या पेन-ड्राईव्हज होत्या. पण हे मी त्या घरच्यांना सांगू शकत नव्हतो."
"हे तुला आधीच माहित होतं?"
"होय, पण त्यांना चाव्यांसारखं डिसगाईज करण्याचा नक्की उद्देश्य मला कळत नव्हता. पण क्षीरसागरच्या सेफला नशीबानं चाव्यांची सोय होती. तोच डिसगाईजचा भाग असावा असा मी अंदाज बांधला. मी त्या चाव्या त्यात घातल्या आणि फिरवायची कृती केली आणि एका हातानं डायल फिरवू लागलो. ऍज एक्सपेक्टेड, चाव्यांची सोय हे फक्त डिसगाईज होतं. आणि सेफचं लॉक 'क्लिक' असं वाजलं. मी सेफ उघडला आणि आतमध्ये एक छोटासा जुनाट व्हिडिओगेम होता. ऑबव्हिअसली तो आधी येऊन गेलेल्या लोकांनी पाहिला होता आणि रागानं फेकला होता, त्यामुळे तो तिरका आणि पालथा एका कोपर्यात पडला होता."
"मग?"
"तो व्हिडिओगेम नव्हता. तो चाव्यांचा ऍडाप्टर होता. कुणीही ब्लॅकमेलर आपलं सगळं भांडवल व्यवस्थित डिसगाईज करूनच ठेवेल."
"मग काय केलंस?"
"मग काय? मी त्या चाव्यांपैकी एक त्या ऍडाप्टरला लावली आणि ऍडाप्टर कॉम्प्युटरला कनेक्ट केला आणि आपल्या हॉटेलमालकासारख्याच कुणातरी एकाचे व्हिडिओ त्यावर दिसू लागले. ते सगळे अचंबित झाले. मी म्हटलं, मी माझं काम केलं, आता ह्या सगळ्याचं काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. एव्हढं सांगून मी बाहेर पडलो आणि एक कॉल पोलिसांना केला, त्यांना एका विवक्षित पोलिस स्टेशनच्या गेटच्या बिजागरीवर ठेवलेल्या चावीची खूण दिली आणि त्याचबरोबर त्या चावीचा ऍडाप्टर आणि इतर चाव्या कुठे मिळतील ते सांगितलं. दॅट वॉज इनफ फॉर देम टू बिलीव्ह द ऍनॉनिमस कॉलर."
"पण मग गुवाहाटी?"
"वर्तकच्या सेफमधली फाईल!" तो ती फाईल कोटाच्या खिशातून काढून तिच्यासमोर फडकवत म्हणाला.
क्रमशः

ba ba ba ba ba bo..
ReplyDeletekasla vegvan kathanak aahe...
सतीश,
ReplyDeleteधन्यवाद! :)