1/25/2011

झोल आहे

झोल आहे

कविता करायची आहे असं ठरवून
कागद पेन घेऊन बसणं फोल आहे
नेहमीच असं घडतं म्हणजे
आपल्याच अकलेत झोल आहे

फुका ट ला ट करण्यापेक्षा
अर्थवाही शब्दांना मोल आहे
पण तेदेखील जमण्याइतपत
आपली बुद्धि कुठे खोल आहे?

हल्ली जिकडे बघावं तिकडे
कसलं ना कसलं ओपिनियन पोल आहे
पण सत्तेच्या खुर्चीत सगळा प्रकार
होल ऍन्ड सोल आहे

आमची कविता म्हणजे
राष्ट्रकुलमधला ओव्हररेटेड टॉयलेट पेपर रोल आहे
अन कांदा महागल्यानं हुंगवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या
फाटक्या बुटाचा सोल आहे

एका कडव्यात तरी राजकीय भाष्य
हा कवीनं ठरवलेला गोल आहे
बाकी कविता म्हणजे कापला गेलेला
पतंग भरदोल आहे

स्वतःच्याच स्वतःबद्दलच्या गैरसमजांची
केलेली पोलखोल आहे
स्वतःलाच समजावण्याचा एक प्रयत्न की
"मित्रा, दुनिया गोल आहे"

स्वतःला कवि न समजण्याइतपत
समज माझी समतोल आहे
प्रतिभावंत हिर्‍यांच्या गर्दीत
मी आपला एक कोल आहे..

(टीप - उगाच काहीही)

31 comments:

  1. :O :O :O All Okay na vibhi????

    ReplyDelete
  2. लक्ष देऊन ऐक दोस्त
    हा फुटका बोल नाही (माझा)
    'उगाच काहीही' कविता करणे
    यात काही झोल नाही !!!

    (टीप - हेही उगाच काहीही)

    ;)

    ReplyDelete
  3. तुला सर्व जमतं रे.. उगाच कैच्याकै टीप टाकत जाऊ नको...
    आवडली मलातरी

    ReplyDelete
  4. Anonymous7:29 PM

    काव्य प्रसवच्या वेदणे नंतर, जे काही निर्माण झाले आहे ते खरोखर रत्न आहे, माझ्या काव्यरत्ना पेक्षा तर खूप भारी ( साईझ ने पण व आशयाने पण.

    ;)

    लिहते रहा.. !

    ReplyDelete
  5. टोल, डोल आणि लोल (LOL) राहिले की राव! :P
    lol!

    ReplyDelete
  6. हा हा ...लैई भारी भाई.
    एवढा मोठा झोल करू शकतोस मग त्या टीपा कशाला रे ...आवडली मला कविता :)

    ReplyDelete
  7. Anonymous9:46 PM

    आ--व---ड--ली--य प्र--चं--ड ....
    समजलं... उगा नसत्या तळटीपांना भुलायला आमच्या मेंदूत झोल नाही... :)

    ReplyDelete
  8. Anonymous9:58 PM

    वा! मस्तच! बरेच दिवसांनी तुमच्या ब्लॉग वर भेट देतोय.. बाकीच्या पोस्ट आता वाचून काढतो :)

    ReplyDelete
  9. कैच्याकै भारी झाल आहे...:)

    ReplyDelete
  10. पतंग भरदोल आहे...इथे मात्र झोल आहे.
    खरा शब्द आहे..भरदोर...भरपूर दोर....दोल नव्हे. ;)
    बाकी कविता मात्र गोलमटोल आहे...म्हणजे बांधेसूद आहे. :D

    ReplyDelete
  11. झोल आहे .. पण कुठे .. मला तरी कुठे दिसत नाहीये.. हाहाहा... बाकी कविता झोल(डौल)दार आहे..

    ReplyDelete
  12. जमतंय की...मस्त मस्त!

    ReplyDelete
  13. फर्स्ट क्लास झालेलं आहे! एकदम भारी! चिंता नसावी! :)

    ReplyDelete
  14. जमली जमली. :) आणि आवडलीही. झोल, पोल, गोल करता करता बरेच टोले हाणलेस की... सहीच!

    ReplyDelete
  15. माऊताई,
    :D

    ReplyDelete
  16. हेरंब,
    ब्लॉगिंग करत कविता पाडण्याला
    अजूनतरी कुठला टोल नाही
    कमेंटा वाचून एक बरं वाटलं
    की कुणाच्याही कमेटमध्ये LOL नाही! :D

    ReplyDelete
  17. आनंदराव,
    कसचं कसचं! :)

    ReplyDelete
  18. राज,
    अरे मी बरेचदा अशा आवरा कविता करतो... लोक अष्टपैलू लेखक असतात..मी कष्टपैलू सुद्धा नाहीय! :D

    ReplyDelete
  19. ओंकार,
    हेरंबला लिहिलेल्या प्रतिक्रियेत
    टोल आहे अन LOL आहे
    बाकी आत्ता सुचत नाही
    परिस्थिती डामा'डोल' आहे! ;)

    ReplyDelete
  20. सुहास,
    असे झोलच करायचे.. आपली स्पेशालिटी तीच :P
    धन्स भाऊ!

    ReplyDelete
  21. तन्वीताई,
    :) असंच आपलं कधीतरी...

    ReplyDelete
  22. निरंजन,
    मीदेखील मध्यंतरी गायबच होतो.. बरं वाटलं तुमची प्रतिक्रिया बर्‍याच दिवसांनी पाहून... :)
    धन्यवाद!

    ReplyDelete
  23. योगेश,
    धन्यवाद रे भावा!!!

    ReplyDelete
  24. देवकाका,
    अहो तोभारत,
    :) धन्यवाद भाऊ! लहानपणापासून ऐकलेला अपभ्रष्ट शब्द आहे... कायम तोच येणार तोंडात जरी खरा कळला तरी! :D

    ReplyDelete
  25. भारत,
    :) धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  26. सागर कोकणे,
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  27. अनघाताई,
    यह तो आपकी ज़र्रानवाज़ी है! :D

    ReplyDelete
  28. श्रीताई,
    :D
    ते टोले आपले लागले असेच झोल करता करता ;)

    ReplyDelete
  29. हेहेहे... जमलिये... वरच्या वर्गात गेलात राजे.

    ReplyDelete
  30. सौरभ,
    :) धन्यवाद मास्तर('कॉमेडी एक्सप्रेस' च्या बंडूच्या तालावर वाचावे) ;)

    ReplyDelete
  31. सुंदर मस्त

    ReplyDelete