भाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४ आणि भाग -५ पासून पुढे
"रेखा, ऊठ. आपल्याला गाडी बदलायची आहे." नरेंद्र खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला.
"ह्म्म." रेखा डोळे चोळत उठून बसली, "तू खालच्या बर्थवर कधी येऊन बसला आहेस?"
"अर्धा तास झाला. नशीबानं आपल्याला हा दोन सीट्सचा सेक्शन मिळाला, नाहीतर चार लोकांना झोपेतून उठवायचं आणि पुन्हा त्यांच्या नजरेत यायचं." तो अत्यंत हळू आवाजात बोलत होता, तरीही सगळेजण झोपलेले असल्यानं ट्रेनमधल्या भयाण शांततेत त्याचं बोलणं रूळांच्या खडबडाटी पार्शसंगीतासह तिला ऐकू येत होतं.
"बरं, मी तोंडावर पाणी मारून आले."
"ठीक. मी पण बॅग्ज घेऊन दरवाजापाशी जातोय, तिथेच ये थेट."
-----
रमेशनं बेल वाजवली आणि दरवाजा उघडायची वाट पाहत होता, तेव्हढ्यात त्याचा मोबाईल वाजू लागला. 'शिंदे' मनाशीच म्हणत त्यानं फोन उचलला.
"बोला शिंदे."
"काय साहेब, दोन दिवस झाले स्टेशनात फिरकला नाहीत, फोन नाही आणि तुमचा फोन लागत नाही. घरी जाऊन आलो, तर तिथेही सापडला नाहीत आणि इथे तुम्ही सिकात असल्याचं कळलं."
"अहो शिंदे, जरा पर्सनल काम होतं थोडं. म्हणून मग सिक लीव्ह टाकली. अचानकच निघालंय काम त्यामुळे कळवता आलं नाही." रमेशनं पुन्हा बेल वाजवली.
"ओह्ह. काही मदत लागली तर सांगा साहेब."
"ते काही तुम्ही सांगायची गरज नाही शिंदे. काही लागलं तर हक्कानं सांगेन मी."
एव्हढ्यात दरवाजाची पत्रांसाठीची फट हलकेच उघडल्यासारखं दिसलं.
"शिंदे, नंतर करतो मी फोन."
"बरं साहेब."
रमेशनं फोन खिशात टाकला आणि गुडघ्यावर बसून फटीकडे पाहू लागला. दोन निरागस, थोडेसे घाबरेघुबरे डोळे त्याच्याकडे पाहत होते.
"आई आहे का घरी?"
"नाही." पोरीचा आवाज मोठा गोड होता.
"मग कुणी मोठं?"
"नाही."
"ह्म्म. कुणाही अनोळखी व्यक्तिला दार उघडायचं नाही असं सांगितलंय आईनं?"
त्या पोरीनं फक्त होकारार्थी मान डोलावली.
रमेशनं घड्याळात पाहिलं. दुपारचे दोन वाजत होते.
'नवर्याचा संशयास्पद मृत्यू झालाय आणि आठवडाही उलटला नाहीये आणि ही बाई एव्हढ्या लहान मुलीला एकटीला घरात ठेवून बाहेर कशी जाऊ शकते?' रमेश स्वतःशीच बोलत बिल्डिंगचे जिने उतरू लागला आणि आपल्याच तंद्रीत चालताना त्याचा धक्का कुणालातरी लागला.
"सॉरी, सॉरी" तो चटकन स्वतःला सावरत म्हणाला आणि त्याच्या लक्षात आलं की त्या धक्क्यामुळे समोरच्याच्या हातातली पिशवी खाली पडलीय आणि भाज्या इतस्ततः विखुरल्या आहेत. तो चटकन खाली बसून भाज्या गोळा करू लागला आणि ती व्यक्तिसुद्धा जिन्यावरच्या भाज्या गोळा करू लागली. एक संच हातात घेऊन तो वळला आणि ओशाळवाण्या स्वरात म्हणाला, "खरंच सॉरी, अजिबात लक्ष नव्हतं माझं."
ती व्यक्ती एक तिशीची स्त्री होती, ती चटकन वळली आणि म्हणाली, "इट्स ओके. माझंतरी कुठे लक्ष होतं."
आत्ता पहिल्यांदा रमेशनं तिच्या चेहर्याकडे पाहिलं. आखीव-रेखीव नाक, जिवणी आणि विलक्षण सुंदर पण थकून गेलेले डोळे. 'कुठेतरी पाहिलंय हिला.' तो मनाशी म्हणेपर्यंत त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्या छोट्या पोरीचे डोळे एकदम त्याच्यासमोर फ्लॅश झाले.
"मिसेस काळे?"
"अं..हो" तिला एकदमच आश्चर्याचा धक्का बसला, "पण तुम्ही कोण? आणि मला कसे ओळखता?"
"इन्स्पेक्टर रमेश." तो आयकार्ड काढून दाखवत म्हणाला, "मी तुमच्या मिस्टरांचा मित्र."
"ओह्ह." तिच्या चेहर्यावर एकदम वेदना दाटून आली.
-----
इंदूरच्या पोलीस मुख्यालयामध्ये फारच तणावपूर्ण वातावरण होतं. शहरामध्ये अचानक झालेले दोन हाय-प्रोफाईल मर्डर्स आणि अचानकच एक्स्पोज झालेली एक मोठी ब्लॅकमेल रिंग, ह्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेबद्दल चहूबाजूंनी प्रश्नचिन्ह उभी केली जात होती. प्रसारमाध्यमं, वर्तमानपत्र सर्वत्र पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात होते. पोलीस आयुक्तांना सरकारकडून कानपिचक्या मिळाल्या होत्या, त्यामुळे त्यांनी आपत्कालीन मीटिंग बोलावली होती, ज्यामध्ये राज्याचे गृहमंत्रीदेखील उपस्थित राहणार होते.
"पण साहेब, हे पुरावे फारच दूरान्वयाने सगळं सिद्ध करताहेत." आयुक्त गृहमंत्र्यांना सांगत होते.
"दूरान्वयानं का होईना सिद्ध करताहेत ना. तपास थांबवा आणि केस उभी करा. पहिल्या मर्डरला आपल्याकडे सस्पेक्ट आहे."
"पण दुसर्यासाठी आपल्याकडे एक सोडून पाच सस्पेक्ट्स आहेत."
"मला वाटलं वीस होते."
"वीस व्हिडिओटेप्स आहेत सर. पण फक्त पाचचजणांची फायनॅन्शिअल ऍक्टिव्हिटी संशयास्पद आहे."
"हे बघा ते सगळं मला सांगू नका. वरून ऑर्डर्स आहेत की ह्या केसेसचा गाजावाजा थांबवला पाहिजे. केस उभी करा लवकरात लवकर आणि तपास थांबवा."
"पण मीडिया?"
"ते आम्ही बघतो कसं मॅनेज करायचं ते. आठवड्याभरात हवा निघून जाईल ह्या केसेसमधली, एकदा संशयाचं धुकं कमी करा, दुसर्या केसमध्ये एका कुणालातरी बकरा करा. नंतरचं नंतर बघू." एव्हढं बोलून मंत्री उठून निघून गेले. आयुक्त सिन्नरकर हतबलतेनं एकदा खिडकीबाहेर आणि एकदा टेबलावरच्या केसफाईल्सकडे पाहत होते. तीन तास मीटिंग होऊनही काहीही मार्ग कुणीही शोधला नाहीच, पण मीटिंगनंतर मंत्रीमहोदयांनी धर्मसंकटात मात्र टाकलं.
"हां यादवजी." गृहमंत्री पित्रे आपल्या पीएला सांगत होते, "यह मेसेज शशिकलातक पहुंचाईये."
"बोलिये सरजी." यादव अदबीनं म्हणाले.
"उसकेपास जो कमलाकरजीका व्हिडिओ टेप है, उसे ठीक दो दिन बाद मीडिया में लीक करना है. पैसों की बात हम खुद आके करेंगे."
यादव मान डोलावून गाडीतून उतरले आणि पार्टी ऑफिसात शिरले. आणि पित्रेंची लालदिवा गाडी शहराबाहेर जाणार्या रस्त्याला लागली.
-----
"बसा हं जरा. हे सर्व आत ठेवते आणि पाणी आणून देते." असं म्हणून ती आत गेली.
"हो." म्हणून रमेश हॉलवर नजर फिरवत कोचावर बसला. हॉलच्या दुसर्या टोकाला असलेल्या दाराच्या कडेने दोन डोळे कुतूहलानं त्याच्याकडे पाहत होते. त्यानं तिथे पाहिलं आणि एक स्मित केलं. मग त्या डोळ्यांची भीड थोडी चेपली आणि ती बटुमूर्ती दरवाजात येऊन उभी राहिली.
तीन वर्षांची तरतरीत मुलगी. आईसारखं तरतरीत नाक अन डोळे. बाकी चेहरामोहरा बहुतेक वडिलांचा असावा असा विचार त्याच्या डोक्यात येईस्तो समोरच्याच टेबलावर ठेवलेला गंध लावलेला तिच्या वडलांचा फोटो त्याच्या नजरेस पडला. आणि इतका वेळ मागे पडलेलं केसचं सगळं भलमोठं रहस्य पुन्हा त्याच्या मनःपटलावर उमटलं आणि तो पुन्हा चिंताग्रस्त झाला.
ती मुलगीसुद्धा त्याच्या चेहर्यावरचे झरझर बदलणारे भाव निरखत होती. त्याचं लक्ष पुन्हा तिच्याकडे गेलं आणि त्यानं पुन्हा हलकं स्मित केलं. ह्यावेळेस तिनंही स्मित केलं. 'खरंच मुलं देवाघरची फुलं असतात. दोन क्षण विसर पाडला सगळ्याचा तिच्या गोड हसण्यानं.' तो मनाशीच म्हणाला.
"इथे ये." तो हातानं कोचावर बसण्याची खूण करत म्हणाला, "नाव काय तुझं?"
"वैभवी" ती हळूच म्हणाली आणि दारातून थोडी पुढे आली.
मग तोच कोचावरून उठला आणि तिच्याकडे गेला आणि गुडघ्यांवर बसला.
"माझं नाव रमेश." तो हात पुढे करत म्हणाला. तिनं त्याच्याशी हात मिळवला. मग त्यानं दुसर्या हातानं तिच्या नाकाच्या शेंड्याला हळूच स्पर्श केला. तशी ती चटकन लाजून आत पळाली. आणि तिची आई पाणी घेऊन बाहेर आली. तो एकदम उठून उभा राहिला.
"सॉरी, मी जरा तिच्याशी गंमत करत होतो." वैभवी पुन्हा येऊन दरवाजात उभी राहिली. तो पाण्याचा ग्लास घेऊन कोचावर जाऊन बसला. ती कोचाशेजारच्या खुर्चीवर बसली. वैभवी हळूच येऊन तिच्या आईच्या मांडीवर बसली आणि रमेशकडे पाहू लागली.
"सॉरी मी अचानकच आलो.."
"अहो किती वेळा सॉरी म्हणाल. खरंच त्याची गरज नाही. तुम्ही आवर्जून भेटायला आलात ह्यातच सर्व आलं."
".."
"ह्यांचे अन माझे दोघांचेही आई-वडील नाहीत, त्यामुळे जे काही नातेवाईक होते ते अंत्यसंस्कार उरकल्यावर निघून गेले. आणि आज नेमकी हिची आया आजारी पडल्यामुळे मला घरी थांबावं लागलंय. पण घरसामान तर आणावंच लागणार म्हणून मग हिला एकटी ठेवून गेले होते. तर नेमकी आपली चुकामूक होत होती." तिच्या आवाजात कंप जाणवत होता.
"अहो ठीकच आहे."
"तुमच्या चेहर्यावर मगाशी हा प्रश्न जाणवला होता मला. म्हणून बोलले."
".." रमेश एकदम ओशाळला.
"असू दे. तुमचा प्रश्न योग्य होता."
हिचं पाणी काही वेगळं आहे हे रमेशला तत्क्षणीच जाणवलं, त्यामुळे आता लपवाछपवीला काही अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं.
"मी तुमच्या मिस्टरांचा मित्र नाही."
"मला लक्षात आलंच ते, कारण त्यांनी कधीही तुमचा उल्लेख केला नाही."
"मग तुम्ही मला घरात.."
"कारण तुमचं आयकार्ड खरं आहे."
"ह्म्म."
"आणि तुम्ही खरं न बोलता आला आहात म्हणजे तुम्हालाही त्यांच्या मृत्युबद्दल संशय आहे."
"मलाही म्हणजे अजून कुणाला?"
"मला." ती एकदम म्हणाली.
-----
"आता पुन्हा नाही ना रे गाडी बदलायची?" ती त्यांच्या दोन छोट्या बॅगा बर्थखाली सरकवत म्हणाली.
"नाही, आता थेट गुवाहाटी."
"तुला कसे रे बरोबर दोन्ही गाड्यांमध्ये दोन सीटवाले सेक्शन मिळाले."
"फक्त व्यवस्थित अभ्यास आणि रिझर्व्हेशन खिडकीतल्या बाईशी योग्य तर्हेने फ्लर्टिंग." तो डोळा मारत म्हणाला.
"हो हो. तू मदनाचा पुतळाच आहेस." ती लटक्या रागानं म्हणाली.
तो फक्त खिडकीतून बाहेर पाहत होता.
तिला खूप राग आला, त्याचं हेच वागणं तिला खटकायचं. मधेच संवाद सोडून कसल्यातरी विचारात गढायचा. तिला तिच्याकडे त्यानं असं दुर्लक्ष केलेलं अजिबात आवडत नसे. पण तो तसाच होता. मग तिनं नवा विषय काढला.
"आपण एव्हढंच सामान का घेतलं?"
"बाकी सर्व विकत घेऊ." तो खिडकीबाहेरची नजर न हटवता म्हणाला.
"अरे हो, त्या हॉटेलमालकाच्या पैशांचं काय झालं?" तिला एकदम आठवलं. त्यानं सावकाश तिच्याकडे पाहिलं आणि आजूबाजूला नजर फिरवली. गाडीतली मंडळी अजूनही पहाटेच्या साखरझोपेत होती.
"मालकानं ऍज एक्स्पेक्टेड नकार दिला."
"मग?"
"काही नाही, त्या हॉटेलच्या सिक्युरिटी रूम आणि तत्सम चाव्यांच्या डुप्लिकेट्स मी त्याच्या घरातल्या व्हॉल्टमध्ये ठेवल्या आहेत. पोलिस सगळ्यांची चौकशी करताना त्याच्याही घरी पोचतीलच. आणि मर्डर वेपनही त्यांना हॉटेलच्या ड्रेनेजमध्ये मिळेल."
"ते कसं?"
"असलं काही होईल हे मला आधीच ठाऊक होतं. मी मर्डरच्याच रात्री उशिरा आलो, त्याचं कारण तेच. बंदूक मी हॉटेलच्या ड्रेनेजमध्ये डिस्पोज केली आणि टेप घेऊन मालकाच्या घरी गेलो."
"तू अट्टल घरफोड्या आहेस."
"मी बरंच काही आहे."
क्रमशः

खुप छान लिहिले आहे
ReplyDeleteमाझ्या साईटचा पत्ता:
१)http://www.marathifanbook.com
२)http://www.prashantredkarsobat.in
प्रशांत,
ReplyDeleteधन्यवाद! तुमच्या साईट्स पाहतो आहे!