१७ डिसेंबर, २०१० रोजी सिदी बुझिद शहरात मुहम्मद बुअज़िज़ी नामक फळविक्याची फळ विकायची गाडी एका पोलिस बाईनं अनधिकृत म्हणून उचलली. त्याच्यासाठी हे नवीन नव्हतं. संपूर्ण कुटुंबाचा एकमेव पालनहार असलेल्या त्याची गाडी ह्यापूर्वीही उचलून नेली गेली होती आणि भ्रष्टाचारानं पोखरलेल्या यंत्रणेनं काही रकमेची लाच घेऊन त्याची गाडी सोडली होती. त्या अनुभवाला अनुसरूनच त्यानं त्या पोलिसबाईला पैसे द्यायचा प्रयत्न केला. पण त्या पोलिस बाईनं त्याचा सर्वांसमक्ष इतका अपमान केला की त्याला जिणं मुष्किल होऊन गेलं. तो अपमानित अवस्थेतच स्थानिक महापालिका कार्यालयात गेला, पण तिथेही त्याची कुणी दाद लावून घेतली नाही. अपमानानं जळत राहण्यापेक्षा त्यानं पोलिस चौकीसमोर प्रत्यक्ष आगीमध्ये जळून जाऊन मरणं पसंत केलं. आणि आत्मदाह करून घेतला. पण तो जागच्या जागी गेला नाही. तो इस्पितळात दाखल केला गेला.
पण त्याच्या ह्या व्यथेविरूद्ध स्थानिक नागरिकांनी सर्वप्रथम आवाज उठवला, पोलिसांनी दंडुकेशाही करण्याचा वापर केला. त्यामुळे अजून निदर्शनं झाली. सोशल नेटवर्क्सवरून बरीच चर्चा होऊन मुहम्मद बेकारीनं अन गरिबीनं त्रस्त ट्युनिशियन तरूणाईचा एक प्रतिनिधी बनला आणि लोकमत त्याच्या बाजूनं संघटित होऊ लागलं. विविध पातळ्यांवरून आवाज उठू लागला. घडत असलेल्या घटनांनी उशीराच का होईना, राष्ट्राध्यक्ष बेन अलीला जाग आली आणि त्याने इस्पितळात जाऊन त्याची भेट घेतली. आश्वासनं दिली (काही साम्य दिसतंय का आपल्याकडे?) आणि भेटीचे फोटो पेपरांमध्ये छापून आले. पण आग लागलेली होती आणि ती एव्हढ्या तेव्हढ्यानं विझण्यालायक राहिली नव्हती. ती शासनव्यवस्थेचा बळी घेऊनच शांत होणार होती. लढा सुरू असतानाच ४ जानेवारी, २०११ ला मुहम्मदचा मृत्यूही झाला. पण त्याचं बलिदान वाया गेलं नाही. त्याच्या शरीरावर पेटलेल्या आगीनं त्याच्याच देशातल्या भ्रष्ट शासनयंत्रणेचाही घास घेऊनच दम घेतला.
राष्ट्राध्यक्ष बेन अलीची मालमत्ता मोजण्याच्याही पलिकडे होती. त्याची द्वितीय पत्नी असलेली लैला बेन अली ही विविध सामाजिक कार्य करीत असल्याचे डंके पिटले जायचे. तीच बाई सत्ता जाणार असे दिसताच सर्वप्रथम ट्युनिशियाच्या राष्ट्रीय बँकेत जाऊन दीड टन सोनं आणि बरीच रक्कम काढून घेऊन देशाबाहेर पळाली. स्विस बँकेनं दांभिकपणे तिची लाखो डॉलर्स असलेली खाती गोठवत असल्याची घोषणा केली. बेन अलीचे अन तिचे कित्येक नातेवाईक, जे सरकारच्या विविध पदांवर बसून मलिदा खात होते, ते मिळेल ती रक्कम घेऊन देशाबाहेर पळण्याच्या प्रयत्नाला लागले. देशाचं सैन्य एव्हाना पलटून नागरिकांच्या बाजूनं झालेलं होतं, त्यामुळे काहीजण पळताना पकडलेही गेले अन काहीजण पळण्यात यशस्वी झाले. ट्युनिशियामध्ये बरेच खटले भरले गेले आहेत.
राष्ट्राध्यक्ष अन त्याची बायको सर्वप्रथम फ्रान्समध्ये आश्रयास गेले. ट्युनिशिया ही फ्रान्सची एकेकाळी वसाहत होती, त्यामुळे इतर पूर्व-फ्रेंच वसाहतींप्रमाणे इथल्या राजकारणातही फ्रान्सचा अप्रत्यक्ष सहभाग होताच. पण आता जगासमोर बेन अलीला आश्रय देणं प्रतिमा डागाळून घेण्यासारखं असल्यामुळे फ्रान्सनं हात झटकले. पण पॅन-इस्लामिझमचं नाव घेत सौदी अरेबियानं मात्र बेन अलीला आश्रय दिला, बेन अलीच्या सर्व करामती जगासमोर असतानादेखील!
सध्या ट्युनिशियात अराजकसदृश स्थिती आहे. बेन अली गेला, पण आता काय? हा प्रश्न लोकांसमोर आहे. बरेच लोक सीमा ओलांडून देशाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेकांनीतर भूमध्य समुद्र ओलांडून इटलीमार्गे युरोपात प्रवेश करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड. आग नेहमीच लावायला सोपी असते, पण तिच्यावर नियंत्रण मिळवलं तरच ती उपयुक्त ठरते, नाहीतर लावणार्यासकट सर्वांनाच स्वाहा करू शकते. त्यामुळे सध्या ट्युनिशियन लोकांनी एकत्र राहणं अन त्यांच्यातून योग्य अन समर्थ नेतृत्व पुढे येणं फारच आवश्यक आहे. तिथे सध्या विरोधक आणि बेन अलीचेच काही बंडखोर अनुयायी ह्यांचं काळजीवाहू सरकार आहे. त्यामधल्या पाच मंत्र्यांनी काही दिवसांतच अंतर्गत बाबींमुळे राजीनामा दिला. मग लोकांनी पुन्हा निदर्शनं केली आणि बेन अलीच्या सर्व लोकांना हाकलायला लावलं. तरीही पंतप्रधान अजूनही जुनाच आहे. ६० दिवसांमध्ये निवडणुका होण्याची घोषणा झालेली आहे. आता आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव ठेवून लवकरात लवकर निवडणुका करवून घ्यायला हव्यात. पण आंतरराष्ट्रीय समुदाय म्हणजे अमेरिका अन युरोप, जे स्वतःच्या हितसंबंधांपलीकडे काहीही पाहत नाहीत. पण सध्या ह्या गोंधळामुळे त्यांच्याकडेच निर्वासितांचे लोंढे येण्याच्या शक्यता असल्यानं, तेही चांगल्यासाठीच प्रयत्न करण्याच्या शक्यता दिसताहेत. एकंदरच परिस्थिती ट्युनिशियाच्या बाजूनं आहे, पण त्यांना त्यादिशेनं पावलं टाकणं आवश्यक आहे.
ही फळविक्यानं लावलेली आग क्षणभर दम घेण्यासाठी थांबल्यागत झाली, पण तिनं ट्युनिशियाच्या सीमा ओलांडल्या अन नव्या दमानं जोर वाढवायला तिनं सुरूवात केली. आता तिला मिळणार्या समिधाही वाढल्या होत्या. मशालीप्रमाणे ती एका हातातून दुसर्या हातामध्ये पसरू लागली. फळविक्यानं पेटवलेली ही आग एका सॉफ्टवेअर इंजिनियरनं मशाल बनून इजिप्तमध्ये कशी भडकवली ते उद्या.
मस्तच.. तुझा या विषयावर लेख येईल याची खात्री होतीच...
ReplyDeleteवेटिंग फॉर इजिप्त पोस्ट
कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड.
ReplyDeleteअगदी अगदी!
दीड टन सोनं??? बापरे! :( किती जमवायच्ं काही सुमार?? कमालच म्हणायची.
उद्याचा इंतजार...
मी कधीची वाट बघते होते ह्या तुझ्या पोस्टची! :)
ReplyDelete<<सध्या ट्युनिशियात अराजकसदृश स्थिती आहे. बेन अली गेला, पण आता काय? हा प्रश्न लोकांसमोर आहे. बरेच लोक सीमा ओलांडून देशाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेकांनीतर भूमध्य समुद्र ओलांडून इटलीमार्गे युरोपात प्रवेश करण्याचा प्रयत्न चालवला आहे...
हे होणारच होतं..नाही का? लवकर स्थैर्य लाभो तेथील लोकांना!
Chhan - waiting for Egypt :)
ReplyDeleteकुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड.
ReplyDelete+ 1
वणवा पेटला आहे...
>>>कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड.
ReplyDelete+ 100
बाबा, व्यवस्थित मांडले आहेस विचार... पुढच्या पोस्टची वाट पहातेय..
पोस्ट वाचताना का माहित नाही पण तुझं वाक्य सतत मनात घोळत होत्म, "ताई तुझ्याकडे ठीक आहे ना सगळं ?? " विचारणारं... :)
वाह एकदम मस्त पोस्ट....
ReplyDeleteतिथे क्रांती घडली त्यात महत्त्वाच होत की लोक एकत्र राहीले शेवटपर्यंत, कुणीही मागे हटल नाही ... हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम :)
कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड. +1
कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड. +1
ReplyDeleteअतिशय मस्त्...पुढच्या पोस्ट्ची आतुरतेने वाट पाहत आहे...
>>>कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड.++ रजनिकांत
ReplyDeleteएक जुनी घटना आठवली, एका काळ्या भारतीय माणसाला पहिल्या वर्गाचे तिकीट अ्सतांनादेखील ट्रेनमधून बाहेर काढले होते, क्रांतीची मशाल पेटली..
अरेच्या, अजून एक घटना आठवली , एका १५ वर्षाच्या आफ़्रिकन अमेरिकन काळ्या गर्भवती मुलीने बसमधील आपली सीट एका गोर्या माणसाला द्यायचे नाकारले ,क्रांतीची मशाल पेटली...
लोकांच्या मनात ज्वनशील पदार्थ खदखदत असतो, फ़क्त एक ठिणगी हवी असते पेटायला....
पुढील पोस्टची वाट पाहतो आहे...ही पोस्ट उत्तमच आहे.
ReplyDeleteजगाची काही माहिती घ्यायची राहिली असेल तर नक्कीच तुझा ब्लॉग वाचवा.
ReplyDeleteसुंदर लिहितोस
वांझोटी क्रांती.
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteअरे डोक्यातून एकतर सहजासहजी जात नाही आणि रोज बीबीसी, सीएनएन आणि अलजज़ीरा बघून ते अजून अजून पक्कं होत जातं! :)
श्रीताई,
ReplyDeleteदीड टन वाचून मीपण क्षणभर हादरलो. इकडे आयुष्यभर राब राब राबून ह्याच्या शतांशही कमाई होत नाही! :(
क्रांती घडली ह्यात नवल नाही!
अनघाताई,
ReplyDeleteहो ना.. गोंधळ वाढतच जाणार आहे. आफ्रिकेचा पूर्ण उत्तर किनारा ढवळून निघतोय. सगळं लवकरात लवकर स्थिरस्थावर होवो, हीच सदिच्छा! :)
आदित्य,
ReplyDeleteधन्यवाद भाऊ.. इजिप्तवर थोडं अधिकच होणार आहे! :)
राज,
ReplyDeleteहोय रे... वणवा पेटलाय खरा... आता किती किती अन काय काय भक्ष्यस्थानी पडणार ते पाहायचं!
तन्वीताई,
ReplyDeleteतिथे सगळीकडेच अगदी बहारिनपर्यंतही अनपेक्षितपणे हे लोण पोचू लागल्यावर मी थोडा विचारात पडलो! :)
सुहास,
ReplyDeleteहोय रे.. लोकांची एकजूट नेहमीच जगातल्या कुठल्याही शासनव्यवस्थेला भारी पडू शकते :)
सारिका,
ReplyDeleteधन्यवाद! लवकरच टाकतोय पुढची पोस्ट! :)
संकेतानंद,
ReplyDeleteअरे बर्याचदा असं घडतं. आपल्यातल्या 'त्या' एका गोष्टीची जाणीव होणंच फक्त पुरेसं असतं. पुढलं सगळं घडतंच!
धन्यवाद रे भावा :)
योगेश,
ReplyDeleteपुढच्या पोस्टचा विषय तुला थोडा जवळचा वाटेल कारण तू कैरोत होतास :)
लवकरच टाकतोय!
आशीष,
ReplyDeleteखूप खूप आभार! अशाच प्रोत्साहनामुळे लिहितोय :)
शरयू,
ReplyDeleteतुमच्या प्रतिक्रिया नेहमीच मला कोड्यात टाकतात! :)
अनेक आभार!
मस्त!
ReplyDeleteआणि दीड टन सोनं??? बापरे!
मीनल,
ReplyDeleteहो ना... दीड टन!! :D