9/23/2010

बामनी कावा

कधी कधी काय होतं, मी असाच बसलेलो असतो. लॅपटॉपच्या पडद्याकडे एकटक बघत. समोर लिहिण्यासाठीची खिडकी उघडलेली. बाजूला घराची खिडकी उघडलेली. घराच्या खिडकीतून पलिकडच्या रस्त्यावरून जाणार्‍या तुरळक गाड्यांचा तुरळक आवाज येतोय. मधेच माझी बेचैन नजर टीव्हीच्या रिमोटकडे जातेय. 'नाही हां. आपल्याला लिहायचंय!' असं स्वतःलाच दटावून मी पुन्हा पडद्याकडे लक्ष केंद्रित करतोय. बोटं हलवून तयारीत ठेवलीयत, न जाणो कधी वीज पडेल. समोर ठेवलेल्या अर्धवट संपलेल्या कांदे-बटाट्याच्या थैल्यांकडे नजर जाते. मग अशीच भिरभिरत राहते. एक रिकामटेकडा जीव, विचार करून करून कसला आणि किती करणार?

मग माझ्या डोक्यात दुपारी माझं एका सहकार्‍याबरोबर झालेलं संभाषण येतं. तो आपला मला म्हणालेला असतो, "आज नको, उद्या ये सिनेमा घ्यायला! आज त्या दुसर्‍याकडे जेवायला जायचंय!" मला आत्ता हे संभाषण आठवल्यावर एकदम वाटायला लागतं, "एक सिनेमा द्यायला एव्हढी नाटकं. काहीतरी असणार, ज्यासाठी मला टाळतोय. काहीतरी पार्टी बिर्टी असेल घरी आणि मला बोलवायचं नसेल. नाहीतर मग त्याचा तो मित्र आहे ना, त्यानं ह्याला सांगितलं असेल मला द्यायचं नाही, परवा त्या मेलबाजीवरून त्याच्याबरोबर मचमच झाली होती ना, त्याचं उट्टं काढायला मित्राचा वापर करत असेल!"

ह्याला म्हणतात कॉन्स्पिरसी थिअरी. आज नेमकं हेरंबनेदेखील कॉन्स्पिरसी थिअरीबद्दलच लिहिलंय. बरेचदा रिकाम्या डोक्याचे प्रताप. पोस्ट लिहायचं कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं सोडून डोकं इथे जबरा वेगात पळतं. इतका वेळ सुस्तावलेला मेंदू इथे कसा चपळ होऊन जातो. आता आमच्यासारखी पामरंसुद्धा असले विचार करू शकतात, तर महान मेंदूंचे विचार किती उच्च दर्जाचे असतील.

हल्लीच एक जबरा थिअरी वाचनात आली. "औरंगजेबानं संभाजीराजांना मारण्याचा मुस्लिम धर्माशी काही संबंध नव्हता. औरंगजेबानं संभाजीराजांना मुस्लिम धर्म न स्वीकारल्याबद्दल मारलं असतं, तर शिरच्छेद केला असता. पण त्यानं संभाजीराजांना एका ब्राह्मण मंत्र्याच्या सांगण्यावरून मनुःस्मृतीच्या आधारावर हालहाल करून मारलं!"

हे वाचलं आणि मी थेट जागेवरून उठून स्वच्छतागृहात गेलो आणि पोटभर हसलो. बाहेर आल्यावरही माझं हसू आवरत नव्हतं. न जाणे मी किती वेळ आठवून आठवून हसत होतो. माझ्या डोळ्यासमोर रामाच्या देवळात सोवळं घालून मनुःस्मृती वाचणारा औरंगजेब(प्रभाकर पणशीकर) आला. तो म्हणे कुराणाच्या प्रती स्वतःच्या हाताने लिहून विकायचा. माझ्या डोक्यात लगेच कॉन्स्पिरसी थिअरी आली. 'कदाचित, तो मनुःस्मृतीचाच फारसी अनुवाद 'कुराण' म्हणून खपवत असेल.' एकदा कॉन्स्पिरसी थिअरी डोक्यात यायला लागल्या ना की धरबंद राहत नाही. 'ऍक्च्युअली औरंगजेबच ब्राह्मण असेल. तो कदाचित जानवंपण घालत असेल.' लहान असताना मुंडण झालेला, कानात भिकबाळी घातलेला औरंगजेब डोळ्यासमोर उभा राहिलासुद्धा माझ्या! औरंगजेब (प्रभाकरपंत पुन्हा) महाराजांच्या आग्र्याहून सुटकेची बातमी ऐकून 'धिक् माम्' म्हणतोय. आणि द्वारपालाची सावली अंगावर पडली म्हणून 'शिव शिव' म्हणत स्नान करतोय, जेवणाच्या ताटाभोवती चित्रावत्या घालून 'वदनि कवळ घेता' म्हणतोय असं कैच्याकै माझ्या डोळ्यापुढे यायला लागलं.

संभाजीराजांबद्दलच्या उपरोल्लिखित वाक्यानं जो औरंगजेबाच्या ग्लोरिफिकेशनचा परिणाम साधलाय त्याला तोडच नाही, पण आमचा आपला औरंगजेबाला व्हिलन बनवायचा केविलवाणा प्रयत्न - 'पंडित औरंगजेबशास्त्री आगरकर!' झाला एकदाचा औरंगजेब व्हिलन. आता पुढे काय काय सुचतं बघू.

तर पंडित औरंगजेबशास्त्रींनी जेव्हा उत्तरेत राज्य केलं होतं, तेव्हा त्यांना चहाची चटक लागली. सारखे चहा प्यायचे. पण ते चहाला चहा नाही, 'कावा' म्हणायचे. उत्तरेत काही ठिकाणी चहाला अजूनी कावा म्हणतात. त्यामुळे काय झालं, की पं.औ.शास्त्रींचा 'कावा' त्यांच्यासारख्या बर्‍याच ब्राह्मण घरांमध्ये प्यायला जाऊ लागला. मग तर 'कावा' ही ब्राह्मण घरांची खासियत बनली. मग काय झालं, इतर कुणी बनवला, तर त्याला ती सर यायची नाही, असं लोकांच्या मनावर ब्राह्मणांनी बिंबवलं. त्यामुळे काय झालं, 'ब्राह्मणी कावा' एकदम फेमस झाला. जो तो 'ब्राह्मणी काव्या'चा उदोउदो करू लागला. मग सगळे ब्राह्मणांना 'कावेबाज' म्हणायला लागले. वर्षं उलटत गेली तसा 'बामनी कावा' असा अपभ्रंश झाला. (कदाचित 'बहामनी' नावाचे जे राजे होते, ते पण मुळात ब्राह्मणच असावे)

अशा प्रकारे, ब्राह्मणांनी कावा करून 'कावा' फेमस करून टाकला. मग अनेक वर्षांनी 'सुखविंदर सिंग' ह्या पंजाबी गायकानं (हादेखील प्रत्यक्षात ब्राह्मणच असणार) 'कावा कावा कावा' ह्या गाण्यातून कावा पुन्हा फेमस केला. आता संभाजी ब्रिगेड आणि कंपनीनं 'बामनी कावा' 'बामनी कावा' असा बवाल सुरू केलाय. मला तर डाऊट येतोय, की अनेक वर्षांनी पुन्हा 'बामनी काव्या'ला मुख्य प्रवाहात आणण्याचाच हा कावा आहे. हे संभाजी ब्रिगेडवालेच मुळात ब्राह्मण असावेत, त्यामुळे तेच 'बामनी काव्या'ची एव्हढी प्रसिद्धी करताहेत.

मला तर आता काळजी वाटतेय, की हे लोक 'बामनी कावा अमृततुल्य' नावाचं चहाचं दुकान काढतील आणि पुन्हा एकदा 'बामनी कावा' सफल होईल.

70 comments:

  1. बाबा, माझ्या मते 'ग्रेट माईंडस थिंक अलाईक' चं हे बेस्टेस्ट उदाहरण ठरावं.. हे हे हे ;) लोल..

    तू माझ्या कॉन्स्पिरसी थिअरीच्या पोस्टची लिंक दिलीस.. आणि माझ्या उद्याच्या पोस्टमध्ये मला तुझ्या 'बामणी काव्याची' लिंक द्यायला लागणारच.. कारण तंतोतंत याच विषयावर आहे. फक्त किंचित वेगळ्या फॉर्ममध्ये.. !!! अफाट योगायोग !!

    बाकी, पं.औ.शास्त्रीं जान्हवं, घालून, मुंडण करून, कानात भिकबाळी घालून 'ओम केशवाय नमः' म्हणताना दिसले रे मला... शिव शिव शिव... आपलं दीन दीन दीन.. च्यायला काय म्हणू तेही कळत नाहीये आता.. 'हेल ब्रिगेड' च म्हणतो कसा.. (हेल चे अर्थ ज्याने त्याने आपापले लावावेत !!!)

    ReplyDelete
  2. Post nehamipramane bharee.
    Fakt mala asa vaaatala ki ek katha banavata aali asati yaa dhaagyavarun - Aurangjeb aani Sambhai : Ek "khara" itihaas mhanoon. Thoda lavkar post samplyaasaarakha vaatala tyamule.

    ReplyDelete
  3. कॉन्स्पिरसी वर कॉन्स्पिरसी .... कॉन्स्पिरसी वर कॉन्स्पिरसी .... कॉन्स्पिरसी वर कॉन्स्पिरसी

    ( Just like... Tareekh pe tareekh ...tareek pe tareekh ... )

    Heramb ani tuzi tuzi post ekach weles... kya baat hai....

    Chan lihila aahes .....

    ya कॉन्स्पिरसी theory mule ata mala pratyek goshti war doubt yayala lagala aahe.... maza pahila nishana ahe mazi boss ... hmmmm !!!

    :) :) :)

    Nice post !!!

    ReplyDelete
  4. डोळे चोळून, स्वतःला चिमटा घेऊन पाहिलं खऱंच लिहिलंय ना हो म्हणजे आपले ते हे हो पं. औो शास्त्री वगैरे ।

    ReplyDelete
  5. एकूणच कॉन्स्पिरसी थिअरी हे प्रकरण आवरा, अशक्य, कैच्याकै ह्या कॆटेगरीतलं दिसतंय...

    ReplyDelete
  6. Nivval laajwaab..
    Kaay bolu?
    Yavar khoop kahee manaat yetay..parat comment takato jara velaane..

    Mast..

    ReplyDelete
  7. ज्या पुस्तकात ही मनुस्मृतिचि जबरा थिअरी देण्यात आली आहे, तो ग्रंथराज वाचताना हसून हसून माझ्या बरगड्या मोडायची वेळ आली!! माणसाचं डोकं इतकं रिकामं असू शकतं यावर माझा काही दिवस विश्वास नव्हता, पण या ग्रंथाने मनुष्यजातिच्या निर्बुद्धपणावर माझा विश्वास परत स्थापित केला आहे. या पुस्तकाची प्रत हा इतिहासातील एक अमोल ठेवा आहे!!
    "मग तर 'कावा' ही ब्राह्मण घरांची खासियत बनली", हे तर बेष्ट! पंडित औरंगजेबशास्त्री आगरकर यांचेप्रमाणे महामहोपाध्याय अफज़लखानशास्त्री नगरकर यांनी पण कावा केल्याचे उल्लेख आहेत!!
    आणि हेरम्ब, "हेल ब्रिगेड' च म्हणतो कसा.. (हेल चे अर्थ ज्याने त्याने आपापले लावावेत !!!) " यावर माबदौलत खुश जाहले आहेत!!

    ReplyDelete
  8. अजून काय काय उजेड पाडला असेल, कोण जाणे?

    ReplyDelete
  9. Nachiket9:09 PM

    असे हसू नका..मुळात ब्राह्मणांच्या या कावेबाजपणाची सुरुवात रामायणात सापडते. कैकेयी, जिच्या कारस्थानाने बिचारा दशरथ हा क्षत्रिय राजा वाचनात अडकला ती कैकेयी ही मूळची ब्राह्मण कन्या असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. कैकेयी ही मूळची महाराष्ट्रातील देशस्थ ब्राह्मण कमलाबाई कुलकर्णी होय. तिने आयोध्येत भटी राज्य यावे म्हणून श्री रामचंद्रांच्या वनवासाचा कट रचला. या काळात ज्या भरत नामक पुत्राकडे राज्य आले तोही ब्राह्मण होता. या चारित्र्यहीन ब्राह्मणी कैकेयीला तो एका धोबी काम करणा-या ब्राह्मणाकडून झाला होता. (पहा अज्ञात रामायण खंड ३ (प्रकाशन सन १९३५))

    त्या काळी या तोतया ब्राह्मणानेच पुढे सीतामाईंच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि पुन्हा एकदा श्री रामचंद्रांना मनस्ताप दिला. या खोट्या आरोपामुळे त्यांना सीतामाईस त्यागणे भाग पडले. असे मूळचे धोबी असलेले कावेबाज ब्राह्मण श्रीरामचंद्रांच्या आजूबाजूला भरले होते.

    अजून एक अज्ञात माहिती जी आजकालच्या पिढीला नाही ती अशी की रावण हा देखील ब्राह्मणच होता. श्रीरावण लेले असे त्याचे मूळ नाव असून तो कोकणातून संपूर्ण कुटुंबासहित श्रीलंकेस गेला. त्याच्या कुंभकर्ण नामक भावाचे अचाट झोपणे हे त्या काळाच्या ब्राह्मणांच्या आहारातले अत्याधिक भाताचे प्रमाण दर्शवते. या भाताच्या प्रमाणावरून सिद्धच होते की ही जमात कोकणस्थ ब्राह्मण होती. आजही कोकणात अतिभात खाणारे भट दिसतील.

    असो.

    ReplyDelete
  10. मुम्बईवरचा हल्ला हा एक बामणी कावा आहे.. कसाब हा बामन आहे हे सत्य मुद्दाम भटांनी कारस्थान करून लपवले आहे. दाऊद हा धर्मांतर करून आधी बामन बनला नंतर त्याने दहशतवादी कारवाया चालू केल्या.जे जे मुस्लिम आतंकवादी झालेत त्यामागे बामनी कावा आहे.. मदरस्यामध्ये भट जिहाद शिकवतात... हा हा हा !!! लोळालोळी !!! हे हे हे.. इतिहासाचे काही खरे नाही.

    @ नचिकेतदादा : - रावण हा खरोखरीसच ब्राह्मण होता. ब्राह्मण पिता आणि राक्षसी माता यांची संतान म्हणजे रावण. रावण हा पांडित्य आणि क्रूरता यांचा अजब रसायन होता.

    ReplyDelete
  11. Nachiket10:11 PM

    @ Sanket

    नुसता श्रीलंकन ब्राह्मण असून तो इंपॅक्ट पडेल का? समजून घ्या हो मुद्दा. हे सर्व जोपर्यंत मराठी मातीशी जुळत नाही तोपर्यंत कसली होणार अस्मितेला आवाहन? So he has to be कोंकणस्थ.. कोकणस्थच होता तो. इतिहास नीट वाचा नाहीतर परिणामाला तयार व्हा..

    ReplyDelete
  12. Nachiket10:30 PM

    बरं..गम्मत जाऊ दे..रावण हा खरोखरच ब्राह्मण होता..? हे राम..मेलो..!!

    ब्राह्मणी पांडित्य आणि क्रूरता यांचं आसुरी नातं.. यावरून बवाल चालू आहे का एखादा? बाप रे..केवढा पोटेंशिअल मुद्दा आहे हा...महाराष्ट्रात उपयोगी नसला तरी कुठेतरी उपयोगी पडेलच.

    ReplyDelete
  13. बामणी काव्याला फेमस करण्याचा हा अजून एक प्रयत्न आहे.
    मला संशय आहे कि सदरहू लेखक ब्रिगेड समर्थक असून त्यांना प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करत आहेत. ;)

    ReplyDelete
  14. Anonymous11:11 PM

    बाबा नेहमीप्रमाणे धरुन फ़ट्याक पोस्ट..औरंगजेबबुवांच ते रुप डोळ्यासमोर आल ... :)बाकी नचिकेत आणि संकेतच्य थिअरया ही भारी... :)

    ReplyDelete
  15. कॉन्स्पिरसी चा जमाना आला आहे....अन त्यात अशे जहाल विषय खुप जवळचे...उर बडवुन प्रत्येक जण मी म्हणतो तेच सत्य हेच बोंबलत असतो.

    बाकी पोस्ट चाबुक झाली आहे...पं.औ.शास्त्रीं...लय भारी.

    ReplyDelete
  16. संकेत आपटे11:22 PM

    बाकीच्यांना आवडली असली तरी आजची पोस्ट मला फार भावली नाही बुवा. (म्हणजे अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ते विलासराव देशमुखांच्या मताप्रमाणे useless असू शकतं. (आता या विलासरावांचं मत नेहमीच १००% useless असतं हा भाग अलाहिदा... ;-))) विस्कळित झाली आहे पोस्ट. पुण्याला जाणारी गाडी भुसावळला गेल्यासारखं वाटतंय. फ्रँकली स्पीकिंग, लेखावरच्या कमेंट्स वाचताना जास्त मजा आली.
    एवढं स्पष्ट मत मांडल्याबद्दल सॉरी बरं का विद्याधरभाऊ...

    ReplyDelete
  17. Anonymous11:27 PM

    संकेत,ये बाबा का श्टाईल है....

    ReplyDelete
  18. जबरी. मस्त चाललंय एकदम. या कॉन्स्परेशन थेअरिजमागे एक कॉन्स्टिपेशन थेअरी आहे. ज्ञानाचे अपचन!

    ReplyDelete
  19. फट्याक............

    ------
    नशीब नोलान चा inception कळला नसेल यांना नाही नायतर लोकांच्या मेंदूत घुसून धुमाकूळ घातला असता या ब्रिगेडी लोकांनी.

    ReplyDelete
  20. Anonymous11:51 PM

    विद्याधर, लेख आवडला.

    बाकी आम्ही पण बामणी कावा करून ब्रिगेडच्या आतल्या गोटातून ही conspiracy theory मिळवली आहे :)

    "हा पोस्ट म्हणजे पण बामणी कावाच आहे असा आम्हांस संशय येतो आहे ! ब्रिगेडचे शोध ब्लोग विश्वावर आले म्हनुन तंतरलेली बामन मंडली त्यांची मुस्कटदाबी करायला हा कावा करत आहेत. पण ब्रिगेड आता हटणार नाही. शिवकालात एकही चांगला बामन नवता हे आमी सिद्ध करू. पेशव्यानी सुद्धा कट करून सत्ता घेतली आनी अटकेपार च्या सर्व निरपराध राजांच्या मनात मराठेशाहीची उगाच भीती घातली. मायबाप इंग्रज सरकारने मग ह्याना वठनीवर आणले आनि जनतेला साक्षर केले. हे बामन असते तर आम्ही त्यांचे गुलाम झालो असतो आनी त्यांचा कावा असा बाहेर आला नसता. धन्य ते इंग्रज!!!
    नोंद (काही कावेबाज लोक ह्याला तळटीप म्हण्तात पन आम्हि नोंदच म्हननार) - आमच्या शुध्लेख्नाला नावे ठेवन्याचा कावा खेळू नये. मराठी ही आम्हि लिहितो अशीच असते. उगाच काही बिनडोक बामन त्याला अशुद्ध वगैरे म्हणतात. "

    ReplyDelete
  21. बामनी कावा...........लैच भारी! मला आधी ज्यांनी पहिल बामनी कावा लिहीला त्याची पोस्ट वाचली पाहीजे. बहुधा चुलबुल असणार. हेओ ची पण वाचतेच. पं औ. शास्त्री, शेंडीला गाठ मारून, गळ्यात जानवं, नेसूला पितांबर आणि मुखात काय??................मस्तच!
    सगळ्यांच्या कॉ. थिअर्‍या भारीच आहेत. :-))

    ReplyDelete
  22. बामणी कावा....
    लई भारी......
    खर तर बामन या देशात उपरे आहेत....
    बाबर हा मुळात बामन होता ;)
    खर तर आम्ही या पोस्टचा निषेध करतो.यामध्ये आम्हाला मुल विषयाला बगल देण्याचा बामणी कावा दिसतो .....
    लगे रहो ....

    ReplyDelete
  23. Anonymous12:21 AM

    बामनी काव्याचे काही उदा.

    १) पानिपतच्या लढाईतुन १७६० ला सदाशीव राव पेशवे गायब होतात. नंतर अगदी १७६१ संत स्वामी समर्थ म्हणून इकडे महाराष्ट्रात उगवतात. त्याना पुढे शनिवारवाड्यातुन मासिक खर्च पुरविला जातो.
    २) पुढे १८५७चा उठाव होतो तेंव्हा तात्या टोपे व नानासाहेब पेशवे भुमीगत होतात. आणि अगदी त्यान नंतर परत महाराष्ट्रात देवाचे दोन अवतार अनुभवायला मिळतात त्यातले एक म्हणजे गजानन महाराज. हे गजानन महाराज दुसरे तिसरे कुणी नसुन तात्या टोपे होते.

    ३) शिर्डीचे साईबाबा हे सुद्धा बामणी कावाच आहे. नानासाहेब पेशवे साईचं रुप धारण करुन लोकांची फसवणूक करतात.
    -----------------

    आता यामागचा तर्क बघा.

    ह्या तिन्ही संतांचा जन्म झाला नाही किंवा त्यानी आपल्या जन्माची जागा, गाव, नाव लपवुन ठेवलं व आपण अवतार असल्याचा दावा केला.

    आता कुठलाही माणुस जर सामान्य बुद्धीने विचार केल्यास ज्याला देव म्हणून लोकानी डोक्यावर धरलं ते राम कृष्ण सुद्दा अवतार न घेता जन्म घेतात पण हे मात्र थेट अवतारले बघा.

    मुळात ईथेच सगळं स्पष्ट होतं की अवतार नावाचा प्रकार एक थोतांड आहे व या वरिल तिन्ही लोकांचा पॅटर्न किती सेम आहे बघा.

    याला म्हणतात बामनी काव.
    ---------------------

    ReplyDelete
  24. @ नचिकेतदा :
    रावण हा मुळात ब्राह्मण नव्ह्ता, त्याला बामनांनी ब्राह्मण म्हणून promote केले अशी एक कॉन्स्पिरसी अगोदरपासून आहेच.( वाचा प्रतिक्रीया ) पण मग कळत नाही, मग बामनांनी रावणाला villain म्हणून का दाखवले? जर तो ब्राह्मण म्हणून दाखवयचा तर त्याला रामाच्या लंकास्वारीत मदत करणारा एक भट म्हणून दाखवता आला असता, किंवा त्याला रामावर विजय मिळालेला दाखवता आला असता. ’बामनी अहंकार’ सुखावला असता हो.. ’बामनी कावा’म्हणणारे हे मुद्दे सोयीस्कररित्या विसरतात.
    वाल्मिकीने कुठेही रावणाचे ब्राह्मण्य नाकारले नाही.त्याला महाब्राह्मण(नीच ब्राह्मण) म्हटलं गेलं.( आश्चर्य आहे, रावणाला ब्राह्मण म्हणून दाखवतांना आपण आपल्या सम्पूर्ण जातीची बदनामी करत आहोत असे वाल्मिकीला वाटले नसेल का हो ? की ह्यातपण काही "बामनी कावा" आहे ) आवरा.. कैच्याकै...

    @ विद्याधरबाबा :- कावा चहाला नाही तर कॉफीला म्हणायचे. वर सांगायचे राहून गेले. "कहवा" चा हा अपभ्रंश आहे. पूर्वी "कहवाघर" (कॉफीहाऊस) असायची.तेवढी एक दुरुस्ती करा.

    ReplyDelete
  25. @ नचिकेतदा :
    बाकी रावण हा को ब्रा होती ही कॉन्स्पिरसी भारीच.. पण रावण हा खरोखरीच ब्राह्मण होता हे तुम्हाला ठाउक नसल्याने असे लिहीले गेले असे मला वाटले, म्हणून मी लिहीलं होतं.असो. कॉन्स्पिरसींचा विजय असो.

    ReplyDelete
  26. बाबा :)...........सलाम!!!!

    ReplyDelete
  27. बाबा,
    झ क्का स.

    ReplyDelete
  28. ur post is gr8, no doubt. But co-incidentally, it so happens that the conspiracy theory abt aurangzeb has been already been explained in Malhar Ramrao Chitnis Bakhar.

    In it, he says that Aurangjeb and Shivaji did tapashcharya in badrikedar. Aurangzeb tap was more "tamasi", so he became muslim and Shivaji's tap was more "satwik", hence he became Hindu. Tod ahe ka yala?

    ani he tumhi wachu shakta khalil thikani:

    Tryambak shankar shejwalkar - samagr granth sangraha.

    ReplyDelete
  29. हेरंबा,
    लय भारी! ;)
    'हेल ब्रिगेड'!!
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  30. ओंकार,
    अरे मला उगाच औरंगजेबशास्त्रींना नसत्या वादात ओढायचं नव्हतं..म्हणून साधीशी पोस्ट ;)
    बाकी, ह्या धाग्यावर एक ग्रंथसुद्धा लिहिता येऊ शकतो.. :P
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  31. शार्दूल,
    मला वाटतं तुमची पहिलीच कॉमेंट! ब्लॉगवर स्वागत :)
    तारीख पर तारीख(राजांची जन्मतारीख) हा सुद्धा कॉन्स्पिरसीतला एक भाग आहेच! ;)
    >>maza pahila nishana ahe mazi boss
    हे बेस्ट! :D
    खूप धन्यवाद! असाच लोभ असू द्या!

    ReplyDelete
  32. आशाताई,
    ब्लॉगवर स्वागत!
    असेलही तो बिचारा पंडित, सगळाच 'बामनी कावा'! ;)
    खूप धन्यवाद! अशाच भेट देत रहा!

    ReplyDelete
  33. नचिकेत,
    मूळ उल्लेख वाचल्यावर जी मजा आली, ती तुमच्या ह्या वाक्यांनी द्विगुणित केली.
    >>कैकेयी ही मूळची महाराष्ट्रातील देशस्थ ब्राह्मण कमलाबाई कुलकर्णी होय.
    >>श्रीरावण लेले असे त्याचे मूळ नाव असून तो कोकणातून संपूर्ण कुटुंबासहित श्रीलंकेस गेला. त्याच्या कुंभकर्ण नामक भावाचे अचाट झोपणे हे त्या काळाच्या ब्राह्मणांच्या आहारातले अत्याधिक भाताचे प्रमाण दर्शवते. या भाताच्या प्रमाणावरून सिद्धच होते की ही जमात कोकणस्थ ब्राह्मण होती. आजही कोकणात अतिभात खाणारे भट दिसतील.

    आणि रामाची कॉन्स्पिरसीही प्रचंड प्रचंड भारी! :)

    बाकी रावण सध्या ग्राह्य मानल्या जाणार्‍या (मोस्टली खोटंच असणार ;) ) रामायणाप्रमाणे खरंच अर्धा ब्राह्मण होता (वडिलांकडून ; आंतरवंशीय विवाह)!

    >>ब्राह्मणी पांडित्य आणि क्रूरता यांचं आसुरी नातं

    ह्यावर लवकरच एखादं पथप्रदर्शक पुस्तक निघेलच!:P
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  34. अश्विन,
    ब्लॉगवर स्वागत!
    तो खरोखरच पथप्रदर्शक ग्रंथ असेल. म्या करंट्यानं अजून तो पूर्ण वाचला नाही!
    >>या पुस्तकाची प्रत हा इतिहासातील एक अमोल ठेवा आहे!!
    खरंच आपण भांडारकर वाल्यांना सांगू, की मूर्खांनो काय ती जुनी भूर्जपत्र गेली म्हणून गळे काढताय...हे आधुनिक वेद संग्रही ठेवा!
    >>महामहोपाध्याय अफज़लखानशास्त्री नगरकर
    हे प्रचंड प्रचंड प्रचंड आवडलं! :)
    खूप खूप आभार! असाच लोभ असू द्या!

    ReplyDelete
  35. कांचनताई,
    अगं डोळे दिपून गेले माझे त्या उजेडाने! :P

    ReplyDelete
  36. आनंदा,
    भापो! :)

    ReplyDelete
  37. संकेत,
    ब्लॉगवर स्वागत!
    >>कसाब बामन होता..
    हा पूर्ण परिच्छेद आवडला.
    आणि अरे.. तू रावणावर जे लॉजिक देतोयस...ते सगळं समजून घ्यायची इच्छा तरी हवी ना रे! गोबेल्स नीतीमध्ये समजून घ्यायचं नसतं.. दुसर्‍यांच्या माथी मारायचं असतं!
    आणि अरे 'काश्मिरी कावा' म्हणून चेक केलं तर नेटवर 'ग्रीन टी' असंच येतंय..कदाचित तू म्हणतोस ते ही बरोबर असेल..
    पण असू दे... चहाच बरं वाटतंय! ;)
    खूप धन्यवाद रे!
    येत राहा असाच!

    ReplyDelete
  38. विक्रम,
    >>मला संशय आहे कि सदरहू लेखक ब्रिगेड समर्थक असून त्यांना प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
    आयला पकडला गेलो! :)

    ReplyDelete
  39. देवेन,
    अरे कॉन्स्पिरसी थियर्‍या म्हणूनच गाजतात, कारण त्या फॅन्टसीज असतात!
    बाकी औरंगजेब कपाळाला हात लावून बसला असेल वर! ;)
    धन्यवाद भौ!

    ReplyDelete
  40. योगेश,
    कॉन्स्पिरसी गंमत म्हणून, गॉसिप म्हणून ठीक असतं रे...पण जेव्हा एक मोठा जमाव, हेच सत्य आहे म्हणून समाजाच्या माथी मारायचा प्रयत्न करायला लागतो ना, तेव्हा सामाजिक स्वास्थ्य बिघडायचा धोका निर्माण होतो..
    त्यांना आवरणं भाग असतं मग! आवरा! मी फार लिहिलं! ;)
    धन्यवाद भौ!

    ReplyDelete
  41. संकेत (आपटे),
    तुझ्या मताचा पूर्ण आदर! अरे असं स्पष्ट मत मांडशील तरच मला कळेल ना कसं इम्प्रूव्ह करायचं (वैसे पर्फेक्शन में इम्प्रूव्ह करना थोडा डिफिकल्ट होता है! ;) )
    अरे अशा विषयांवर लिहिताना खूप सांभाळावं लागतं! कदाचित म्हणून तसं वाटत असेल तुला!
    धन्यवाद रे! असंच जे वाटेल ते सांगत जा मला! :)

    ReplyDelete
  42. देवेन,
    ये बाबुराव का ष्टाईल है! ते आठवलं! ;)

    ReplyDelete
  43. देविदासजी,
    अप्रतिम विवेचन!
    >>ज्ञानाचं अपचन!
    खरंच!
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  44. सचिन,
    इन्स्पेशन ची आयडिया भारी आहे! भविष्यात वापरण्याजोगी एकदम! ;)
    धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  45. निरंजन,
    लयच भारी प्रकार!
    पुलंचं "काय साहेब होता!" ते आठवलं एकदम!
    खूप आभार! :)

    ReplyDelete
  46. अलताई,
    अगं खूप जण आहेत...वेदांचे स्रोत कसे अज्ञात आहेत.. तसंच पहिली पोस्ट कुणी लिहिली तेही अज्ञातच राहिल!
    कॉ. थिअर्‍या फारच मनोरंजक असतात! :)

    ReplyDelete
  47. सागर,
    लय भारी!
    >>बाबर मुळात बामन होता...
    हा शोध नोबेल पीस प्राईज मिळवून देऊ शकतो..कारण दंगलीच शांत होतील! :)

    ReplyDelete
  48. Anonymous,
    इतकी मौल्यवान माहिती आमच्याशी वाटल्याबद्दल शतशः आभार! ;)

    ReplyDelete
  49. तन्वीताई,
    :D:D:D !!

    ReplyDelete
  50. mynac दादा,
    खूप धन्यवाद रे!

    ReplyDelete
  51. सविताताई,
    स्मायली का जवाब स्मायली! :D

    ReplyDelete
  52. निखिल,
    ब्लॉगवर स्वागत!
    हे जबरदस्त लॉजिक आहे... म्हणजे थोडक्यात महाराज पण बामनच असल्याचं सांगणारा हा बामनी कावा आहे!
    नक्की वाचेन (जाळायच्या आधी ;) ) हे मिळवून!
    खूप धन्यवाद!
    असाच भेट देत रहा!

    ReplyDelete
  53. चेतनभाई,
    तुम्हाला लिहिलेलं उत्तर का दिसत नाहीये .. x-)
    ब्लॉगर गंडतं राव मधेच!
    कॉ. थिअरी हे कैच्याकै अशक्य आवरा प्रकरण आहे!
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  54. @ Vidyadharbaba :
    u are also right & im also right. kashmiri kahwa is green tea.. bt persian kahva (mughal times), it is coffee. Still in many parts of the world,(iran, bosnia,arabia may be)kahva is used as synonym for coffee; & kahvaghar (kahva house) was a reality in mughal times. I read it long ago in a Hindi magazine "Vigyan Pragati"( I had monthly subscription of it.) I still have that copy at my home, bt unfortunately im away, so i cannot tell exactly which issue, bt i still remember that kahva thing.u can search for kahva in wiktionary. so u r also right.. & keep that "tea", it sounds "INDIAN". u can ignore my recommendation for coffee. he.he..
    Some problem with Marathi writing. so had to write in English.. im really sorry for that ..

    ReplyDelete
  55. बाबा या कॉन्स्पिरसीबद्द्ल असं फ़क्त तुच लिहू शकतोस...साष्टांग दंडवत हो बाबामहाराजांच्या दरबारात.

    ReplyDelete
  56. संकेत,
    तू म्हणतोस तसं दोन्ही पद्धतीचे उल्लेख आहेत. त्यामुळे आपण आपले भारतीय पद्धतीनं जाऊ! :D
    धन्यवाद भाऊ पुन्हा एकदा!

    ReplyDelete
  57. अपर्णा,
    :D:D:D
    धन्यवाद!

    ReplyDelete
  58. "तर पंडित औरंगजेबशास्त्रींनी जेव्हा उत्तरेत राज्य केलं होतं, तेव्हा त्यांना चहाची चटक लागली. सारखे चहा प्यायचे. पण ते चहाला चहा नाही, 'कावा' म्हणायचे.... जो तो 'ब्राह्मणी काव्या'चा उदोउदो करू लागला. मग सगळे ब्राह्मणांना 'कावेबाज' म्हणायला लागले. वर्षं उलटत गेली तसा 'बामनी कावा' असा अपभ्रंश झाला"

    अरे विद्याधर!!!!हसून पुरेवाट झाली रे बाबा :D :D :D

    ReplyDelete
  59. कै च्या कै भार्री आहे ही पोस्ट....!!!

    ReplyDelete
  60. श्रीराज,
    :)
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  61. मैथिली,
    खूप आभार गं!

    ReplyDelete
  62. क्षितिज,
    खूप धन्यवाद रे!

    ReplyDelete
  63. विनोदाच्या नावाखाली या मर्‍हाटी मातीत बहुजन (आनी राज्यकर्त्या) समाजाला दूशने दिल्याबद्दल या बामनी लेखकाचा आमी सगळे निशेध करत आहोत. एका ’बाबा’ला (वाचा:पुरंदरे) पुन्यामधे आमी सरळ केलाच आहे. आता नजर तुज्यावर आहे. गप गुमाणं माफी माग आ!! नाहीतर फुडंच आंदोलण या ब्लोगवर केलं जाइल.

    ReplyDelete
  64. विक्रांत,
    खरंच मला जाम टेन्शन येतंय...पुरंदरे तो झांकी है..भिंत अभी बाकी है! असं काहीसं होईल की काय?
    :))

    ReplyDelete
  65. बाबा.. प्रचंड कैच्याकै लिहिले आहेस.... औरंगजेब >>> बामन >>> चहा >>> कावा... वा..वा... :) माझ्या आवाक्यात असते तर तुला आता एखाद्या गडाची किल्लेदारी... नाही..नाही..एखाद्या प्रांताची शुभेदारीच बहाल केली असती... :) मजा आणलीस... :)

    ReplyDelete
  66. रोहन,
    :D
    मला सुभेदारी मिळाली तर कावा यशस्वी झाल्याची ओरड होईल! :P
    खूप आभार रे! ;)

    ReplyDelete
  67. Jabardast Lihil ahes Baba !

    ReplyDelete
  68. Bhartachya pragatimadhil sarvat motha adthada...aani bhartacha kattar dushman fakt 1kach... bramhanvad..cancer peksha marak...dahshatvadapeksha ghatak... Aamhi bahujan to nasht kelyashivay rahnar nahi...

    ReplyDelete