1/26/2011

काही (फुटकळ) चारोळ्या

(माथाटीप - सर्वांच्या वतीने 'आवरा' मी आधीच म्हणून घेतोय स्वतःला, पुनरुक्ति टाळावी :D )

कधीतरी शांतपणे चालताना विचित्र जाणीव होते
काहीतरी मागे सुटून गेलं अन नकळत वाट वळते
नव्या नवख्या वाटेवरती नवलाईच्या सोबतच
सुटून गेलेल्या कसलीतरी रूखरूख लागून राहते

----

ऋतू तो पानगळीचा जरी ओरबाडून गेला
दिसण्यास तो जरीही सर्वस्व घेऊनी गेला
तरी अंतरी अजूनी तो ध्येयाग्नी आहे
मी वृक्ष कालही होतो मी वृक्ष आजही आहे

----

लाटांच्या आधाराने समुद्र लाथाडीत होतो
क्षितिजाच्या नजरेने सूर्य बुडवीत होतो
बुडता बुडताही तो फिस्सकन हसला
अन कल्पनेचा प्रयत्न कल्पनेतही फसला

----

उदास संध्याकाळी एकट्या वाटसरूला
ना चालण्यात मर्जी ना थांबण्यात अर्थ
दूर थांबलेले पैलतीर ते खुणावे
जड संथ पावले पण सावलीत गर्क

----

वेडा म्हणून कोणी मला एकदा हाक मारली
मी नजर वर करून भुवई वर केली
दोन क्षण नजरानजर झाली अन
'हाक मी नाही मारली' म्हणत प्रतिबिंबानंच नजर खाली केली

----

दिसतोस उंच शांत ऐटीत डोलताना
स्वातंत्र्यदिन कधी अन गणतंत्रदिनही आहे
मज पामरास किंतु अप्रूप काय त्याचे
भाकरीच्या चंद्रकळांना मी ओळखून आहे!

----

33 comments:

  1. जबरा.. शेवटच्या दोन जास्त आवडल्या.. शेवटचीने सुर्व्यांच्या 'भाकरीचा चंद्र' ची आठवण झाली.. मस्तच.

    ReplyDelete
  2. "लाटांच्या आधाराने..." आवडली नि भाकरीच्या चंद्रकळा पण!
    आवरा तू म्हणून घेतलंस स्वतःला पण आम्ही मात्र नाही म्हणणार!

    ReplyDelete
  3. आणि कविता करत रहा रे.
    तारे मिळवण्यासाठी उड्या मारल्यास जिवापाड तर किमान चंद्राला तरी गवसणी घालशील की :)

    ReplyDelete
  4. 'दोन क्षण नजरानजर झाली अन
    'हाक मी नाही मारली' म्हणत प्रतिबिंबानंच नजर खाली केली'

    खूप सुंदर! अशा अजून किती आहेत पोतडीत?? एकदम अभिमान वगैरे वाटला. :)

    ReplyDelete
  5. शेवटच्या चार खुप आवडल्या...मस्तच....

    ReplyDelete
  6. मज पामरास किंतु अप्रूप काय त्याचे
    भाकरीच्या चंद्रकळांना मी ओळखून आहे!
    =d> =d>...भारीच !!

    ReplyDelete
  7. बाबा , ये क्या हो रहा है ....

    बरा आहेस ना.

    >>बाकी चारोळ्या भारीच

    ReplyDelete
  8. मस्तच...आवडल्या चारोळ्या... :)

    ReplyDelete
  9. Anonymous8:19 PM

    फारच छान

    ReplyDelete
  10. बाबा, तू तर पेटला आहेस की रे! :) खूपच छान.

    ऋतू तो पानगळीचा जरी ओरबाडून गेला
    दिसण्यास तो जरीही सर्वस्व घेऊनी गेला
    तरी अंतरी अजूनी तो ध्येयाग्नी आहे
    मी वृक्ष कालही होतो मी वृक्ष आजही आहे

    ही खासच आहे. शेवटची ओळ सारे जीवन सांगून गेली.
    येऊ देत अजून... :)

    ReplyDelete
  11. ऋतू तो पानगळीचा जरी ओरबाडून गेला
    दिसण्यास तो जरीही सर्वस्व घेऊनी गेला
    तरी अंतरी अजूनी तो ध्येयाग्नी आहे
    मी वृक्ष कालही होतो मी वृक्ष आजही आहे..


    खतरनाक बाबा ! ! मस्तच !!
    अगदी मनाला भावल्या या ओळी!!

    ReplyDelete
  12. क्या बात है बाबा
    आवडल्या

    ReplyDelete
  13. भन्नाट...काही आवरा वगैरे नाही हा..
    येऊ देत अजून...

    ReplyDelete
  14. Anonymous11:11 PM

    क्या बात है... आवरा वगैरे काहिही नाहिये... उलट या काव्य-चारोळ्या प्रतिभेला आवरू नकोस... :)

    >>ऋतू तो पानगळीचा जरी ओरबाडून गेला
    दिसण्यास तो जरीही सर्वस्व घेऊनी गेला
    तरी अंतरी अजूनी तो ध्येयाग्नी आहे
    मी वृक्ष कालही होतो मी वृक्ष आजही आहे

    ही तर जाम आवडली मला...

    ReplyDelete
  15. 2011 dedicated to poems? Seems so :-)

    ReplyDelete
  16. वेडा आणि प्रतिबिंब सगळ्यात जास्त आवडली!

    ReplyDelete
  17. हेरंबा,
    :) सुर्व्यांची कविता ध्यानात आली नव्हती आधी... पण कुठेतरी बॅक ऑफ माईंड असणार नक्कीच!

    ReplyDelete
  18. ओंकार,
    धन्स रे...
    अन >>तारे मिळवण्यासाठी उड्या मारल्यास जिवापाड तर किमान चंद्राला तरी गवसणी घालशील की
    :) प्रयत्न चालूच आहेत सगळ्यांच्या मनाच्या मोठेपणामुळे!

    ReplyDelete
  19. अनघाताई,
    बिलीव्ह मी...मी काल दीड तास बसलो होतो एव्हढ्या सहांसाठी..
    कष्टकवी आहे मी...
    तुला अभिमान वाटला ह्याचा फार आनंद झाला... :)

    ReplyDelete
  20. योगेश,
    धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  21. माऊताई,
    :) :)

    ReplyDelete
  22. सचिन,
    धन्यवाद भावा!

    ReplyDelete
  23. सुहास,
    धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  24. साकेत,
    ब्लॉगवर स्वागत!
    प्रतिक्रियेसाठी आभार! असेच भेट देत राहा!

    ReplyDelete
  25. श्रीताई,
    :)
    ती सगळ्यांत फास्ट सुचलेली होती! :D

    ReplyDelete
  26. दीपक,
    लिहून झाल्यावर मलाही छान वाटल्या त्या ओळी वाचायला...कुणावरून तरी इन्स्पायर्ड असाव्यात बहुतेक! सबकॉन्शसली.. :)

    ReplyDelete
  27. सागर,
    धन्स भावा!!!

    ReplyDelete
  28. सागर कोकणे,
    आभार रे मित्रा!! :)

    ReplyDelete
  29. तन्वीताई,
    :)
    नाही आवरणार प्रतिभेला!! :D

    ReplyDelete
  30. सविताताई,
    :) काय ठाऊक! :D

    ReplyDelete
  31. विनायकजी,
    खूप आभार! :)

    ReplyDelete
  32. दुसरी आणि शेवटची खुप खास आहे. simply superb!!!

    ReplyDelete
  33. सौरभ,
    खूप धन्यवाद रे भावा!!! :)

    ReplyDelete