1/27/2011

अनुवाद -१

ब्लॉगवर सगळे प्रकार हाताळून बघायचे असं सध्या डोक्यात चालू आहे. त्यामुळे आज फारसं काही सुचत नसल्याचा मुहूर्त साधून 'अनुवाद' हा प्रकार धरावा असं ठरवलंय. अनुक्रमांक अशासाठी, की पुन्हा कधी अशीच 'शून्य वैचारिक अवस्था' आली की अनुवादाचं शस्त्र काढायला बरं!

डॉ. व्हिक्टर फ्रँकल हा एक मानसशास्त्रज्ञ नाझींच्या ज्यू छळाच्या पर्वामध्ये छळछावणीमध्ये होता. ऑशविट्झ च्या कुप्रसिद्ध छळछावणीत जाऊनही जिवंत परत आलेल्यांपैकी हा एक. व्हिक्टर फ्रँकलनं ह्या छळादरम्यानदेखील स्वतःच्या अभ्यासामध्ये बरीच भर घातली. त्यानं तर बाहेर पडल्यानंतर आपल्या अनुभवांवरून मानसशास्त्रातल्या नवीन उपचारपद्धतीही शोधल्या. आपले छळछावणीतले अनुभव अन त्यावरून त्यानं बनवलेली उपचारपद्धती असं एक पुस्तक त्यानं लिहिलेलं आहे. अन ते जगभरात बरंच नावाजलंही गेलंय. 'मॅन'स सर्च फॉर मीनिंग' असं पुस्तकाचं नाव. मी ह्या पुस्तकाची-खासकरून 'छळछावणीतले अनुभव' ह्या भागाची पारायणं केलेली आहेत. त्यामुळे 'अनुवाद' ह्या प्रयोगाची सुरूवात ह्या पुस्तकातल्याच एका उतार्‍यापासून करतोय.

मूळ उतारा -

The prisoner who had lost faith in the future-his future-was doomed. With his loss of belief in the future, he also lost his spiritual hold; he let himself decline and became subject to mental and physical decay. Usually this happened quite suddenly, in the form of a crisis, the symptoms of which were familiar to the experienced camp inmate. We all feared this moment-not for ourselves, which would have been pointless, but for our friends. Usually it began with the prisoner refusing one morning to get dressed and wash or to go out on the parade grounds. No entreaties, no blows, no threats had any effect. He just lay there, hardly moving. If this crisis was brought about by an illness, he refused to be taken to the sick-bay or to do anything to help himself. He simply gave up. There he remained, lying in his own excreta, and nothing bothered him any more.
I once had a dramatic demonstration of the close link between the loss of faith in the future and this dangerous giving up. F---, my senior block warden, a fairly well-known composer and librettist, confided in me one day: "I would like to tell you something, Doctor. I have had a strange dream. A voice told me that I could wish for something, that I should only say what I wanted to know, and all my questions would be answered. What do you think I asked? That I would like to know when the war would be over for me. You know what I mean, Doctor-for me! I wanted to know when we, when our camp, would be liberated and our sufferings come to an end."
"And when did you have this dream?" I asked.
"In February, 1945," he answered. It was then the beginning of March.
"What did your dream voice answer?"
Furtively he whispered to me, "March thirtieth."
When F-- told me about his dream, he was still full of hope and convinced that the voice of his dream would be right. But as the promised day drew nearer, the war news which reached our camp made it appear very unlikely that we would be free on the promised date. On march twenty-ninth, F-- suddenly became ill and ran a high temperature. On March thirtieth, the day his prophecy had told him that the war and suffering would be over for him, he became delirious and lost consciousness. On March thirty-first, he was dead. To all outward appearances, he had died of typhus.

Those who know how close the connection is between the state of mind of a man-his courage and hope, or lack of them-and the state of immunity of his body will understand that the sudden loss of hope and courage can have a deadly effect. The ultimate cause of my friend's death was that the expected liberation did not come and he was severely disappointed. This suddenly lowered his body's resistance against the latent typhus infection. His faith in the future and his will to live had become paralysed and his body fell victim to illness-and thus the voice of his dream was right after all.

अनुवाद -

ज्या कैद्याचा स्वतःच्या भविष्यावरून विश्वास उडायचा, तो संपलाच होता. त्याचं आत्मिक भानही सुटायचं. तो स्वतःला कोसळू द्यायचा आणि मानसिक अन शारिरीक स्तरावर त्याची अधोगती सुरू व्हायची. हे सहसा अगदी अचानक घडायचं, एखाद्या समस्येच्या रूपात अन अनुभवी कैद्यांना लगेच ह्या लक्षणांचा अर्थ लागायचा. ह्या क्षणाची आम्हा सर्वांनाच भीती वाटायची, पण स्वतःसाठी नाही कारण त्याला अर्थ नव्हता, तर आमच्या मित्रांसाठी. सहसा ह्याची सुरूवात एखाद्या कैद्यानं एका सकाळी उठायला, आंघोळ करायला, अन कपडे घालून परेड ग्राऊंडवर जायला नकार देऊन व्हायची. कुठल्याही प्रकारच्या विनवण्या, लाथा-बुक्के अन धमक्यांचा कसलाही परिणाम नाही. तो तसाच तिथे पडून राहायचा अगदी निश्चल. जर ही समस्या एखाद्या आजारपणामुळे निर्माण झालेली असेल तर तो स्वतःला आजारी कैद्यांच्या राखीव जागेत न्यायला नकार द्यायचा किंवा स्वतःसाठी काहीच न करता निश्चल पडून राहायचा. त्यानं आशा सोडून दिलेली असायची. तिथेच स्वतःच्याच मलमूत्रात पडलेल्या त्याला आता कशानंच काही फरक पडणार नसायचा.
एकदा मला भविष्यावरून उडालेला विश्वास अन ह्या भयंकर अशा परमोच्च नैराश्याच्या अवस्थेतील जवळच्या संबंधाचा मोठा नाट्यपूर्ण अनुभव आला. क्ष, माझा सिनियर ब्लॉक वॉर्डन, एक बर्‍यापैकी प्रसिद्ध संगीतकार जो ओपेराच्याही रचना लिहायचा, एक दिवस मला विश्वासात घेऊन सांगू लागला, "मला तुला काहीतरी सांगायचंय, डॉक्टर. मला एक विचित्र स्वप्न पडलं. एक आवाज मला म्हणाला की इच्छा असेल त्याप्रमाणे मी मला काही जाणून घ्यायचं असल्यास विचारू शकतो, आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुला काय वाटतं, मी काय विचारलं? की मला हे जाणून घ्यायचंय की माझ्यासाठी हे युद्ध केव्हा संपेल. तुला कळलं डॉक्टर, मला काय म्हणायचंय - माझ्यासाठी! मला जाणून घ्यायचं होतं की केव्हा आपण, आपला कॅम्प मुक्त होईल आणि आपल्या वाटचे भोग संपतील."
"आणि हे स्वप्न तुला केव्हा पडलं?" मी विचारलं.
"फेब्रुवारी १९४५ मध्ये." तो म्हणाला. तेव्हा मार्चची सुरूवात नुकतीच होत होती.
"अन तुझ्या स्वप्नातल्या आवाजानं काय उत्तर दिलं?"
तो हळूच माझ्या कानात म्हणाला, "तीस मार्च."
जेव्हा क्ष नं मला त्याच्या ह्या स्वनाबद्दल सांगितलं, तेव्हा तो प्रचंड आशावादी होता अन त्याला पूर्ण विश्वास होता की त्याच्या स्वप्नातला आवाज बरोबर बोलतोय. पण जसजसा सांगितलेला दिवस जवळ येत गेला, आमच्या कॅम्पवर येणार्‍या युद्धाच्या बातम्यांवरून हे स्पष्ट होत गेलं की सांगितलेल्या दिवशी आमचं मुक्त होणं अशक्यप्राय होतं. एकोणतीस मार्चला क्ष आजारी पडला अन तापाने फणफणला. अन त्याच्या भाकिताप्रमाणे युद्ध अन भोगांपासून त्याच्या मुक्तीसाठी ठरलेल्या दिवशी म्हणजे तीस मार्चला तो भ्रमिष्ट झाला अन त्याची शुद्ध हरपली. एकतीस मार्चला, तो गेला. तसं तिर्‍हाईतासाठी, लक्षणांवरून त्याचा मृत्यू टायफसमुळे झाला होता.

ज्यांना माणसाची मानसिक अवस्था (धैर्य अन आशा किंवा निराशा) अन शरीराची रोगप्रतिकारकशक्ती ह्यांच्यातल्या जवळच्या संबंधाची कल्पना आहे त्यांच्या लक्षात येईल की, अचानक गमावलेलं धैर्य किंवा नैराश्याचा झटका भयंकर परिणामांना कारणीभूत ठरू शकतो. माझ्या मित्राच्या मृत्यूचं अस्सल कारण हे होतं की अपेक्षित मुक्ती आलीच नाही अन त्याचा प्रचंड भ्रमनिरास झाला. ह्या घटनेमुळे त्याच्या शरीराचा सुप्त रूपातल्या टायफसच्या संसर्गाविरूद्धचा प्रतिकार एकदम कमी झाला. त्याचा स्वतःच्या भविष्यावरचा विश्वास उडाला अन त्याची जगण्याची इच्छाच लोप पावली आणि त्याचं शरीर आजारपणाला बळी पडलं - अन त्याअर्थी त्याच्या स्वप्नातला आवाज खरा झाला.

ह्या पुस्तकाची विकिपीडिया लिंक.

16 comments:

  1. सही सही बाबा.. मस्त चाललेत 'माझे ब्लॉग(वर)चे प्रयोग' :)

    हेही आवडलं.

    ReplyDelete
  2. वाह बाबा...पेटलायस एकदम :)
    मस्त झालाय अनुवाद :)

    ReplyDelete
  3. बाबा हा प्रकार पचंड सही आहे रे.
    मी पुढल्या पोस्ट ची आतुरतेने वाट बघतोय

    ReplyDelete
  4. Anonymous3:13 AM

    बरोबर हेरंबा, मस्त चाललेत याचे ’पोस्टांचे प्रयोग’ :)
    दरवेळेस नवा पदार्थ येतोय आणि चवही अप्रतिम :)

    बाबा अनूवाद सुंदर जमलाय...

    ReplyDelete
  5. माणसाचे मन काय खेळ करेल हे कोणीही सांगू शकत नाही. जसे शरीराच्या इतर अवयवांकडे नियमित लक्ष द्यावे लागते तसेच किंवा त्याहूनही अधिक जागरूकतेने आपल्याला आपल्या मनाची निगराणी करावयास हवी.

    मला खूप आवडला हा तुझा उपक्रम. आणि मला वाटतं कि हा उपक्रम चालवण्याकरता जी आवश्यक आहे ती क्षमता तू नक्कीच बाळगतोस.
    Proud of you! :)

    पण मध्ये खूप दरी ठेवू नका! पटापट लिहा! :)

    ReplyDelete
  6. बाबा...सध्या चांगलाच सुटला आहेस...हे पण आवडल :)

    ReplyDelete
  7. हेरंबा,
    हेहेहे 'माझे ब्लॉग(वर)चे प्रयोग' हे कुठल्यातरी गृहस्थाच्या गाजलेल्या पुस्तकासारखं नाव आहे नाही! ;)

    ReplyDelete
  8. सुहास,
    खूप धन्यवाद भाई! हौसला अफज़ाई की जरूरत थी! :)

    ReplyDelete
  9. अमित,
    ब्लॉगवर स्वागत! आणि प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!
    भेट देत राहा! :)

    ReplyDelete
  10. सागर,
    धन्यवाद रे भाऊ! करेन लवकरच पुन्हा प्रयत्न!

    ReplyDelete
  11. तन्वीताई,
    अगदी सुरूवातीला इथे आल्यावर एकटा जेवण बनवू लागलो होतो तेव्हाची आठवण आली एकदम! :)

    ReplyDelete
  12. अनघाताई,
    खरंच..मनाची निगराणी अन त्यावरचं थोडंफार नियंत्रण फारच गरजेचं असतं. मी नाझी छळछावणीवर बरंच वाचलंय, पण ह्याचा दृष्टिकोन एका मानसोपचारतज्ज्ञाचा असल्यानं वेगळा आणि फारच परिणामकारक वाटतो.
    आणि माझीही इच्छा आहे अजून बरंच करायची, पाहू कसं जमतंय ते!
    खूप छान वाटलं तुझी प्रतिक्रिया वाचून! :)

    ReplyDelete
  13. योगेश,
    मुंबईस्नं आल्यापासून माझ्याकडे पाहून सगळेच 'सुटलायस, सुटलायस' असं म्हणतायत! :D
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  14. अनुवाद सक्षम झालाय बाबा. आवडला. येऊ देत अजून. :)

    नेमका तू हाच उतारा निवडलास? काही हलकेफुलके, सरधोपट नाही... कसे परिणाम असतात ना आपल्या मनावर. जे आपण फक्त ऐकलेय, वाचलेय... आणि तरीही ते आपल्या मनाला फार फार लागून राहिलेय. कोणी असे कसे वागू शकतो? का? का?

    ReplyDelete
  15. श्रीताई,
    खरंच... कुरतडत राहतात आतून काही गोष्टी...तसंच आहे!! :-|

    ReplyDelete