2/06/2011

काऊन्सिलिंग

..असं झालं रे
म्हणून त्यानं बोलणं संपवलं
नजर वर करून माझ्या डोळ्यात
उत्तर शोधायला बघितलं
मी शांतपणे ग्लासातून
अजून एक घोट घेतला
अन फक्त त्याच्या खांद्यावर
दोन क्षण हात ठेवला
हसू त्याच्या चेहर्‍यावर
जणू सहजच उमललं
काऊन्सिलिंगचं गमक मला
अचानकच उमगलं
रोजच्या रोज आता
नवीन लोकं भेटू लागले
मी घोट घेता घेता
उसासे सोडू लागले
माझे कान ऐकोत न ऐकोत
हात खांद्यावर पडत होता
उत्तरं नको होती कुणाला
असण्यानंच फरक पडत होता
एक हात खांद्यावर होता
अन दुसरा कायम ग्लासावर
पण त्याच्या असण्याचा कधी
प्रभाव नसावा माझ्यावर
आज मात्र भलतंच माझं
मन खायला उठलंय
पण माझं काऊन्सलिंग करायला
कुणाला काय पडलंय
आणि लक्ष गेलं माझं
फडताळावर तो बसला होता
नक्की आठवत नाही आत्ता
पण माझ्याकडे पाहून हसला होता
..असं झालं रे
म्हणून मी बोलणं संपवलं
नजर वर करून त्याच्याकडे
उत्तर शोधायला बघितलं
तो स्थितप्रज्ञासारखा टेबलावर
समाधीस्थ बसला होता
काऊन्सिलिंगचा खरा मानकरी
बहुतेक कायम तोच होता!

25 comments:

  1. Good one...I could relate it to myself... I have been there... I know what you mean... :)

    Keep it up!

    ReplyDelete
  2. मला कळत नाहीये...हे वाचून मला रडू येतंय कि हसू!

    ReplyDelete
  3. श्रद्धाताई,
    थँक्स! :)

    ReplyDelete
  4. अनघाताई,
    मला लिहून देखील कळत नाहीये! :-/

    ReplyDelete
  5. बाबा, सुरेख... भापो. !

    ReplyDelete
  6. हो.. चांगल्याच भापो!

    ReplyDelete
  7. हेरंबा,
    :)

    ReplyDelete
  8. Anonymous8:20 PM

    बाबा आधि वाचले तेव्हा काहीच समजले नव्हते.... :( ....

    मग पुन्हा वाचले तेव्हा कुठे जरा कुछ समझ्या :).. मग जे समजले ते आवडले :)

    ReplyDelete
  9. ताई,
    अगं मला वाटलंच होतं की हे अवघड आहे..कारण मला जसं वाटत होतं, तसं बहुतेक मी उतरवू नाही शकलो.. हरकत नाही! :)

    ReplyDelete
  10. कोण कुणाच counseling करतय हा प्रश्नच .. म्हणजे खांद्यावर हात ठेवणारा, ऐकवणारा की तो स्थितप्रज्ञ? की कवी? की वाचक? गोंधळ झाला माझा नुसता :-)

    ReplyDelete
  11. छान! मला पूर्ण कळला नाही ’तो’! विचारात टाकलं आहे तुम्ही! कोड्यात टाकणं हा ही कवितेचा एक महत्वाचा विशेष असतो.तो गौतम बुद्ध आहे का?

    ReplyDelete
  12. सविताताई,
    तोच प्रश्न मला पडला...कुणी मनुष्य लोकांचं काऊन्सेलिंग करतो की प्रोसेसमध्ये त्याचंही काऊन्सिलिंग होतं कारण अस्सल कर्ताकरविता कुणी भलताच असतो! :)

    ReplyDelete
  13. सुषमेय,
    खूप धन्यवाद! :)

    ReplyDelete
  14. विनायकजी,
    सगळंच गुंतागुंतीचं झालं... काही अनुभव गेल्या काही दिवसांमधले..उतरले असेच! :)

    ReplyDelete
  15. विद्या, खरेच कोण कोणाचं काऊन्सिलिंग करतयं?? परिस्थिती व घटनेबरहुकुम हा प्रोसेस न संपणाराच आहे ना? चार पाच वेळा कालपासून वाचली. प्रत्येकवेळी ’ तो ’ वेगळाच अर्थ समोर आणतोय असे वाटत राहते.
    आवडेश. :)

    ReplyDelete
  16. श्रीताई,
    मला आधी वाटलेलं जे मी उतरवलंय ब्लॉगवर ते धड पोचेल की नाही...पण कमीतकमी भावना पोचतेय हे पाहून बरं वाटलं! :)

    ReplyDelete
  17. सागर,
    स्मायली चं उत्तर स्मायली! :)

    ReplyDelete
  18. हात ठेवायला खांदा दिसत नाहिये गड्या... एक व्हर्च्युअल हात खांद्यावर आहे असं समज.

    ReplyDelete
  19. सौरभ,
    धन्यवाद रे भावा...!! :)

    ReplyDelete
  20. BJP ...(भाजोपो)...विभि...प्रचंड आवडल....

    ReplyDelete
  21. Anonymous11:04 PM

    शेवटच्या त्याने गोंधळात टाकल बाकी भापो.... :)

    ReplyDelete
  22. देवेन,
    अरे शेवटचा 'तो' प्रत्येकाच्या समजण्यावर सोडून दिलाय मी! :)
    धन्स भाऊ!

    ReplyDelete
  23. योगेश,
    धन्यवाद रे भाऊ! :)

    ReplyDelete