4/16/2012

मराठी ब्लॉगिंगोन्नतीचे पाच सोपान

मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मला अगदी चौथी-पाचवीपासूनच काहीतरी लिहावं आणि लोकांनी आपलं कौतुक करावं असं वाटायचं. कविता वगैरेसुद्धा पाडायचा प्रयत्न मी अगदी लहान वयात केला होता. त्या कवितेला फारसा अर्थ नव्हता हा भाग अलाहिदा, पण लेखक किंवा कवी ह्या शब्दांबद्दल फार आकर्षण वाटायचं. त्याभोवती एक अनामिक ग्लॅमर असल्यागत आणि ते आपण बनावं असं वाटायचं. आता वाटून कुणी लेखक होत नसतो, पण वाटायचं हे महत्वाचं.
तर अशी सुरूवात झाल्यावर माझी हौस मुरत गेली नसती तरच नवल. मी चांगलाच लिहिता झालो. मुख्यत्वेकरून कथा लिहायचो, पद्य मनुष्य मी कधीच नव्हतो आणि हे सत्य मी फार पूर्वी मान्य केलं. एकदा पाय फ्रॅक्चर झाल्यावर मी प्लॅस्टरमध्ये वीस दिवस पडून होतो, तेव्हा एक रेल्वेकादंबरीस्टाईल ऍक्शन दीर्घकथादेखील लिहून काढली होती. एकदा एअरपोर्टवर विमानाची वाट पाहताना मी ई-तिकिटाच्या प्रिंटआऊटच्यामागे कथा लिहिली होती. घरातल्या अडगळींमध्ये आवराआवरी करताना आजही आईला मी कथा लिहिलेले कागदाचे कपटे अधूनमधून सापडतात. आणि हे सगळं 'मराठी ब्लॉग' ह्या माध्यमाची ओळख होण्यापूर्वी. त्याआधी कॉलेजात असताना मित्राच्या नादानं इंग्लिश ब्लॉग लिहायचो. आणि ते अत्यंत बालिश आणि माझ्या अत्यंत मर्यादित महाविद्यालयीन वर्तुळापर्यंतच सीमित असे ब्लॉग्ज असायचे.
तर मुद्दा हा की आजपासून अडीच वर्षांपूर्वी मराठीमध्ये ब्लॉग लिहायला सुरूवात करण्यापूर्वीदेखील मी लिहितच होतो आणि जेव्हा मी ब्लॉगवर काही लिहित नसतो, तेव्हाही कागदांवर मी लिहितच असतो. पण ब्लॉग हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे.
आपण सर्वप्रथम ब्लॉग म्हणजे काय ते पाहू. Blog म्हणजे Weblog ह्या शब्दाचं छोटं, सुटसुटीत रूप आहे. Web वर ठेवला जाणारा Log अर्थात ढोबळमानानं ऑनलाईन दैनंदिनी. पण ब्लॉग तिथपर्यंतच मर्यादित राहिला नाही. सुरूवातीला इंग्रजीनं आणि नंतर इतरही अनेक ज्ञानभाषांमध्ये समृद्ध असे ब्लॉग्ज जगभरात तयार झाले. ब्लॉगचा वापर नुसती दैनंदिनी म्हणून करणारे जसे लोक आहेत, तसेच ब्लॉग म्हणजे ऑनलाईन ग्रंथच बनवणारेही अनेक महाभाग आहेत. आणि इतका लवचिकपणा हीच ब्लॉगची मुख्य खासियत. थोडक्यात ब्लॉग म्हणजे महाजालावरचा एक असा कोपरा जो वेळ पडल्यास सगळ्या जगालाही दिसू शकतो. अनेकजण असा स्वतःचा कोपरा केवळ मर्यादित वर्तुळापर्यंतच सीमित ठेवतात अर्थात त्याही बाबतीत ब्लॉग हे लवचिक माध्यम आहे. पण ज्याप्रकारे इंटरनेटचा प्रसार होऊ लागला, त्यामुळे ब्लॉगिंग हे संवादाचं एक माध्यम बनू लागलं. अगदी राज्यक्रांत्यांमध्येची ब्लॉगिंगनं बरीच महत्वाची भूमिका वठवली. अर्थात ब्लॉगिंग ही एक भाषा बनली. आणि मग ज्याप्रकारे प्रत्येक भाषेच्या बाबत होतं, त्याप्रमाणेच ब्लॉगिंगबाबतही गुणात्मक आणि संख्यात्मक तुलनांना सुरूवात झाली. इंग्रजी, फ्रेंच, चायनीज, रशियन, स्पॅनिश इत्यादी मोठा सुशिक्षित आणि इंटरनेट उपलब्ध असलेला वर्ग असणार्‍या भाषांमध्ये अनेक ब्लॉग्ज निर्माण झाले. ह्या ब्लॉगिंग जगतांमध्येदेखील निश्चितच अशा प्रकारची ओरड कोणत्या न कोणत्या कालावधीमध्ये झाली असणारच, पण मी तितका शोध घेतला नाही त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. पण सध्या, सध्या कशाला, मी जितके दिवस ब्लॉगिंग करतोय तितके दिवस मी 'मराठी ब्लॉग्जचा दर्जा उंचावत नसल्याची खंत' व्यक्त करणारे उसासे वाचतोय. गंमतीचा भाग असा की की लहानपणापासून मी 'मराठी भाषा मरणासन्न आहे' असलेही उसासे ऐकत आलोय आणि त्या उसाशांना काहीही अर्थ नसतो हे मला नेहमीच तितक्याच प्रकर्षाने वाटत आलंय.
आता आपण मराठी ब्लॉगिंगबद्दलच्या काही ठळक काळज्या पाहू -

१. मराठीत विषयांचं वैविध्य नाही.

-मी स्वतः अत्यंत थोडेसेच ब्लॉग्ज पाहिले आहेत आणि माझ्या अत्यंत तुटपुंज्या परिघामध्येही एक फोटोग्राफीचा ब्लॉग, भरपूर ट्रेकिंगचे ब्लॉग्ज, ललितलेखनाचे विपुल ब्लॉग्ज, कथा/लघुकथा, कविता, तांत्रिक बाबींशी संबंधित ब्लॉग्ज, पाककला, चित्रकला, हस्तकला, समाजकार्यातले अनुभव, प्रवासवर्णनं, रामायण, महाभारत इत्यादी इत्यादी ब्लॉग्ज मी पाहिलेत. मी स्वतः अत्यंत छोटा अन सामान्य मनुष्य असल्यानं मला जास्त विषयांमध्ये गती नाही त्यामुळे मी फारसे वैविध्यपूर्ण ब्लॉग्ज शोधले नाहीत. पण न शोधताही जर मला इतके मिळाले असतील, तर बाकीचेही काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे, एखादा ब्लॉग हा एकाच विषयाला वाहिलेला असावा असा एक टीकाकारांचा सार्वत्रिक अट्टाहास मला जाणवतो, तो अनाकलनीय आहे. एखाद्या व्यक्तीनं एका विषयासाठी एकच ब्लॉग लिहिला तरच तो गुणात्मकदृष्ट्या वरचढ का गणाला जावा? जर एखाद्यानं त्याची फोटोग्राफी, चित्रकला, हस्तकला, तांत्रिक बाबी आणि ललितलेखन एकाच ब्लॉगवर केलं तर लगेच त्याला ललित ब्लॉगर म्हणून हिणवायचं? हे म्हणजे 'लघुत्तम सामायिक विभाजक' काढण्यासारखं आहे आणि तेदेखील चुकीचा. कारण कुठल्याही प्रकारचं लेखन कमी दर्जाचं जास्त दर्जाचं असं म्हणणं हेच मुळात चुकीचं आहे. ललित लिहिलं की वाईट, विवेचन केलं की चांगलं, इंग्रजीमिश्रित बोलीभाषा वापरली की वाईट, जडबंबाळ अललंकारिक लिहिलं की चांगलं ही वर्गवारी कशासाठी?
ज्याप्रमाणे कुठलाही एक मनुष्य दुसर्‍याप्रमाणे नसतो, त्याप्रमाणे कुठलीही एक अभिव्यक्ती दुसर्‍या अभिव्यक्तीसारखी नसते. त्यामुळे एकाच शाळेत, एकाच बाकावर एकाच तासाला बसणारी दोन मुलं त्या तासात घडलेल्या घटनांचं संपूर्ण वेगळं वर्णन करतील. ते आपलं 'एकच कुत्रा आहे म्हणून आमचा निबंध सारखा आहे' असल्या बालिश जोकसारखं कधीच नसतं. तस्मात एकाच धाटणीचे ब्लॉग असं म्हणून जे एक जनरलायझेशन केलं जातं ते मला पूर्णपणे आक्षेपार्ह वाटतं.

२. मराठी ब्लॉगिंगमध्ये रोजच्या घडामोडींबद्दल किंवा फक्त स्वतःच्याच परिघातल्या अनुभवांबद्दल अत्यंत ट्रिव्हियल लिहिणार्‍या ब्लॉग्जचाच भरणा जास्त आहे. थोडक्यात ब्लॉग ह्या माध्यमात 'नवा विचार' येत नाही.

-मी कुणी मोठा लेखक नाही की लोकप्रिय ब्लॉगर नाही की कॉम्प्युटर आहे आणि मराठी टंकलेखन जमतंय म्हणून चार ओळी खरडणारा हौशी मनुष्यही नाही, पण मी ह्या सर्वांचाच प्रतिनिधी आहे. कारण कधी मी लेखक म्हणून लिहितो, तर कधी मनातलंच ललितलेखनाच्या माध्यमातून लिहून चार समविचारी लोकांचे प्रतिसाद मिळावेत म्हणून लिहितो, तर कधी निव्वळ हातात लॅपटॉप आहे म्हणून लिहितो. आणि हो, मीसुद्धा वाचलेली पुस्तकं, पाहिलेला सिनेमा किंवा मस्त जमलेली ट्रीप ह्यांवर ब्लॉगपोस्ट लिहितो. पण जेव्हा 'मराठी ब्लॉगिंगमध्ये नवा विचार येत नाही' असली ओरड होते, तेव्हा मोठी मौज वाटते.
मुळात 'नवा विचार' ही किती सापेक्ष संकल्पना आहे. जी व्यक्ती फक्त स्वतःच्या घरातल्या गोष्टी ब्लॉगवर लिहिते, त्या व्यक्तीनं कथा लिहिणं हा 'नवा विचार' ठरतो. जी व्यक्ती पुस्तक परीक्षणं लिहिते, तिनं ललित लिहून पाहणं हा 'नवा विचार' ठरतो आणि जी व्यक्ति अक्षरशः डोक्यात चाललेल्या कुठल्याही विचारचक्रावर लिहिते, तिनं कविता लिहिणं हा 'नवा विचार'च नाही का?
फक्त दणदणीत शब्दप्रयोग करून वैचारिक लिहिणं म्हणजेच 'सध्याच्या विचारांपलिकडचं' होऊ शकत नाही. अर्थापलिकडला अर्थ शोधणं आणि तो शब्दांकित करणं हा निश्चितच कौतुकास्पद 'नवा विचार' ठरतो, पण फक्त तोच नवा विचार ठरतो हे आक्षेपार्ह आहे. असं लिहिणार्‍यानं एकदा घरात काय घडतंय, ते हलक्याफुलक्या बोलीभाषेत (मग ती इंग्रजीमिश्रित का असेना) शब्दांकित करून पाहणं, हा निश्चितच 'नवा आणि सध्याच्या विचारांपलिकडचा' विचार ठरू शकतो. किएस्लोव्स्कीचे 'थ्री कलर्स' हे तीन सिनेमे, तिन्ही संपूर्ण वेगवेगळ्या धाटणीचे. एकामध्ये डार्क ह्यूमरमध्ये दडलेला सिम्बॉलिझम, दुसर्‍यामध्ये कोंबून भरलेला थेट अंगावर येणारा सिम्बॉलिझम आणि तिसर्‍यामध्ये प्रचंड स्टाईलबाज सिम्बॉलिझम. डेकालॉगचे दहाही एपिसोड वेगवेगळ्या धाटणीचे, एकात रडायला येईल, तर दुसर्‍यात घृणा वाटेल, तिसर्‍यात थरारून जायला होईल तर चौथ्यात चेहर्‍यावर स्मितहास्य येईल. हा 'नवा विचार'. जर किएस्लोव्स्की फक्त सिम्बॉलिझमला कवटाळून बसला असता, तर सिम्बॉलिझमवरचे त्याचे इतके प्रयोग पाहायला कुणी थेटरात फिरकलंही नसतं किंवा त्यावर तासनतासाचा अभ्यास करून लेख पाडायचीही कुणी तसदी घेतली नसती. क्युब्रिकचा प्रत्येक सिनेमा त्याच्या मागच्या सिनेमापेक्षा वेगळा असतो. त्याला 'सध्याच्या विचारापलिकडे जाणं' म्हणतात. जर तो प्रत्येकच सिनेमात 'अर्थामागचे अर्थ' शोधत बसला तर अभिव्यक्तीची बोंब होईल ह्याची त्याला कल्पना असते.
उद्या जर टॉड फिलिप्सनं (हँगओव्हरचा दिग्दर्शक) किएस्लोव्स्कीच्या 'द पर्गेटरी' चं काम पूर्ण करायला घेतलं तर ते त्याला जमेल का? आणि क्रिश्तॉफ पिएशिविचला जर 'हँगओव्हर ४' ची स्क्रिप्ट लिहायला सांगितली तर ती त्याला जमेल का? सांगण्याचा मुद्दा हा की अगदी एखाद्याला नसेलच 'नवा विचार' करायचा तर काय हरकत आहे? 'जरी राजहंसाचे चालणे जगी झालें या शहाणे, म्हणोनि काय कवणें चालोचि नये?'
रडगाणी गाण्यापूर्वी थोडा विचार केलेला बरा असतो.

३. मराठी लेखक, खेळाडू, गायक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रांमधील कुणीही ब्लॉगलेखनाकडे वळलेले दिसत नाहीत.

-हा एक अत्यंत योग्य मुद्दा आहे. मराठी ब्लॉगजगताला वेगळा आयाम मिळवून देण्यामध्ये ही गोष्ट मोलाची ठरू शकते. पण इथे एक मोठी अडचण आहे. आपल्याकडे शाळेनंतरचं शिक्षण मराठीमध्ये उपलब्ध नाही, आणि असलं तरी ते कुणी घेत नाही कारण त्याचा वास्तविक जगात उपयोग होत नाही हे कटू सत्य आहे. थोडक्यात मराठी ही ज्ञानभाषा नाही. त्यामुळे व्यावसायिक शब्दकोष किंवा खेळामधल्या संज्ञा, शास्त्रीय संज्ञा ह्या मराठीतून एकतर असणं आणि असल्या तरी प्रथितयश किंवा त्या त्या क्षेत्रातले जाणकार, खेळाडू, शास्त्रज्ञ किंवा व्यावसायिक व्यक्तींना ब्लॉगमधून तितक्या पातळीपर्यंत मराठीतून व्यक्त होणं अंमळ अवघडच दिसतं. पण हो, गायक, लेखक, संगीतकार किंवा अगदी व्यावसायिकही काही काही मार्गांनी निश्चितच मराठीतून व्यक्त होऊ शकतात. जुन्या काळातले उत्तम शास्त्रज्ञ उदा नारळीकर किंवा बाळ फोंडकेंसारखे उत्तम शास्त्रीय लेखक आताच्या पिढीत न होण्याची कारणमीमांसा थेट इंग्रजी माध्यमाच्या शाळेपर्यंत घेऊन जाते आणि ह्या विषयामध्ये लिहिण्या/बोलण्यासारखं इतकं काही आहे की माझ्या मर्यादित बुद्धीनं मी काही लिहिणं चुकीचं ठरेल.
थोडक्यात, वाट बिकट आहे, पण जर प्रथितयश लोकांनी मराठीत प्रयत्नपूर्वक लिहिलं (जसं अमिताभ बच्चन हिंदीत ब्लॉगिंग करतात), तर मराठी ब्लॉगजगताला एक नवा आयाम मिळेल ह्यात शंकाच नाही.

४.तांत्रिकदृष्ट्या मराठी ब्लॉग्जना अजून बरीच मजल गाठायची आहे.

-अजून एक योग्य मुद्दा. मराठीमध्ये टंकलेखनाची सुविधा ही तुलनेने अलिकडची घटना आहे. त्यामुळे मराठी ब्लॉगलेखनही अलिकडचंच. त्यातली बरीच मंडळी अशी आहेत जी इंग्रजी ब्लॉग्ज वाचत नाहीत किंवा लिहितही नाहीत त्यामुळे तिथल्या विविध संकल्पनांची ओळख नाही. आणि ब्लॉग लिहिणारे सगळेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले किंवा रोजच्या रोज संगणकाशी निगडीत कामें करणारे नाहीत, त्यामध्ये गृहिणी, पेन्शनर्स आणि इतरही अनेक व्यावसायिकांचा भरणा आहे, ज्यांना ब्लॉगचा आराखडा, प्लगिन्सची व्यवस्था इत्यादी गोष्टींबद्दल अजूनही तितकीशी माहिती नाही. त्यामुळे मराठी ब्लॉग्जमध्ये दिसायला सुटसुटीत आणि विविध सोयीसुविधांनी युक्त असे ब्लॉग्ज फारच कमी आहेत.
ह्या बाबतीमध्ये सुधारणेला बराच वाव आहे.पण सध्या ब्लॉगजगतात तांत्रिक बाबी स्पष्ट करून, समजावून सांगणारे अनेक ब्लॉग्ज आहेत आणि त्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे लवकरच चित्र पालटलेलं बघायला मिळण्यास हरकत नाही.

५. शुद्धलेखन आणि परिच्छेद, विरामचिह्ने इत्यादी लेखनविषयक तांत्रिक बाबी.

-इंग्रजी माध्यम आणि तत्सम मुद्द्यांमुळे मराठी शुद्धलेखन किंवा प्रमाण (राजमान्य) मराठी शुद्धलेखन हा एक काळजीचा विषय आहे. योग्य परिच्छेद पाडणं, र्‍हस्व-दीर्घ आणि स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम हे योग्य पद्धतीने किती जणांना जमत असेल ते सांगणं कठीण आहे. पण इथे आपल्याला अभिव्यक्ती महत्वाची आहे की सादरीकरण हा एक मुद्दा कळीचा ठरतो. भाषेचा मूळ उद्देश संवाद साधला जाणं आणि माहितीची देवाणघेवाण होणं हा आहे असं धरून चालल्यास तांत्रिक माहिती किंवा प्रवासवर्णनपर किंवा तत्सम माहितीपर ब्लॉग्जमध्ये शुद्धलेखन किंवा परिच्छेदांचा मुद्दा बाजूला ठेवता येईल, पण अर्थातच कविता किंवा कथा ह्यांमध्ये ह्याची अपेक्षा ठेवणं रास्त ठरेल.
पण एकंदरितच सरसकट सर्वत्रच शुद्धलेखन, परिच्छेद हा अट्टाहास धरून चालणं म्हणजे थोडासा अतिरेकच म्हणावा लागेल. सादरीकरण महत्वाचं आहे, पण अभिव्यक्तीचाच गळा घोटणारं सादरीकरण काय कामाचं हाही विचार व्हायला नको काय? माध्यमाला सरावल्यानंतर आपोआपच सादरीकरणात सफाई येऊ लागते. पण सादरीकरणाच्या नावाने गळे काढून नवीन अभिव्यक्ती दडपण्यात काय हशील?

मी एव्हढं सगळं पाल्हाळ लावण्याचं कारण एव्हढंच होतं, की मराठी ब्लॉगिंगमध्ये नव्या वाटा चोखाळल्या जाव्यात हा विचार मांडताना जी सद्यस्थितीबद्दल ओरड होते आहे ती अनाठायी आणि संकुचित मनोवृत्तीची आहे असं माझं ठाम मत मला मांडायचं होतं. आणि त्याचसोबत मराठी ब्लॉगिंग माझ्या नजरेतून खरोखरच कुठे आहे, ह्याचीही एक पडताळणी करायची होती. मी कुणीही तीसमारखाँ नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो, पण जे खटकलं किंवा वाटलं ते मांडण्याचं माझं स्वातंत्र्य वापरून मी हे लिहितोय.
नव्या वाटा ह्या कायमच उपलब्ध असतात, अगदी इंग्रजी ब्लॉगजगतामध्ये सर्व काही पादाक्रांत झालंय असा दावा कुणीही करणार नाही, त्यामुळे नव्या वाटा अन नव्या विचारांसाठी आत्ता लिहिणार्‍या किंवा लिहिण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कमी गुणवत्तेचे, ट्रिव्हियल, स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणारे वगैरे म्हणणं हे चूक आहे. जोवर लेखन होत नाही, तोवर ते वेगळं आहे की नाही हे कसं कळेल? तेव्हा कायम उपलब्ध साहित्याबद्दल बोंब ठोकण्यापेक्षा किंवा व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार्‍यांना शेरेबाजीनं नामोहरम करण्यापेक्षा प्रत्येकाचंच स्वागत आणि कौतुक करायला काय हरकत आहे? इंटरनेटची लोकशाही तर सर्वोच्च प्रकारची लोकशाही आहे आणि ती तितक्याच उच्च दर्जाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यही देते. तर आपलं स्वातंत्र्य आपण इतरांच्या अभिव्यक्तीला अधिक फुलवायसाठी वापरायचं की दडपायसाठी ते प्रत्येकानं ठरवायचं.

टीप - काल नजरचुकीने काही वाक्यांची दोन परिच्छेदांमध्ये पुनरूक्ती झाली होती. ती दुरूस्त केली आहे.

74 comments:

  1. अतिशय संयत आणि तरीही सडेतोड, बेफाम !!! प्रचंड आवडला.

    अनेक ब्लॉगरांना जे कदाचित समजावून सांगता येणार नाही आणि त्यापेक्षाही तथाकथित स्वघोषित (अल्पमति) टीकाकारांना जे आयुष्यात (वाचा बापजन्मात) समजून घेता येणार नाही असे मुद्दे फार खुबीने मांडले आहेस. पण हे मुद्दे तथाकथित माहीतगरम, अभिनवअदृश्य आणि 'विक्षिप्त' लोकांना पटतील अशी अपेक्षा बाळगणे हे सध्या तरी नळाच्या कृपेने पाउस पडण्याची अपेक्षा करण्यासारखं आहे.

    छ्या छ्या छ्या.. पोस्टमध्येही पुल (ब्लॉगिंगोन्नतीचे पाच सोपान) आणि प्रतिक्रियेतही. !! छ्या.. कसले बुर्झ्वा मध्यमवर्गीय आहोत आपण. कधी कळणार आपल्याला परकीयांच्या अजीवनशैलीची परिहार्यता !!! धिक्कार असो !!!

    ReplyDelete
    Replies
    1. :)
      जोवर समजत नाही तोवर वेगवेगळ्या सर्व पद्धतींनी आपले सर्व मुद्दे मांडत राहिलेच पाहिजेत ना रे भाऊ!
      आणि आपली झेप पुलं, वपुं, जीए, ग्रेस, कुसुमाग्रज, केशवसुत, पाडगावकर, विंदा, नेमाडे ..अरारारा जास्त झाली वाटतं नावं! अपरिहार्य होती तेव्हढी लिहिली ;)

      Delete
  2. रच्याक, शीर्षक अत्युच्च आहे हे आधी नमूद करायला विसरलो होतो..

    ReplyDelete
    Replies
    1. :D
      पुलं नेहमीच मदतीला येतात.. पुलंच्या एकेका वाक्यावर पिढ्यानपिढ्या चतुर संवाद आणि लेख पाडत राहणार आहेत! :)

      Delete
  3. लेख पर्फेक्ट आणि शिर्षक नेमके. बाकी वेड पांघरलेल्यांना शालजोडीतले कळणे कठिणच.... :)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहा श्रीताई, खरंय.. झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करणं कठीणच!

      Delete
  4. बाबा शेठ एकदम, मनातलं लिहीलंय. बाकी शालजोडीतले समजतील की नाही शंकाच!

    ReplyDelete
    Replies
    1. अलताई,
      खरंय अन समजले तरी समजून घ्यायला हवेत ना!

      Delete
  5. मनातलं लिहिलं . लिहीणं फार कठीण, पण टीका करणं सोपं. ज्याला अभिनय येत नाही तो डायरेक्टर बनतो, तसेच ज्याला लिहीता येत नाही तो लोस मधे टीकाकार बनतो. अत्युच्य लेख, त्यांच्यापर्यंत पोह्चवतो.

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा.. काका.. एक म्हण आहे.. अगदी सर्वसमावेशक नाही पण तरी 'Those who can't teach'. त्यावर काही कटू अनुभव आलेले चित्रकर्ते नाटककर्ते असंही म्हणतात की Those who can't become critics.
      जनरलायझेशन सोडलं तरीसुद्धा निष्कारण टीकेच्या नावाखाली इतरांचा उपमर्द करण्याची लाट आलेली आहे.
      चालायचंच.

      Delete
  6. सुरेख लेख झाला आहे विद्याधर!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद निरंजन! :)

      Delete
  7. अतिशय सयंत लेख.

    कलात्मक,अलंकारिक,वैचारिक(अस ते स्वत: म्हणतात म्हणून)... वै. वै लिह्नार्याना हे आपले सामान्य सोपान समजले तरी खूप झाले.

    ReplyDelete
    Replies
    1. समजणं अत्यावश्यक आहे सचिन. तरच ब्लॉगिंगची खरोखरच उन्नती होईल! ;)

      Delete
  8. शाब्बास !! मला इतकं कौतुक वाटतंय ना !!! खरंच !!! :) :)

    ReplyDelete
  9. अडचणी असूनही मार्ग काढत ब्लॉग फोफावत आहे, हे थोडक्यात सांगता येईल. लेख उत्तम.
    मंगेश नाबर.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी अगदी मंगेश. हेच सार आहे म्हणायला हरकत नाही!
      धन्यवाद!

      Delete
  10. जबरदस्त लिहिलंय पंत.. संयत शतक... हॅट्स ऑफ्फ

    ReplyDelete
  11. व्वा व्वा पंत... एकदम सडेतोड आणि मुद्देसूद लेखन. शीर्षक तर जबरी :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. Anonymous9:24 PM

      य्ये ब्बात :)


      बाबा, द्रविडची फटकेबाजी आणि ज्ञानियाची भिंत दोन्ही समसमान आठवले :) .... पुन्हा एकदा, हमारा भाई लिखेंगा तो जबरदस्तच!!

      अतिशय अभ्यासपुर्ण आणि अप्रतिम मुद्देसुद लिखाण!!!

      Delete
    2. धन्यवाद सुहासा! शीर्षकाचं नेहमीप्रमाणेच सगळंच श्रेय पुलंना! कठीण समय येता, त्यांचं कुठलंही वाक्य घेऊन आकर्षक शीर्षक बनवता येतं! :)

      Delete
    3. तन्वीताई,
      :) हेरंबला म्हटलो तसं.. प्रत्येक मार्गाने आपले विचार अन मुद्दे मांडत राहायचेच म्हणून..

      Delete
  12. आता टीकाकारांनीही या भिंतीवरही डोके आपटून घ्यावे. आणि थोडे फुटक्या मडक्यात ज्ञान भरुन आपापला ब्लॉग सुरु करावा.
    मराठी ब्लॉगला फॉंट्स आणि अन्य काही सीमा आहेत म्हणा, पण "भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी" फारसे अवघड नाहीच. आपणच मिळून मार्ग काढावयास हवा.

    ReplyDelete
    Replies
    1. >>पण "भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी" फारसे अवघड नाहीच. आपणच मिळून मार्ग काढावयास हवा.

      अगदी अगदी.. मागे जाण्याची किंवा स्टॅग्नेशनची शक्यताच नसते... जाणार तर पुढेच! :)

      Delete
  13. अतिशय परिणामकारक लेख लिहिलाय. मुद्देसुद आणि प्रमाणबद्ध ! प्रत्येक मराठी ब्लॉगर्सने वाचायला आणि शेअर करायला हवाच.
    हल्ली लोकसत्तासारखा मराठी वृत्तपत्रातुन मराठी ब्लॉगर्स जी ठरवून अवहेलना? ( मी शब्द बरोबर वापरलाय ना ? ;) व्हू केअर्स ;) ) होतेय त्या कोपर्‍यातल्या लोकांसाठी हा लेख म्हणजे, अपनी कलाईयोंका खुबसुरतीसे इस्तेमाल करके लगाया हुआ चौका है!.

    मस्तच रे !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दीपक,
      लाटच आलेली आहे सध्या गळे काढण्याची! उगाच लोकांचे गैरसमज नकोत की खरोखरच मराठी ब्लॉगिंग स्टॅग्नेट झालंय म्हणून आपलेची चार आणे! :D

      Delete
  14. शीर्षकापासून शेवटपर्यंत... अजुन एक जबरदस्त पोस्ट...

    जियो...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सिद्धार्थ! :)

      Delete
  15. मुद्देसुद लेख !

    अजून काही मुद्दे -
    १) मराठी ब्लॉग्स ला सारखी नावे ठेवताना इंग्रजी ब्लॉग्स सोबत तुलना करू नये असे मला वाटते. मराठी ब्लॉग्सची संख्या हजारांत तर इंग्रजी ब्लॉग्सची लाखात आहेत. त्यामुळे कुठल्याही विषयावरचे जास्त ब्लॉग्स इंग्रजी मध्ये असणे अपेक्षितच आहेत. (एखाद्या विषयावरचे ब्लॉग्स/एकूण सर्व ब्लॉग्स ची संख्या) हा ratio इंग्रजी मध्ये मराठी पेक्षा फारसा वेगळे असेल असे मला वाटत नाही. बाकीच्या प्रादेशिक भाषांतील ब्लॉग्स सोबत तुलना केलेली एकवेळ ठीक आहे.

    २) इंग्रजी मध्ये professional ब्लॉगर्स ची संख्या जास्त आहे. मराठीत माझ्या माहितीत तरी प्रोफेशनल ब्लॉगर्स नाहीत बहुतेक सर्व हौशी ब्लॉगर्स आहेत. त्यामुळे सुद्धा एखाद्या विषयाला वाहिलेल्या ब्लॉग्स च्या संखेत फरक पडू शकतो. परत, वरील मुद्द्यानुसार, हि तुलना गैरलागू आहे.

    ३) बऱ्याचश्या तारांकित मंडळी च्या ब्लॉग्स वर त्यांच्या नावाने ghost writer ब्लॉग लिहितात. आपल्याकडे अजून मोठ्या लोकांनी स्वत:च ब्लॉग काढण्याची प्रथा रुजलेली नाहीये. बरीचशी मंडळी फेसबुक पेज/ ट्विटर ला प्राधान्य देत आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिजीत,
      एकदम परफेक्ट!
      >>(एखाद्या विषयावरचे ब्लॉग्स/एकूण सर्व ब्लॉग्स ची संख्या) हा ratio इंग्रजी मध्ये मराठी पेक्षा फारसा वेगळे असेल असे मला वाटत नाही. बाकीच्या प्रादेशिक भाषांतील ब्लॉग्स सोबत तुलना केलेली एकवेळ ठीक आहे.
      >>इंग्रजी मध्ये professional ब्लॉगर्स ची संख्या जास्त आहे. मराठीत माझ्या माहितीत तरी प्रोफेशनल ब्लॉगर्स नाहीत बहुतेक सर्व हौशी ब्लॉगर्स आहेत.
      (त्याचं कारण तसा ऑडियन्स उपलब्ध नाही हेही एक)
      आणि
      >>बऱ्याचश्या तारांकित मंडळी च्या ब्लॉग्स वर त्यांच्या नावाने ghost writer ब्लॉग लिहितात. (ताजं उदाहरण म्हणजे राजूसाहेब परूळेकर जे अण्णांच्या नावाने ब्लॉग लिहित होते आणि सध्या अण्णांच्या नावानं शिमगा करण्यात मग्न आहेत)
      >>बरीचशी मंडळी फेसबुक पेज/ ट्विटर ला प्राधान्य देत आहेत.

      अतिशय सुयोग्य मुद्दे मांडले आहेस.. धन्स भाऊ!

      Delete
  16. मस्त. सिद्धार्थ + १.

    ReplyDelete
  17. मस्तच लिहिले आहेस.

    हे वाचताना महेंद्र यांच्या चेहऱ्यावर एक छानसे स्मित झळकले असेल... माहितेय मला :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्रीराज! :)

      Delete
    2. श्रीराज
      हसणॆ कंट्रोल होत नाही.. :) लोळागोळा होतोय .

      Delete
  18. Anonymous12:32 AM

    निव्वळ अचूक!!!
    बाकी असल्या शालजोडीतल्यांचे मी टेन्शन घेत नाही. ह्यांचेच काय, मी मुळात कुणाचेच टेन्शन घेत नाही. विचार स्वातंत्र्य दिलंय ना आपल्याला संविधानाने!
    पण तरीही हा लेख म्हणजे जबरदस्त! क्याडीक ला सचिनने मारलेला षटकार सारखा आहे. किंवा लक्ष्य मधल्या अमिताभने 'हम, दुश्मनी में भी एक, ... शराफत रखते हैं!!' ची आठवण करून देणारा आहे.
    सलाम तुम्हाला!

    ReplyDelete
    Replies
    1. वैभव,
      >>ह्यांचेच काय, मी मुळात कुणाचेच टेन्शन घेत नाही. विचार स्वातंत्र्य दिलंय ना आपल्याला संविधानाने!
      अगदी बरोबर.. फक्त वर म्हटलं तसं.. सर्व व्यासपीठांवरून ओरड होऊ लागली म्हणजे उगाच कुणाचे ब्लॉगिंग किंवा मराठी ब्लॉगजगताबद्दल गैरसमज नकोत म्हणून आपल्याला जे वाटतं ते स्पष्टपणे मांडण्याची गरज वाटली!
      कॉम्प्लिमेंट्सबद्दल धन्यवाद! :)

      Delete
  19. कित्ती सुंदर आणि मुद्देसूद झालाय लेख. <<<"अभिव्यक्त होणं महत्वाचं"-अगदी अगदी, शंभर टक्के सहमत. मुळात प्रत्येकचजण साहित्याची सेवा वगैरे उदात्त भावनेनं लिहितच नाही. किमान मी तरी नाही, मला लिहायला आवडतं म्हणून मी लिहिते आणि मी लिहिलेलं ज्यांना वाचायला आवडतं ते वाचतात इतका सगळा सोपा मामला असताना त्याच्या गुंतावळ्या करायच्या कशाला नाही का? सगळेच्या सगळे मुद्दे मनापासून पटले आणि ते मांडण्यासाठी जे अचूक शब्द वापरले ते तर जास्तच आवडले. साधं, सोपं, मुद्देसूद. मस्त मला खूप म्हणजे खूप आवडली पोस्ट:)

    ReplyDelete
    Replies
    1. शिनु,
      >>मला लिहायला आवडतं म्हणून मी लिहिते आणि मी लिहिलेलं ज्यांना वाचायला आवडतं ते वाचतात इतका सगळा सोपा मामला असताना त्याच्या गुंतावळ्या करायच्या कशाला नाही का?
      अचूक.. बहुतांच्या मनातलं! :)
      धन्यवाद!

      Delete
  20. मस्त..मस्त मस्त.... ! मस्तवाल टिकेखोरांना अगदी योग्य उत्तर... चेहऱ्यावर एक "अपरिहार्य" नाठाळ हसू आलं वाचताना... :)

    ReplyDelete
    Replies
    1. चैताली,
      :) धन्यवाद!

      Delete
  21. perfect lihile ahes re! :-)

    ReplyDelete
  22. Anonymous4:06 AM

    एका मोठ्या वृत्तपत्राकडून काही ब्लॉगर्सवर आणि पर्यायाने अवघ्या ब्लॉगिंगकर्त्या वर्तुळावर झालेल्या अत्यंत शेलक्या शब्दांतील टीकेबद्दल ऐकून होतो. त्या पार्श्वभूमीवर अतिशय संयत, तरीही मुद्देसूद आणि आवश्यक तिथे कठोर लेख (ब्लॉगपोस्ट?) लिहील्याबद्दल तुझे अभिनंदन!

    ReplyDelete
    Replies
    1. आल्हाद,
      धन्यवाद रे भाऊ! अनाठायी टीका मोठ्या व्यासपीठावरून झाली तर थोडी तरी नोंद घ्यावीच लागते ना रे! :)

      Delete
  23. उत्तम लेख! पटले....१००%

    ReplyDelete
  24. अभ्यासपूर्ण, ठाम भूमिका मांडणाऱ्या उत्तम लेखाबद्दल अभिनंदन. मराठी लेखक, शास्त्रज्ञ, खेळाडू इ. नी ब्लॉगिंग केल्यास एक नवीन आयाम निश्चितपणे मिळेल, हे अगदी पटले.

    ReplyDelete
    Replies
    1. सुमेधा,
      खूप खूप धन्यवाद!

      Delete
  25. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मला अगदी चौथी-पाचवीपासूनच काहीतरी लिहावं आणि लोकांनी आपलं कौतुक करावं असं वाटायचं. कविता वगैरेसुद्धा पाडायचा प्रयत्न मी अगदी लहान वयात केला होता.

    >>> तुला सांगतो बाबा.. मलाही असेच वाटायचे लोकांनी आपलं कौतुक करावं वगैरे... :) पण मी कविता वगैरे पाडायचा प्रयत्न नाही केला.. त्या ऐवजी ४-२ पोरांना ढकलून पाडायचो.. तेवढेच आपले नाव शिक्षकांच्या तोंडात... :D

    पायऱ्या छान मांडल्या आहेत.. :) आता मी भटकंती वर लिहितो, इतिहासावर लिहितो पण मला ललित, कविता जमत नाहीत म्हणून काय झाले.. :)

    ReplyDelete
    Replies
    1. रोहन :)
      बरंय भाऊ... मी ढकलल्यावर पडणार्‍यांपैकी होतो :D

      Delete
    2. आणि मी ढकलणारा... हे माझ्या ब्लॉग वरच्या लेखावरून लक्षात आलं असेलच..

      Delete
  26. झकास...!!
    डोक्यात येणाऱ्या भावना मुद्देसूदपणे आणि सडेतोडपणे लोकांपर्यंत पोहोचवता येणं ही अर्थात लेखन-कला आहे आणि ते परफेक्ट जमलंय...ब्लॉग्स हा प्रकार मला खूप आधी माहित होता, नियमित लिखाण मी खूप अलीकडे सुरु केलं. पण सुरु केलं ते चुकलं का काय असा फील आला होता गेले काही दिवस. पण या पोस्टने उत्साह वाढवला.
    प्रत्येक ब्लॉगमधून अर्थपूर्ण, गहन काही शोधण्याचा अट्टाहास चुकीचाच आहे!

    पण बाबा, इतका तंत्रशुद्ध मराठीतला, मगदूरपूर्ण ब्लॉग लिहून फालतू टीकाकारांच्याच अपेक्षा वाढवताय आपण..:P

    ReplyDelete
    Replies
    1. चैतन्य,
      तुमचा उत्साह वाढला ह्यातच सर्व आलं. ब्लॉग म्हणजे आपलं व्यक्त होण्याचं माध्यम आहे त्यामुळे त्याचा आनंद घेणं सर्वांत महत्वाचं!
      खूप धन्यवाद! :)

      Delete
  27. ( Forgive me for using English, but I don't know how to write comment using Marathi (Devnagari) fonts)

    I think, blogging lies midway between someone's diary and 'writing' (writing means literary expression). And critics, or whomsoever who try to look at blogging seems to be using wrong yardsticks. I am not talking just about set of people who are critical of Marathi bloggers, but also of those who are happy about it. There are no yardsticks about blogging, except it is likable or not. It is like a song that one sings for one's own joy and others listen to it, somehow randomly.
    The limitations, writing or expression in any language will have are limitations of people who speak, use and live that language. And limitations are not weaknesses, they are strengths too.
    There is one fact about English blogging, which my one journalist friend pointed out to me, is there are more bloggers than serious readers. Its because of the freedom the medium gives.
    The interesting thing to see will be whether blogging will lead to some serious 'writing' in Marathi. Here I mean fictions or work of arts. I hope you understand that it will be really adventurous to call blogging as an art. It is honest, beautiful expression, but I think, it takes more to have form of art. Blogging is bringing unafraid originality and I wish that it will be reflected in writing, provided bloggers will be able to transcend to the next level.
    Thanks for thought-provoking post and forgive me for long, philosophical comment, which might be wrong.

    ReplyDelete
    Replies
    1. Encounters with Reality,
      >>set of people who are critical of Marathi bloggers, but also of those who are happy about it.
      अतिशय सहमत. फक्त हॅपीऐवजी समाधानी असं म्हणेन मी. कारण कुठल्याही अभिव्यक्तीमाध्यमामध्ये परिपूर्णता कधीच येत नसते. त्यामुळे कायम पुढच्या दिशेकडेच किमान पाहत तरी राहिलंच पाहिजे.
      'सिरियस रीडर्स' च्या बाबत म्हणाल तर बर्‍याच अंशी मलाही ते पटतं. चुकीची असली तरी एक ऍनालॉजी देईन, ट्वेंटी ट्वेंटी खेळात जसं बॅट्समन बनण्यात जास्त मजा असते, तशीच काहीशी कथा ह्या माध्यमातल्या स्वातंत्र्यामुळे असू शकेल.
      आणि मी ब्लॉगिंगला अनेक कलांची एकत्रित अभिव्यक्ती करण्याची कला म्हणेन. कारण ह्यात प्राचीन लेखनकलेसोबतच बरेचदा छायाचित्रण, ध्वनीमुद्रण, चलचित्रण आणि ह्या सर्वांची योग्य सजावट इतक्या सार्‍या कलांचा संगम अनेक ठिकाणी होताना दिसतो. पण शेवटी प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतोच.
      तुमच्या लिहिलेल्या जवळपास सर्वच वाक्यांशी मी सहमत आहेच, पण This takes the cake..
      >>The limitations, writing or expression in any language will have are limitations of people who speak, use and live that language. And limitations are not weaknesses, they are strengths too.
      मुद्देसूद आणि वैचारिक कॉमेंटकरता मनापासून धन्यवाद!

      Delete
  28. संयम राखून कसे खेळायचे(लिहायचे) हे द्रविडकडून शिकलास बरे...कुठेच आरडाओरडा नाही की बोंबा नाही...जे काही आहे ते स्पष्ट आणि शांतपणे मांडलेस...बाबा की जय हो! ब्लॉगिंगचा विजय असो !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सागर! :)

      Delete
  29. खूपच योग्य, सडेतोड आणि तरीही संयत लिहिलंय विद्याधर! खूपच आवडलं! शिर्षक आवडलंच. परिपूर्ण पोस्ट वाटली. आपल्यापैकी कुणी असं लिहायला हवंच होतं. महेंद्रजींनी म्हटल्याप्रमाणे मनातलं लिहिलंय! मस्त! अभिमान वाटला! आभार! शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. विनायकजी,
      खूप खूप धन्यवाद! :)

      Delete
  30. ब्लॉग हे माध्यम नवे असल्याने त्यावर वेळोवेळी रचनात्मक चर्चा होण्याचा फायदाच होईल आपल्याला.

    ReplyDelete
    Replies
    1. सविताताई,
      खरं आहे. जितकं वैचारिक अभिसरण होईल, तितकंच नवं काही गवसत जाईल, फक्त नकारात्मक विचार सोडायला हवेत. :)

      Delete
  31. पंत..च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक :) :)

    बादवे...सोपानला हे शालजोडीतले झेपणार का रे???

    ReplyDelete
    Replies
    1. हाहा योगेशा. तो एक प्रश्नच!

      Delete
  32. नमस्कार.

    आपला लेख आवडला. मस्त आहे.
    खरंतर कुणी काय लिहावं, कसं लिहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तीक विषय आहे. व्यक्त होणं हे आवश्यक आहे. ब्लॉगर आपल्या पद्धतीने व्यक्त होतात.एकदा व्यक्त होणं जमलं की हळूहळू त्यांच्यात आपोआप सुधारणा होईलच. ते पण लिहीता लिहीता शिकत असणारच की. उगाच शुध्दलेखन, परिच्छेद यांचा बाऊ करण्यात अर्थ नाही.
    ब्लॉग लेखकांनी असल्या टिकेकडे लक्ष न देता आपलं लेखन चालू ठेवावं. आपला लेख छान आहे. फक्त टिकाकार या अभ्यासपूर्ण लेखावरही टिका करणारच. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच चांगलं. नाही का?
    - विवेक वाटवे

    संकल्पसूची.ब्लॉगस्पॉट.इन

    ReplyDelete
    Replies
    1. विवेक,
      नमस्कार. अनाठायी अन टीकेसाठी केलेल्या टीकेकडे दुर्लक्षच केलेलं चांगलं असतं. पण जेव्हा मोठ्या व्यासपीठावरून अशी टीका होते अन त्याचं लोण पसरेलसं वाटू लागतं, तेव्हा थोडीफार दखल घेऊन, थोडंफार आत्मपरीक्षण आणि बरंचसं स्पष्टीकरण करावंसं वाटतं.
      खूप धन्यवाद!

      Delete
  33. ह्या सार्‍या गदारोळात संयत, नेटका लेख पाहून बरं वाटलं. पाचही मुद्द्यांशी पूर्ण सहमत.

    ReplyDelete
    Replies
    1. नंदन,
      खूप खूप धन्यवाद!

      Delete
  34. खूप छान लेख...हेरंबच्या दोन्ही प्रतिक्रियांना पूर्ण अनुमोदन......
    या विषयावर इतकं सुसंबद्ध लिहिल्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन......:)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्स अपर्णा. आपलाही खारीचा वाटा :)

      Delete
  35. he patal buwa ki jar web blog ek mukt aakasshach ahe vichar mandnyasathi tar ugach nako ti valay ka nirman karaychi sherebajine......

    ReplyDelete