1/30/2011

३० जानेवारी

३० जानेवारी हा दिवस भारतामध्ये मो.क. गांधींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो. ह्याच दिवशी नथुराम गोडसेंनी गांधींचा गोळ्या घालून वध/खून केला (ज्याला जे हवे ते घ्यावे, मूळ मुद्दा हा नाही). आणि भारताच्या इतिहासातला एक अध्याय संपला. पण एका अपमानित व्यक्तिनं जागृत होऊन अन्याय्य शक्तिंविरूद्ध एक अख्खं राष्ट्र जागं करण्याची जगातल्या इतिहासातली पहिलीच वेळ असावी. राष्ट्रीय चळवळ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचं श्रेय अवश्य गांधींना जातं. पण जसजसे दिवस उलटत गेले तसतसे गांधी दुराग्रही अन हट्टी होत गेले. आणि मग हळूहळू व्यक्ति राष्ट्रापेक्षा मोठी होत गेली. जेव्हा असं घडतं तेव्हा राष्ट्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसानच होतं आणि तसंच ते होऊही लागलं होतं. आणि पुढे अजूनही मोठ्या प्रमाणावर होण्याच्या शक्यता होत्या.
अशा वेळी नथुरामनी घाई केली की उतावीळपणा केला की शांतपणे निर्णय घेतला हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या मते देशाचं नुकसान थांबवण्याचा एकच मार्ग होता आणि त्यांनी तो अनुसरला. त्यासाठी होणार असलेलं यथोचित शासनही स्वीकारण्याची पूर्ण तयारी करूनच त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. तो निर्णय चुकीचा की बरोबर किंवा नथुराम माथेफिरू की हुशार हे महत्वाचं नाही. पण नथुरामच्या कृतीचे किती विचित्र परिणाम घडले ते महत्वाचं.
नथुरामच्या कृतीनं गांधींना हौतात्म्य मिळालं. ज्याचा पुरेपूर वापर नेहरू सरकारनं करून घेतला. गांधी म्हातारपणानं गेले असते तर गांधींना जे अतिमानवीय रूप देण्यात आलंय बहुदा तसं झालं नसतं. गांधींच्या चुका आणि अतिरेक कदाचित आपोआपच देशासमोर आला असता. शेवटी गांधीदेखील माणूस होते, पण त्यांना देव बनवण्याचं काम नथुरामच्या कृतीमुळे सोपं झालं. गेली ६० वर्षं काँग्रेससकट देशातले अनेक पक्ष त्यांच्या जीवावर भाकरीचे तुकडे मोडतायत (किंवा नोटा मोजतायत असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल).
गांधींचे विचार कितीही आदर्श असले तरी त्यांनी त्या विचारांना योग्य ठिकाणी मर्यादा घातल्या नाहीत. गांधींचा प्रत्येकच बाबतीत अतिरेक होता. मग ती अहिंसा असू दे, असहकार असू दे किंवा ब्रह्मचर्य असू दे. असे प्रकार संतांसाठी ठीक असतात, पण देश चालवणार्‍यांसाठी नव्हे. त्यातही त्यांनी ब्रह्मचर्याबाबत केलेले प्रयोग हे कधीकधी विकृती ह्या सदरात मोडणारे होते. मग भले ते त्यांनी कितीही निरागसपणे केल्याचं सांगण्यात आलं तरीही.
कुठलीही मागणी मान्य करून घेण्यासाठी उपोषणाला बसून अख्ख्या देशाला वेठीला धरणं हे त्यांचं अमोघ अस्त्र होतं. आधी हे त्यांनी ब्रिटीशांवर आजमावलं. पण ब्रिटीशांच्या वेळी केस वेगळी होती. गांधी मेले असते तर अख्खा देश पेटेल ही भीती ब्रिटीशांना होती. थोडक्यात ते अन्यायी ब्रिटीशांना केलेलं हुशार ब्लॅकमेलिंग होतं. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याच लोकांकडून स्वतःची तत्त्व राखण्यासाठी (किंवा हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी) आपल्याच लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करणं हे कितपत योग्य होतं. एका माणसाच्या तत्वांसाठी अख्खा देश आणि हजारो लोकांचे प्राण पणाला लावले जात होते. आपली तत्व लोकांवर जबरदस्तीनं लादणं ही एकप्रकारची वैचारिक हिंसा ठरत नाही का? पण गांधींनी काही काही गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं.
गांधींनी एकट्यानीच देशाचं नुकसान केलं असं म्हणणं कदाचित अतिशयोक्ति ठरेल. पण अशा न तशा पद्धतीनं गांधींचं पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान होतं. नेहरू आणि कंपनीने गांधींच्या नावाखाली अनेक चुका केल्या. पण गांधींनीदेखील आपल्या हट्टीपणाने अनेक गोष्टी घडवून आणल्या. गांधींची सगळ्यात मोठी चूक कदाचित ही होती की त्यांनी स्वतःची तत्व कधीच काळाच्या कसोटीवर तपासून पाहिली नाहीत. त्यांच्या ज्या समजूती होत्या त्यांचा टिकाऊपणा तपासून पाहण्याची त्यांना कधीच गरज वाटली नाही. उलट अख्ख्या जगानं आपल्याच समजुतींनुसार स्वतःची मतं बदलून चालावं ह्या हट्टाने ते मार्गक्रमणा करत राहिले. त्यांचं अहिंसेचं अन असहकाराचं अमोघ अस्त्र देखील बदलत्या काळानुसार बदल मागत आहे. आजही ज्या ज्या देशांमध्ये उठाव झालेत, तिथे सगळीकडे सुरक्षा दलं निर्दयीपणे आंदोलकांवर हल्ले करताहेत. पण आंदोलक ठिय्या मांडून उपोषणाला बसले तर एकतरी आंदोलन यशस्वी होऊ शकतं का? हा प्रश्न मला पडतो. जोवर आंदोलक आपली एकगठ्ठा शक्ति दाखवून सुरक्षा दलांनाही आपल्या बाजूनं येण्यास मजबूर करत नाहीत तोवर हे अशक्यच ठरतं. काही काही देशांमध्ये रक्तविरहित क्रांतीही झालीय. पण सर्व ठिकाणची परिस्थिती एकसारखी नसते. जेव्हा जखम जुनी होते तेव्हा जवळचा भाग कापूनच काढावा लागतो आणि त्यात थोडं रक्तही वाहून जावं लागतं.
जर नथुरामनं गांधींना गोळ्या घातल्या नसत्या. तर कदाचित काही वर्षांमध्ये स्वतंत्र भारतामध्ये गांधींभोवतीचा बुडबुडा फुटलाही असता किंवा भारत अजून मोठ्या प्रमाणावर गांधींच्या आहारी गेला असता. कदाचित अजून एक दोन संस्थांनांची घोंगडी हिंसक कारवाईअभावी भिजत पडून राहिली असती. पण ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत.
देशातल्या जनतेला ब्रिटीश अन्याय्य राजवटीविरूद्ध जागृत करण्यामधलं गांधींचं योगदान वादातीत आहेच आणि त्याबद्दल मी त्यांचा आदर करतो. पण आज स्वतःच्या तत्वांपायी अख्ख्या देशाचं आणि पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान केल्यामुळे त्यांना महात्मा म्हणताना मात्र माझी जीभ कचरते.

आज माझ्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी ३० जानेवारीलाच मी पहिली पोस्ट टाकली होती. सर्व वाचकांच्या प्रेमामुळे आणि सर्व मित्र आणि शुभचिंतकांच्या प्रोत्साहनामुळेच हा प्रवास पूर्ण झाला. सुरू केला तेव्हा स्वतःपासून काहीच अपेक्षा नव्हत्या. पण सर्वांच्या प्रेमानं आणि प्रोत्साहनामुळे आणि वेळोवेळी मिळणार्‍या चांगल्या वाईट अभिप्रायांमुळे लिहिता राहिलो. रस्त्यावर काही कौतुकंही झाली पण सगळ्याचं श्रेय वाचकांनाच जातं.
डिसेंबरमध्ये विचार केलेला की पहिल्या वाढदिवशी ब्लॉगला १०० व्या पोस्टची भेट द्यावी. पण डिसेंबरमध्ये सुट्टीवर असताना लेखनात जवळपास महिन्याभराचा खंड पडला. पण मग तरीसुद्धा पहिलीच भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याखातर गेला आठवडाभर रोज एक अन कालपासून तर दिवसाला दोन पोस्ट केल्या आहेत. ह्या अतिरेकाचा गुणवत्तेवर निश्चितच परिणाम झाला असेल. पण मला हे चॅलेंज पूर्ण करायचं होतं आणि महत्प्रयासाने ते मी पूर्ण करू शकलोय ह्याचा मला आनंद आहे. ही माझ्या ब्लॉगवरची १०० वी पोस्ट आहे.
ह्यापुढे पोस्ट्सची फ्रिक्वेन्सी पूर्ववत होईल. आणि गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, ह्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न करूर करेन.
सर्वांचे मनापासून आभार! आपला लोभ असाच कायम राहिल आणि मी कायम लिहिता राहिन हीच सदिच्छा! :)

81 comments:

  1. इतिहास हे राज्यकर्त्यांचं एक साधन आहे. महाभारत आणि रामायण ह्या कलाकृती जशा "कलाकृती" आहेत, इतिहास नाहीत, तेच आपल्याला माहीत असलेल्या सध्याच्या इतिहासाबद्दलही म्हणती येईल. नीरक्षीरविवेकाने आणि महामानवांना माणूसपणाच्या कसोटीवर पारखून अशा कलाकृतींमधील सत्य उचलता आले पाहिजे.

    ReplyDelete
  2. शंभरी गाठल्याबद्दल अभिनंदन
    जेव्हा जखम जुनी होते तेव्हा जवळचा भाग कापूनच काढावा लागतो आणि त्यात थोडं रक्तही वाहून जावं लागतं. - पटलय. आणि गांधींच्या नावावर नुसते राजकर्तेच का, इतरही अनेक ठिकाणी अनेक लोक अजूनही तुकडे तोडतायत. अतिरेक झाला कि डोक्यात तिडीक जाते आणि याबाबतीत असंच काहीसं होऊ लागलेलं आहे - किंबहुना बरेच वर्ष होतंय

    ReplyDelete
  3. खूप चांगला झालाय लेख.
    "देशातल्या जनतेला ब्रिटीश अन्याय्य राजवटीविरूद्ध जागृत करण्यामधलं गांधींचं योगदान वादातीत आहेच आणि त्याबद्दल मी त्यांचा आदर करतो. पण आज स्वतःच्या तत्वांपायी अख्ख्या देशाचं आणि पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान केल्यामुळे त्यांना महात्मा म्हणताना मात्र माझी जीभ कचरते."


    १०० % सहमत .
    अन ब्लोग ला १ वर्ष झाल्याबद्दल अभिनंदन .
    बाकी
    "ह्या अतिरेकाचा गुणवत्तेवर निश्चितच परिणाम झाला असेल."

    अस काहीही नाहीये.उलट मी तर म्हणेन हि पोस्ट तुझ्या बेस्ट ऑफ १० मध्ये येवू शकते .
    लिहिता रहा ..तुझ्या ब्लोग ला शतशः धन्यवाद कि ज्या मुळे मला एक जिवलग मित्र मिळाला .

    ReplyDelete
  4. बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा..ही भिंत रा द्र सारखी वर्षानुवर्षे उभी राहो....:)

    वाईट वाटणार नसेल तर एक सांगू महात्मा गांधी, नेताजी आणि त्यावेळचे सगळे स्वातंत्र्यसेनानी ह्या सर्वांनी आपल्या देशासाठी जे केलाय न त्यापुढे आपण फार छोटे आहोत ...त्यामुळे जरी त्याचं काही आपल्याला पटलं नसलं तरी त्यांचा उल्लेख असा सुरुवातीलाच मो.क.गांधी केला हे मला थोडं वाचायला बर वाटल नाही....याआधी पण बहुधा ते या ब्लॉगवर झालय...विचार कर कदाचित पटेल...आपण मोठ्या माणसांच्या चुका दाखवताना त्यांना आदरही देऊ शकतो...कारण मुळात त्यांनी जो त्याग केला आहे त्याच्या आपण जवळपासही जाऊ शकू का??

    ReplyDelete
  5. तुम्ही उत्तम लिहीता असं म्हटलं तर मला सगळे इथे नवखा समजतील. पण मी तुमचे जवळपास सगळे ब्लॉग्ज वाचतो. आजचा विषय माझा खूप जिव्हाळ्याचा आहे म्हणून पहिल्यांदाच कॉमेंट टाकतओय. तुमचा म्हणनं अगदी योग्या वाटतं. हट्ट तर होतच, पण माझ्या मते गांधींच्यात अजुन एक सवय होती ती म्हणजे आपलाच मार्ग कसा योग्य आहे हे सगळ्यांना पटवण्याची. त्यांना थोडा ही हिंसाचार सहन होत नसे हे एक वेळ मी पटवून घेईन स्वत:ला, पण याचा अर्थ दुसर्‍या कोणी हिंसा केली, मग ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी असली तरीही, ती वाईट हे त्यांना ठरवण्याचा अधिकार नव्हता. अहो साधा भूमिती मधला प्रमेया ५० प्रकारे सोडवता येतो, मग स्वातंत्र्य मिळवण्याचे २ मार्ग का असु नयेत. स्वातंत्र्यवीर सावरकर नाहीत, भगतसिंग नाहीत की नेताजी नाहीत, कोणाचाच मार्ग गांधींना पटला नाही हे किती चूक आहे. आपल्या मार्गाची मोनॉपली संपता कामा नये अशी मानसिकता मला कायम त्यांच्या या वागण्यातून दिसत आली. त्यांच्या बद्दल आदर आपल्या पिढीला नाही असे मला मुळीच वाटत नाही. तो आहेच, पण त्यांच्या मृत्यूला आता इतकी वर्ष उलटून गेली आहेत यामुळे बहुदा त्यांच्या विचारांच्या आड आपल्याला बघायची संधी मिळाली आहे असा मला वाटतं. कुठेही मोर्चे, संप, उपोषण झाले की माझ्या मनात पहिला विचार "गांधींनी भारताला दिलेली सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे संप, उपोषण ई. आहे" असा येतो. आणि जाता जाता तुम्ही गांधींना मो. क. गांधी म्हणलात यात तुम्ही त्यांचा अनादर केला आहे असं मला नाही वाटत, No offense.

    ReplyDelete
  6. Anonymous4:24 PM

    Sundar lekh ..

    ReplyDelete
  7. Anonymous4:29 PM

    गांधीजीनि समाजाला एक प्रक्रारे षंढ बनवलं. आज चे नेते सुद्धा तेच करून त्याची स्वताची पोळी बाजून घेता आहेत.
    अगदी बरोबर गांधीनी आपली तत्व कधीच पारखल नाही फक्त लादली मग ते चूक कि असो कि बरोबर.
    १ वर्षाअभिनंदन

    ReplyDelete
  8. १००% सहमत. एक वर्षाच्या वाढदिवसा बद्धल अभिनंदन!

    ReplyDelete
  9. अगदी पटलं.
    ब्लॉगच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा आणि शंभरीबद्दलही!
    लिहीत रहा!

    ReplyDelete
  10. अभिनंदन मान्यवर......... असेच लिहीते रहा !
    आणि गांधीपोस्ट आपल्याला ज्याम आवडली !!

    ReplyDelete
  11. Anonymous8:57 PM

    >>>पण आज स्वतःच्या तत्वांपायी अख्ख्या देशाचं आणि पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान केल्यामुळे त्यांना महात्मा म्हणताना मात्र माझी जीभ कचरते. +100

    बाबा पोस्टमधला शब्द न शब्द पटला... गांधींबाबतचे माझे विचार बरेचसे ’भिकाजी जोशीं’सारखेच आहेत :)...

    ब्लॉगच्या बड्डेच्या पोस्टची मी वाट पहातच होते, पण तू नुसती वाढदिवसाची पोस्ट न टाकता एक वेगळीच पोस्ट टाकलीस... मान गये बाबा!!

    ब्लॉगला आणि तूला पुढच्या लिखाणासाठी अनेक अनेक शुभेच्छा आणि मन:पुर्वक अभिनंदन....
    बाकि गुणवत्ता हा जो शब्द तू वापरला आहेस, तो या भिंतीबाबत वापरायचा तर मी म्हणेन..

    "क्या बात... क्या बात.... क्या बात" :)

    ReplyDelete
  12. खर तर कोणत्याही माणसाबाबत अस काही मत व्यक्त करायला (म्हणजे ती व्यक्ती किती दुराग्रही होती किंवा चुकीचे निर्णय घेतले तिने ..) मी कचरते .. कारण ब-याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात ..काळ, संदर्भ, भावना, परिस्थितीचे अनेक पैलू वगैरे.

    गांधींना मोठ बनवण् जितक सोप आहे तितकच त्यांच्यावर टीका कारण सोप आहे अस माझ अनुभवाने मत बनलय!

    जुन्या लोकांनी जे काय केल ते ... आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला काय म्हणतील याची आपण काळजी करावी .. आणि जमेल तितक चांगले (समाजासाठी या अर्थाने) काम करत राहावे असा माझ्यापुरता मार्ग मी निवडलाय .. तोही बरोबर /चूक माहिती नाही!

    ReplyDelete
  13. अभिनंदन! तुझं चॅलेंज पूर्ण झाल्याचा आम्हालाही आनंद आहे. लिहीत रहा.. :)

    ReplyDelete
  14. Anonymous9:31 PM

    बाबाची भिंत दिवसेंदिवस प्रगल्भ व भारदस्त होत जावो याच शुभेच्छा

    ReplyDelete
  15. बाबाने शंभरी गाठून पहिला वाढदिवस साजरा केला.. ;)
    पोस्ट आणि त्यातले विचार पटले..
    @पांथस्थ >> अहो साधा भूमिती मधला प्रमेया ५० प्रकारे सोडवता येतो, मग स्वातंत्र्य मिळवण्याचे २ मार्ग का असु नयेत. >> पटेश...

    ReplyDelete
  16. तुझ्या १०० पोस्ट पैकी सर्वात उत्तम पोस्ट असावी ही!
    अभिनंदन!

    ReplyDelete
  17. बाबा...शंभरी भरली....अभिनंदन अन पुढील लिखाणास शुभेच्छा... :) :)

    ReplyDelete
  18. लेख उत्तम आणि ब्लॉगची शंभरी व वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन! अर्थात लेखात जो मुद्दा मांडलाय - नथुरामने कळत नकळत गांधींना महात्मापण बहाल केल्याचा त्याविषयी इतकेच म्हणेन की आपण जेव्हा पुन्हा त्यांच्यावर लेख लिहीतो तेव्हा नथुरामने जी चूक केली तीच आपणही करीत असतो. अशा लेखांमुळे गांधींच्या नावावर राजकीय व्यापार करणारे अधिकच सहानुभूती गोळा करतात.

    मी स्वत: गांधींविषयी जेव्हा लिहीतो तेव्हा एकच मुद्दा मांडतो ज्यामुळे त्यांच्या तथाकथित अनुयायांची तोंडे एकदम बंदच होतात. तो पुन्हा इथे मांडतो.

    गांधींचा खून तीस जानेवारीला झालाच नाही आणि तो नथुरामने केलाच नाही. गांधींचा जराजर्जर झालेला तो देह तसाही नष्ट होणारच होता. दुसर्‍या दिवशी जेव्हा या अहिंसेचे गोडवे गाणार्‍या माणसाच्या समर्थकांनी पुण्यात शेकडो ब्राम्हणांची घरे जाळली तेव्हाच गांधींच्या तत्त्वाचा, विचारांचा खून झाला. म्हणजेच गांधींचे खरे खुनी कोण हे पुन्हा वेगळे सांगायला हवे का?

    बस्स यापेक्षा या मोकाट व्यक्तीविषयी मी अधिक काही लिहीतच नाही.

    ReplyDelete
  19. वाह वाह वाह!!! सुंदर लेख. पुर्ण सहमत. बड्डेब्लॉगला खुप खुप शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. :)

    ReplyDelete
  20. माझा फार अभ्यास नाही कि मी 'गांधी' ह्या विषयावर काही विचार मांडू शकेन. परंतु एक भारतीय नागरिक म्हणून इतके नक्कीच कळते कि इतिहास ओंजारून गोंजारून आपण फक्त नुकसान करित रहातो.
    आपल्या आयुष्यात देखील फार काळ भूतकाळात रमणे हे भल्याचे नसतेच.
    आपण आपल्या वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित करावयास हवे तरच आपला आणि त्याबरोबर आपल्या देशाचा भविष्यकाळ आपण चांगला घडवू शकू.

    बाळ वर्षाचे झाले..त्याबद्दल खूप शुभेच्छा. :)

    ReplyDelete
  21. तरीच म्हटले एवढे झपाटल्यासारखा का लिहितोय ?
    असो...शुभेच्छा...पहिल्या बर्थडेलाच सेंच्युरी केल्याबद्दल!

    ReplyDelete
  22. Laii....... bhari!

    Vadhadivasachya Shubheccha!!

    ReplyDelete
  23. हार्दिक अभिनंदन..आणी पुढच्या प्रवासास शुभेच्छा. ः)

    ReplyDelete
  24. Anonymous1:52 AM

    लेख उत्तम झाला .. पण एकांगी वाटतो..

    १) महाराष्ट्रीयन मध्यम वर्गाची भूमिका परत मांडली ... पण मध्यम वर्गाच्या जाणिवांच्या बाहेर पडायला लेख समर्थ नाही.. कारण.. शब्दपांडीत्याच्या/ शब्द कसरतींच्या जोरावर ..म्हणजे.. म.को.गांधी वगैरे उल्लेख करून समविचारी लोकांमध्ये वाहवा मिळवता येते पण इतरांना पटतील असे मुद्दे मांडण्यात लेख थोडा कमी पडतो..

    २) कोणीही हट्ट केला म्हणून कोणी मानत नसते.. मी जर उद्या उपोषण करायला बसलो तर मला विचारायला कोणी काळे कुत्रे पण येणार नाही.. गांधीना लोक मनात होते.. . त्यामुळे ते त्यांचा हट्ट चालायचा.. त्यांच्या( गांधींच्या ) चुकीच्या वाटनाऱ्या विचारांना विचाराच्या पातळीवर विरोध करण्याची ताकद नथूरामात किंवा इतरांच्यात का नव्हती ..हा विचार करण्याचा मुद्दा !!.. जर होती तर ते का कमी पडले .... की लोकांचा विश्वास संपादन करण्यात ..ते कमी पडले,,
    याला एक सोपे उत्तर ..म्हणजे विचाराच्या पातळीवर विरोध करायला बराच वेळ लागला असता ....त्यामुळे त्यांना मारणे गरजेचे होते, पण हे उत्तर फार पुढे घेवून जाता येणारे नाही. कारण FASIST लोकांच्या विचारात व यात कोणतेही अंतर रहात नाही ... "हम करे सो कायदा" असा भाव यात असतो. म्हणजे गांधींचा खून करून नाथूरामाचे जसे समर्थन करता येते तसे महाराष्ट्रामध्ये १९४८ मध्ये जाळलेल्या घरांचे कोणी करत असेल तर त्यांना कसे रोखणार. ?????? ते ही म्हणतील की बामणांची जीरवायचा आत्ताच चान्स आहे..नाही तर परत डोक्यावर बसतील , आमचे जीणे मुश्कील करतील.. याला आपण कसे उत्तर देवू ??
    कारण आम्ही जर आम्हाला न पटनाऱ्या मुद्द्यांवरून हिंसक व्हायला लागलो आणि एकमेकांचे मुडदे पडायला लागलो तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही..

    ३) गांधीची तत्वे काळाबरोबर नव्हती हे काही प्रमाणात बरोबर आहे पण त्यामध्ये तू काही नवीन सांगत नाहीस. गांधी स्वतः म्हणायचे की माझा नंतरचा विचार असेल तो माझा पक्का समजा , या नंतरही माझ्या विचारात बदल होवू शकतील. आणि गांधींचे म्हणायचे तर टिळक व सावरकर यांचेही विचार काळाबरोबर नव्हतेच.
    "आधी सामाजिक की आधी राजकीय "..या वादात टिळकांची 'आधी राजकीय ' या भूमिकेने मोठ्ठा घोळ करून ठेवलाय. ज्या समाजात आर्थिक व सामाजिक समता नसते तो समाज खऱ्या अर्थाने राजकीय विकास करू शकत नाही. आंबेडकरांनी संविधान सभेच्या भाषणात म्हंटले होते की "आज आम्ही देशाला राजकीय लोकशाही अर्पण करीत आहोत पण जो पर्यंत आम्ही सामाजिक,आर्थिक लोकशाही संपादन करू शकणार नाही तो पर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही ".. आज जे काही देशात चाललंय त्याची बीज या आर्थिक व सामाजिक विषमतेत आहेत हे सांगायला पंडिताची गरज नाही.
    सावरकरांनी मांडलेली "पुण्यभू व पितृभू ही राष्ट्रवादाची " ची संकल्पना ही आजच्या कालात योग्य नाही. असे असते तर नेपाळ मध्ये राहणारे सर्व हिंदू राष्ट्रविरोधी झाले असते कारण त्यांची पुण्यभूमी भारतात आहे....आणि मजा म्हणजे जे जर्मन्स व इंग्लिश लोक दुसऱ्या महायुद्धात एकमेकांच्या उरावर ( राष्ट्रहिताच्या नावाखाली) बसले होते, त्या दोघांची पुण्यभू इटलीत आहे, मग त्यांचे राष्ट्रीयत्व खोटे का ?
    त्यामुळे मला असे वाटते की जगात कोणीही परिपूर्ण नाही.त्यामुळे काळाच्या कसोटीवर आपणच उतरायचे ..इतरांचे विचार उतरोत किंवा न उतरोत. ..आणि अहिंसा हाच मार्ग .. जो आजही संयुक्तिक आहे..नाहीतर अशी घरात तलवारी आणी बंदुका घेवून बसावे लागेल..

    काहीही असो.. पण लेख छान आहे..

    ReplyDelete
  25. अभिनंदन.....!!!

    माझ्या मनातलं मांडलं आहेस अगदी...!! अप्रतिम लेख...!!

    ReplyDelete
  26. अगदी अप्रतिम लिहिलं आहेस. पूर्णतः सहमत. !!

    संपूर्ण लेख + १ ..

    मी तोच विचार करत होतो की हा असा झपाटल्यासारखा का लिहितोय. आता लक्षात आलं :) .. चॅलेंज (आणि तेही स्वतःच स्वतःला दिलेलं असलं की) पूर्ण करण्यात एक वेगळीच मजा असते :) मस्तच..

    विकांतात धावत पळत सगळ्या पोस्ट्स वाचत होतो पण प्रतिक्रिया द्यायला जमलं नाही. जरा गडबड होती.

    पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !! लिहिते रहो.. जीते रहो !!

    ReplyDelete
  27. ओंकार,
    >>नीरक्षीरविवेकाने आणि महामानवांना माणूसपणाच्या कसोटीवर पारखून अशा कलाकृतींमधील सत्य उचलता आले पाहिजे.
    पूर्णतया सहमत!

    ReplyDelete
  28. आदित्य,
    खरं आहे..एका माणसाच्या नावावर आज कित्येक लोक बाजार भरवून उभे आहेत..अति तर होतच चाललंय... कुठेतरी ह्या सगळ्यालाही अंत असेल अशा भाबड्या आशेवर जगतोय आपण! :)

    ReplyDelete
  29. सागर,
    धन्यवाद भाऊ! अरे मनात जे होतं तेच शब्दांत मांडायचा प्रयत्न केला!
    बाकी,>>तुझ्या ब्लोग ला शतशः धन्यवाद कि ज्या मुळे मला एक जिवलग मित्र मिळाला .
    मला पण! :)

    ReplyDelete
  30. अपर्णा,
    मी गांधींना महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणू इच्छित नाही आणि मोहनदास गांधी किंवा मोहनदास करमचंद गांधी असं लिहायचा मी कंटाळा केला... मो.क. गांधी लिहिण्यामागे काहीच दुसरं कारण नाही. बाकी त्यांचा अनादर करण्याचा कुठे प्रश्नच येत नाही.
    खूप आभार गं!

    ReplyDelete
  31. पांथस्थ,
    तुम्ही ह्यापूर्वीदेखील कमेंट दिल्याचं मला चांगलंच आठवतं! :)
    आणि तुमचे हे दोन मुद्दे,
    >>साधा भूमिती मधला प्रमेया ५० प्रकारे सोडवता येतो, मग स्वातंत्र्य मिळवण्याचे २ मार्ग का असु नयेत.
    >>त्यांच्या बद्दल आदर आपल्या पिढीला नाही असे मला मुळीच वाटत नाही. तो आहेच, पण त्यांच्या मृत्यूला आता इतकी वर्ष उलटून गेली आहेत यामुळे बहुदा त्यांच्या विचारांच्या आड आपल्याला बघायची संधी मिळाली आहे असा मला वाटतं.
    मनाला प्रचंड भावले आणि पटले. माझ्यासारख्या कित्येकांच्या मनातल्या गोष्टी तुम्ही उत्तम प्रकारे शब्दबद्ध केल्यात!
    आणि हो माझा अनादर करण्याचा उद्देश नव्हताच, केवळ माझं मत काय आहे ह्याची माझ्या 'महात्मा' न वापरण्यावरून कल्पना यावी इतकंच!
    इतक्या मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete
  32. Anonymous 1,
    खूप धन्यवाद! असाच लोभ असू द्या! :)

    ReplyDelete
  33. Anonymous 2,
    गांधींंच्या काही कृतींतून देश आणि समाज षंढ बनल्याचं चित्र उभं राहिलं हे सत्य आहे! आणि राजकारण्यांनी नेमक्या ह्याच परिस्थितीचा फायदा उठवून आजन्म तुकडे अन लचके दोन्ही तोडले.
    खूप खूप आभार!

    ReplyDelete
  34. अलताई,
    खूप धन्यवाद गं! :)

    ReplyDelete
  35. आनंदभौ,
    राहा असेच नेहमी पाठीशी उभे! :)

    ReplyDelete
  36. विक्रांत,
    धन्यवाद भाऊ! शंभरावी पोस्ट अनायासे ती गांधींवर यावी हा योगायोगच म्हणायचा! असाच लोभ राहू दे! :)

    ReplyDelete
  37. तन्वीताई,
    शंभरावी पोस्ट काय लिहू हा प्रश्न बराच वेळ पडून होता. मग नुसतीच एक वाढदिवसाची अन १०० वी म्हणून एक पोस्ट टाकावी का हा विचारही आला. पण मग ३० जानेवारीच्या घटनांचं जे विकृत अन सोयीस्कर चित्रण केलं जातं ते डोक्यात आलं अन पोस्ट लिहिली. :)
    बाकी... "क्या बात..." प्रभुजी मिथुनदांच्या शब्दांत शाबासकी मिळाल्यानं बरं वाटलं! :D
    आशीर्वाद राहू दे गं तायडे! :)

    ReplyDelete
  38. सविताताई,
    अगदी खरं आहे तुमचं म्हणणं अन ते मला बर्‍याच अंशी पटतंही. मी अगदी इंजिनियरिंगला असेपर्यंत गांधींना शिव्या घालायचो. पूर्णपणे एकांगी अन आंधळा विरोध होता. अजूनही कदाचित थोडाफार एकांगी विरोध वाटू शकतो. अर्थातच मीदेखील त्या काळात नव्हतो अन ना कुणा प्रत्यक्षदर्शीशी मी भेटलोय. जे काही साहित्य माझ्यासमोर आहे ते म्हणजे लिखित अन चित्रित गोष्टी.
    आणि गांधींनी स्वतःचं आयुष्य डॉक्युमेंट करायला फार पूर्वीपासून सुरूवात केलेली होती. त्यांच्या दैनंदिन व्यवहारांची नोंद ठेवणारे लोक त्यांच्यासोबत राहत. त्यामुळे त्यांच्या काळातले त्यांच्याबाबतचे जेव्हढे संदर्भ उपलब्ध आहेत, तेव्हढे फारच कमी लोकांचे असतील.
    त्यामध्ये सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये चालू असलेलं गांधींचं प्रमाणाबाहेरचं उदात्तीकरण, ते अगदी त्यांच्या तोंडी ते 'हे राम!' घालणं वगैरे गोष्टी पाहून कुठेतरी अति होत असल्याचं जाणवतं. महापुरूषांचं नको इतकं उदात्तीकरण हा लोकांना अफूच्या गोळ्या ठासून खरी दुखणी विसरवण्याचा रामबाण उपाय बनलाय हल्ली! त्यातही आज माझी पिढी जे भोगतेय ते मला दिसतंय. परदेशामध्ये राहून आपल्याकडच्या विचारसरणीतील किंवा एकंदरच जीवनपद्धतीतीलसुद्धा चांगल्या गोष्टींची अन उणीवांची प्रकर्षाने जाणीव होते. त्यामुळे एकंदरच माझं बरंच मतपरिवर्तन घडून मी काही वेगळ्या निष्कर्षांप्रत आलो. ते मी मांडण्याचा प्रयत्न केला बस इतकंच!
    बाकी, कुठल्याही गोष्टीवर टीका करणं किंवा स्तुती करणं सोपं असतं आणि काही करून दाखवणं अवघड असतं हे जितकं सत्य आहे तितकंच, घडलेल्या घटनांवरचा प्रत्येक दृष्टिकोन समोर येणं.
    अन एक असा माणूस ज्याच्या हातात काळाने पुढच्या समस्त पिढ्यांचं भवितव्य निश्चित करण्याची शक्ती दिली, त्यानं जे निर्णय घेतले त्यामुळे परिणाम झालेल्यांपैकी मीही एक असल्याने मला साहजिकच माझं मत मांडण्याचा अधिकार प्राप्त होतो.
    बाकी, >>आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला काय म्हणतील याची आपण काळजी करावी .. आणि जमेल तितक चांगले (समाजासाठी या अर्थाने) काम करत राहावे असा माझ्यापुरता मार्ग मी निवडलाय
    हा नक्कीच स्पृहणीय अन थेट मार्ग आहे. कृतीवादी अन आदरणीय.. मला स्वतःला ह्या मार्गावर चालायला निश्चितच आवडेल.
    पण एक प्रश्न ह्यानिमित्ताने पडतो की 'आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याबद्दल काय म्हणतील?' हा विचार कधी गांधींनी केला असेल का?

    ReplyDelete
  39. मीनल,
    :) ते चॅलेंज पूर्ण झाल्यावर सुटकेचा निश्वास टाकलेला मी! धन्स गं!

    ReplyDelete
  40. रणजित,
    शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद भाऊ! :)

    ReplyDelete
  41. आका,
    पहिल्या वाढदिवसालाच शंभरी भरली माझी! ;)
    धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  42. भुंगादादा,
    खूप धन्यवाद! तुझी प्रतिक्रिया बघून मस्त वाटलं एकदम!
    असाच लोभ राहू दे!

    ReplyDelete
  43. योगेश,
    हो ना रे...पहिल्याच वर्षांत शंभरी! :D
    धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  44. चेतनभाऊ,
    बरोबर आहे तुझं थोड्याफार अंशी... पण कसं आहे...माझ्या यःकश्चित लेखापेक्षा कित्येक मोठ्या नावाजलेल्या लेखण्या स्तुतीसुमनं अन नसलेली विशेषणं लावण्यात गर्क असतील.. त्यामुळे माझा आपला एक क्षीण अन मनापासून आलेला आवाज!
    बाकी अहिंसेबाबत तू बोललास ते सोळा आणे सत्य!

    ReplyDelete
  45. सौरभ,
    मनःपूर्वक आभार रे भावा! :)

    ReplyDelete
  46. अनघाताई,
    आपली समस्या कुठे आहे माहितीय? आधुनिक भारताचा इतिहास आपल्या पुस्तकांमध्ये गांधी ह्या नावापाशी येऊन थांबतो. आपण ती एक एव्हढी मोठी वास्तू बनवलीय की बाकी सर्व गोष्टींवर त्या स्मारकाची सावली पडावी आणि नजरेसच पडू नयेत.
    लेख लिहिण्यामागचा उद्देश एव्हढाच की माझ्या विचारांना वाट मिळावी. अन खरंच आपण आता गोष्टींकडे जास्त वस्तुनिष्ठपणे बघायला हवं असं मला वाटतं. आणि तू म्हणतेस तसं >>आपण आपल्या वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित करावयास हवे तरच आपला आणि त्याबरोबर आपल्या देशाचा भविष्यकाळ आपण चांगला घडवू शकू.
    मला १०० % पटतं.
    शुभेच्छांसाठी धन्यवाद गं! :)

    ReplyDelete
  47. सागर कोकणे,
    धन्यवाद रे भाऊ! अरे आधी थोडा खंड पडल्याने शेवटी झपाटून जायची पाळी आली! ;)
    असाच लोभ राहू दे!

    ReplyDelete
  48. विनोद,
    धन्यवाद मित्रा! :)

    ReplyDelete
  49. शरद,
    धन्यवाद भाऊ! :)

    ReplyDelete
  50. Anonymous 3,
    >>लेख एकांगी वाटणं निश्चितच शक्य आहे! कारण आपण प्रत्येकजण निराळ्या दिशेनं विचार करतो.

    १) >>मी जरी मध्यमवर्गाच्यादेखील जाणिवा पकडू शकलो असेन ह्यातून तर ते मी माझी अचिव्हमेंट म्हणून गणतो. पुढे सांगायचं झालं तर, मो.क. गांधी मी का वापरलं ते तुम्ही अपर्णा अन पांथस्थना दिलेल्या उत्तरांवरून समजू शकता. कुणाकडून वाहवा मिळवण्यासाठी लिहिलेल्या लेखांपैकी हा लेख नव्हता. वाहवा मिळवण्यासाठी मी ब्लॉगवर बरेच दुसरे लेख लिहिलेत. कारण, गांधी किंवा इतर कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर केवळ वाहवा मिळवण्यासाठी लेख लिहून काहीच निष्पन्न होत नाही हे मी जाणून आहे. मी माझे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला. जर तुम्हांला ते पटले नाहीत तर आपल्यातल्या कम्युनिकेशनमध्ये गॅप राहिली असं मी म्हणेन. आणि प्रत्यक्ष गांधी स्वतःचे मुद्दे समविचारी लोकांबाहेरच्या लोकांना पटवून देण्यात कमी पडले, तर मी कोण हो?

    २) >>मी सुरूवातीलाच म्हटलं की एक अख्खा देश तळागाळांतल्या लोकांपासून जागृत करणं हे गांधींचं असामान्य कर्तृत्वच होतं. आणि जेव्हा असा माणूस आपले हट्ट लोकांवर लादू पाहतो तेव्हा तो हट्ट मोठा ठरतो. आणि गांधींना लोक मानत होते, त्यामुळे त्यांचा हट्ट चालायचा, हे समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे झालेल्या चुका चुकाच राहतात. डायरेक्ट ऍक्शन डे च्या दिवशी घडलेला प्रमाद कित्येक लोकांच्या जीवावर बेतला, त्यांच्या कुटुंबियांना जाऊन हे 'लोकं त्यांना मानत होते' वालं स्पष्टीकरण देऊन पाहा. काय रिऍक्शन येते ते सांगा?
    गांधींना विचारांच्या पातळीवर विरोध करणारे नेते त्याकाळात जिवंत असणारे तोडीस तोड नेते एकमेव सावरकर होते. ज्यांच्या प्रत्येक उक्तीला खाली दाखवण्यात धन्यता मानणारे नेहरूंसारखे (मतलबी) अनुयायी गांधींजवळ होते. एकदा सावरकरांना माफीवीर, हिंदुत्ववादी किंवा हिंसापिपासू ठरवून मोकळं झालं की समस्या सुटली. गांधी ह्या ब्रँडचा व्यवस्थित वापर करणं नेहरूंना बखुबी जमलं. गांधी ही व्यक्ती दिवसेंदिवस इतकी लार्जर दॅन लाईफ बनत चाललेली होती की तिथे वैचारिक चर्चा किंवा मतभेदांना काही जागाच उरलेली नव्हती.
    अर्थात हे नथुरामनं गांधींना गोळ्या घालण्याचं समर्थन होऊ शकत नाही, हे मी मान्य करतोच.
    आणि अर्थातच नथुरामचं गांधींना गोळ्या घालणं आणि गांधींचे अनुयायी म्हणवणार्‍यांनी ब्राह्मणांची घरं जाळणं ह्यामध्ये अगदी प्रिमिटिव्ह पातळी सोडली तर कसलंही साम्य नाही. कारण तिथे समुदायाची मानसिकता चित्रात येते.
    आणि तुमचं हे म्हणणं की आम्ही न पटणार्‍या मुद्द्यांवरून हिंसक होऊ लागलो तर आपला पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. हे मला पटलं हो.. पण गांधींना हे लक्षात आलं नाही का? कारण जीनांनी तेच केलं अन गांधींनी एक उपोषण करून पाहिलं. अन एक पाकिस्तानच जन्माला आला.
    contd...

    ReplyDelete
  51. contd..
    ३) >> गांधी हे म्हणाले होते >>या नंतरही माझ्या विचारात बदल होवू शकतील.
    तर तसं कधी झाल्याचं दिसलं नाही. चौरीचौराच्या घटनेनंतर चळवळ बंद करण्याचा गांधींचा अतिरेकी अहिंसक स्वभाव अगदी डायरेक्ट ऍक्शन डे पर्यंत एव्हढं पाणी पुलाखालून जाईपर्यंत देखील अगदी तस्साच राहिल्याचं दिसतं.
    टिळकांनी जे राजकीय स्वातंत्र्य मागितलं होतं त्याची कारणं काय असावीत ह्याचा विचार करता हे लक्षात येतं. की इंग्रजांची राजवट अगदी पोर्तुगीज किंवा स्पॅनिशांएव्हढी वाईट नसली, तरी जुलमी नक्कीच होती. आणि ते बाहेरचे असल्याने साहजिकच स्थानिक जनतेच्या अनेक समस्यांची त्यांना समज असणं अशक्य होतं. त्यातून पहिलं महायुद्ध उरकल्यानंतर खिळखिळ्या झालेल्या ब्रिटीश सत्तेला सगळ्या वसाहती ह्या लुबाडून आपलं सामर्थ्य पुनश्च मिळवण्याचे एकमेव स्रोत होत्या. त्यामुळे आपला सामाजिक विकास घडवणं हे अशा विचित्र परिस्थितीतल्या सामर्थ्यासाठी हपापलेल्या राजवटीखाली अवघड होतं. त्यामुळे आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवणं टिळकांना श्रेयस्कर वाटलं असणं साहजिक आहे. बाकी ह्या सामाजिक की राजकीय मध्ये काळाबरोबर नसण्याचा काय संबंध होता ते मला कळलं नाही. कारण इथे फक्त एका निवडीचा सवाल होता. टिळकांची निवड एक होती.
    आणि सावरकरांबद्दल बोलायचं झालं. तर तुम्हांला सांगू का? सावरकरांचे विचार खरंच काळाबरोबर नव्हते. कारण ते त्यांच्या काळाच्या खूप पुढचे होते. त्यांनी सांगितलेली सैन्यसज्जता करण्यात नेहरूंना कमीपणा वाटला अन ते पंचशील करायला निघाले. परिणाम काय झाला ते जगानं पाहिलं. जातिव्यवस्थेचा निषेध करणर्‍यांपैकी सावरकर आद्य होते. मंदिरात दलित पुजारी नेमणारे सावरकरच! पण गांधींनी वर्णव्यवस्था हा हिंदूधर्माचा पाया आहे असं वक्तव्य केलेलं. बाबा आंबेडकरांच्या धर्म बदलण्याचे भारतीय समाजावर अन देशावर किती दूरगामी परिणाम होऊ शकतात हे फक्त सावरकरांनाच दिसलं होतं आणि म्हणूनच आंबेडकरांचं मन वळवायचा अन वर्णव्यवस्था मोडायचा प्रयत्न करत राहिले.
    वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय माझ्या शाळेमध्ये मी आठवीत असताना पहिल्यांदा शिकायसाठी आला, म्हणजे इसवीसन ९६-९७ वगैरेमध्ये..अन सावरकर ह्या गोष्टीबद्दल जवळपास अर्ध्याशतकाहून जास्त आधी घसा खरवडत होते.
    'पुण्यभू अन पितृभू'च्या ज्या त्यांच्या सिद्धांतांबद्दल तुम्ही बोलता आहात. तो सिद्धांत ह्या गोष्टीसाठी आहे की जर उद्या तुमच्यासमोर तुमच्या धर्माची पुण्यभू अन तुमचा देश ह्यांमध्ये निवड करण्याची वेळ आली तर तुम्ही काय निवडाल? तत्कारणातच... आपल्या देशाला आपली खरी पुण्यभू मानणं हा सावरकरांचा संदेश होता. जर्मनी अन इंग्लंडची गोष्ट जी तुम्ही करता त्यात एक बेसिक फ्लॉ आहे. जर्मनी अन इंग्लंड हे मेजॉरिटी प्रोटेस्टंट देश आहेत (इंग्लंडचं राजघराणंसुद्धा) अन ते व्हॅटिकनला मानत नाहीत. त्यांची सो कॉल्ड पुण्यभू जेरूसलेम आहे. पण जर्मनीचं राष्ट्रगीत ऐकाल तर त्यात म्हणतात 'डॉईशलँड(जर्मनी) अबोव्ह ऑल' थोडक्यात काय, तर सर्वांत आधी देश. बस हेच सावरकरांचं म्हणणं होतं. आपल्या देशालाच आपली पुण्यभू अन पितृभू मानणे. पण जर शब्दशःच अर्थ घ्यायचा असेल तर कुणाचा काही इलाज नाही.
    टिळक काय, गांधी काय किंवा सावरकरच काय, कुणीच संपूर्णतया बिनचूक होतं असं म्हणणं धाडसाचंच ठरेल, पण एकावर झालेल्या टीकेला उत्तर म्हणून इतरांचे दोष काढणं ही पळवाट आहे.
    बाकी अहिंसा हाच मार्ग वगैरे फार मस्त वाटतं म्हणायला. पण अहिंसा ही कुठल्या थराची अन ती शब्दशः अहिंसा आहे की तत्वशः हे महत्वाचं. नाहीतर घर जाळायला लँड माफियाचे लोक आल्यावर उपोषणाला बसण्याच्या अहिंसेचा काही उपयोग नाही.
    बाकी ती जी गांधींची वैचारिक हिंसा मी लेखात म्हणालो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
    माझ्या पोस्टमुळे तुमचं इतकं विचारमंथन झालं अन तुम्ही इतकी विस्तृत प्रतिक्रिया दिलीत ह्याचं प्रचंड समाधान वाटलं. तुम्हाला उत्तर देतानाही मला बराच आनंद मिळाला.
    खूप धन्यवाद! भेट देत राहा!

    ReplyDelete
  52. सारिका,
    खूप लोकांच्या मनात बर्‍यापैकी असेच मुद्दे होते हे पाहून खूप छान वाटलं. :)
    खूप आभार! असाच लोभ राहू दे!

    ReplyDelete
  53. हेरंबा,
    खरंच अरे, त्या चॅलेंजपुढे तहान-भूक, झोप सगळं कुर्बान करून टाकलेलं मी! मजा आली एकदम... :)
    तुझा विकांत मी समजू शकतो...'आदि'शक्तीच्या आराधनेत बराच काळ जात असेल! ;)
    खूप खूप धन्यवाद रे भाऊ! :)

    ReplyDelete
  54. अभिनंदन विद्याधर!
    बरेच विचारमंथन झालेले आहे यावर!
    तुझी Anonymous ३ ला दिलेली अभ्यासपूर्ण प्रतीक्रिया आवडली!
    माझ्याकडून तुला पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
  55. Anonymous10:06 PM

    1) 'गांधींना लोक मानत होते, त्यामुळे त्यांचा हट्ट चालायचा' - मी असे म्हंटलेले नाही. हा माझ्या लिहिण्याचा तसा अर्थ नाही, माझा मुद्दा इतकाच की लोक त्यांचे ऐकायचे कारण त्यात त्यांना तथ्य वाटत असणार किंवा ते जे सांगत होते त्यात त्यांचा( लोकांचा) कोणता तरी स्वार्थ / फायदा असणार.तो जो काही फायदा असेल , ते ठरवण्याची , त्यावर विचारमंथन करण्यासाठी ही जागा नाही, कारण विषयाच्या विस्तारभयामुळे , त्याविषयी फार बोलता येणार नाही. पण "गांधींचा हट्ट चालायचा कारण ते दुराग्रही होते" या वाक्यात लोक मूर्ख होते असा स्पष्ट अर्थ अनुस्यूत आहे, तो मला चूक वाटतो.लोकांना त्यांचे चांगले वाईट समजते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळेच गांधींचा हट्ट मान्य झाला...


    " गांधींना विचारांच्या पातळीवर विरोध करणारे नेते त्याकाळात जिवंत असणारे तोडीस तोड नेते एकमेव सावरकर होते." - इतिहासाचा एक विद्यार्थी म्हणून मला हे म्हणणे पटत नाही, कारण सावरकारांपेक्षा तीव्र शब्दात गांधींचा विरोध आंबेडकरांनी केलाय. त्यांचे WHAT CONGRESS AND GANDHI HAVE DONE TO THE UNTOUCHABLES हे पुस्तक त्याचीच साक्ष्य देते आणि ,"Don’t call Gandhi a saint. He is a seasoned politician. When everything else fails, Gandhi will resort to intrigue.” "Don’t fall under Gandhi’s spell, he’s not God... Mahatmas have come and Mahatmas have gone but untouchables have remained untouchables.” ही वाक्ये त्याचीच साक्ष्य आहेत. इथे सावरकरांचा मोठेपणा कमी करणे हा माझा उद्देश नाही, तर गांधींचे अनुयायी ( तुम्ही म्हणता त्याप्रमाणे) ज्या पद्धतीने त्यांना 'लार्जर दॅन लाइफ' करून त्यांची 'Hero Worship' करतात, त्याप्रमाणे सावरकरांचा 'डोळस व वैद्यानिक वारसा सांगणाऱ्या' अनुयायांनी, तसे करू नये, एवढीच माफक अपेक्षा...

    हिंसा ही भ्याड मनोवृतीचे निदर्शक आहे, कारण निहत्याऱ्या व्यक्तीवर हल्ला करण्यात कसली आले शूरता. त्यामुळे नथुराम व घरे जळणाऱ्या व्यक्ती यांच्या मानसिकतेत कोणताही फरक मला वाटत नाही. हं गांधींचा अत्याधिक अहिंसेवरचा विश्वास मला योग्य वाटत नाही, पण म्हणून अहिंसा चूक होते असे नाही.

    ३) गांधींच्या विचारात बदल झाले, ते असे..
    - चौरीचौरा च्या घटनेनंतर त्यानी जरी चळवळ थांबवली , तरी १९४२ च्या आंदोलनांत झालेल्या हिंसेनंतर त्यानी ती थांबवली नाही.
    - पहिल्यांदा हिंसेला विरोध करून, जरी त्यानी ' विश्वास्ताचा' सिद्धांत मांडला असला तरी नंतर त्यानी १९४४ च्या आसपास ,एका अमेरिकन पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत असे म्हंटले होते कि, " स्वतंत्र भारतामध्ये आम्ही पहिल्यांदा जमीन सुधारणांचा कार्यक्रम हाती घेणार आहोत"
    पत्रकार - " पण त्याला जमीनदार विरोध करतील " ?
    गांधी -" आम्हाला ते करावे लागेल "
    पत्रकार- " ते हिंसक वळण घेयील , "
    गांधी " त्याला आमचा इलाज नाही, २-४ दिवस जाळपोळ होईल पण नंतर सर्व ठीक होईल"
    काही अभ्यासकांच्या मते, गांधींचा हा 'Land reforms ' चा विचार ब्राम्हण वर्गाला अस्वस्थ करत होता , कारण महाराष्ट्रात ब्राम्हणांकडे बर्यापैकी जमिनी ( खोती, कुलकर्णी, देशपांडे) होत्या. या पार्श्वभूमीवर फुले - टिळक वाद समजून घ्यावा लागेल. टिळकांनी खोती बिलाला विरोध केला होता, ज्यामुळे आजही शेतकरी वर्गातील जाणकार त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधातील समजतात.
    असो सांगायचा मुद्दा एवढाच की गांधींच्या विचारात बदल झालेले दिसतात .

    ReplyDelete
  56. Anonymous10:08 PM

    2) टिळकांबद्दल - बाकी ह्या सामाजिक की राजकीय मध्ये काळाबरोबर नसण्याचा काय संबंध होता ( तुमचा प्रश्न )
    - राजकीय सुधारानंतर सामाजिक सुधार होवू शकत नाहीत असे मला म्हणायचे नाही पण तत्कालीन परीस्थित तशी परिस्थिती होती. कारण आगरकरांनी म्हंटले होते कि जर "मी पेशवाईत जन्माला आलो असतो तर मला त्यानी हत्तीच्या पायाखाली दिले असते ', हे वाक्य तत्कालीन परिस्थिती दर्शवते. कारण पेशवाईत झालेल्या अगणित अत्याचारांमुळे न्या. रानडे व आगरकर चिंतीत होते. त्यामुळे ब्रिटीशांच्या मदतीने आधी सामाजिक सुधार करून घ्यावेत व नंतर समाजातील वाईट चालीरीती संपल्या की राजकीय स्वातंत्र्य मिळवता येयील अशी त्यांची भूमिका होती..पण टिळकांनी त्याला विरोध केला.
    - टिळकांनी " काँग्रेस" च्या अधिवेशांच्या बाजूस सामाजिक परिषदेचे अधिवेशन भरवण्यास विरोध केला, आणि शेवटी तर ते स्टेज जाळले.
    - मुलींचे लग्नाचे वय १० वरून १४ ( कदाचित १६ असेल, नीट आठवत नाही) ते करणाऱ्या प्रस्तावास विरोध केला .
    - आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे खोती बिलाला विरोध केला.
    त्यामुळे मला टिळक काळाबरोबरचे वाटत नाहीत.

    सावरकरांबद्दल - "आपल्या देशालाच आपली पुण्यभू अन पितृभू मानणे" असा तुम्ही जो अर्थ घेतला तर उत्तमच, पण तो तसा घेतला गेला नाही, आणि म्हणूनच सावरकरांनी मुस्लिमांना देशद्रोही ठरवले. खरे म्हणजे या देश वगैरे संकल्पनांचे सामान्यांना काही पडलेले नसते. २ वेळेला पोट भरायची ज्यांना चिंता असते त्यांना कुठला देश आणि कुठला धर्म. त्यामुळे सामान्य हिंदू व मुस्लीम हे देशविरोधी नसतात. आणि जर एखादा असेलच तर त्यामुळे संपूर्ण समाजाला नावे ठेवणे योग्य नाही. पण दुर्देवाने सावरकरांनी मुस्लिमांविषयी आकस बाळगला. त्यांच्या आकसाने कधी-कधी तर क्रौर्याची परिसीमा पार केलेली दिसते. जसे-
    More controversially , he ( सावरकर ) asks as to why Shivaji and Rana Pratap and their soldiers didnt rape muslim women.......
    According to him , if these people had raped muslim women , it would have struck terror among muslims , and they would have thought ten times before raping hindu women ,for it would have invited terrible retaliation on their own women .
    - यामध्ये व सौदी अरेबिया च्या कायद्यामध्ये ( आंख के बदले आंख) काय फरक, यामध्ये व यामध्ये व हिटलर मध्ये तरी काय फरक.. म्हणून मला वाटत की त्यांचे विचार काळासोबत नाहीत. त्यापेक्षा गांधी अधिक योग्य वाटतात.

    पण एकावर झालेल्या टीकेला उत्तर म्हणून इतरांचे दोष काढणं ही पळवाट आहे हे तुम्ही म्हणालात ते बरोबर माझही तेच म्हणणे आहे म्हणून ...मी आधीच्या भागात म्हणालो त्याप्रमाणे ..त्यामुळे मला असे वाटते की जगात कोणीही परिपूर्ण नाही.त्यामुळे काळाच्या कसोटीवर आपणच उतरायचे ..इतरांचे विचार उतरोत किंवा न उतरोत. ..

    वैचारिक हिंसेबद्दल - हिंसा वैचारिक नसते , वैचारिक असते ती विचारांची देवाणघेवाण. . ती कधीही चांगलीच.

    ReplyDelete
  57. Anonymous3:52 AM

    अभिनंदन!!
    लेख आवडला आणि तुमच्या व Anonymous च्या प्रतिक्रियांमधूनही बरीचशी माहिती मिळाली.
    तुमचे लेख वाचनीय आहेत. मी प्रथमच भेट दिली पण लिखाण आवडले.

    लिहते रहो.

    ReplyDelete
  58. नथुरामच्या कृतीनं गांधींना हौतात्म्य मिळालं. ज्याचा पुरेपूर वापर नेहरू सरकारनं करून घेतला. गांधी म्हातारपणानं गेले असते तर गांधींना जे अतिमानवीय रूप देण्यात आलंय बहुदा तसं झालं नसतं. गांधींच्या चुका आणि अतिरेक कदाचित आपोआपच देशासमोर आला असता. शेवटी गांधीदेखील माणूस होते, पण त्यांना देव बनवण्याचं काम नथुरामच्या कृतीमुळे सोपं झालं. गेली ६० वर्षं काँग्रेससकट देशातले अनेक पक्ष त्यांच्या जीवावर भाकरीचे तुकडे मोडतायत (किंवा नोटा मोजतायत असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल). +1

    n congratess :)

    ReplyDelete
  59. बाबा, अप्रतिम पोस्ट. आणि वर दिलेली सविस्तर प्रतिक्रिया माझ्या मनातले प्रश्नांना उत्तर देऊन गेली...

    मला माहीत होत की तुझ्या ब्लॉगला वर्ष पूर्ण होतय, सो अशीच एक मस्त विचारमंथन करणारी पोस्ट अपेक्षित होती आणि हो आत्ता कळला तु पोस्ट पाडायचा सपाटा का लावला होतास ते :)
    खूप खूप शुभेच्छा भाई. असाच लिहत रहा.

    (सॉरी उशिरा प्रतिक्रिया देतोय, पण सध्या गायबच आहे नेटावरुन काही दिवस..लवकरच परत येइन)

    ReplyDelete
  60. विद्याधर, मला आपलं वाटतं कि सध्या देशाला चर्चेची नाही तर कार्याची गरज आहे....
    कदाचित आपला देश आपल्याकडे त्याचीच भीक मागत असेल...
    कधी कळणार हे आपल्याला? अजून कोण, कधी आणि किती चुकायला हवे आहे?

    ReplyDelete
  61. नमस्कार !

    मला तुम्ही माहित नाहीत .. आणि मी हि तुम्हाला ! योगा योगाने प्रथमच तुमचा ब्लॉग पाहिलाय आज...हा लेख वाचला.. संतुलित आहे बऱ्यापैकी !म्हणलं थोडं शेअर करावं ! खरंच हेतू फक्त शेअर करायचाच आहे! हे वाचून झाल्यावर वाटलं , तुम्हाला किंवा कोणालाही .. गांधी 'कळले' का ?? मलाही नाही ! पण एक गोष्ट .. गांधींनी आयुष्यात प्रामाणिक पणा दाखविला....तुम्ही आम्ही आहोत का तेवढे ? नाही..पण त्यांना तुमच्या आमच्या सारख्या 'माणसांच्या' कसोटीवर/गुणांवरच तपासायची प्रलोभनं सुटत नाहीत ! त्यांनी दलितांचे संडास साफ करण्या इतपत समर्पण दाखवले.. त्यांना श्रेय देता देता हळूच/उघडपणे त्यांच्या चुकांवर बोटं ठेवायची .. जास्तवेळ. त्यांना 'समजून' घेण्याची ताकद आपल्यात नाही हे सतत दाखवून दिलं जातं ...पूर्वीही, आजही आणि पुढेही होईल असं ! १०० % कोण आहे या जगात ? बरं , सावरकर , भगतसिंग, सुभाष बाबू .. यांच्या मार्गाने जर स्वातंत्र्य मिळालं असतं कदाचीत तर .. विविधतेत एकता असं काही आज उरलं असतं का ? खरंच काय उरलं असतं ? सहन करायला 'खरे गट्स' लागत नाहीत ? गांधीनी ते दाखवले ! गांधींना रेट करायचं तर तेवढी सिद्ध केलेली बुद्धी हवी ..बुद्धी साठी जगाला माहित असलेलं नाव आईनस्टाईन आहे, त्यांनी गांधीन बद्दल काढलेले उद्गार आपण जाणतोच ! तरीही..! गांधीनी भविष्या साठी अभूत पूर्व मार्ग दाखवला नाही ?मानवाचे अस्तित्व हा भूमितीचा प्रश्न निश्चितच नाही.. सर्वोत्तम असा एकंच मार्ग असतो ! बाकी सगळे वळसे, वेळ काढू पणा !एका हायड्रोजन/न्यूट्रोन बॉम्ब वर संपविण्यासाठी हे सगळं उभं आहे ? आणि काळाला अनुसरून वागले नाहीत म्हणजे काय हो ? गुण / तत्व हे मेटा फिजिकल नाहीत ? मग कशासाठी आणि कुणी कडे आणि कोणता 'बदल' 'बदल' म्हणुन आपण दिवा स्वप्न पाहतो ? आपल्या मतावर ठाम राहाणं म्हणजे हट्टी पणा ?..सगळ्याना सारखंच दिसतं पुढचं ?.. असं कसं होईल...समाज रेडी नव्हता पूर्वी आणि पुढेही कधी होईल असं आपलं मत आहे ? गरोदर स्त्री ज्या यातानांमधून जाते त्याबद्दल पुरुषांनी बोलण्यात काय तथ्य आहे ? गांधींना तर एका नव्या समाजाला जन्म द्यायचा होता .. ते त्यांचं मुल होतं.. ते मुल जिवंत राहिलं नाही..!यात त्यांनी केलेल्या प्रेमाचा दोष ? बाकी तुमच्या ब्लॉग ला ३६५ दिवस झाल्या बद्दल तुम्हाला शुभेच्छा ! आभारी !
    - आशिष

    ReplyDelete
  62. प्रसाद,
    खूप धन्यवाद भाऊ! पोस्ट टाकतानाच विचारमंथनाची अपेक्षा होती. पण अपेक्षेपेक्षा थोडं जास्तच झालं! :D
    भेट देत राहा! असाच लोभ राहू दे! :)

    ReplyDelete
  63. १) >> लोकांना त्यांचं चांगलं वाईट कळत असतं, तर 'नेता' हा प्रकार अस्तित्वात आला नसता. लोकांना वैयक्तिक चांगलं वाईट कळतं असं एकवेळ म्हणू शकतो आपण, पण समूहाचं चांगलं वाईट बघण्यासाठीच 'नेता' निवडला जातो. अन माणसं नेत्याचं तोवर डोळे झाकून ऐकतात जोवर त्याचे विचार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी त्रासदायक ठरत नाहीत ( हे वाक्य फक्त अतिशय खालच्या पातळीवरच्या अनुयायांबद्दल आहे, जीवनं उधळून टाकणारे अनुयायीही असतातच). पण लोकांना सामूहिक भल्याबुर्‍याची जाण असती तर सगळेच नेते झाले असते ना!
    असो. तुमचा विश्वास आहे म्हटल्यावर वादाचा मुद्दा उरत नाही.

    >>इथे तुम्ही जी आंबेडकरांची वाक्य चिकटवली आहेत, ती मला 'वैचारिक पातळीवर' विरोध करणारी वाटत नाहीत. ती आरोप करणारी किंवा जास्तीत जास्त टीका करणारी वाटतात. आणि जरी गांधींच्या विचारांचा अन त्यांच्या एकंदर पॉलिसीजचा 'वैचारिक पातळीवरचा' विरोध आंबेडकरांनी लिहिलेला असला तर तो अद्याप माझ्या वाचनात नाही. कारण मी एकंदरच आंबेडकरांचं साहित्य फारसं वाचलेलं नाही.
    आणि मला सावरकरच एकमेव वाटण्याचं दुसरं कारण हे असावं, की आजवर देशातल्या सर्व प्रमुख(?) माध्यमांनी अन विचारवंतांनी नेहमी गांधींच्या विचारविरोधात सावरकरांचीच चर्चा केलेली आहे. कारण बहुतेक सावरकर हे त्यांच्या हिंदुत्ववादी ख्यातीमुळे सॉफ्ट टार्गेट ठरतात, उलट बाबासाहेबांना गांधीविरोधी म्हणून प्रोजेक्ट करणं कदाचित राजकीय सोयीचं नाही.
    आणि सावरकरांना 'Hero Worship' करायचा जर प्रयत्न कुठे होत असेल, तर त्याला पहिला खुद्द सावरकरांचाच आक्षेप राहिल. त्यामुळे तुम्ही खर्‍या सावरकरवाद्यांपासून खुशाल अपेक्षा ठेवू शकता, त्या निश्चितच पूर्ण होतील ह्याची मी ग्वाही देतो.
    >> नथूराम अन घरे जाळणारी माणसे ह्यांच्या मानसिकतेचा तौलनिक अभ्यास करायला घेतला तर कदाचित पी.एच.डी. सुद्धा करता येईल, त्यामुळे ते मी टाळतो. फक्त एव्हढेच म्हणेन. की समूहाचं मानसशास्त्र आणि एका विशिष्ट हेतूने प्रचंड भारावून जाऊन पण पूर्ण शुद्धीवर राहून केलेलं कृत्य ह्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. जरी ती कृती वरकरणी कितीही सारखे परिणाम दाखवत असली तरी.
    त्यापुढे नथूरामना हीन दाखवण्यासाठी जो 'निशस्त्र व्यक्ती' वगैरेचा वापर झाला आहे, तो शब्दपांडित्याला धरून आहे.
    अन जेव्हा अत्याधिक अहिंसा मान्य नाही अन अहिंसा चूक होते असं नाही, ही दोन्ही वाक्ये एकाच ओळीत येतात, तेव्हा खरोखर वादासाठी मुद्दा उरत नाही. कारण माझंही तेच मत आहे. बहुतेक आपल्यात मतभिन्नता ऍक्सेप्टेबल अहिंसेच्या पातळीवर असेल. पण ती तशीच राहिलेली बरी!
    ३) >>१९४२ च्या आंदोलनांत झालेली घटना मला वाचल्याचं आठवत नाही. पण तुम्ही म्हणता त्याअर्थी नक्कीच असेल. पण मग 'डायरेक्ट ऍक्शन डे' च्या दिवशी जीनांचे अनुयायी हिंसेचा नंगानाच करताना आपल्या अनुयायांना अहिंसेचं पालन करण्यास सांगण्यामध्ये काय अर्थ होता? अन जिनांनी डायरेक्ट ऍक्शन डे थांबवावा म्हणून उपोषणाला बसून काय साध्य झालं?
    जमीन सुधारणेचा मुद्दा नेहमीच निघतो अन त्यावर माझं असं म्हणणं आहे. की होय महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांच्या हातात जमिनी होत्या. वतनं होती. ती यथोचितपणे काढून घेऊन कुळांच्या हाती दिली गेली. अनेक ब्राह्मण देशोधडीला लागून शहरात आले अन शिक्षण असल्याकारणाने नोकर्‍या करून पुन्हा संसाराची गाडी चालवू लागले. अन उरलेसुरले ब्राह्मण नथुराम अन गांधी अनुयायां(!)च्या कृपेने देशोधडीला लागले. पण मग जे अजूनही जमीनदार अस्तित्वात आहेत (जर तुम्ही कुणीच नाहीत म्हणालात तर प्रश्नच संपला, मी शांत झोपेन आज), ते कोण आहेत मग? जमिनी फक्त ब्राह्मणांकडेच होत्या का? अजूनही खेड्यांमध्ये घडणार्‍या घटना कुठे अंगुलीनिर्देश करतात?
    contd..

    ReplyDelete
  64. contd..
    आणि हा कायदा केवळ महाराष्ट्र, गुजरात अन थोड्याफार प्रमाणात कर्नाटकातच नीट राबवला गेल्याचं दिसतं. कारण उत्तरेकडे आजही जमीनदारांच्या अत्याचारांच्या बातम्या दिवसाआड येत असतात. अन बंगाली जमिनदारांच्या गोष्टीवर देवदाससारख्या कलाकृती निघतात. त्यामुळे अख्ख्या देशात फक्त महाराष्ट्रीय ब्राह्मणांकडे बोट दाखवण्याचं कारण मला कळत नाहीत. बहुतेक ते सॉफ्ट टार्गेट आहेत (देशातल्या कुठल्याही राज्याच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार सर्वांत कमी ब्राह्मण महाराष्ट्रात आहेत आणि तेही उपरोल्लिखित कारणाने विखुरलेले, त्यामुळे त्यांच्या मतांचा कुणालाही उपयोग नाही, पण त्यांना कॉमन एनिमी बनवून बरीच टकली गोळा करता येतात, पुन्हा त्यांच्याकडून संघटित विरोधही अपेक्षित नाही) म्हणून की त्यांच्या नावाखाली नथुराम, टिळक अन सावरकरांना एकाच ओळीत उभं करून झोडायला सोपं जातं म्हणून!
    अन हो उत्तरेकडे बहुतांश जमीनदार ठाकूर(क्षत्रिय) होते/आहेत अन बंगालमध्ये देखील. तेव्हा ब्राह्मणांमध्ये अस्वस्थता असं वाक्य सोडणं थोडं बेजबाबदार वाटतं!
    असो मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे, की जमीन सुधारणा कायदा नीट राबवलाच गेला नाही. तेव्हा त्यामध्ये खालच्या पातळीवरच काही त्रुटी असणं सहज शक्य आहे. त्यामुळेच खोती बिलातदेखील त्रुटी असण्याच्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर टिळकांचा विरोध असू शकतो. अर्थात टिळकांचा विरोध का होता, हे संबंधित कागदपत्रांच्या अभ्यासाशिवाय कळणं अशक्य आहे. टिळक ब्राह्मण होते, म्हणून त्यांनी विरोध केला, हे वक्तव्य बालिशपणाचं वाटतं (तुम्ही ते करत आहात असं मला बिलकुल म्हणायचं नाही.)
    तुमचा मुद्दा गांधींच्या विचारपरिवर्तनाचा होता हे मला लक्षात आहे. पण तुमची काही वाक्य मला स्पष्ट करावीशी वाटली म्हणून केली.
    बाकी, गांधींचं हे मतपरिवर्तन झालेलं मला ठाऊक नव्हतं. पण मुळात ज्या गोष्टींचा भारताला(मला अन माझ्या समविचारी लोकांना) त्रास होतोय, त्या बाबतींत त्यांचं मतपरिवर्तन झालेलं नजरेस आलं नाही, म्हणून मी तसं म्हटलं होतं.
    तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद!
    2) >>सर्वप्रथम सरसकट सगळी पापं पेशवाईच्या माथी मारणं अन त्यासाठी आगरकरांच्या एका वाक्याचा उपयोग करणं मला परिपूर्ण वाटत नाही. कारण, पेशवाईनं देशांमध्ये चालीरिती आणल्या किंवा रूढीपरंपरा आणल्या हे माझ्या ऐकीवात नाही अन दुसरं म्हणजे पेशवाईत झालेले अगणित अत्याचार कोणते हे जर तुम्ही सांगितलं असतंत तर अधिक चांगलं झालं असतं, कारण मी मोगलाईत झालेले अनन्वित अत्याचार वाचले आहेत.
    दुसरं म्हणजे 'ब्रिटीशांच्या मदतीनं सामाजिक सुधार करून घ्यावेत अन एकदा वाईट चालीरिती संपल्या..' हे वाक्य फारच आशावादी वाटतं.
    कारण पहिलं म्हणजे ब्रिटीश काही आपलं देणं लागत नव्हते. अन दुसरं म्हणजे त्यांना आपल्या सामाजिक सुधारणांमध्ये काडीचा रस नव्हता. त्यांना पहिल्या महायुद्धाने खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था मार्गावर आणायची होती. अन त्यामुळे त्यांनी दोनचार त्यांच्या दृष्टीने निरुपद्रवी बिलं पासही केली असतील. पण ती बिलं स्वकीय सरकारने पास केली नसती असं कोण म्हणतं?
    अन दुसरं म्हणजे बिलं पास करून सामाजिक सुधारणा होत नसतात, त्यासाठी समाजाचा रोष पत्करून सामाजिक मंथन घडवावं लागतं. अन ते उत्क्रांतीच्या नियमानुसार घडतंच. अहो बिलं अन कायदे स्वातंत्र्यानंतरही अमाप झाले. काय फरक पडला तत्काळ? ब्रिटीश लोक काय करणार होते त्याहून जास्त?
    असो. ह्या बाबतीतही तुमची मतं ठाम असतीलच. त्यामुळे मला वाद वाढवायचा नाही.
    आता टिळकांबद्दल,
    >- टिळकांनी " काँग्रेस" च्या अधिवेशांच्या बाजूस सामाजिक परिषदेचे अधिवेशन भरवण्यास विरोध केला, आणि शेवटी तर ते स्टेज जाळले.
    स्टेज टिळकांनी जाळलं किंवा जाळवलं, हे मला खरंच ठाऊक नव्हतं. एखादं सपोर्टिंग कागदपत्र असेल तर सांगता का? मला खरंच जाणून घ्यायला आवडेल.
    - मुलींचे लग्नाचे वय १० वरून १४ ( कदाचित १६ असेल, नीट आठवत नाही) ते करणाऱ्या प्रस्तावास विरोध केला .
    ह्म्म.. ह्या प्रस्तावाला विरोध करण्यामागचं कारण मलाही कळत नाही. पण मला ह्या विरोधाचीही अधिकृत नोंद पाहायला आवडेल. अन हा प्रस्ताव कुठे चर्चेस होता अन काय चर्चा झाली ह्याचीही नोंद असली तर उत्तमच.
    - आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे खोती बिलाला विरोध केला.
    खोती बिलाबद्दल मी वरच बोललो.
    बाकी काळाच्यापुढे टिळक नसतील पण काळाच्या मागे होते हे मी तरी उपरोल्लेखित कुठल्याही मुद्द्यावरून (लग्नाचं वय सोडता) म्हणू शकत नाही. आणि गंमतशीर योगायोग पाहा. आजच आपल्या देशात 'कन्सेन्शुअल सेक्स' साठीची मान्य वयोमर्यादा कमी करण्याचा प्रस्ताव सादर झालाय. :D
    असो. थोडक्यात, आपलं इथेही एकमत होण्याच्या शक्यता कमीच दिसतात.
    contd..

    ReplyDelete
  65. contd..
    >>सावरकरांनी मुस्लिमांना देशद्रोही ठरवले, हे वक्तव्य जेव्हा 'याल तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय' ह्या सावरकरांच्या उक्तीशेजारी ठेवलं जातं, तेव्हा त्याचं तेज थोडं कमी होतं.
    दुसरी गोष्ट जर देश वगैरे संकल्पनांचं सामान्यांना काहीच पडलेलं नसतं, तर पहिल्याप्रथम पाकिस्तान बनला नसता. त्यापुढे, जर जिनांनी मुसलमानांना चिथवलं असं म्हणावं, तर पाकिस्तानचा प्रस्ताव, जिनांनी पाकिस्तानसाठी वकिली करायच्या आधीच अस्तित्वात आलेला असल्याचं दिसतं. अन जर खरंच सामान्यांसाठी देश इतकी नगण्य गोष्ट असती, तर पाकिस्तानात कराचीमध्ये आजही 'मुहाजीर कौमी मूव्हमेंट' अस्तित्वात नसती, अन तिच्या सपोर्टवर पाकिस्तानात सरकार चाललं नसतं.
    पुढची गोष्ट म्हणजे, जर सावरकरांचं 'पुण्यभू अन पितृभू'चं इंटरप्रिटेशन लोकांना इतकंच खटकतं, तर गांधींना 'मुसलमानांना मुख्य प्रवाहातील स्वातंत्र्यचळवळीत आणण्यासाठी' 'खिलाफत चळवळ' सुरू करण्याची गरज का पडते, ह्याचा परामर्श घेणं आवश्यक ठरतं.
    कारण, जर देशातल्या मुसलमानांसाठी देशाच्या स्वातंत्र्यचळवळीपेक्षा, तुर्कस्तानातल्या खलिफाला पदच्युत केल्याचा (जे एका धार्मिक पण डोळस पुरोगामी मुस्लिम नेत्यानंच-अतातुर्कनं-केलं होतं) निषेध करणं जास्त महत्वाचं वाटतं असं जर खुद्द देशाच्या स्वातंत्र्यचळवळीचे तत्कालीन सर्वेसर्वा गांधींनाच वाटत असेल, तर सावरकरांच्या सिद्धांताकडे वेगळ्या नजरेनं पाहणं आवश्यक ठरत नाही का?
    बाकी दोन वेळच्या जेवणाची भ्रांतवाला सिद्धांत मनाला पटून जातो हो, पण जेव्हा फाळणीनंतरच्या हिंसाचाराबद्दल वाचलेल्या गोष्टी अन जगभरात ठिकठिकाणी चाललेली थैमानं दिसतात तेव्हा माणसाला पोटाच्या भुकेपेक्षासुद्धा जास्त कधीकधी काहीतरी महत्वाचं असतं, ह्याचा विश्वास पटतो.
    >>सावरकरांनी मुस्लिमांविषयी आकस बाळगला
    हे पूर्णपणे ढोबळ वक्तव्य आहे. त्यांच्या आकस बाळगण्याची कारणामीमांसा जाणून घेण्यासाठी 'सहा सोनेरी पाने' वाचावी लागतात अन अंदमानच्या जेलमध्ये त्यांच्यासोबत घडलेल्या घटना जाणून घ्याव्या लागतात.
    अंदमानच्या जेलमध्येही सावरकरांनी मुस्लिम कैदी वॉर्डन्सचे पक्षपाती निर्णय पाहिले होते. अन त्यांचं मुद्दाम त्रास देणं अन ब्रिटीशांकडून मिळणारी अग्रक्रमाची वागणूकही पाहिली होती.
    त्याहीपुढे ऐतिहासिक कालखंडातही भारतवर्षावर झालेलं कुठलंही इस्लामी आक्रमण रामराज्य देणारं नव्हतंच. उलट सर्वप्रकारची संपत्ती लुटून नेणारं होतं. त्यामुळे सावरकरांचा सोनेरी पानेमधला दिसणारा 'आकस' त्या सर्व गोष्टींतून येतो.
    पण पुरोगामी मुस्लिमांबद्दल सावरकरांची तक्रार नसल्याचं त्यांच्या अतातुर्कची स्तुती करणार्‍या निबंधातून जाणवतं. अन 'याल तर तुमच्याबरोबर अन नाही तर तुमच्याशिवाय' ह्यामध्येही पराकोटीचा आकस दृष्टीस पडत नाही.

    पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही जो एका इंटरनेट फोरममधला मजकूर चिकटवला आहे. त्याचा उगम सहा सोनेरी पाने मध्ये आहे. अन तुम्ही जो मजकूर पेस्ट केला आहे, तो एका माणसाचं त्यावरचं मत आहे, ते मूळ उतार्‍याचं भाषांतरही नाही.
    सावरकर तिथे मुस्लिम आक्रमकांच्या रणनीतीचा ऊहापोह करून म्हणतात की मुस्लिम आक्रमकांनी हिंदूचा परस्त्रीदाक्षिण्याचा गुण हेरला होता. अन त्याचा पुरेपूर फायदा उचलून कधी मुस्लिम स्त्रियांना मानवी ढाल म्हणून वापरून तर कधी हेर म्हणून वापरून त्यांनी भारतीय राजांचं नुकसान केलं. जे पूर्णतया सत्य आहे.
    contd..

    ReplyDelete
  66. contd..
    त्याचबरोबर ते इतरही गोष्टींचा उल्लेख करतात, जसं नको तिकडे सर्वधर्म सहिष्णुता कशाप्रकारे हिंदू राजांना महाग पडली वगैरे! अन हे उदाहरण तर सर्वांनाच ठाऊक आहे, की घौरीनं पृथ्वीराजावर १७ आक्रमणं केली अन पृथ्वीराजानं त्याला १७ वेळा हरवून पकडून बाईज्जत सोडलं. पण अठराव्यांदा घौरी जिंकला अन त्यानं मात्र पृथ्वीराजाचे डोळे काढून त्याला मारलं. त्याचप्रमाणे सोमनाथाचं मंदिर अनेक वेळा लुटलं गेलं, पण हिंदू राजाने नंतर तिथे मशीद बांधण्याची परवानगी दिली अन नको तिकडे मनाचा मोठेपणा दाखवून शेवट ओढवून घेतला. हा मोठा फरक सावरकर इथे चर्चितात.
    सावरकर त्या उतार्‍यामध्ये १६०० च्या शतकातील रणनीतीची चर्चा करतात. ज्या काळामध्ये बहुपत्नीत्व कुठल्याच धर्मामध्ये निषिद्ध नव्हतं. त्या चर्चेदरम्यान ते म्हणतात, की ह्या परकीय आक्रमकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं असतं तर त्यांना पुन्हा असले प्रकार करण्याची हिंमत झाली नसती.
    त्यांच्या 'जशास तसे' ह्या वाक्प्रयोगामध्ये दुर्दैवाने बलात्काराचाही समावेश होतो अन हे माझ्या आधुनिक मनाला निश्चितच खटकतं. पण त्यांनी मांडलेले सद्गुणीपणाचे मुद्दे निश्चितच मनाला पटणारे आहेत. हिंदू राजांची तत्व इतकी नैतिकतेच्या पातळीवर उच्च होती की अत्यंत खालच्या पातळीवरून लढणारे मोगल बरंच नुकसान करू शकले.
    त्याचबरोबर ते बाजीरावाच्या मस्तानीपासून झालेल्या मुलाला हिंदू करू न देणार्‍या ब्राहणांवरही टीका करतात. इथे ते मोगलांच्या अन इस्लामी आक्रमकांच्या युद्धनीतीला देता येऊ शकणार्‍या उत्तरांबद्दल चर्चा करतात अन कुठे काय चुकलं ह्याची कारणमीमांसा करतात.
    त्यांच्या त्या उतार्‍याचा इथे फार उहापोह करणं शक्य नाही अन मला ह्यापुढे स्पष्टीकरण द्यायचं नाही. पण बरेचदा, शेंडा-बुडखा न देता जी विधानं चिकटवली जातात ते दिशाभूल करणारं ठरतं.
    आणि सौदी अरेबिया अन हिटलरची सावरकरांशी तुलना करणं हे चुकीचं ठरेल, कारण पहिली गोष्ट म्हणजे सौदीचे नियम अन हिटलरचे नियम ह्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. शरिया अन वंशश्रेष्ठता ह्यामध्येदेखील फरक आहे. अन त्याहीपुढे जाऊन 'आंख के बदले आंख' हा जो शरिया कायद्यातील नियम आहे, त्याची तुलना मुस्लिम आक्रमकांवर परतून आक्रमण करण्याच्या रणनीतीशी करणं मला योग्य वाटत नाही. आणि त्यातून सावरकर १६०० च्या शतकात अवलंबलेल्या युद्धतीनीबद्दल बोलतात अन त्याच नीती तत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्याची कुठेही वकिली करत नाहीत.
    जगात कोणीही परिपूर्ण नाही.त्यामुळे काळाच्या कसोटीवर आपणच उतरायचे ..इतरांचे विचार उतरोत किंवा न उतरोत. ..
    हे जरी सत्य असलं अन मला पूर्णपणे पटत असलं, तरी बेसिकली सावरकरांचे अन अतातुर्कचे विचार मला हेच करायला सांगतात. त्यामुळे मी त्यांना माझा रोलमॉडेल मानू शकतो.
    अन गांधींचे विचार मला न पटणार्‍या बर्‍याच गोष्टी सांगतात, तत्कारणात मला त्या मान्य करता येत नाहीत.
    हिंसा वैचारिक नसते..ह्याबद्दल गांधींची कदाचित वेगळी मते असू शकतात. कारण गांधींची प्रत्येक गोष्ट अगदी ब्रह्मचर्यदेखील वैचारिक पातळीवर होतं.
    >>वैचारिक असते ती विचारांची देवाणघेवाण. . हे मात्र पटलं.
    अन ह्या देवाणघेवाणीतून बरंच काही नवं शिकायला मिळालं, ह्याचा आनंद वाटतो.
    माझ्या मते ह्यापलिकडे ह्या विषयावर इथे चर्चा न करणं सयुक्तिक ठरेल. तरी तुम्हाला चर्चा करायची असेल अन तुम्हाला तुमची ओळख द्यायची इच्छा असेल तर तुम्ही मला थेट इमेल करू शकता. माझा इमेल पत्ता माझ्या प्रोफाईलपेजवर मिळू शकतो.
    एव्हढा वेळ काढल्याबद्दल धन्यवाद! भेट देत राहा!

    ReplyDelete
  67. तृप्ती,
    ब्लॉगवर स्वागत! तुमची प्रतिक्रिया वाचून खूप आनंद वाटला. खूप धन्यवाद!
    भेट देत राहा..असाच लोभ राहू दे! :)

    ReplyDelete
  68. विक्रम,
    तुलाही विचार पटले ह्याचा आनंद वाटला.
    अनेक आभार भाऊ! :)

    ReplyDelete
  69. सुहासा,
    धन्यवाद रे भाऊ! अरे सपाटा लावताना पार सपाट व्हायची पाळी आली होती रे! :P
    खूप खूप धन्यवाद रे! तुम्ही सगळे पाठीशी आहात हे ठाऊकच आहे! :)

    ReplyDelete
  70. अनघाताई,
    कार्याची गरज तर आहेच. पण कधीकधी दोन वेगळ्या तापमानाचं पाणी संपर्कात आलं की त्यांची तापमानं समान व्हायला उष्णतेचं वहन होतं, तद्वतच विचारांचं वहन होणं बहुतेक गरजेचं होतं. बरेचदा खूप विचारवहन होऊनही तापमान समान होत नाही हे दुर्दैव आहे, पण बरेचदा दुसरा पर्याय नसतो! :(

    ReplyDelete
  71. आशीष,
    ब्लॉगवर स्वागत! तुम्ही १०० व्या पोस्टवर आलात, आनंद वाटला. माझा लेख तुम्हाला थोडाफार का होईना संतुलितही वाटला, ह्याचा आनंद झाला.
    तुमची प्रतिक्रिया वाचून मला तुमच्या चांगुलपणाबद्दल खात्री पटली. अन गांधींच्या माणसातल्या ज्या चांगुलपणावर विश्वास होता, तो तुमच्यात आहे हे दिसलं.
    तुम्ही फक्त शेअर करताय अन त्यामुळे त्यात कुठेही तुम्हाला चर्चा अपेक्षित अन इच्छित नाही हे मी जाणतो. त्यामुळे फक्त मी माझ्या ब्लॉगवरच्या प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर लिहितो, त्याप्रमाणे तुम्हालाही लिहितो.
    तुमची प्रतिक्रिया भावनिक दृष्टिकोनातून आहे अन मला त्याचा पूर्ण आदर आहे. मीदेखील कित्येकदा आवडत्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना भावनेत वाहून जातो अन तो मनुष्यस्वभाव आहे. अन गांधींबद्दल बोलण्यासाठी गांधींइतकं मोठं व्हावं हे जरी कितीही छान वाटलं तरी सद्यस्थिती पाहता ते मला पटत नाही. कारण माझ्यामते आज गांधींना प्रमाणाबाहेर मोठं करण्यामागे कुणाचं गांधींवरचं प्रेम नाहीये, तर राजकीय हेतू आहेत. अन त्यातून लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करण्याखेरीज काहीच साध्य होत नाही. तत्कारणात, दुसरा दृष्टिकोनही लोकांसमोर माझ्यापरीनं आणावा असं मला वाटतं.
    मी कधीच मला गांधीच काय, सावरकरही समजले असं म्हणत नाही. पण त्यांच्या कृतींचे माझ्या विश्वाशी निगडित परिणाम अभ्यासणं अन लोकांसमोर मांडण्यामध्ये मला काही गैर वाटत नाही.
    बाकी तुमची अगदी मनापासून असलेली प्रतिक्रिया फारच आवडली. पण खरंच मी इतक्या भावनिक अन काव्यात्म पातळीवरून देशाच्या इतिहासाबद्दल विचार करू शकत नाही.
    तुम्हाला कुठेही दुखावलं असल्यास क्षमा करा! माझा तसा हेतू बिलकुल नव्हता!
    प्रतिक्रियेबद्दल आभार! अन भेट देत राहा! :)

    ReplyDelete
  72. सर्वांसाठी सूचना ही की ह्यापुढे इथे आलेल्या कुठल्याही निनावी प्रतिक्रियेला उत्तर दिलं जाणार नाही. माझ्याकडे खरंच वेळाचा तुटवडा आहे. ब्लॉगवर नाव नको असल्यास कृपया मला वैयक्तिक इमेल करावा!
    धन्यवाद!

    ReplyDelete
  73. बाबा अभिनंदन....असंच येऊदे....

    ReplyDelete
  74. अवधूत,
    धन्यवाद रे भाऊ!!

    ReplyDelete
  75. विभी! काय बोलू? काही अचानक आलेल्या घरगुती अडचणींमुळे प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला.तुम्ही लिहिलेलं आवडतं.समतोल तुम्ही कधीच सोडत नाही.तुम्हाला प्रत्यक्षही भेटलोय.एवढा विचार करणारा माणूस चांगला रसिक आहे हे बघून जास्त आनंद झाला.मला अतिरिक्त चर्चा सुरू झाल्या की ज्याम बोअर होतं खरंतर! (तो माझा दोष असावा)पण इथे प्रतिक्रियाही खूप उदबोधक वाटल्या.आणि एक... तुम्ही लिहा हो! वेगात लिहिलंत तरी तुमची मांड सुटत नाही असं माझं मत आहे.सगळ्या पोस्ट्स मला ताकदीच्या वाटल्या आहेत.अनेक अनेक शुभेच्छा!

    ReplyDelete
  76. विनायकजी,
    :)
    तुम्ही एव्हढ्या आवर्जून प्रतिक्रिया लिहिलीत त्याचा आनंद झालाच..इतकं सारं वाचून एकदम छान वाटलं पण तेव्हढीच जबाबदारीही आल्यासारखं वाटलं...
    खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  77. ब्लॉगच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा आणि शंभरीबद्दलही!

    ReplyDelete
  78. सुषमेय,
    अनेक आभार! असाच लोभ राहू द्या! :)

    ReplyDelete
  79. अरे देवा! काहितरी घोळ झालेला दिसतोय विद्या. तुझ्या अभिनंदनाची दिलेली पावतीच कुठे दिसत नाहीये. :(

    ब्लॊगच्या वर्षपूर्ती प्रित्यर्थे अभिनंदन व भरभरून लिहीण्यासाठी पोतडीभरून शुभेच्छा! मोजू नकोस रे, तू लिहीत राहा. :)

    ReplyDelete
  80. श्रीताई,
    अगं इथे नाही दिसली तरी तुझ्या शुभेच्छा आहेतच हे ठाऊक आहे मला! :)
    नाही मोजत आता, पहिले शंभर म्हणून नवलाई ;)

    ReplyDelete
  81. तुझा पोस्टची वाचला आणि त्यावर आलेल्या पोस्टपेक्षाही लांब लचक असलेल्या कमेंटही वाचल्या... :) शेवटी काय प्रत्येकजण त्याच्या जागी योग्यच असतो लक्ष्यात ठेव... मग गांधी काय किंवा गोडसे काय.... सावरकर काय आणि बाबा काय... कसे काय? :)

    ReplyDelete